बापु, निसर्गोपचार आणि राजाभाऊ. यांचा तसा चांगला संबंध. हा त्यांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय.
आता लोका सांगे ब्रम्हज्ञान यातला हा राजाभाऊंचा प्रकार. (निसर्गोपचाराचा त्यांचा अभ्यास ते काही केल्या अंमलात चुकुन सुद्धा आणत नाहीत. )
उरळीकांचन मधल्या निसर्गोपचार आश्रमात मिळणारे जेवण त्यांच्या आवडीचे.
पण .
जेव्हा जेव्हा राजाभाऊंनी सोलापुर रस्तावरुन जातांना तेथे आत जेवणासाठी वळण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा त्यांच्या बायकोने , त्यांच्या मुलाने तो हाणुन पाडलेला.
ताडीवाला चौकामधल्या बापु भवनात नास्ता, जेवण, चांगले मिळते असे ते जाणुन होते. पण तेथे जाण्याचे काही जमत नव्हते. आज राजाभाऊंनी अखेरीस ते जमवुन आणलेच.
खरं म्हणजे ते जेवायला निघाले होते विमाननगर मधल्या "कोकम" मधे. ( कोकम बंद झाले हे त्यांना नंतर कळले )
रस्तात जाताजाता राजाभाऊंना अचानक बापु भवना मधल्या जेवणाची आठवण झाली. आणि आज त्यांचे नशीबही चांगले होते. ती तयार झाली.
आरोगदायक, अत्यंत साधे पण रुचकर, चविष्ट सात्विक जेवण, पोटाला , शरीराला बाधुच शकत नाही असे.
तोंडल्याची भाजी, चवळीची उसळ, टॉमेटोची रस्सेदार भाजी, भात, कोशींबीर आणि पोळ्या. सोबत ताक व फळे,
सोबत त्यांनी आवळा, लिंबु, आल्याचे सरबत घेतले.
जेवण झाले तरी त्यांचा पाय काही तेथुन निघता निघत नव्हता. काऊंटरजवळ ते घुटमळत राहीले, त्यांचा जीव शेंगदाणा लाडुत अडकलेला.
आता ते एकाच बैठकीत चारी चार लाडु केव्हा संपवणार आहेत हे बापुच जाणे.
No comments:
Post a Comment