Saturday, April 28, 2007

राहुल देशपांडे आणि नांदी

सद्ध्या मी राहुलमय झालो आहे. काल कार्यक्रमाच्या सुरवातीस गायलेली ही नांदी. उद्याचा इतिहास आज रचण्याऱ्या, वर्तमानकाळातील तरुण पिढीचे हे लोभिवणारे रुप. अजुन किती वर्षे आपण गतकाळात रमत, उसासे टाकत गेले ते दिन गेले, करत बसणार आहोत ?

श्री. राहुल देशपांडें व वसंतोत्सव


शिवधनुष्य आपल्या तरुण खांद्यावर समर्थपणे उचलण्याचा संकल्प श्री. राहुल देशपांडेंनी योजीला आहे. पुण्याच्या सवाई गंधर्व महोत्सवाच्या धर्तीवर आधारीत "वसंतोत्सव" नामक संगीत समारोह मुबंईत १९ व २० मे रोजी षण्मुखानंद सभाग्रुहात आयोजीत केला गेला आहे. ह्यासाठी त्यांना हवी आहे ती आपली साथ. डॉ. पं. वसंतराव देशपांडेंच्या गायकीचे सर्वांगीण दर्शन घडविण्याचा हा पहिलाच प्रयास आहे, त्या मागची कारणमीमांसा स्पष्ट करतानां राहुलजी म्हणाले की दुर्देवानी पं.वसंतरावांवर "कट्यार काळजात घुसली" नंतर ते नाट्यसंगीत गायक आहेत हा शिक्का बसला, हे पुसण्यासाठी व त्यांची पुरती ओळख करु देण्यासाठी असा महोत्सव दरवर्षी होणार आहे. आता डॉ.वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानची धुरा देखिल राहुलजींनी आता आपल्यावर घेतली आहे. तरुण वयातील राहुलजींचे खरच जेवढे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
काल रात्री मुबंईत प्रथमच राहुलजींचा " शतःजन्म शोधिताना, संगीत नाटकाची वाटचाल" हा अप्रतीम कार्यक्रम झाला. पण जवळजवळ १२५ वर्षाचा इतिहास उलगडुन सांगण्यास २-३ तासाचा अवधि तसा अपुराच आहे. गोडी अपुर्णतेतील चाखत, तृप्त मनाने गिरगावकर मध्यरात्री घरी परतले ते पुढच्या १९-२० मे रोजी होणाऱ्या "वसंतोत्सव" वे वेध लावुन.
पण काल राहुलजींचे मनोगत ऐकताना मला असे जाणवले, खर म्हणजे माझा हा जाणवुन घेण्याचा अधिकार नाही , माझ्या मर्यादेचे उल्लघंन करण्याचे धाडस करत मला असे म्हणावसे वाटते की श्री. राहुलजी हे उत्तम हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गाणारे गायक आहेत, त्यांच्यावरही हा "शिक्का" बसु नये. सध्या ते पं. मुकुल शिवपुत्रकडे गाणे शिकत आहेत.
पुढील वाटचालीसाठी राहुलजींना शुभेच्छा व त्यांना ह्या नविन उपक्रमात भरभरुन यश मिळो ही परमेश्वरापाशी प्रार्थना.

श्री. राहुल देशपांडे- लावीली थंड उटी वाळ्याची

लावीली थंड उटी वाळ्याची, संगीत शाकुंतल मधले हे गीत तसे शृंगारीक अंगाचे, १२५ वर्षापुर्वीचे, श्री. राहुल देशपांडेनी नांदी नंतर गायला सुरवात केली. माझ्या आवडते हे गाणे. बहोत अच्छे.

