Thursday, October 29, 2009

श्याम की सूरतीया बिसरत नाही आणि "शिवार" मधे डोकवल्या शिवाय राहवेना

आज राजाभाऊंनी बढीया गाणॆ ऐकले. राग नंद आणि नायकी कानडा. दोन्ही राग आवडते. आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मधे "महाराष्ट्र ललित कलाकेंद्र" आयोजीत श्रीमती. श्वेता हट्टंगडी-किलपाडी यांचे गाणॆ होते.

पण त्या तिथे ते एक गडबड करुन राहिले. नेमके सोबत जी.ए.कुलकर्णींनी अनुवाद केलेले व कॉनराड रिक्टर ने लिहिलेले "शिवार " हे पुस्तक घेवुन गेले.

"आता खूप दूरवर रानात भूतांच्या मेणबत्या लागल्याप्रमाणॆ सूर्याचा शेवटाचा लालसर उदास प्रकाश होता. आता तोही पुसला गेला व रान एकदम काळवंडले ... "

अरे , येथे ही याच प्रहराचे राग , डोळे पुस्तक काही सोडवेना आणि कानाला काही गाणॆ ऐकल्यावाचुन राहवेना, सालं भलतचं त्रांगडे होवुन गेले. ही उर्मी फार वाईट असते.

बा मना,  एका वेळी एकच काम कर रे, क्षणस्थ हो रे बाबा. आपल्या मनाला त्यानी दटवेले. एकावेळी दहा कामे करायला हे काही तुझे कार्यालय नाही. एकावेळी एकच.

मग पुस्तक सरळ मग पुढच्या खुर्चीवर ठेवुन त्यांनी गाण्याचा मस्तपैकी आस्वाद घेतला.



मेरो पीया ...

Wednesday, October 28, 2009

गंमत जम्मत


महाराष्ट्र, हरियाणा आणि अरुणाचल प्रदेश. तिन्ही राज्यात निवडणुकीचे निकाल एकाच दिवशी लागले.
हरियाणा आणि अरुणाचल प्रदेशात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेवुन झाली देखील, वरती विधानसभेत सरकारने  बहुमत सिद्ध करुन दाखवेल देखील.

महाराष्ट्रातील घोळ अजुन संपायला मागत नाही. राजकीय ***लीला व नौटंकीचा शेवट व्हायचा कधी ? सरकार आपल्या कामाला सुरवात करणार तरी कधी ? शपथविधीस नाताळाचा मुहुर्त धरायचा बेत आहे की काय ?

आता मात्र आपल्या साहेबांचा कंटाळा येत चालला आहे. लवकर निवृत होतील तर बरे.

Monday, October 26, 2009

ही नाही तर ती तरी, चंद्र आणि गुरु यांची युती

गेले दोन-तीन दिवस झाले आकाशात एक नाट्य रंगतेय,

तेजस्वी गुरु , चंद्रकोरीच्या जवळ जवळ येत चालला आहे.  येत्या एक दोन दिवसात त्यांची युती असावी.

Saturday, October 24, 2009

फ़िराक़

आज , आत्ता शेवटी "फ़िराक़ " चित्रपट पाहिला, जे काही दाखवले गेले आहे ते जणु घडलेच नाही असे मनाचे खोटे समाधान करत.

तू ही जब ख़ंजर-आज़मा न हुआ

इक बार दोस्तों पे ज़रा एतबार कर
फिर देख तेरी पीठ पे ख़ंजर भी आयेगा । - आबिद साबरी

हम कहां किस्मत आज़माने जाए ?
तू ही जब ख़ंजर-आज़मा न हुआ - गालिब


जनता चालवते तो ख़ंजर नसतो. ती असते मास्तरांची छडी. ( आमच्या दामले मास्तरांच्या छडीचे वळ अजुनही हातावर जाणवतात, पण एवढा मार खावुनही गणितात फक्त शुन्यच कळले ).

