Saturday, September 12, 2015

साऊथ ऑफ विंध्याज

केवळ आणि केवळ सर्वसाक्षी परमश्रद्धाळु श्री श्री राधेगुरु मॉं साक्षी आहेत , आज "


साऊथ ऑफ विंध्याज " मधे राजाभाऊंनी जेवणाची मजा किती लुटली त्यासाठी. आनंद , परमानंद.
एक तर ताटातले सर्व पदार्थ आवडीचे ( एक सोडुन, पालकची भाजी ) त्यात परत मस्त माहोल. मग काय राजाभाऊंनी आडवा हात मारला.
एक वाटी पायसम आणि आणखीन एक वाटी पायसम, परत एक वाटी पायसम. अवियल, व्हे.स्टू, भेंड्याची भाजी, दही भात, सांबार भात, लेमन सेवया, एक वाटी घट्ट दही, सोबत अनेक प्रकारची लोणची. ह्या "साऊथ ऑफ विंध्याज " मधे जाण्याचे आणखीन एक कारण होते. अप्पम. जेवणाच्या टेबलाजवळ एक टॉली उभी रहाते , तिच्यात मग अप्पम बनवत रहातात. अप्पम तयार झाला रे झाली की डायरेक्ट पानात, गरमागरम. मग काय अप्पम वर अप्पमवर राजाभाऊंनी जो ताव मारला की बस रे बस.
स्थान ग्रहण केले. समोर एक गृहस्थ पाण्यानी भरलेला मग आणि भांड घेवुन उभे. गुलाबपाण्यानी हात धुवायचे व सुवासिक हातांनी भोजन ग्रहण करायचे.
आधी समोर आला तो ताकाचा एक ग्लास. ताक बाकी मस्तच होते, अजुन एक ग्लास चालले असते. त्यानंतर "आरंभ" समोर यायला सुरवात झाली. मस्तपैकी गरमागरम कांद्याची भजी. येथे जरा राजाभाऊंचा गोंधळ उडला, कांद्याची भजी खावुन झाल्यानंतर त्यांनी "स्टार्ट्र्स " आणायला सांगितले. मग त्यांना कळाले की कांदा भजी हीच स्टार्ट्र्स होती . मग समोर आले ते रसम, एकदम कडक. त्यानंतर भोजनाचे भरलेले ताट. सोबत घट्ट दही आणि दही भात. शेवटी सांबारभात, लेमन सेवया आणि मग पुनरागमन.
जेवण एवढे आवडले, एवढे आवडले की बोलायची सोय नाही. आज राजाभाऊ अगदी समाधानाने जेवले.
पण परत जाणॆ नाही. थाळीचा दर बघुन जीभ बाहेर येते.

लक्ष असुं दे मॉंजी लक्ष असुं दे

विलेपार्ले रेल्वेस्थानकामधे लोकल शिरली. उभी राहिली. अगदी सरकत्या जिन्यासमोरच्याच डब्यातुन राजाभाऊ उतरले, नेहमीच्या सवयीनुसार सरकत्या जिन्याकडे वळले. सरकता जिना बंद आहे हे त्यांना कळायला काही काळ जावा लागला.
पुढची पाचेएक मिनीटे श्री श्री राधेगुरू मॉंचा धाव करण्यामागे गेला.
सुरु होवु दे रे , मॉं सुरु होवु दे. लक्ष असुं दे मॉंजी लक्ष असुं दे. वजनामुळे जिने चढणे होत नाही, मॉंजी लक्ष असुं दे.
पण ते सरकत्या जिन्यांवर प्रार्थनेचा काहीच परीणाम झाला नाही, ते तसेच ढिम्म ते ढिम्मच.
मग राजाभाऊंच्या डोक्यात प्रकाश पडला, अरे आज मॉं आपली परीक्षा बघत आहेत. आपल्या भक्तांचे त्यांना फार काळजी आहे. मग हळूहळु, थांबत थांबत जिने चढुन ते वर गेले.

Monday, September 07, 2015

ख़ुश हूँ कि मेरा हुस्ने तलब काम तो आया
ख़ाली हे सही मेरी तऱफ जाम तो आया

काफ़ी है मेरे दिल के तसल्लीको येही बात
आप आ न सके आप का पैग़ाम तो आया

अपनोने नज़र फेर ली दिल ने दिया साथ
दुनिया मे कोई दोस्त मेरे काम तो आया

वो बात हो एहसान हो या मेरी कशिश हो
डूबा हुआ ख़ुर्शीद सरे शाम तो आया

लोग उनसे ये कहते हैं कि कैसे है "शकिल" आज
इस हुस्न के सदक़े मे मेरा नाम तो आया

रात्र काळी,घागर काळी,यमुना जळे ती काळी हो माय !

रात्र काळी,घागर काळी,यमुना जळे ती काळी हो माय !.


अलिकडे केव्हा तरी कोणत्यातरी पुस्तकात या गौळणीचा ओझरती उल्लेख वाचला होतो, मग ते गाणे तुटक तुटक डोक्यात नुसते भिरभिरत राहिले. याचा अर्थ काय उमजत नव्हता. 


रात्र काळी, हो ती काळी असते, काळीकुट्ट असते, जंगलात, पर्वतमाथावर, दरीत, गुहेत, गुंफात, लेण्यातल्या मुक्कामात अनुभवली होती. पण यमुना काळी ? घागर काळी ? गोऱ्यागोमट्या कृष्णसखीची घागर काळी ?


ज्या यमुनेच्या तीरी कृष्णाच्या मुरलीच्या नादाने भुलुन जावुन त्या साऱ्याजणी गोपीकृष्णासंगे रासाचे नृत्य करायचे त्या यमुनेचे रुप कसे हे असे काळॆ ? मग या अश्या ह्या  नदीकाठी कश्या काय या लीला घडत असतील ? विरहणी कश्या बहाणे काढुन कृष्णसख्याला भेटायला येत असतील ? या यमुनेचे रुप तर कसे साजरे, लाजरे, गोजीरवाणे, देखणे हवे . यमुना काळी ? रात्र काळी ? घागर काळी ? जेथे कृष्ण तेथे तर सर्व कसे आनंदमय असायला हवे.


मग ही यमुना अशी यमुना-कालिंदी का ? का ? का ? 


मग त्याचे उत्तर दुर्गाबाई भागवतांच्या "पैस" मधे सापडले.


"यमुना नि दु:ख याची सांगड परंपरेने घातली आहे. मरण, विरह, निराशा यांचे कल्लोळ तिच्यात सतत परंपरेने उठवत ठेवलेले आहेत . भयाणाची जाण तिला पाहूनच होते. 


पुढे त्या लिहितात,


" यमुना नि मृत्यू यांची सांगड वैदिक यमयमीच्या भग्न प्रेमकथेत आहे. लहानबहिण वडील भावावर प्रेम करते. त्या काळी हे प्रेम