Friday, April 27, 2007

श्री. राहुल देशपांडे- दादा ते आले ते गायले आणि त्यांनी मन जिंकले


चारपाच वर्षापुर्वीची गोष्ट, इंदौरात दिपावलीत, पाडव्याच्या भल्यापहाटे आम्ही समस्त मराठी समाज, नववर्षाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी रवींन्द्र नाट्यगृहात जमलो होतो. प्रयोजन होते, स्वानंद आयोजीत तरुण, प्रतिभाशाली गायक श्री. राहुल देशपांडेचा नाट्यसंगीतावर आधारीत कार्यक्रम. पडदा उघडण्याआधी, पडद्याआड जुन्याकाळाच्या प्रथेनुसार नांदी सुरु झाली. प. वसंतराव देशपांडेंची कैसट लावली होती. हळूहळू पडदा उघडू लागला, सर्वजण आर्श्चयचकीत होवुन रंगमंचावरील तो अविष्कार मंत्रमुघ्ध अवस्थेत ऐकत भावनावश होत होते. श्री. राहुल देशपांडे नांदी गात होते. ते आले त्यांनी गायला सुरवात केली आणि त्यांनी जिंकले, इंदौर काबीज केले. टाळ्याच्या गजरात त्यांना दाद देणे सुरु झाले. वा, वा, बढिया, क्या बात है? पहिल्याच दर्शनाने रसीक नादवला, खुळवला, श्री. राहुल देशपांडेच्या प्रेमात पडला. नांदीनंतर श्री. राहुल देशपांडेनी जवळजवळ तीन, चार का पाच ? देव जाणे, येथे वेळेचे भान होते कोणाला ? (फक्त्त मध्यांतरात पोह्याचा बेत होत त्यापुरतेच आम्ही होशोहवासात होतो) (या होशोहवास शब्दावरुन "युं खुदाके लिये छीनो ना मेरे होशोहवास । ऐसे नज़रोसे ना देखो खु़मार आ जाये ॥ - नुरज़हान), सुरवातीच्या काळापासुन अगदी अलीकडच्या काळातील नाट्यगीते ऐकवली. तेथे सर्व वर्तमानपत्रानी त्यांना कार्यक्रमाआधी व नंतर अगदी डोक्यावर घेतले होते, भरभरुन राहुलजींवर लेख लिहिले जात होते ? ( आपल्या मुंवई, पुण्यात ही गोष्ट मोठी दुर्मीळ ) . जोहर मायबाप जोहार.
ह्या कार्यक्रमाआधी आदल्या दिवशी संध्याकाळी ते डॉ. शशीकांत तांबे यांच्या घरी गाणार असल्याचे वर्तमानपत्रात वाचुन मी डॉ. तांबेच्या घरी पण गेलो होतो. पण काही कारणास्तव श्री. राहुल देशपांडेचे ते गाणे रद्द झाले. ( मुख्य कार्यक्रमापुर्वी ते कसे दुसरीकडे गाणार ? आयोजन करणाऱ्यांना हे समजायला हवे होते, मग डॉ. तांबेच गायले) . त्या नंतर मी श्री. राहुल देशपांडेचा मुबंईतील कार्यक्रम सहसा चुकवत नाही. दोन वर्षापुर्वी श्री. राहुल देशपांडेचा लोकमान्य सभाग्रुह, विलेपार्ले, येथे शास्त्रीय संगीताचा झालेला कार्यक्रमपण मला चांगलाच आठवतो.
हे सारे आज आठवण्याचे कारण काय तर आज बस मधुन जाताना मी अचानक पं. वसंतराव देशपांडेचे नाव लिहीलेला फलक वाचला. तो वाचण्यासाठी बस मधुन उतरुन पहीले तर काय उद्या रात्री साडेआठ वाजता साहित्य संघात श्री. राहुल देशपांडेचा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आहे. मला जायलाच हवे.
ह्या तुलनेवरुन.
मध्यंतरी मी मुकुल शिवपुत्र यांच्या कार्यक्रमाला गेलो होतो, तेव्हा ते " माझ्या सुरवातीला माझे गाणे ऐकल्यानंतर लोक, आम्हाला पं. कुमारजी गंधर्वांची आठवण झाली हे सांगायचे, मग मला ह्या तुलनेचा राग यायचा ,पण आज मलाच माझ्या वडीलांची खुप आठवण येत आहे " अश्या अर्थाचे काहीतरी म्हणाले. त्याच्या स्वरात विशाद होता का ? देव जाणे. खरच ही तुलना कीती अयोग्य असते.
हरीवंशराय बच्चनची एक सुंदर कविता आहे. महान वृक्ष आपल्या खाली वाढणाच्या झाडाझुडपांना बघुन म्हणातो की ही माझ्या छ्त्रछायेत ही किती सुखी आहेत. उन, पावसाचा मारा मी झेलतो, यांना कसलीच तोशीश लागुन देत नाही. झाडेझुडपे म्हणतात हा वृक्ष एकटाच खुप मोठा झाला आहे, वाढ्ला आहे, आणि ह्याने तर आमची वाढ खुंटुन टाकली आहे.
श्री. राहुल देशपांडेंवर श्री, तात्या अभ्यंकरनी त्यांच्या ब्लॉगवर अप्रतिम लेख लिहीलेला आहे.

ना चाहू हिरामोती, ना चाहू सोनाचांदी


ना चाहू हिरामोती, ना चाहू सोनाचांदी ये तो मेरे किस काम के ? देता है दिल दे बदले मे दिल ले . हे सारे चित्रपटात व गाण्यातच शोभुन दिसते. प्रत्येक्षात हे मिळवण्यासाठी माणसाला काय काय करायला लागते.

ता.क. माझीया अर्धांगनीच्या मते मला तीन महाभयानक रोगाने पछाडलेले आहे आणि मी एक फुकट गेलेली केस आहे. कॉंम्पुटरीया, नेटेरीया व ब्लॉगेरीया ही या रोगांची नावे.

वॉर्डन बेकरी व स्नॅक शॉप


आता पर्यंतच्या माझ्या खाद्ययात्रेत वॉर्डन बेकरी व स्नॅक शॉप वर लिहायचे कसे काय राहुन गेले देव जाणे. नाना चौक जवळ, ऑगष्ट क्रांती मार्ग, गवालीया टॅक, ग्रॅट रोड, हा या बेकरीचा पत्ता. आणि तिची ओळख बेकरीत मिळण्याऱ्या विविध केक, पेस्ट्रीज, पाव, बिस्कीटे, स्नॅक्स, वेफर्स, फरसाण, खाकरा, आदी वस्तुंवरुन पटते. वॉर्डन बेकरीत मिळणारा आमंड टार्ट हा आमच्या तिघांचा आवडीचा पदार्थ. येथे मी अजुनपर्यंत केक, पेस्ट्रीज खालेल्या नाहीत, त्या बद्द्ल मी फार कर्मठ आहे, गेलॉर्ड शिवाय दुसरीकडे खाणे मला नामंजुर आहे.
ता.क काल मी पावभाजीसाठी पाव आणले पण माझी त्याच्या दर्जाबद्द्ल निराशा झाली.

मुंबईतील रस्ते



म्ह्टले बघुया आपल्या मुंबईतील रस्ते कसे आहेत ? हे त्याचे नमुनेदार फोटो . मुंबईतले रस्ते सुमार दर्जाचे... वाहन चालवता येईल असे मुंबईतील रस्ते नाहीत, आंतरराष्टीय शहर म्हणुन दर्जा असला तरी रस्ताचा दर्जा तसा दिसत नाही, असे उदगार सोमवारच्या सुनावणीत मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश स्वतंत्रकुमार यांनी काढले.
१.ह्या रस्तातील भेगा, फटी बुंजवायच्या कोणी ? ह्यात मोटरसायकल, स्कुटर चे चाक अडकुन मग त्या घसरतात.
२.घरगल्य्यातील सांडपाणी रस्तावर येत आहे. जवळपास रहाणारे नागरीक, दुकानदार यांना मनापात जावुन ते साफ करावसे पण वाटत नाही का ? नगरसेवकांना आपल्या विभागातुन किमान आठवड्यातुन एकदा फेरफटका मारुन ह्या सर्व विसंगतीची नोंद घ्यावीसी वाटत नाही का ?
३. रस्तावर चालणारी कामे किती दिवस, महिने, वर्षे चालतात ह्या वर नियंत्रण असावे का ? ही सर्व कामे शनिवार, रविवार, किंवा रात्री युद्धपातळीवर करुन ताबडतोब का पुरी केली जात नाहीत ? जेणे करुन वाहतुकीला त्रास होणार नाही. चीन म्हणे विक्रमी वेळात तिबेटच्या पठारावर, दुर्गम जागी , प्रतिकुल परीस्थितित रैल्वे लाईन बांधते.
४. कामे पुर्ण झाल्यावर रस्ता पुर्ववत करायचा केव्हा ? आणि कोणी ?
५. रस्तावरील खड्डे तर जीवना अपरीहार्य भाग बनले आहेत . मोटरसायकल, स्कुटर चालवणाऱ्याच्या पाठीचे काय होत असावे ? किंवा ह्या मुळे होणाऱ्या अपघाताचे प्रमाण किती असावे ?
६.भर चौकात, सर्कलजवळ ही कचराकुंडी ठेवली गेली आहे ? रात्री ह्या वर वाहने धडकण्याची शक्यता नाकारताना येत नाही.

