Friday, February 29, 2008

मी तुझ्या वडीलांसारखा, तु माझ्या मुली सारखी

भरतनाट्यम नॄत्याचा अप्रतिम कार्यक्रम नुकताच संपला, छानपैकी रंगला होता, नॄत्यांगना एक प्रख्यात नर्तकी व गुरु होत्या. रंगमंचावरुन खाली आल्यावर त्यांच्या भवती चाहत्यांचा गराडा पडला, त्यांचे अभिवादन करायला, कौतुक करायला.

त्या घोळक्यात होते एक सो कॉल्ड कला,नॄत्य समीक्षक, वय वर्षे अवघे "पावुणशे वयमान", खांद्यावरील झोळीत त्यांनी वर्तमानपत्रात लिहीलेल्या लेखांची चार-सहा कात्रणे, ते त्यांचे भांडवल. कदाचीत ते या क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती असाव्यात सुद्धा. कोण जाणे.

मग त्यांनी आपली ओळख बाईंना करुन दिली, आता वडीलांच्या वयाचे म्हटल्यावर बाईंचे हात हातात धरुन बोलत रहाणे स्वाभाविकच नाही का ? पण बोलणे केवढे ? किती वेळ ? मारुतीच्या शेपटीसारखे लांबलच्चक ,संपता संपत नाही, हात हाती घेतलेला सोडवत नाही. इतर जण ताटकळत उभे आहेत याचे सभ्यगॄहस्थांना भान नाही. नर्तकीची चुळबुळ सुरु झाली, वाट पहाणाऱ्यांत त्यांचा एक कार्यक्रम ठरवण्यासाठी आलेले दोघे जण होते, स्वाभाविक पणे त्यांच्या कडे लक्ष देणे क्रमप्राप्त होते, बुजुर्गांचे कौतुक काही संपण्याच्या मार्गवर नव्हते.

आपला हात अलगद सोडवुन त्या इतरांकडे वळल्या, झाले या समिक्षकांचे माथे बिथरले, ते दोघे बातचीत करुन लगेच निघुन गेल्यानंतर यांनी मॅडमना फायरीग वर फायरींग द्यायला सुरवात केली, तुला काय मॅनर्स वगैरे आहेत की नाही , मी तुझ्याशी बोलत होतो आणि तु खुशाल माझाकडे दुर्लक्ष करुन त्यांना अटेंड करायला गेलीस, या तुझा गुन्हाला क्षमा नाही , तुझे असे धाडस मुळात झालेस कसे , तुझ्यात ही हिम्मत आलीच कुठुन ? ढिशुम्म, ढिशुम्म. नौटंकी सुरु.

मॅडम नी मग हात जोडुन त्यांची माफी मागायला सुरवात केली, गलती हो गयी, अगली बार मुझसे ऐसी भुल कभी नही होगी , मुआफ कीजीयेगा, माफी चाहती हुं !, आता काय करायच म्हाताऱ्या माणसाचा, त्यांचा वयाचा, पांढऱ्या पिकलेल्या केसांचा मान राखायला हवाच ना. नौटंकीचा जबाब ही त्याच भाषेत द्यायला हवा ना.

म्हातारा काय पटायला मागत नव्हता, त्याला जास्तच चेव येत गेला, मग माफी स्विकारता स्विकारता बाईंचे जोडलेले हात गच्च धरले व तिला चक्क जवळ घेतले, मिठीत, राग शांत होईना, मिठी काही सुटेना, मग तिच्या गालाचे चुंबन घेतले,
त्यात काय मोठेसे, मी तुझ्या वडीलांसारखा, तु माझ्या मुली सारखी.
मग कदाचीत त्यांचा राग शमला असावा.

टुलिप्सच्या बॉगवर खाली लिहीलेले वाचले आणि हा वरील प्रसंग आठवला
उगीच बेटी बिटिया करणारे ( ही आपली माझी टिपिकल खडूस मुंबई प्लस ए.को.गिरी. अंगात भिनलीय कुणी जवळ यायला लागलं की हात झटकून अंतरावर पळायची, म्हणून असं मत. ते एरवी खरे प्रेमळही असू शकतात).

Thursday, February 28, 2008

असे आपापसात मराठी माणसे का बरे भांडतात ?

गनिमांशी लढतांना नातीगोती पाहू नका. - साहेब.