उघड्या डोळ्याने ती जनता काय चाललय हे पहात असते, जाणीवपुर्वक निवड व निवाडा करत असते.
गरज असते ती आत्मपरिक्षण करण्याची, झालेल्या चुका खुल्या दिलाने कबुल करायची. संघटनेच्या विचारांशी ज्यांचे देणॆ घेणॆ नाही, मागुन येवुन प्रबळ झालेले अश्यांना दुर सारुन पुर्नबांधणी करण्याची.

ग़म का तूंफॉ भी़ गुज़र ही जायेगा
मुस्कुरा देने की आदत चाहिये ।

Friday, October 23, 2009

काय गंमत आहे

दहा वर्षापुर्वीचा त्यांचा वाईट कारभार विसरायला लोक अजिबात तयार नाहीत, अजुनही त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल अविश्वास आहे तर दुसरीकडॆ यांनी कसाही कारभार करो वा न करो , लोक त्यांनाच निवडुन देणार.

Thursday, October 22, 2009

शेवटी

तुम्ही गेल्या दहा वर्षात किती निष्कीयपणे कारभार करत आहेत हे महत्वाचे नाही, तुम्ही निवडणुका कश्या रीतीने मॅनेज करता ते खरं.

शेवटी जो जीता वो सिकंदर

खर म्हणजे

खर म्हणजे या पाच वर्षात एक नेता खुप काम करतांना दिसत होता, ते म्हणजे श्री. उद्धव ठाकरे.

पण ...

भावोजी , वाईट वाटुन घेवु नका

सर्व वहिनींनी आता सुटकेचा निश्वास सोडला असेल.

पैठण्या त्यांना मिळण्यापासुन त्या वंचीत झाल्या असत्या ना !

13

13 हा आकडा शिवसेनेला लकी असल्याचे सांगितले जात होते. १३ तारखेला निवडणुक असल्याने त्यांना चांगले यश मिळेल असे म्हटले जात होते.

पण हा १३ आकडा चक्क मनसेला फळला.

Wednesday, October 21, 2009

बारागावच्या बाराजणी ......

बारागावच्या बाराजणी, बारामतीत यांचे धनी .

उद्याला निवडुन आलेले अपक्ष व बंडखोर आमदार नक्की काय करतील ?

Monday, October 19, 2009

किल्ले पहावे बांधुन - अभिरुची, भिडे बागेत


ढोलकीवादन - सौ. निवेदिता मेहंदळे

आत्ताचा "वन्स मोर " हा केवळ ढोलकीवादनाला. राजाभाऊंचे एकच मागणॆ.

पाडवा पहाट- सौ. प्रतिमा इनामदार, संजीव मेहंदळॆ व सहकलाकारांसमवेत

हवेहवेशी वाटणारी ती बोचरी थंडी, तो सुखद गारवा, ते अभ्यंग स्नान, बायकोने चोळुन चोळुन लावलेल्या उटण्याने ( हे सारे आता उरले आठवणी पुरते , त्यात परत उटणे कुठेशी ठेवले आहे आठवत नाही,( दिवाळी संपली की नंतर सापडॆल कुठे तरी, ही अशी माझी आठवण !) ) आणि मोती साबणाने ( हा साबण मात्र खरा ) , मग नविन कपडॆ घालुन ’पाडवा पहाटेला " भिडॆ बागेत जाणॆ.

भिडे बागेत जाणे ते सौ. प्रतिभा इनामदार, संजीव मेहंदळॆ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेला मराठी गीतांचाअप्रतिम कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी, दिपावलीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी.

उन्ह चढत गेली की या सुमधुर गीतांचा कैफ ? सांगणे कठीण व्हावे.

रसीकांचे केवळ दाद देणारे दोनच शब्द. आणखी काय हवय !






वा राजाभाऊ वा. मजा आली.

बढीया.

दिल खुष हुवा.