Wednesday, April 25, 2007

Let it go- harekrishnaji

माझी एक वाईट सवय आहे, आयुष्यात एखाद्या गोष्टीत, कामात, कार्यात मी स्वःताला येवढे गुतुंन, गुरफटुन, झोकुन घेतो की कोठे थांबायचे ह्याचे भानच रहात नाही. शेवटी यातुन न थांबल्यामुळे मनस्तापच पदरी येतो. शारीरीक, आर्थिक व मानसीक या तिन्ही आघाडीवर. या माहिती मायाजालावर ही ब्लॉग लिहीताना केव्हा आणि कोठे थांबायचे हे पण कळलेच नाही. मला वाटते ती वेळ आता आली आहे. याच्या पुढे मी काही लिहीन असे वाटत नाही.

निदान तेवढा वेळ मी माझ्या दुरावलेल्या बायको व मुलासाठी देवु शकेन.

सवाल

"राज्यातील साडेचार लाख मंदीरे, मठ व देवस्थाने यांच्या दोन लाख साठ हजार कोटी रुपयाच्या संपत्तीवर आणि दोन हजार कोटी रुपयाच्या वार्षिक उत्पन्नावर सरकारचा डोळा असल्याचा आरोप" - आज सकाळी ही बातमी लोकसत्ता मधे वाचल्यावर असंख्य सवाल माझ्या मनात आले.
माय गॉड, आपल्या राज्यातील मंदीरांची दोन लाख साठ हजार कोटी रुपयाची संपत्ती आहे ! ही एवढी संपत्ती आपल्या ह्या राज्यातील देवस्थानांची ? त्यात परत दोन हजार कोटी रुपयाचे वार्षिक उत्पन्न ? ह्या अफाट पैश्याचे होते तरी काय ? मग ह्या राज्यात रहाणारी असंख्य माणसे दळीद्री अवस्थेत का बरे राहिली आहेत ? हे राज्य असे डबघाईला का बरे आले आहे? आपल्या ह्या प्रगत राज्यास मागासलेली अवस्था का आली आहे ? शेतकऱ्यांना कर्जबाजारी अवस्थेत आत्महत्त्या का बरे करायला लागत आहेत ? पैश्याअभावी अत्यंत हुशार पण गरीब मुलांना उच्च शिक्षणापासुन वंचीत का बरे रहावे लागते ? ते तर जावुद्या, आज हजारो बालके प्राथमिक शिक्षणापासुन वंचीत का बरे रहात आहेत ? ह्या सर्व श्रीमंत देवस्थानांच्या पंचक्रोशीतील पाचपन्नास गावांचे स्वरुप अजुनही का बरे पालटुन जात नाही ? निदान ती देवस्थाने ज्या गावात आहेत ती गावे तरी अजुनही अशी दैनावस्थेत का बरे रहातात ? गावकऱ्यांना आपली गावे सोडुन रोजीरोटी साठी परगंदा का बरे व्हावे लागते ? अजुनही असंख्या बालके कुपोशणाचे बळी का बरे पडत आहेत? अजुनही सर्वसामान्याना परवडेल अश्या दरात वैद्यकिय सोयी सर्वत्र का बरे उपलब्द झालेल्या नाहीत ? ह्या सर्व अमाप संपत्ती चा विनियोग समाजकारणासाठी योग्य रीतीने का बरे केला जात नाही ? आज ह्या अमाप संपत्तीमधे आपल्या देशाचे भवित्तव्य पालटण्याची ताकद असुन सुद्धा तो असाच पडुन का आहे? आज दान करणारे हीच माणसे दर महिन्याला आपण रहातो तो विभाग स्वच्छ ठेवण्यासाठी महिनाकाठी १५-२० रुपये वर्गणी काढताना हात आखडता का घेतात ?
आज आपल्या राज्यातील देवस्थानांचे हे एवढे उत्पन्न तर सबंध देशात काय असेल ?

Tuesday, April 24, 2007

स्वीट बंगाल


दादा, रोसोगुल्ला. सोंदेश ख्वाबेन ? अस्सल, रसभरीत, चवदार, मधुर, बंगाली मिठाई खाण्यासाठी आता मला कोलकोताला जाण्याची गरजच उरली नाही. अरे लालची माणसा, लालच बहुत बुरी बला है! व्यंकटेश माडगुळाकरांची अस्वलाची कथा तुला ठावुक आहे ना. पावसाळ्यात बहाव्याची झाडे शेंगानी लगडतात, अस्वलाला या शेंगा फार प्रिय. पण त्या अती खाल्ल्या की पोटात प्रचंड दुखते, वेदना होतात, सतत शी होते, चालण्याचेही बळ राहत नाही.