पण महाभारतात गंधर्वांनी कौरवांवर हल्ला केला तेव्हा धर्म म्हणाला "आम्ही एकशे पाच " कौरव पांडव एक होवुन त्यांनी गंधर्वांचा पराभव केला.

इतिहास हे ही सांगतो की युवराज स्वगॄही परतले व महाराजांच्या निधनानंतर छत्रपती झाले व त्यांनी मोघलांविरुद्ध प्रखर लढा दिला, स्व:त औरंगजेबाला महाराष्ट्रात लढाईला उतरावे लागले व येथेच या मातीत त्याचा अंत झाला.

Wednesday, February 27, 2008

पहला नशा पहला खुमार.

आज या मौसमाची पहिली "कुक" ऐकली, सकाळी कार्यालयात जाताना मग दिवस कसा मस्त प्रसन्नवस्थेत गेला. संध्याकाळी घरी परततांना तो कोकीळ जणु माझी राह बघत होता , पुन्हा एकदा
कुहु, कुहु बोले रे कोयकीया

कोयलीया मत करो पुकार कलेज़वा लागी कटार.

हाय ! ना जाने कितनी बार हम घायल हुवे है !
हमने देखा है जमानेका बदलना लेकीन उनके बदले हुवे तेवर नही देखे जाते !
अब छलकते हुवे साग़र नही देखे जाते तोबा के बाद मंज़र नही देखे जाते !
दरस बिन निरस सब लागेरी !
(अरे हे तर विषयांतर झाले. )
नाभी के दरबार सब मील गावो बसंत रुतु की मुबारक ! यात कोयलने आपला सुर साधायला सुरवात केलीय. संगीतशास्त्राच्या दॄष्टीकोनातुन पहायला गेल तर कोयल तसा बेसुराच, एकच पंचम स्वर धरुन बसलेला, पण हे बेसुरेपण देखील कसे मोहवीत असते.

मग कुमारजी धानी रागात स्वरचीत बंदीश गावु लागतात
आई रुत आई रुत
बोलन लगी कोयलिया बनमे !!
बहार आई अंबूकी मदभरे
गमक रही चहुं दिस बन मे !!

Monday, February 25, 2008

मराठी अस्मीतेचे गमभन

्शुभदा चौकर यांनी रविवारच्या लोकसत्तात मराठी भाषा , शिक्षणाचे माध्यम, व मराठी शाळेच्या संबधी खुप अभ्यासपुर्ण लेख लिहीला आहे.
http://www.loksatta.com/daily/20080224/lokkal.htm

आज बऱ्याच मराठी शाळा ओस पडत चालल्या आहेत, बंद पडत चालल्या आहेत.

- बिल्डरनां बरेच झाले. शाळॆच्या जागेवर टोलेजंगी टॉवर उभारायला मोकळे.

( माझाही मुलगा St.Teresa मधे शिकला )

Sunday, February 24, 2008

आणि मग


आणि मग राजाभाऊंनी आपले दुःख उकडीच्या मोदकात बुडवले. हाण गणप्या हाण.

डुक्कर फियाट BML


आज राजाभाऊ खुप दुःखी आहेत. दरवर्षी ज्या ज्या वेळी ते व्हींटेज कार रॅली बघायला जातात त्या दिवशी त्यांची मनस्थीती खुप हळवी झालेली असती.


आपण ही आज यात भाग घेतला असता, जर आपण आपली गाडी जतन केली असती तर. या मॉडॆलच्या गाडया पाहिल्या की त्यांना आपल्या गाडीची आठवण येवुन फार वाईट वाटायला लागते.

पार्कींगची सोय नसल्यामुळे गाडी बाहेर काढतांना विचार करायला लागायचा. संध्याकाळी घराच्या लांब कोठेतरी गाडी उभी करणॆ, मग रात्री ती जावुन घराजवळ आणणे, मग त्याचा कंटाळा, गाडी जागच्या जागी उभी राहु लागली. त्यात जुनी गाडी म्हणाजे मगरीचे तोंड व हत्तीचे पोट. कितीही पैसा ओतला, मेहनत केली तरी ती कमी पडायला लागली.

ओरीजनल इटालीयन फिआट , जाणली जायची डुक्कर फियाट या नावाने, १९५७ मॉडॆल.

