Showing posts with label DIET. Show all posts
Showing posts with label DIET. Show all posts

Saturday, December 25, 2021

आहारनियंत्रणाचे तप

 पुर्वीच्या काळी ऋषीमुनी तप करण्यास बसले की कसे त्यांचे तप भंग करण्यास अप्सरांना पाठवले जायचे.


सध्या आहारनियंत्रणाचे तप करणाऱ्या राजाभाऊंच्या समोर ही अशी अनेक प्रलोभन येत आहेत.


एक मात्र खरे की त्यांचा अजुनपर्यंत विश्वामित्र झालेला नाही.


ग्रॅण्ड सरोवर. गोरेगाव. 


सर्वांनी बुफेवर ताव मारला पण राजाभाऊंनी काहीच खाल्ले नाही.


राजाभाऊ आता तरी शहाणॆ व्हा व डायटींग सुरु करा

 विलेपार्ले रेल्वेस्थानक.

राजाभाऊ रिक्षात बसले, एका कडेलाच. एक पाय जरासा बाहेर आलेला.

रिक्षाचालक म्हणाले "आत सरकुन बसा."

राजाभाऊ मनाशी म्हणाले "वा, आपल्या सुरक्षतेची ह्यांना किती काळजी "


परत कधीतरी एकदा

राजाभाऊ रिक्षात बसले, एका कडेलाच. एक पाय जरासा बाहेर आलेला.

रिक्षाचालक म्हणाले "आत सरकुन बसा."

राजाभाऊंना बरं वाटले, चला आपली काळजी घेणारं पण दुनियेत कोणीतरी आहे.


हाच प्रसंग तिसऱ्यांदा


रिक्षाचालक म्हणाले. "मधे बसा"


तेव्हा कुठे डोक्यात प्रकाश पडला. एका बाजुला बसल्याने नक्कीच आपल्या वजनाने रिक्षा त्या बाजुला कलंडत असणार, बॅलन्स सांभाळण्यासाठीचे हे सांगणे.


राजाभाऊ आता तरी शहाणॆ व्हा व डायटींग सुरु करा.


चेट्टीनाड खाद्यमहोत्सव

 राजाभाऊ उरले केवळ पानं खावुन जगण्यापुरते. 


काय दिवस आले आहेत म्हणण्यापेक्षा खरोखरीचे , आभासी नव्हेत, अच्छॆ दिन आले आहेत असं म्हणावे लागेल. शरीर कसं जरासे हलके हलके वाटायला सुरवात जी झाली आहे.


Courtyard Marriot मधे सध्या "चेट्टीनाड खाद्यमहोत्सव" सुरु आहे हे एक प्रकारे बरचं झाले. आवडीचे आप्पम आणि व्हे. स्टु. तरी खायला मिळाले.

तिन लहानुसे आप्पम , व्हे.स्टु सोबत, मुठभर भात, जणु फोडणीचा. जरासी गाजराची , पपयाची कोशिंबीर आणि फळं. 

एकदमच सात्विक आहार. 


राजाभाऊंनी आयुष्यात पहिल्यांदाच डेजर्टस कडे चांगलीच पाठ फिरवली असेल आणि ते पण त्यात भरपुर म्हणजे भरपुर निवड असतांना.


लगे रहो राजाभाऊ, लगे रहो.

old post

रेडीयो क्लब

भगवान , वाह रे वाह , तेरी माया

राजाभाऊने कुछ भी नही खाया  !

डायटींग जो चल रहा था


रेडीयो क्लब. कुलाबा. यांचे लोकेशन एकदम टॉप आहे. जवळजवळ  वर्षभराने राजाभाऊ येथे गेले असावेत. नुतनीकरण केलेले रेस्टॉरंट बघुन दिल खुष झाले. पण केव्हातरी अन्नाकडे नुसते बघत रहाणॆ कष्टाचे होवु लागले. 


मग काय. 