सजा एकच


ज्या मुखाने हा रसस्त्राव रंगकाम करतो त्या मुखात निखाऱ्यांचा तोबारा भरणॆ

हे सारे केवळ उपचारापुरते




साधी , प्राथमिक काळजी सर्वांनीच घ्यायला हवी होती.

Saturday, October 17, 2009

दिवाळी रात्र

सुरेल सुरवात झालेल्या दिवसाची रात्र ही त्याला साजेशीच रंगीन हवी. वरुन आज पुणॆ शहराचे काय सुंदर रुप दिसत आहे




दिवाळी पहाट


पहाट अशीच सुरेल होवुन दररोज यावी. दररोज ही पहाट ललत, देसकार, विभावती, जौनपुरी घेवुन यावी, रोजची पहाट हि दिवाळी पहाट असावी, डॉ.अश्विनी भिडे देशपांडेंच्या स्वरांनी भारलेली असावी, मंत्रमुग्ध करुन सोडणारी असावी.

"मधुकंस " या संस्थेने आयोजीत "दिवाळी पहाट" ला जाण्याचे राजाभाऊंनी चार दिवसा पासुन वेध लागले होते. पण आयत्या वेळी त्यांनी कच खाल्ला, लांब जाण्याचा कंटाळा केला व ते भल्या पहाटॆ पावणॆसहा वाजता घराजवळील अभिरुची गार्डन मधे "दिवाळी पहाट " कार्यक्रमास पोहोचले. पण तेथे त्यांचे काही मन लागेना. मग ते पोचले गरवारे महाविद्यालयात.

काय गाणे रंगुन राहिले होते. वा . मजा आली.

Thursday, October 15, 2009

बेने इस्त्रायलींची पुरी



यंदाला नक्कीच दिवाळी नंतर राजाभाऊंनी ८-१० दिवस उरळीकांचनला निसर्गोपचार आश्रमात जावुन रहायला लागणार आहे.

चारोळी, वेलची, केसर, किसमीस, बदामपिस्ताचे सारण भरलेल्या या रंगबेरंगी छटा असलेल्या, शुद्ध तुपात तळालेल्या या करंजा करणॆ फार खटाटोपीचे काम. त्यात परत हे खाणॆ व पचवणॆ येरागबाळ्याचे काम नोहे.

गेले दोन दिवस ते घरात चाललय.

बायकोला लागलय येड , त्यात राजाभाऊंची आत्याबाई व तिचे यजमान तिला फितुर. चौघांची मेहनत. एकाचा आडवा हात.

तेव्हा दिवाळीला फराळाला जरुर येणॆ.


Wednesday, October 14, 2009

नक्षलवाद्यांच्या क्रुरतेला बळी पडलेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांसाठी - आम्ही सारे तुमच्या दुःखात सहभागी आहोत.

.








.

दिवाळी म्हणजे "च चकलीतला "


हंस, नवल आणि आवाज


वाचनालय केव्हा बरे दिवाळी अंक द्यायला सुरवात करणार आहे ?

वाचनालय उघडण्याच्या जरा आधी जावुन नंबर लावावा, अंक बाहेर काढले की त्यावर झडप घालुन आवाज, किंवा हंस किंवा नवल आपल्या ताब्यात घ्यावा.

समाधानाने घरी जावे.

आज प्रतिक्षा संपली.

बाबांना बोनस मिळाला आहे, हे आईला न सांगता कळायचं.

एक दिवस बाबा खुशीत घरी यायचे. आल्या आल्या गालावर चापटी मारायचे. "काय रे चोरा, नुसता हुंदडातोस ना ! चल , सायकल घेवु तुला ! " . बाबांना बोनस मिळाला आहे, हे आईला न सांगता कळायचं. तिची लगबग वाढायची. - फुलपाखरु, लोकप्रभा दिवाळी, ले. प्रविण टोकेकर.

एक छान लेख.