गाडीचा शेवट अखेरीस भंगारवाल्या कडे झाला.

Saturday, February 23, 2008

मराठी माणुस, मराठी भोजन, व मराठी शहर

या मराठी माणसाचा या मध्यल्या काळात स्वाभिमान जागा झाला, खाईन तर मराठी भोजन नाहीतर राहीन भुकेला. त्यात परत ते गेले होते मराठीमोळ्या शहरात, ठाणे शहरात, त्यात भर पडली होती मराठी सणाची, आज माघी गणेश जन्म. मनात स्वार्थ जागा झाला. उकडीचे मोदक, मस्त पैकी चौरस थाळी, अहाहा नामी बेत. खासा बेत, शाही बेत.

पण मनुष्याच्या मनात एक असते व नियतीच्या दुसरे.

वेळ तशी अवेळ . सकाळचे अकरा. हरकत नाही. आधी पोटोबा मग गणॆश दर्शन. मराठी माणुस चालवत आलेली ऑटो रिक्शा पकडली . म्हटले बाबारे , आमचे पोट तुझ्या हवाली , पटकन छान पैकी चविष्ट, रुचकर अशी थाळी मिळेल अश्या मराठीमोळ्या उपहारगृहात घेवुन चल रे आम्हाला.

पण ! आपल्या वतनाला नाही हो तो जागला . घेवुन गेला आम्हा उभयतांना उडप्याच्याच उपहारगॄहात. केवढे तयाचे हे घोर अज्ञान , की साऱ्या ठाण्यात मराठी उपहारगॄह नाही ? असा कसा रे हा प्रसंग आम्हावर ओढवला ? कोणास जागावे ? मराठी बाणा ठेवावा की उदरभरण करावे? शेवटी नेहमी प्रमाणे तडजोड केली. येथ पर्यंत आलोच आहोत तर सध्या फक्त दाक्षिण्यात पदार्थाची न्याहारी करावी, पुढचे पुढे.

दुपारी तिन वाजताच्या सुमारास ठाण्यात परतलो, बसचालक शेजारीच बसले होते तयांशी पुच्छा केली, मास्तर, सांगा आम्ही कोठे जेवु. तुमची बस साऱ्या ठाण्याभर फिरत असते, सारे रस्ते आपण पालथे घालत असता, मराठी शुद्ध शाकाहरी भोजन कुठे मिळेल तेवढे गाठुन द्या.

तयांनी मार्गी लावुन दिले. एका उपहारगृहाची गाठ घालुन दिले, हाय रामा, मास्तर तुम्ही सुद्धा ? साऱ्या दुनीयेभर केवळ ऊडपीच आहेत काय ? पंजाबी जेवायच ? चायनीच जेवायच ? मेक्सीकन जेवायच ? अमेरीकन हवे ? चला ऊडप्या कडे.

मराठी माणुस. तत्व म्हणाजे तत्व, आपण तसे बऱ्याबोलाने हार मानणारे, पराभव स्विकारणारे नसतो, जाज्वंत स्वाभीमान. शब्दाला पक्के. मराठी भोजन एकदा ठरले म्हणजे ठरले आता त्यात तडजोड नाही. रस्तातही दोनचार दुकानात विचारुन झाले. पण नकारघंटाच नशीबी.

पण मग नायलाजास्तव शेवटी एक भय्या रिक्शावाला पकडला. भेय्याजी, थाली (एक पायरी खाली ) खाना है कही अच्छा हॉटॆल मे ले चलिये.

शेवट - टिपटॉप मधे गुजराती थाळी, माणासी रुपये १७०.०० मोजुन जेवलो. त्या थाळीत गुजराथी पदार्थ होते, पंजाबी , आणि अगदी चायनीच सुध्दा होते. पण मराठी पदार्थ जरा सुद्धा नव्हते.

मग मात्र रात्री खास वाट वाकडी करुन ठाकुरद्वारी विनय मधे चटकदार उसळ, मिसळ हाणायला गेलो.
तत्व म्हणजे तत्व. खाणार म्हणजे खाणार.