आदल्या पावसाळ्यात आलेल्या ह्या मरणप्राय अनुभवाने अस्वल शहाणे झालेले असते. आता ह्याच्या पुढे शेंगा न खाण्याचा ठाम निश्चय करते. जंगलातुन भटकताना, बहाव्याचे झाड दिसल्यावर हिरव्यागार, टचटचीत भरलेल्या लांबसडक शेंगा त्याला मोहवु लागता, क्षणभर मनाची चलबिचल होते, पण नाही. निश्चय ठाम असतो. पुढेचे झाड येते, पुन्हा चलबिचल. हळूहळू मनाची समजुत अस्वल घालु लागतं. एखादी शेंग खाल्ली तर ते काही वाईट नाही, हावरेपणा नाही करायचा. तिसऱ्या झाडाशी आल्यावर अस्वल हळुच एक शेंग तोंडात पकडतं. खातं. ही शेंग काही फार मोठी नव्हती, अजुन एखादी खायला काय हरकत, असा विचार करुन दुसरी शेंग खातं, पण खवळलेले तोंड ऐकत थोडच ? मग तिसरी, चौथी. आता मात्र थांबलेच पाहीजे. अस्वल ठरवतं. पण दुसरं मन म्हणते - नाहीतरी आता चार शेंगा खाल्याच आहेत, हौऊ दे काय व्हायचे ते. खाऊ पोटभर. अस्वल पोटभर शेंगा खातं. अगदी खुश हौउन फिरत राहतं. पण संध्याकाळ व्हायला लगते आणि पोटात पहिली कळ उठते. मागचा पावसाळा आठवतो. कळांवर कळ येऊ लागतात, अस्वल गडाबडा लोळतं. संडासाला धार त्यातुन उठून दुसरीकडे जाण्याच त्राणही काही वेळाने अस्वलात रहात नाही. दोन दिवस या नरकात अस्वल लोळत राहतं. पुन्हा पुन्हा निश्चय करतं, की आता पुन्हा म्हणुन शेंगाना तोंड लावणार नाही. छे ! काय या वेदना ! मरुन गेलो तर सुटेन तरी. ( शामला देशपांडे लिखित " पोट सांभाळा " या श्री व सौ या मासीकातील लेखातुन साभार)

तर सांगायचे म्हणजे, मुबंईत अनेक ठिकाणी "स्वीट बंगाल" च्या शाखा आहेत, बऱ्याचवेळा आम्ही (मी व माझी बायको) १. लेडी जमशेटजी मार्ग, सेनाभवन जवळ, दादर २.बिग बझार, लोअर परेल, ३. महेश्वरी उद्यान, माटुंगा ४. जागतीक व्यापार केंद्र, कफ परेड, ई. ठिकाणी जावुन मस्तपैकी रसगुल्ला, गुलाबजामुन, संदेश, आदी हाणतो.

मग घरी आलो की माझे वाढलेले वजन, चरबी घेवुन चिंता करायला लागतो. आता सांगा अस्वल आणि मी ह्यात काय फरक आहे का ?

Monday, April 23, 2007

ये तेरा घर ये मेरा घर

सध्या मला धोका आहे. दाराबाहेर किंवा खिडकीत ऊभे राहण्याची सोय राहिली नाही. ते केव्हा हल्ला करतील सांगता येत नाही. अर्थात ह्यात त्यांची काहीही चुक नाही. ते बिचारे ह्या माणसांच्या जंगलात आपल्या पिल्यांचे संरक्षण धडपडत असतात. त्या जोडीला केवढे सावध रहावे लागते.

बालकथेत स्थान मिळालेले आहे ते चिमणाचिमणीच्या घराला, त्याचे घर मेणाचे, कावळ्यांचे घर शेणाचे. पण दोघांच्याही भावना सारख्याच. ह्या हंगामात कावळाकावळी घर बांधायला घेतात, एकएक करुन काडया, वायरी जमा करायच्या, घरटे बांधायचे, अंडी टाकायची, ती उबवायची, पिल्ल्यांचे पालनपोषण करायचे, त्यांचे मानवा पासुन रक्षण करायचे, ती मोठी झाली की उडुन जाणार, घरटे विस्कळुन जाणार.


Sunday, April 22, 2007

श्री . शौनक अभिषेकी

श्री . शौनक अभिषेकी व पंचम निषाद


गायन श्री . शौनक अभिषेकी, संकल्पना - पंचम निषाद, वेळ भल्या सकाळी ६.१५वा. पु.ल.देशपांडे महाराष्ट कला अकादमी च्या प्रांगणात, माझ्या सारखे असंख्य रसीक आज सकाळी जमा झाले होते. मजा आली. श्री. शौनक अभिषेकीनी आपल्या गायनाची सुरवात श्रीमतभैरव रागाने सुरु केली, त्यानंतर गायलेल्या खटतोडी ह्या अनवट रागाने बहार आणली . नेहमीप्रमाणे भजन व भैरवीनी सांगता झाली.


पंचम निषाद व पु.ल.देशपांडे महाराष्ट कला अकादमी यांनी एक फार चांगला, अभिनम उपक्रम सुरु केला आहे, दर महीन्यात एका रविवारी सकाळी ६.१५वा, तरुण गायक / गायिका चा कार्यक्रम ते आयोजीत करतात, ज्यात सकाळचे राग ऐकण्याची एक दुर्मीळ संधी मिळते.

Saturday, April 21, 2007

गणपती आराधना


सर्वप्रथम वंदना । गौरीशंकरनंदना
सकलभक्त पावना। सर्वार्थ साधना
भवाग्नीत पोळलो रे । भवजली बुडलो रे
भवतापे तापलो रे । भवानी सुता
संकटी सापडलो रे । संसारात पडलो रे
व्यर्थ धडपडलो रे । संकष्टीपावना
सुटण्यासाठी कष्टलो । तव भजनी तुष्टलो
द्वारी मुझीया तिष्टलो । सुरवरबंधना
ऐकले विघ्ने हरशी । जाळशी रे पापराशी
अपराध विसरशी । एकदंता
मोकलूनी मी त्वरेने । धाव घेतली वेगाने
आलो बहुत आशेने । मोदकप्रिया
प्राथावे रे जीवाभावे । किती किती विनवावे
किती रे तुला स्तवावे । प्रथमेशा
अवघ्या अवनीवरी । जो सर्वथा राज्य करी
का न माझे दुःखहरी । अष्टविनायका
पाझर नये म्हणूनी । जावे कारे परतुनी
थकलो रे आळवुनी । परशुधरा
प्रसन्न कसा रे होशिल । आपत्तीत तारशील
दया कधी करशील । प्रसन्नवदना
विनम्रे विनवी प्रभा । उजवी अंधरीनभा
राही पाठीमागे उभा । विघ्ननाशका
अंगारकी संकष्टी रोजी , माझ्या वडीलांनी केलेली ही श्री गजाननाची आळवणी.