कितीही पगार मिळत असला तरी मनात कुठे तरी वाटत रहाते, दिवाळी सणात आपल्याला काहीतरी जास्तीचे मिळो, जेणे करुन आपण आपल्या कुटुंबीयांसाठी अधिक काहीतरी खरेदी करु शकु.

जर आपली हे अशी भावना असवा तर आपले देखिल हे कर्तव्य ठरते , आपल्या घरात आपल्या साठी जे कोणी, ज्या कोणी कामं करत आहे त्यांचाही दिवाळीचा आनंद आपण द्विगुणीत करावा, आपण केलेल्या दिवाळी फराळात त्यांच्याही वाटा काढला जावा, कधी त्यांच्यासाथी नविन कपड्याची खरेदी आपण करावी.

आपला आनंद आपणच वाटायला हवा.

Organised v/s disorganised




अंदाज आणि अंदाज

मनसेला जो प्रतिसाद मिळाला आहे तो पहाता त्यांना २५-३० जागा सहज मिळाव्यात. केवळ तरुणही नव्हे तर वयोवॄद्ध देखिल मनसे कडे आकर्षीत झालेले पहायला मिळत आहे.

बोटावरील शाई अभिमानाने दाखवत आम्ही मनसेला मत दिले सांगणारे भेटले.

अशी कोणती भुरळ पडली आहे ?

अंदाज आणि अंदाज

मनसेला जो प्रतिसाद मिळाला आहे तो पहाता त्यांना २५-३० जागा सहज मिळाव्यात. केवळ तरुणही नव्हे तर वयोवॄद्ध देखिल मनसे कडे आकर्सःइ

Tuesday, October 13, 2009

माझी दृष्टी माझी सृष्टी - प्रा राम शेवाळकर

उस्मानाबादची साखर आणि जगाची बाजारपेठ - निळु दामले

Monday, October 12, 2009

दिवाळी म्हणजे आकाशकंदील आणि दिवाळी अंक




दिवाळी सण. या रोजच्या धकाधकीच्या, ताणतणावाच्या, अडीअडचणीच्या, जीवघेण्या वेगाच्या, त्रासाच्या, दुखभऱ्या आयुष्याला, थकल्याभागल्या , महागाईने कावलेल्या जीवास, आनंदाने प्रफुल्लीत, उत्साहाने मोहरुन, सुखाने भरुन देणारा सण. सुख, शांती, समॄद्धी मिळवुन देणारा सण.

या सणाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी नटुन येतात ती मासिके, दिवाळी अंकाच्या गोजीरवाण्या रुपात.
या दिवाळी अंकात सर्व गोष्टी, लेख, कविता, सारे सारे आनंददायक असावेत, मनाला प्रफुल्लीत करणारे असावेत, उत्साहीत करणारे असावेत, या मनाच्या सुंदरश्या जमलेल्या मुड शी जुळणारे असावेत, साजेरे असावेत.

या लेखांमधे आजारपणॆ, रुग्णालय, रोग, रोगी, डॉक्टर, मॄत्यु, दुःख, वेदना याला जागा नसावी. हे तर सारे आयुष्यात पाचवीला पुजलेले. निदान या आनंदाच्या दिवसात, शुभ घडीत , मंगलमयी वातावरणात त्याचा विसर पडावा.

सकाळ दिवाळी अंक .

"खेळ जीवनमॄत्युचा यात - "सन्मान जगण्याचा आणि मरणाचाही " ले. अती दक्षता शास्त्रातील तज्ञ डॉ. शिरीष प्रयाग, "नॉट ऍट द कॉस्ट ऑफ यू " - ले. संजय भास्कर जोशी , आणि जर्मनीत अनुभवलेला दुर्दम्य आशावाद - ले. वैशाली करमरकर "

हे लेख या आल्हाददायक वातावरणात, उदासवाणे करुन सोडायला आले नसते तरी चालण्यासारखे होते. सबंध वर्ष त्यासाठी पडलय.