मराठी माणुस, मराठी भोजन, व मराठी शहर

या मराठी माणसाचा या मध्यल्या काळात स्वाभिमान जागा झाला, खाईन तर मराठी भोजन नाहीतर राहीन भुकेला. त्यात परत ते गेले होते मराठीमोळ्या शहरात, ठाणे शहरात, त्यात भर पडली होती मराठी सणाची, आज माघी गणेश जन्म. मनात स्वार्थ जागा झाला. उकडीचे मोदक, मस्त पैकी चौरस थाळी, अहाहा नामी बेत. खासा बेत, शाही बेत.
पण मनुष्याच्या मनात एक असते व नियतीच्या दुसरे.
वेळ तशी अवेळ . सकाळचे अकरा. हरकत नाही. आधी पोटोबा मग गणॆश दर्शन. मराठी माणुस चालवत आलेली ऑटो रिक्शा पकडली . म्हटले बाबारे , आमचे पोट तुझ्या हवाली , पटकन छान पैकी चविष्ट, रुचकर अशी थाळी मिळेल अश्या मराठीमोळ्या उपहारगृहात घेवुन चल रे आम्हाला.
पण ! आपल्या वतनाला नाही हो तो जागला . घेवुन गेला आम्हा उभयतांना उडप्याच्याच उपहारगॄहात. केवढे तयाचे हे घोर अज्ञान , की साऱ्या ठाण्यात मराठी उपहारगॄह नाही ? असा कसा रे हा प्रसंग आम्हावर ओढवला ? कोणास जागावे ? मराठी बाणा ठेवावा की उदरभरण करावे? शेवटी नेहमी प्रमाणे तडजोड केली. येथ पर्यंत आलोच आहोत तर सध्या फक्त दाक्षिण्यात पदार्थाची न्याहारी करावी, पुढचे पुढे.
दुपारी तिन वाजताच्या सुमारास ठाण्यात परतलो, बसचालक शेजारीच बसले होते तयांशी पुच्छा केली, मास्तर, सांगा आम्ही कोठे जेवु. तुमची बस साऱ्या ठाण्याभर फिरत असते, सारे रस्ते आपण पालथे घालत असता, मराठी शुद्ध शाकाहरी भोजन कुठे मिळेल तेवढे गाठुन द्या.
तयांनी मार्गी लावुन दिले. एका उपहारगृहाची गाठ घालुन दिले, हाय रामा, मास्तर तुम्ही सुद्धा ? साऱ्या दुनीयेभर केवळ ऊडपीच आहेत काय ? पंजाबी जेवायच ? चायनीच जेवायच ? मेक्सीकन जेवायच ? अमेरीकन हवे ? चला ऊडाप्या कडे.
मराठी माणुस. तत्व म्हणाजे तत्व, आपण तसे बऱ्याबोलाने हार मानणारे, पराभव स्विकारणारे नसतो, जाज्वंत स्वाभीमान. शब्दाला पक्के. मराठी भोजन एकदा ठरले म्हणजे ठरले आता त्यात तडजोड नाही. रस्तातही दोनचार दुकानात विचारुन झाले. पण नकारघंटाच नशीबी.
पण मग नायलाजास्तव शेवटी एक भय्या रिक्शावाला पकडला. भेय्याजी, थाली (एक पायरी खाली ) खाना है कही अच्छा हॉटॆल मे ले चलिये.
शेवट - टिपटॉप मधे गुजराती थाळी, माणासी रुपये १७०.०० मोजुन जेवलो. त्या थाळीत गुजराथी पदार्थ होते, पंजाबी , आणि अगदी चायनीच सुध्दा होते. पण मराठी पदार्थ जरा सुद्धा नव्हते.
मग मात्र रात्री खास वाट वाकडी करुन ठाकुरद्वारी विनय मधे चटकदार उसळ, मिसळ हाणायला गेलो.
तत्व म्हणजे तत्व. खाणार म्हणजे खाणार.

हवाय कोणाला बसंत ? ?


ये आरजु थी हम कभी बहार देखेंगे ! किसे पता था फी़जा़ बार बार देखेंगे !!
करार पाके भी किस्मत मे बेकरारी है ! वो और होंगे जो दिलका करार देखेगे !!

कागज के पुलगलेमे कब तेरे बाहोंका हार देखेंगे !!