ठाकुर मुझे आंबा दे दे ठाकुर



ज्या आंबामहोत्सवाचे वेध लागले होते तो आखिर प्रभादेवीला सुरु झाला. केलीन यंदाला आंबा आहे कुठे ? आंबामहोत्सवात दर तसे चढेच होते. बागाईतकारांची संख्याही तशी रोडावलेलीच दिसली. सध्यातरी दोन डझनावर समाधान मानले आहे, त्यात परत फळ पिकायला किमान ४-५ दिवस तरी जाणार तो पर्यंत प्रतिक्षा करणे आहे.


मध्यंतरी वर्तमानपत्रात आंबा जपानला निर्यात करणार असल्याची बातमी वाचली. घरचे उपाशी नी बाहेरचे खाती तुपाशी. ये सरासर नाईन्साफी है.


ठाकुर मुझे आंबा दे दे ठाकुर.

Friday, April 20, 2007

जमवा चलो रे ! राजधानी मा



आज मी दिवसभर सामाजीक कार्यासाठी (?) घराबाहेर होतो. आज दिवसभर खुप गरम होते, पारा वर चढला होत, घराबाहेर आणि घरात सुद्धा.

मग मी रात्री तपमान खाली उतरवण्यासाठी बायको व मुलाला घेवुन ऑपेरा हाउस येथे नविन आलेल्या राजधानी ह्या उपहारग्रुहात गुजराती थाळी जेवण्यास गेलो.

आज किती तरी दिवसांनी आम्ही निवांतपणॆ जेवलॊ. आमरसपुरीचा बेत होता. चक्क डाळींबी, कच्चा टॉमेटो, कारले, टॉमेटो-बटाटा भाजी, कढी, गोड डाळ, मजा आली. रु.१५२/- (माणसी) मधे पोटभर जेवलो.

बाबा लगीन, बाबा लगीन

अखेर गंगेत घोडे न्हाले. शुभघडी, शुभदीन, शुभ मुहुर्तावर , सर्व वाईट ग्रहांची शांती केल्यानंतर, प्रमुख देवस्थानांना भेट व भेटी दिल्या नंतर आज सर्व बातम्या वाहिनींना कामाल जुंपत नवरदेव अखेरीस बोहल्यावर चढले, दोनाचे चार हात झाले, घरी सुनबाई आल्या.

Wednesday, April 18, 2007

नियम म्हणजे नियम.

एक, दोन, तीन, पाच, आठ, तेरा, एकवीस, जेव्हा असंख्य वाहानचालक एकाच जागी वर्षोनुवर्षे तो एकच वाहतुकीचा नियम भंग करीत असतील तर तो दोष केवळ वाहानचालकांचाच असु शकतो काय ? ह्याच एका जागी नियम मोडणाऱ्यांना पकडण्यासाठी वाहतुक पोलिस नियमितपणे कसे हजर असतात ? अनेक ठिकाणी डोळेझाक का केली जाते ?

स्थळ १ : ताडदेव पासुन हाजी अलीला जाताना उजवीकडची लेन, महालक्ष्मी रैल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या वाहानांसाठी आहे, परंतु रोजच्या रोज अनेक वाहानचालक येथे घोळ घालतात व ह्या लेन मधुन वरळीला जाणाऱ्या रस्ताकडे वळतात आणि अलगद कायद्याच्या रक्षकाच्या हाती सापडतात.
ह्या चुकणाऱ्यांचे प्रबोधन करायचे कोणी? मार्गदर्शक फलक लावायचे कशासाठी ?

स्थळ २. : एरॉस चित्रपटग्रुह, जमशेट टाटा रोड, हाकेच्या अंतरावर वाहतुक पोलिस चोकी आहे. येथे वहाने उभी करु नये चा फलक आहे तरी पण वहाने सुखाने उभी असतात, अगदी बसथांब्यावर सुद्धा.

स्थळ ३. : एरॉस चित्रपटग्रुह, जमशेट टाटा रोड, मी यामाहावर, सरळ महर्षि कर्वे रोडच्या दिशेने निघालेलो, पहिलाच पाऊस, रस्ता निसरडा झालेला, सिग्नल अंबर झालेला, मी झेब्रा क्रॉसींग वर थांबलेलो. पर्याय दोन होते, नियमाचे पालन करण्यासाठी, अफाट गर्दीतल्या माणसांना टाळत किंवा उडवत पुढे निघुन जाणे, त्याच बरोबर स्वताचा जीव धोक्यात घालणॆ कारण समोरील वाहतुक (लोकांना टाळेटाळे पर्यंत) सुरु झाली होती. मला दंड भरायला लागला.

स्थळ : ग्रांटरोड, सिग्नल अंबर झालेला, मी झेब्रा क्रॉसींग वर थांबलेलो नाही कारण नियमाचे पालन झाले पाहिजे. कोपऱ्यावर उभ्या असलेल्या वाहतुक पोलिसांनी माझ्या कडुन दंड वसुल केला, सिग्नल मोडल्याबद्द्ल.

देवा मला पाव.

जा वत्सा मुबांपुरीत वरळी नाक्यावर जा तेथे सिटी बेकरी आहे तेथे मस्त पाव मिळतात , नरम पाव, कडक पाव काय म्हणाल ते मिळेल. दिवसा जा, दुपारी जा , अगदी रात्री जा, ताजे गरम पाव घेण्यासाठी सिटी बेकरीत झुबंड उडलेली आढळून येईल.
वरळी नाक्यावरचे सिटी बेकरी हे एक लॅडमार्क आहे

बाई तुझ्या सौभाग्याला धोका आहे.


