ग्यास नाखुशीने
लाईटरशी भांडत भांडत पेटतो ,
भाजलेला रवा
दह्यामध्ये फुरंगटून बसतो,
धुतलेला तवा
अट्टाहासाने
पुन्हा नळाखाली पडलेला असतो
आणि
बाहेर येरेझारे घालत
मधूनच बिस्किटे बघणाऱ्या
राजाभाऊनच्या लक्ष्यात येतं
कि रोजच्या धावपळीतून
आज
वहिनींची पण सुट्टी.......
राजाभाऊंनी "राग आलायं " लिहील काय आणि दुसऱ्याच क्षणी शीघ्रकवयित्री सुरंगा दाते यांनी अप्रतिम कविता काय रचली.
वहिनीनां काय, सुट्टी घ्यायला काहीही लहानसे देखील कारण पुरते.
"आत्ता त्यांनी सांगितलयं ना सुट्टी म्हणुन मग ... "
No comments:
Post a Comment