माझ्या बायकोला दुसरे लग्न करायचय. अ.. म्हणजे माझ्याशीच परत एकदा दुसऱ्यांदा लग्न करायचय. केवळ हे फुलांचे हार गळ्यात घालुन मिरवण्यासाठी. दक्षिण भारतीय त्यांच्या लग्नात हे असे हार गळ्यात घालतात. माटुंग्याला रामाश्रय मधे कोकोनट सेवीयां, नीर डोसा खाणे व परततांना तेलंग रस्ताच्या कोपऱ्यावर असलेल्या ही हारांची दुकाने न्याहळणे.


उत्तम आरोग्यासाठी दुध ? ? ? ? ? ?

अज्ञानात किती आनंद असतो, सुख असते.

दुधाचे पर्याय: वाचा व जाणुन घ्या http://kasakaay.blogspot.com
Wednesday, February 20, 2008

मी पण विकावु आहे ! कुणी घेता का हो ?


मी पण विकावु आहे. काय विचार ?
पोराला सांगुन सांगुन दमलो, अरे अभ्यासाची पुस्तके सोड, बॅट हातात घे, क्रीकेट खेळ दाताच्या कण्या केल्या, साम दाम दंड भेद सर्व प्रयोग करुन झाले, पण ऐकेल तर शप्पथ.


आता मग मलाच मैदानात उतरावे लागणार आहे. जन्म भर कारकुनी करुन राहलोय त्या मुळे महिना अखेरच्या तारखेची वाट बघणॆ नशिबी जे काही लागलेले आहे त्यातुन सुटका पाहीजे असेल तर माळ्या वर धुळ खात पडलेली बॅट खाली काढण्यावाचुन पर्याय नाही अस वाटायला लागलय.


मला कोणाला विकत घ्यायचे आहे का बोला ? बोली लावायला सुरवात करा. तसा थोडाफार क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे, गल्लीत क्रिकेट चांगला खेळत होतो. आतापण काही काळा पुरती का होईना बॅट हाती धरु शकतो, वेळप्रसंग पडल्यास चेंडु मागे अवजड की बोजड शरीर घेवुन धावुही शकतो.


त्यांना करोडो रुपयाच्या बोल्या लावुन विकत घेतले जाते. माझी काही तेवढी मागणी नाही. थोडक्यात पटण्यासारखे आहे.


मग काय विचार ?सकाळ - क्रिकेटच्या "श्रीमंती'चे नवे पर्वमुंबई, ता. १९ - सद्‌गृहस्थांचा खेळ अशी ओळख असणाऱ्या क्रिकेट या खेळाची आता उद्यापासून "श्रीमंत' अशी नवी ओळख क्रिकेटच नव्हे; तर उद्योग आणि बॉलीवूडसह क्षेत्रालाही होईल. बहुचर्चित आणि कोट्यवधी डॉलरची उलाढाल असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या आठ संघांची उद्या निवड होईल.निवड होण्यापेक्षा आठ संघांचे फ्रेंचाईस आपला संघ अधिक बलवान करण्यासाठी नामवंत क्रिकेटपटू "विकत' घेणार आहेत.

दिवसाढवळ्या शुद्ध दिशाभुल

मोरुची बायको सक्काळी सक्काळी मोरुस बोलली, मोरु ऊठ, मोरु ऊठतोस ना रे , ऊठ ना रे ,अस काय ?
हा येवढा मधाळ स्वर ? सवय नसल्यामुळे मोरु बावचळुन गेला, मनात शंकेची पाल चुकचुकायला लागली. सावधान मोरु, सावध रहा जेव्हा माणसे अचानक गोड बोलु लागतात, चांगले वागु लागतात तेव्हा नक्कीच काहीतरी त्यांच्या मनात शिजत असते . दिवस वैऱ्याचा आहे.

अरे जरा इंटरनेट सुरु करतोस कारे ? तीच्या मारी ! हीच हीच ती दिवसरात्र नुसती कोकलत असते , किती वेळ या संगणकाला चिकटुन असतो म्हणुन. पण बायकोला नाही म्हणायला मुळातच अंगात धाडस असायला लागते, मोरु तर कणाहीन.

हे बघ यांची http://www.travelocity.co.in/ जाहीरात आली आहे, मुंबई दिल्ली विमान प्रवास फक्त रु. १७५०.०० मधे, चटफट, फटाफट आपली चौघांची तिकीटे बुक करुन टाक बघु. नाहीतर फुल्ल होतील.
आज्ञाधारक मोरुनी तत्काळ माहीतीजालात या साईट वर टिकीटाचे दर पाहीले. या खालील आकड्यात त्याला रु. १७५०.०० कोठेच दिसेना.