आणि हो, दिवाळी अंक म्हणजे " वार्षिक भविष्य " देखील.

काही टक्केवारी वाढावी तर काही कमी.

काही टक्केवारी वाढायलाच हवी. उ.दा. मतदानाची, या बद्दल दुमत नसावे.

त्याचबरोबर काही टक्केवारी, जेव्हा तुमचे काम आपल्या भाग्यविधात्यांनी करावे तेव्हा त्यासाठी त्यांना जी "टक्केवारी " द्यावी लागते ती निश्‍चीतच कमी व्हावी विशेषःता जर का तुम्ही मराठी असाल आणि ते देखील मराठी असतील व त्यातुनही ते मराठी माणसांचे रक्षणकर्ते असतील.

Sunday, October 11, 2009

ग़ज़ल बरखा


"ग़ज़ल बरखा" या कार्यक्रमाला राजाभाऊंचे जाणॆ झाले.

आणि ते देखिल चक्क बायकोबरोबर लक्ष्मी रोड वर खरेदीला जाण्या ऐवजी ! (केवढे हे धाडस )

पण फारशी मजा नाही आली हे मात्र खरे.

दिवाळी म्हणजे

दिवाळी म्हणजे. नुसतीच धम्माल नव्हे, तर दिवाळी म्हणजे दिवाळॆ देखील.

राजाभाऊंच्या बायकोनी राजाभाऊंकडॆ अश्या काही नजरेने पाहिले की.

त्यांचा अपराध एकच. आपल्या बायकोला त्यांच्या दॄष्टीतुन साधासरळ वाटणारा प्रश्न त्यांनी विचारला.

"आता हे कशाला ? "

"मग दिवाळीचा फराळ काय तोंडात ठेवायचा ?"

त्यांच्या बायकोने रागाने जळजळीत उत्तर दिले.

वीस वर्षे संसाराला झाली तरी देखिल आपल्या नवऱ्याला स्वयपाकघरात साधे स्टीलचे (मुबलक ! ) डबे नाहीत या सारखी शुल्लक गोष्ट कळु नये ?

दिवाळी म्हणजे

दिवाळी म्हणजे धम्माल, दिवाळी म्हणजे बच्चे कंपनींनी बनवलेले किल्ले.


Thursday, October 08, 2009

राजाभाऊ स्वगॄही परत

कॅफे मद्रासशी असलेली आपली बांधिलकी त्यागुन आता पर्यंत राजाभाऊंनी माटुंग्यामधली अनेक उपहारगृहांशी आपल्या पोटाची जवळीक साधण्याचा बराच प्रयत्न केला. मग त्यांनी आपल्या नेत्याचे अनुकरण करत स्वगॄही खायला जाण्याचे ठरवले.
अर्थात त्यांनी हा निर्णय घ्यावा या साठी त्यांच्या पुढे प्रलोभनच तसे ठेवले गेले.
अप्पम आणि स्टू.
होय. कॅफे मद्रासनी "अप्पम व स्टू " ची आपल्या मेन्युत भर घातली आहे. कालच्या रात्री उशीर झाल्याने त्यांना अप्पम गन पावडर चटणी व सांबाराबरोबर खायला लागले. काय करणार "स्टू" संपला होता.
आता परत एकदा जायला हवे.

Wednesday, October 07, 2009

"येणार आहेत " , "येणार आहेत" ,’ बसलेले आहेत ( बसलेले ??) "जागा अडवणॆ

टिळक स्मारक, पुणॆ. औध मधल्या एका संस्थेने केलेल्या भरतनाटयमचा कार्यक्रम.

सभागृह खचाखच भरलेले. अगदी दोन्ही बाजुला प्रेक्षक नृत्य पहायला उभे
. पोहोचायला अंमळ उशीर झाल्याने राजाभाऊ व त्यांच्या बायकोला पण उभे रहायला लागले.