बाई तुझ्या सौभाग्याला धोका आहे. भगत म्हणाला. बाईंची भितीने तारांबळ उडली. तळहातावर चिमुटभर कुंकू भगताने ठेवले. मुठ बंद करा. मुठ उघडल्यावर आतले कुंकू काळेठक्कर पडलेले. बाई गर्भगळीत झाल्या. तुमच्या नवऱ्याच्या वाईटावर तुमच्यावर जळणारी जवळचीच व्यक्ती आहे, त्याने करणी केली असुन, मुठ मारली आहे त्याने ही त्याचा हा पुरावा, तुमच्या सौभाग्याची निशाणी असलेले हे लाल कुंकू काळे पडले.
ह्यावर उपाय काय महाराज ? करणी उलटावी लागेल , खुप खर्च येइल. काही हरकत नाही, बुवा माझी तयारी आहे. बाई पैसे देतात, बुवा करणी उतरवतो.
बाई दुसरा हात पुढे करा, तळहातावर हळद ठेवली जाते, मुठ बंद करा. आता मुठ उघडा. पिवळी हळदीचे लाल कुंकू होते. बाई, तु नशिबवान, धोका टळला, बाईंनी सुटकेचा निस्वास सोडला.
अश्यारीतीने कित्येक भोळ्या बायका ह्या साध्यासोप्या चमत्काराला फसत असतील.
कुंकवात, हळदीत, थोडीसी कपडे धुण्यासाठी वापरली जाते ती डिर्टजंड पावडर, सर्फ़, निरमा, टाईड ई. मिसळा व ह्या प्रयोगाला सिद्ध व्हा. ऊन्हाळ्यात हात घामजलले असतातच अन्यतहा हात स्वच्छ धुवुन घेण्यास सांगणे.
साभार : महाराष्ट अंधश्रद्धा निर्मुलन समिती ह्यांच्या "अंधश्रद्धेची दुनिया, चमत्काराची किमया " ह्या पुस्तकातुन.

Tuesday, April 17, 2007

माझी मुबंई

मी आपण रहात असलेले शहर स्वच्छ, सुंदर करण्यासाठी धडपडणाऱ्याच्या माहीती साठी नवीन blog निर्माण केला आहे. आपण आपल्या विभागात ह्या साठी प्रयत्न केले असतील तर ह्या जरुर मला कळवा. ह्या blog वर ते प्रसिद्ध करायला मला आवडेल.

http://maazimumbai.blogspot.com/

भानामती

आणि अचानक बघताबघता खुंटीवर टांगलेल्या साडीने पेट घेतला. नक्कीच भानामती ही. काळी जादू, अंगावर बिब्ब्याच्या फुल्या उठवते, कपडे फाडते, जाळते, घरावर दगड, लिंबु टाकते, कोणीतरी अद्रुश्य अमानवी शक्ती हे घडवुन आणत असावी.

जरा थांबा, विचार करा, आपण शाळेत रसायनशास्त्र शिकलो आहोत, ते आठवा, कार्बन-डाय-सल्फाइड व पिवळा फॉस्फरस ह्याचा हा खेळ, कोणीतरी व्यक्ती तुमच्या नकळत तुमच्या कपडयावर हे लावते, कार्बन-डाय-सल्फाइड हे बाष्पनशील आहे, त्याची वाफ होते व कपडयावर पिवळा फॉस्फरस उरतो, सर्वसाधारण तपमानाला तो पेट घेतो त्यामुळे कपडे आपोआप पेटतात.

हेच मिश्रण मेणबत्तीच्या टोकावर लावा, देवाचा चमत्कार, मेणबत्त्या आपोआप पेटतात,

दक्षता : रसायने फार काळजीपुर्वक हाताळणे, पिवळा फॉस्फरस हाताने हाताळू नये.
साभार : महाराष्ट अंधश्रद्धा निर्मुलन समिती ह्यांच्या "अंधश्रद्धेची दुनिया, चमत्काराची किमया " ह्या पुस्तकातुन.

Sunday, April 15, 2007

वळ्वाचा पाउस

सटासट, सटासट, थडाथडा थडाथड, गारांचा वर्षाव होत होता, अवचित वळवाच्या पावसाने खिंडीत गाठले. आज सायंकाळी चारच्या सुमारास खाली दुरवर क्षितीजावर धुळीचे लोटच्या लोट उसळु लागलेले वरुन दिसत होते, बोलबोलता वातावरण अंधारुन आले, क्षणभरात हे धुळिचे वादळ वरती येवुन ठेपले. आपण डी एस के विश्वात आहोत हा संभ्रम, हा तर आखाती प्रदेशच आहे की काय ? चहुओर धुल आणि मातीचे राज्य पसरलेले. हातापलीकडचे ही दिसु नये हि परिस्थिति.

अकस्मात हे सारे निसर्गाचे भयानक वातावरण गायब झाले, सर्व काही एकदम स्वच्छ झाले. पण ही होती वादळापुर्वीची शांतता.

परत एकदा काही काळानंतर वातावरण अंधारुन आले, गगनात बिजुरिया चमकु लागल्या, विजेचे तांडव नॄत्य सुरु झाले, आता प्रतिक्षा होती केव्हा एकदा सुरु होतो गारांचा वर्षाव ह्याची. जास्त वेळ वाट बघावी लागली नाही, गरजत, बरसत सुरु झाला वळवाचा पाउस, आपल्या आयुधासह, एका हाती भल्यामोठाल्या गारा , दुसऱ्या हाती बोचरे, थंड वारे घेउन बेसावधांची त्रेधातिरपट उडवित. लहानात लहान मुल होत मी लागलो गारा वेचायला, मुबंईच्या माणसांना वळवाचा पाउस, गार म्हणजे नाविन्यच की.

हवेतील गारवा मस्तपैकि वाढला, वातावरणात बेहोशी, मदहोशीचे माहोल, संपुर्ण भिजलेलो मी, त्यात सोबत गिरिजादेवींचे " पिया नही आये, काली बदरीया बरसे "

तुम भी होती अच्छा होता.

Friday, April 13, 2007

आंबा पिकीतो रस गळीतो, कोकणचा राजा झीम्मा खेळीतो.

ज्याच्या मंजिरी कामदेवाच्या पंचबाणापैकी एक आहेत असा हापुस आंबा यंदाला गेला कुठे ?

पिवळसर, केसरी रंगाचे हे डोलदार फळ, फळांचा सम्राट, ज्याचे माधुर्य व सुवास काय वर्णावा ? घरी अर्धवट पिकलेले फळ आणावे, त्याची अढी लावुन पिकण्यासी योग्य समय द्यावा, नैसर्गीकरीत्या, पुर्णपणे पिकल्यावर त्यासी आंजारुन गोंजारुन त्याच्या रंगरुपाचे , सुवासाचे कौतुक करीत लडिवाळपणे, हळुवारपणे, हाताळत, त्याचा योग्य तो मान राखत आस्वाद घ्यावा, कधीतरी छान पैकी आमरसपुरीचा बेत आखावा, पायरी, राजापुरी आंबे रसाला उत्तम.