Direct
Rs 5,313 , Rs 5,386, Rs 6,408 ,Rs 8,276,Rs 9,584
One stop
Rs 5,724

मग त्यानी त्या कंपनीला दुरध्वनी लावला, आधी * दाबा, मग १ दाबा मग, ए सारे सोपस्कार पुर्ण झाल्यावर एका युवतीने फोन उचलला. मी म्हटले बाईग आम्ही निघालो आहोत राजधानी सर करायला, रु. १७५०.०० मधे चार टिकीट लवकर द्या.

थांबा हं बघते काय उपलब्ध आहेत ती . या या फ्लाईट्ची आहेत , यांचा दर तुम्हाला सर्व मिळुन जवळजवळ रुपये २६,०००.०० पडतील, सर्व डिस्काउंट वजा जाता.

अहो पण माझ्या हिशोबाने फक्त रु. १४,०००.०० व्हायला हवेत रु, १७५० च्या दराने.

त्याच काय आहे, शोधावे लागेल , तुम्ही चार एकदम टिकीटे बुक न करता वेगवेगळी घ्या म्हणजे थोडी फार स्वस्त पडतील. पण रु. १७५० च्या दरात नाही. आणी ती देखील एका फ्लाईट् मधे नाही.

कठीण आहे बुवा, बायको एका फ्लाईट्ने , नवरा दुसऱ्या, मुलगा तिसऱ्या

थोडक्यात सांगायचे तर जाहीरात म्हटल्या प्रमाणे रु, १७५० च्या दराने ते ऐकही टिकीट देवु शकत नाहीत .
या अश्या फसव्या जाहीराती करतातच कशाला ?

तात्पर्य शेवटी मोरुच्या बायकोच्या नशीबी विमान प्रवास नाही ,ट्रेनचाच प्रवास लिहीला आहे.

Tuesday, February 19, 2008

इतने करीब हो मेरे नजरे उठाके क्या करु !

इतने करीब हो मेरे नजरे उठाके क्या करु !
दिल मे बसे हुवे हो तुम लब्ज को हिलाके क्या करु !!

रस्तातुन जातायेता कधीकधी काही माणसे पहाण्यात येतात, हाती मनगटात गळाबंद पिशवी बाधंलेली असते, त्यात बहुदा जपमाळ असावी, रस्तात चालता चालता, उभ्या उभ्या, जपमाळेचे मणी ओढत, त्यांचा जप चालु असतो. काहीजणांच्या हाती कसलेतरी छोटेसे मोजणी यंत्र असते, ओठाने जप व बोटाने त्या यंत्राची कळ दाबणॆ, ही दोन्ही कामे यंत्रवत होत असतात.

अश्यांना पाहीले की मला हमखास शुभा मुद्गल यांनी गायलेले सुफी संप्रदायातील हे गाणे आठवते.

Sunday, February 17, 2008

का बरे ?

"भावाला पळवला गावाला " या आंदोलनाने काय साधले ?
लोकांची स्मरणशक्ती फार तोकडी असते असे म्हणतात, तेव्हा जे लवकरच लोकांच्या विस्म्रुतीत जाणार असतात ते विषय हाती घेवुन, वातावरण क्षणीक तापवुन त्या पासुन तात्कालीक लाभ उठवण्याचा प्रयास हे राजकारणी का बरे करत असावेत ? या घटनेने ते काही जणाच्या नजरेत हिरो बनत असतील ही पण पुढे काय ?
या वेळी होणाऱ्या वित्तहानी, जीवीतहानी होण्यास ज्या वक्ती प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे कारणीभुत झालेल्या असतील त्या वैयत्तीकरीत्या त्याची जबाबदारी का बरे स्विकारत नाहीत ?

Saturday, February 16, 2008

www.playchess.com


उद्याचा नेता !


"राजकीय फायद्यापेक्षा अमेरीकन नागरीकांच्या दैनंदीन प्रश्नाच्या सोडवणुकीला त्यांच प्राधान्य असते " - हे वर्णन वाचले "उद्याचा नेता " या बराक ओबामा यांच्या वरील म.टा मधे श्री. सतीश कामत यांनी लिहीलेल्या उत्तम लेखामधे.