मग थोड्यावेळाने सभागॄहात नजर फिरवली तर अनेक खुर्च्या रिकाम्या दिसल्या.

खुर्च्या रिकाम्या आणि तरीही बापुडे प्रेक्षक उभे ! हे गौडबंगाल काय आहे ?

रिकाम्या खुर्चीत बसायला गेलो तर बाजुच्यांनी त्या अडवुन ठेवलेल्या. "येणार आहेत " , "येणार आहेत" ,’ बसलेले आहेत ( बसलेले ??) ".

कार्यक्रम सुरु होवुन तास भर झाला तरी "येणार आहेत, बसलेले आहेत ? " .

या लॉडनी जागा अडवुन ठेवाव्यात, बाजीरावांनी मग हवे तेव्हा यावे, न यावे व इतरांनी उभ्याने कार्यक्रम पहावा.

राजाभाऊंनी शेवटी खुर्च्यांवर कब्जा केला.

Monday, October 05, 2009

बाहेरुन आतुन सर्वच जण एकत्रीत राज्य उपभोगणार आहेत..

उंदीर सापाचा नवा खेळ सुरु झाला आहे
कौरव पांडव भांडत आहेत
रयत तमाशा बघत राहिली आहे

कालपर्यंत भगवंत त्यांचे पाठीराखे होते
दारी त्यांच्या "वसंत"फुलवीत होते, "शरदा"च्या चांदण्याचा सडा घालत होते
काय करणार, आता तर भगवंतानीच पार्टी बदलली आहे.

अर्जुनाच्या मनी नवा संभ्रम आहे
मराठी माणसांनी मराठी माणसांनाच मत द्यायचे आहे ?
की मराठी माणसांनी मराठी माणसांसाठी अमराठींचा पक्ष घ्यायचा आहे ?

एकंदरीत काय सगळी गंमत जंमत आहे.
बाहेरुन आतुन सर्वच जण एकत्रीत राज्य उपभोगणार आहेत.
राव पडले पंत चढले तरी जनता रोजच्या लढायीत मरणारच आहे.



राजकारण मोठे गहन हो

राजाभाऊ, हे निवडणुक कोणाला कशी फळॆल हे सांगणे फार महाकठीण हो.

आता हेच बघा ना,

राज्याबाहेर वनवासात पाठवले गेलेल्या " त्यांनी " अचानक उसळी घेवुन पुन्हा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रबिंदुपाशी परत स्वःतला आणुन ठेवले आणि येवढी वर्षे राज्यात घालवलेले अचानक पटावरुन गायब झाले.

कु. नेहा खिस्ती हिचे अरंगेत्रम






एक खुप सुरेख कार्यक्रम पाहिला.

मी म्हणजे कोण ?