बाहेर जावुन समुद्राच्या समोर काहीच न करता राजाभाऊ तेथे उभ्या असलेल्या, जाणाऱ्या येणाऱ्या बोटी बघत राहिले.

बांधलेले संयमाचे बांध जेव्हा एका मागोमाग एक करत ढासळत रहातात

 कठोर परिश्रम करुन गेल्या चार महिन्यात बांधलेले संयमाचे बांध जेव्हा एका मागोमाग एक करत ढासळत रहातात तेव्हा.


भोगा आपल्या कर्माची फळं, राजाभाऊ, भोगा. 


आपलेच हात आणि आपलचं तोंड, मग त्याची सजा पोटानी भोगायलाच हवी नाही का ! 


बुलंद किल्याची पहिली तटबंदी कोसळली ती गोरेगावच्या "ग्रॅंड सरोवर" मधे. 


मोहाला शरण जातांना माणसाला वाटत असते मी तो मोह माझ्या ताब्यात ठेवला आहे. पण तो त्याचा भ्रम असतो ही गोष्ट लगेचच दोन दिवसांनी गोरेगावच्याच ओबेरॉय मॉल मधल्या "बी बी सी " मधे पनीर व चीझ रहित सिझलर्स खातांना ही लक्षात येते. 


मग परत तिसऱ्या दिवशी केवळ नाईलाजच झाला आहे, भुकेपोटी एका ऋषींनी तर कुत्राही खाल्ला होता हे मनाला समजवत "राधाकृष्ण" मधे अर्धाकच्चा रवा डोसा खाल्ला जातो आणि तो सुद्धा "फुड पॉईंट" मधे बटाटा वडा खावुन सुद्धा पोट न भरल्यामुळे.


माणसाचा आणखीन एक भ्रम असतो. हे सारे थांबवणॆ माझ्याच हातात आहे, मी ते कधीही ते थांबवु शकतो. हा पण भ्रम आहे हे मग त्याच्या दुसऱ्याच दिवशी मालाडमधे "जाफ्रन "मधे बिर्याणी खातांना लक्षात येवु लागते.


गेले तीन दिवस आपल्या कर्माची फळं भोगत राजाभाऊ घरी बसले आहेत. 


आतबाहेर, आतबाहेर करत. आता तरी शहाणॆ व्हा, राजाभाऊ, शहाणॆ व्हा. सोसवील एवढेच करा.

व्हीगन डायट

 विशेष असे काही नाही. पहिले म्हणजे माझ्या मनाने पक्क ठरवले वजन कमी करायचे. मग व्हीगन डायट सुरु केले.  मी शाकाहारी असल्यामुळे मला हे सोपे पडले.  दुध आणि दुधापासुन बनलेले सर्व पदार्थ, मध, आंबवलेले पदार्थ, साखर, भात, साबुदाणा, मैद्यापासुन बनलेले पदार्थ, तळलेले पदार्थ, लोणचे, पापड साफ बंद.


सकाळची न्याहारी , मग दोन अडीच तासाने एखादे फळ, दुपारी जेवणात दोन पोळ्या व भाजी, परत चार एक वाजता थोडेसे काहीतरी घरुन बनवुन नेलेले आणि रात्री दोन भाकऱ्या व भाजी व सत इसबगोल.


चालणॆ सुरु करायचे आहे पण ते अजुन होत नाहीयं, 


मुख्य म्हणजे बाहेर उपहारगृहात जावुन काहीही खाणे नाही.


आणि ह्या व्हेगन डायटसाठी जो सपोर्ट लागतो तो माझ्या एका मैत्रिणीकडुन मिळतोय. ते महत्वाचे.


नक्की लक्षात नाही , पण कालीयामर्दन नंतर अंगात चढलेले विष उतरण्यासाठी मला वाटते श्रीकृष्ण कदंबाच्या झाडाखाली बसले होते, हा औषधी वृक्ष आहे.