सद्यस्थितीत कोणीतरी हे गुण आपल्या नेत्यांच्या निदर्शनास आणुन दयायला हवेत. सदानकदा केवळ भावनीक मुद्दे हाती घेवुन केवळ भावनांच्या प्रश्नावर आपले राजकारण करत येनकेन प्रकारे सत्ता संपादन करणॆ हा मार्ग न चोखंदळता, फक्त बेरजेचेच राजकारण करुनही सर्वोच्च पदाच्या जवळ जाता येते हे बराक ओबामा दाखवुन देत आहेत.

आपल्याकडल्याही सर्व पंतप्रधानपदासाठी उत्सुक, उतावळ्या आपल्या नेत्यांसाठी देखील या अमेरीकन पद्धतीच्या धर्तीवर उमेदवार निवडण्याची प्रक्रिया सुरु करायला हवी. त्यासाठी गरजेचे आहे अमेरीका, ब्रिटन प्रमाणे केवळ दोन राजकीय पक्ष असलेली प्रणाली.

जर तुम्ही आमचे, आमच्या देशाचे नेतॄत्व करु इच्छीत असाल तर त्या पदासाठी आपण कसे व केवढे समर्थ, सक्षम, आहोत, आपण देशाला कोणती दिशा देणार आहात, भविष्यासाठी आपल्याकडे कोणत्या योजना आहेत ते तसे देशाला आपण या सुरवातीच्या चर्चेद्वारे सांगीतले पाहीजे, पटवुन दिले पाहीजे.

सुजाण मतदारांनीही केवळ धर्म, जात, प्रांत, भाषा, यांच्या आधारावर केवळ भावनेचे राजकारण करीत, केवळ हाच सत्तासंपादनाचा मार्ग हेच गॄहीत धरणाऱ्या आपल्या नेत्यांची निवड करतांना, त्यांच्या मागे जातांना आधी थोडा तरी विचार करायला हवा.

Friday, February 15, 2008

भुलभुल्लया मे खोया है पाटकर
या नव्या भुयारी मार्गात शिरणे व चक्रवॄह मधे शिरणॆ एकच. मार्गदर्शक पाटयांशिवाय योग्य मार्गी लागणॆ कठीणच

Thursday, February 14, 2008

प्रिये,

तबीयत ठिक थी और दिल बेकरार न था

ये तब की बात है जब तुम्हीसे प्यार ना था !!

Tuesday, February 12, 2008

त्या दोघीजणी

नमस्कार, मी मिसेस क्ष. बोलतेय, या बॅंकेच्या त्या ब्रांच मधुन, हो ना, आज मी पुण्यात नाही, मुंबईला कामासाठी गेले होते.

या वाक्याने सुरु झालेली मोबाईल वरील संभाषणे मुंबईत सुरु झालेली थेट पुणे स्थानक येई पर्यंत सुरु होती. जागा - डेक्कन क्वीन चा वातानुकुलीत खुर्चीयानातील डब्बा. दिवसभरातील राहीलेले कार्यालयातील कामे या प्रवासात पुरी करायचा बाईंनी चंग बांधला होता.

माणसे मोबाईल फोन वर किती अमर्यादीत बोलतात ? व आपले संभाषण आजुबाजुच्या सर्वांना ऐकवत. किती त्रासदायक असते हे. आधीच मी रात्रभर झोपलो नव्हतो, म्हटले गाडीत झोप घेवु, त्या साठी जास्तीचे पैसे मोजले, पण !!

मध्यंतरी पुणॆ-मुंबई वोल्वो बस च्या प्रवासाचे वर्णन "गंध कुणाचा "http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/ या एका बॉग वर वाचले होतो त्याच आठवण होईल असा हा प्रसंग.

असाच एक बस प्रवास ठाणॆ-अणजुरचा. वेळ भर दुपारच, देवदर्शन करायला आम्ही निघालेलो, नेमक्या कोणत्या बस स्थानकावरुन ही गाडी सुटते हे शोधाशोध करण्यात बराच वेळ दवडलेला, परत आल्यावर चांगले उपहारगॄह शोधुन जेवु, म्हणुन हट्टाने उपाशी राहीलेले आम्ही दोघे.