पण हे क्षण हल्ली दुर्मीळ होत चालले आहेत. बाजारात आंबा विकत घ्यायला गेलात तर दिसते काय तर काळे डाग पडलेले, काळसर, सुरकुतलेले, रसहीन अवकळा आलेले फळ, जे हातात सुद्धा घेववत नाही, आणि किमंती तर काय विचारुच नका. वरुन पिकलेले पण चवीला आंबट असणारे, रसायनामुळे दोन तीन दिवसात संपुर्णपणे पटकन पिकुन चटकन उतरणारे आंब्याची हालत बघवत नाही, हल्ली ह्या फळाची मिजास ओसरत चालली आहे.

ह्या अवनितीस जबाबदार कोण ? निसर्ग की त्यास ओरबडणारा मानव ?
मुबंईत भरणाऱ्या आंबामहोत्सवात बऱ्याच वेळा उत्तम दर्जाचे फळ मिळुन जाते, मी ह्या आंबामहोत्सवात व माझ्या माहितीत दोन कुटुंब आहेत जे विजयदुर्ग व पालशेट वरुन त्यांच्या घरचे आंबे मुंबईत मर्यादित प्रमाणात आणुन विकतात , त्याच्याच कडून आंबा खरेदी करतो.
ता.क. दुबईत पाठवलेल्या आंब्याला दर्जा नसल्यामुळे मागणी अजीबात नाही व तो सर्व माल तसाच पडुन आहे हे वर्तमानपत्रात वाचुन तसे बरे वाटले. आमच्या तोडातला उत्‍तम दर्जाचा माल काढायचा व तो परदेशी पाठवावचा.

Thursday, April 12, 2007

Live to Eat: Melon Margarita

Live to Eat: Melon Margarita

स्टेटस , नरीमन पॉइंट, मुंबई.



उडीपी उपहारगॄहात इडली, डोसा खाण्यासाठी मागवला की त्याबरोबर सोबत छोट्या छोट्या, लहानग्या वाट्यांमधुन सांबार, चटणी दिली जाते. ह्यात काय मजा येत नाही बुवा. इडली, डोसा बरोबर बुडवुन खाण्यासाठी भरपुर सांबार, चटणी असली की कसे बढीया वाटते. मुक्तहस्ते खाता जिव्हा मस्तपैकी तॄप्त झाली पाहिजे.
जिव्हेचे हे चोचले पुरवण्यासी स्टेटस , नरीमन पॉइंट, मुंबई , सारखे उपहारगॄह नाही. त्याच्या बाहेरील काउंटरवर स्वस्तात व पटकन खाण्यासाठी दाक्षिण्यात्य पदार्थ गरमागरम मिळतात. सकाळी, दुपारी मात्र हे ऊभे राहुन खायला लागतात, सायंकाळी बसण्याची सोय केली जाते. आयुष्यभर मी येथे ओनीयन रवा डोसाच खात आलो आहे फारफार तर साधा डोसा.

पण स्टेटस जगप्रसिद्ध्य आहे ते त्याचा चवदार, रुचकर पंजाबी जेवणासाठी, गुजराती थाली खाण्यासाठी, केवळ हेच कारण आम्हास तेथे जेवणासाठी वारंवार जाण्यास प्रवॄत्त करत नाही, येथे केवळ शाकाहारीच जेवण मिळते हेही कारण थोडके नसावे. मांसाहरीसोबत मांसाहरी उपाहारगॄहात जाण्याचा मला तिटकारा आहे.
काजु मलई मटार, पनीर मेथी मलाइ, पनीर बटर मसाला , पनीर तिक्का मसाला, मलाइ कोफ्ता, दम आलू काश्मिरी, ह्या सर्व आमच्या आवडीच्या भाज्या. ह्या सोबत मग कुलचे, रुमाली रोटी हवेच. जीरा राइस, पीज पुलाव दाल माखनी तर हवेच हवे. त्याचे स्नेकस (हाच उच्चार) तर लाजबाव असतात.

आत प्रवेश करता येथील वातावरण, सजावट पाहुन मन कसे प्रसन्नचित्त होते. मोकळ्या मनाने, भरल्याखिश्याने जेवण्याचा आस्वाद घ्यावा. रविवारी मात्र आम्ही येथे जाणे टाळतो. अफाट गर्दीचा सामना करण्याची तयारी आमची तयारी नसते.

Wednesday, April 11, 2007

शिल्प

मुंबईत हे रेखीव शिल्प कोठे आहे ? कोणी सांगु शकेल काय ?


ना खेद ना खंत, केवढी हि अनस्था ?



ना खेद ना खंत, केवढी हि अनस्था ? सिडनीला येणाऱ्या पर्यटकांपैकी नव्वद टक्के पर्यटक हे " सिडनी ऑपेरा हाउस " पाहाण्याच्या ओढिने येतात.

आणि मुंबईत ? ऑपेरा हाउस हे केवळ एका विभागाचे नाव म्हणुन शिल्लक आहे. येवढी सुरेख वास्तु पण मला त्याचे काय ? ह्या भावनेपोटी दुर्लक्षित व पडिक अवस्थेत आपल्या मरणाची वाट पहात उभी आहे. कलेची आम्हास ना कदर ना तीचे जतन करण्याची जाणीव.

काही वर्षात हि वास्तु पाडून येथे टोलेजंग इमारती उभ्या राहिल्यातर आश्चय वाटायला नको.

Tuesday, April 10, 2007

मुकुल शिवपुत्र - एक झलक

श्री. सुभाष दळवी.