काही माणसे कशी आपल्या असलेल्या ओळखींमुळे उन्मत्त होतात, अहंकारी होतात , त्या ओळखीचा कसा गैरवापर करतात या संबधी एका वाचकाने दै.सकाळच्या "मु्क्‍तपीठ’ मधे लेख लिहिला आहे.
काल रात्री अश्याच एका माणसाचे गर्वीष्ट रुप पाहिले. दुसऱ्याला तुच्छ मानत स्वःताला फार महान समजणाऱ्या या सदगॄहस्थाने राजाभाऊंच्या एका सुंदर रात्रीची वाट लावली.
कालची रात्र साजरी करायला ते पुण्यामधे एका हॉटेल मधे बुफे खायला गेले. पुर्वी ते येथे गेले असल्यामुळे येथला कर्मचारीवर्ग त्यांच्या ओळखीचा. कालचे वातावरण आल्हाददायक होते, पाऊस नुकताच पडुन गेल्याने हवेत गारवा होता, रात्र सुरेल होती. मस्त पैकी छानसे जेवण जेवत , गप्पा मारतमारत रात्र रंगत चालली होती, मधेच स्वःत शेफनी येवुन त्यांची विचारपुस केली. जेवण अगदी मस्तच होते. बुफे जसा हवा तस्साच.
पण रसाचा भंग करण्यासाठी त्यांच्या बाजुला एक कुटुंब येवुन बसले. त्या गॄहस्थानी बियरच्या टेंपरेचरवरुन जो शहाणपणा शिकवायला सुरवात केली तेव्हाच खरतर राजाभाऊंनी आपली जागा बदलायला हवी होती. त्याचा घसा म्हणे खराब होता.
राजाभाऊंना भेटायला शेफ बाहेर आले होते तेव्हा त्या विद्वान गॄहस्थांनी त्याला मेनु मधे नसणारा कोणतातरी सॉस बनवायला सांगितला, व त्यांने तो कर्टसी म्हणुन बनवुन पाठवला देखील.
मग जेवण झाल्यावर राजाभाऊंसाठी हॉटॆल तर्फे त्यांच्या वाढदिवसाचे निम्मित्ते बर्थडे केक दिला गेला, कापतांना ते शेफ परत बाहेर आले. राजाभाऊंसाठी सारे कसे मंत्रवत होते, भारावलेले वातावरण.
त्या शेफना बघुन "त्या"चे पित्त खवळले.

"हा सॉस असा बनवतात काय ? किती तिखट केला आहे ? जगात असा कुठेच बनवला जात नाही, ऑस्टेलिया पासुन अमेरीकेपर्यंत, मी कोण आहे माहिती आहे का ? मी आत्ता तुमच्या अमुक तमुकशी , (त्या हॉटेलच्या उच्चपदस्थ थोरामोठयांची दोन चार नावे घेतली ) मोबाइल वरती बोलत होतो, तुझे नाव सांग, मी त्यांना सांगुन तुझी आत्ता नोकरी घालवतो, तुला रस्तावर आणतो, मला तु तिखट खायला घातलेस काय ? जी फायरींग सुरु झाली ती थांबायचे नाव नाही.
राजाभाऊंना त्याचे खुप वाईट वाटले, एका क्षणापुर्वी ते सर्व त्यांच्याशी अगदी आनंदात बोलत होते, त्या हॉटॆलच्या, तिथल्या जेवणाच्या केलेल्या तारीफने खुश होत होते आणि दुसरयाच क्षणी त्यांना जमिनीवर आदळले गेले.
कसाबसा राजाभाऊंनी त्यांचा संताप आवरला.

कोणाची तरी ओळख सांगुन हा सर्वांचा नोकरी घालवण्याच्या धमक्या देतो म्हणजे काय एखादी गोष्ट आवडली नाही तर त्याची तक्रार जरुर करावी पण वैयत्तीकरित्या कोणाला धमक्या कशासाठी द्याव्यात ?

Saturday, October 03, 2009

काही जणांची मानसीकता कळणे फार कठीण असते.

इंद्रायणी. मुंबई- पुणे प्रवास. शुक्रवार. तीन दिवस लागोपाट सुट्ट्या आल्यामुळे तुफान गर्दी.

म्हाताऱ्या माणसांना घेऊन बिनाआरक्षित प्रवास करण्याचे वेडे धाडस लोक करतातच कसे ? दोन-तीन तास त्यांनी उभ्याने प्रवास करायचा .
छ्त्रपती शिवाजी टर्मीनसला जरा लौकर गेले तर बसायला आरामात जागा मिळते. पण दादर वरुन १०-१२ मिनीटाचा उलटा प्रवास करुन लोक तेथे गाडी पकडायला येत नाहीत. का ते तेच जाणो. दादरला नेहमीच्याच गर्दीत ते चढणार व मग ३-४ तास उभ्याने प्रवास करणार.
काही जणांची मानसीकता कळणे फार कठीण असते.

एल्गार

उशीर झालाय खरा पण खुप नाही झाला.

सुरेश भट वाचायला घेतले आहेत.