बस पकडली , अचानक मस्तकशुळ उठला, तीव्र वास सहन होईना, समोर बसलेल्या बाईंनी अतिशय तीव्र वासाचे तेल आपल्या मस्तकी चोपड चोपड चोपडले होते. त्यात बरेच दिवस केस धुतलेले नसावेत असे माझ्या बायकोचे मत पडले.

हे तेल बनवणाऱ्यांना व वापरणाऱ्यांच्या आवडीला माझा नमस्कार.

Monday, February 04, 2008

काळा घोडा आर्ट फेस्टीचल - २००८व्यसन चांगले का वाईट हे सांगत नाही, वाईट आहे ती सवय. ती सवय सोड.

Sunday, February 03, 2008

धुक्यात हरवलेले सापुतारा
ऐसो कैसो आयो रिता रे

आज पहाटॆ पासुन मुंबईत थोडासा बेमौसमी पाऊस पडतोय. मध्यंतरीच बऱ्यापैकी थंडी होती. हे निर्सगाचे ऋतुचक्र असे अनियमीत होत चालले आहे.

लहानपणी दिवाळीत भल्यापहाटे अभ्यंगस्नानाच्या समयी चांगली कचकचुन थंडी असायची , कढत कढत पाण्याने राजा गोपीचंद स्नान व्हायचे, आता दिवाळीत ना तो पहाट गारवा राहिला आहे ना अभ्यंगस्नान.
जुन महिन्यात पावसाचे आगमन व्ह्यायचेच. पण आता पार ऑगष्ट चा मुहुर्त गाठ्ला जातो.

या अश्या ऋतुंबद्द्ल कुमारजींनी बहार रागात एक मस्त बंदीश रचली आहे

ऐसो कैसो आयो रिता रे
अंबुवा पे मोर ना आयो
कऱ्यो ना गुंजारे भंवरा रे !!
पीर बढ्योरे कोयल की
रंग ना खिल्यो हे फुलवारे !!

Saturday, February 02, 2008

टी.चंद्रशेखर. राजीनामा आणि .........

माननीय मुख्यमंत्रीजी,
फरक पडता है ना, बहुत फरक पडता है ! कर्तव्यदक्ष , कार्यक्षम अधिकारी जेव्हा मानहानी न सहन करता बाणेदारपणॆ राजीनामा देवुन निघुन जातात , तेव्हा नाही म्हटले तरी सामान्य जनतेस तो तोटाच असतो.
या उलट सिंहासनावर कोणीही या, जा, रहा, त्याला त्याचे काय ?

Friday, February 01, 2008

पासवर्ड्स, पासवर्ड्स, आणि पासवर्ड्स,

डोक्यात नुसता गुंता झालाय या पासवर्ड्सचा. किती म्हणुन ल्क्षात ठेवायचे ? कार्यालयात १०-१५ , ATM चे दोन , तिन, बॅंकेचे पासवर्ड्स, ई मेल चे दोन-चार, INTERNET साठी अनेक.

अरे देवा, परत हे सारे डोक्यात साठवुन ठेवावे लागतात, कोठे लिहुन ठेवण्याची सोय नाही

कैसी है ये पहेली ?

या आयुष्याचे कोडे उलगडणे दिवसेंदिवस अधिकाधिक कठीण होत चालले आहे.
कधी ते डर्बी मधे धावणऱ्या रेसच्या घोड्यासारखे नुसते वाऱ्याच्या वेगाने दौडत असते, तर त्याच वेळी ते घाण्याला जुंपलेल्या बैलासारखे गरागरा गरागरा तिथल्यातिथे नुसतेच गोलगोल फिरत असते, तस्सेच संथ पणे.
डिसेंबर- जानेवारी पासुन मुंबईत ऐवढी कार्यक्रमाची नुसती रेलचेल आहे, कलाप्रेमींसाठी नुसती मेजवानी, मुंबई फेस्टीवल, IMG fest, शास्त्रीय गायन ,वादन, नॄत्य, खाद्यमहोत्सव, चित्रपट महोत्सव, डॉक्युमेंटरी, शॉट, फिल्म महोत्सव, जे म्हणाले ते , पण एकाही कार्यक्रमाला जाणे झाले नाही.
दुर्दैव म्हणजे, हळहळ व्यक्‍त करायला पण वेळ नाही.

नॅनो घेण्याचा विचार आहे का ?
मस्त कार्टुन्स बघण्यात आली

पर्यावरण

नेताजी
कनवाळुपणा