सुचना - आपल्याला जर घाणीत, नरकात राहण्याची आवड असेल तर श्री. सुभाष दळवींपासुन चार हात दुर रहा . एकदा का ह्या माणसाने आपल्याला झपाटले तर मात्र खैर नाही. स्वच्छ मुंबईचे स्वप्न केवळ हिच व्यक्‍ति साकार करु शकते. मुंबई महानगर पालिकेचा मला भेटलेले हे पहिले आधिकारी जे लोकांत मिसळुन त्याच्याबरोबरीने २४ तास काम करतात.
This is to express our gratitute towards “THE MASTERMIND BEYOND THE CLINLINESS DRIVE”, the most dedicated officer of Brihanmumbai Mahanagarpalica, who works for 24 hours and 7 days to fulfill the dream of “CLEAN MUMBAI”, Shri Subhash Dalvi , for his guidance, active support and active participation and valuable help, all the time without whom it was just impossible. His one speech just one speech made the difference. It just changed the lifelong attitude of all of us and the rest is "Creating History"
(My advice to the people who enjoys staying in the most unhygenic conditions to stay away from Shri Subhash Dalvi, if they want "Status Quo". )
In south Mumbai, problem of housegullies still haunts the civic authorities. We the residents, tried to solve it through citizens initiative and participation.

We had undertaken the cleanliness and beautification drive in our lane during the month of Feb 2002 with the full support and cooperation of BMC, D ward. The cleanliness drive was initiated under the Dattaka Vasti Yojana (Area Adoption Scheme) of BMC under the able guidance of Mr. Subhash Dalvi (then Officer on Special Duty) and Shri Rajendra Vale (then AMC) and Shri Ravindra Howale (AHS ) of B.M.C.

During the Cleanliness Drive we freed all housegullies from garbage, sewage water, rodents, mosquitoes, cleaned all underground drainage and since then we have successfully maintained almost all housegullies in neat and clean conditions. All those years, we had remained complainant body and did nothing except cursing BMC for not maintaining the hygienic conditions in our surroundings. During this drive, we all residents changed our attitude and worked along with B.M.C. hand-in-hand to solve the chronic problem of cleaning and maintaining housegullies. We feel that to reduce the unnecessary burden on B.M.C in handling the solid waste the local residents should come forward and adopt their area to maintain the cleanliness

लता

प्रीतम मेरी दुनिया मे दो दिन तो रहे होते । हम प्रेम की सागर मे एक साथ बहे होते ॥
अगर मुझसे बिछ्ड़ना था तुझे ओ जालीम । दो बोल मोहबतके हमसे न किये होते ॥

लता व मदन मोहनचे हे सुरेल गीत.

माझे स्नेही श्री प्रकाश कद्रेकर, केवळ त्यांच्याच मुळे हे संगिताचे प्रचंड भांडार माझ्यासाठी उघडले गेले, दुर्मिळ गाण्यांचा भारतभर फिरुन संग्रंह करणे हा प्रकाशचा छंद. हा सारा खजिना प्रकाशनी विनामुल्य माझ्यासाठी रिता केला. त्यातली काही हि रत्ने

Aab gam ko bana lenge jeene ka sahara
Aai chand mera tujaase ye kahya raha hai, tu bevafaa na hona
Aai pyar teri duniyase hum itnishi nishani leke chale
Aaj mere nasseb ne muzko rula rual diya
Aasi muhabbat se hum baaz aai jo dil ko jalaye,sataye,rulaye
Bahare phir bhi aayegi
Baichain karnewale tu bhi chain na paye
Bajuband khul khul ja
Balma ja ja ja
Bandh Preeti Phulawar, Man leke chitachor bhul jana na, bhul jana na.
Bedard jamane se shikva na shikayat hai
Bhjulja ai dil mohabat ka phasana
Chand hai maadhyam
Chakori ka chandase pyar
Dard mila hai tere pyar ki nishani o dene wale teri meherbani
Dil hi to hai tadap gaya
Dukhiyare naina dhunde piyako
Ek dil ka lagana baki tha wo bhi lagake dekhliya
Ek thes lagi aasoo tapke
Ghadiya gini hai maine tere intazzar me
Hamare baad aab mehfil me aafasane baaiya honge
Jab raat nahi katati
Jate ho to javo hum bhi yaha yadonke sahare ji lenge
Jo muze bhulake chale gaye muze unki yaad sataye kyu
Kaaga re ja re ja re mohe piya ka sandeshwaa la re la re
Kali kali raat re dil bada sataye teri yaad aaiye
Katate hai dukh me din pehule badal badalke
Kisiki najar ka mast ishara hai jindaji,ek aasamaan ka tuta sitara hai jindagi
Koi kisika diwana na bane
Luta gayi oomidoki duniya
Luto dil mera
Mai Sagar Ki Mast Lahqr tu Aaasaman Ka chand Milan Ho Kaise Milan Ho Kaise
Man me kisi ki preet jagake
Naa umid hoke bhi duniya me jiye jaate hai dil tut gaya phir bhi hum pyar kiye jate hai
Preetam meri duniya me do din to rahe hote, hum prem ke saagar me eksaath baye hote
Pyar ki yai talkhiyaa
Saapna ban saajan aaye
Saavari surat maan bhai re piya
Sajjan ki gali chod chale
Sajjan se peheli baar mile to bole kaise humko hai aapase pyar
Subahaka intazaar kaun kare
Sunlo sajan dil ki baat
Taare gin gin beeti sari raat
Taare wohi tai, chand wohi hai hai magar
Tumhare bulaneko ji chathata hai
Tute huve aaramanoki ek duniya basaye, baithi hu te yaad ka lekarki saahara
Wo to chale gaye ai dil yaad se unki pyar kar
Yahi Bahar hai duniya ko bhul jane ki khushi mananeki
Yeh arzoo thi ke hum bahar dekenge, kise pata tha phiza baar baar dekhenge

Monday, April 09, 2007

एन. आर. नारायण मूर्ती राष्ट्रपती झाले तर ?


इन्फोसिस'चे प्रमुख एन. आर. नारायण मूर्ती राष्ट्रपती झाले तर ही घटना "फॅंटॅस्टिक' असेल, असे राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी आज येथे सांगितले. ....येथील इन्फोसिस ग्लोबल एज्युकेशन सेंटरमध्ये आज झालेल्या प्रश्‍नोत्तरांमध्ये "नारायण मूर्ती राष्ट्रपती व्हावेत, असे आपणास वाटते काय' या प्रश्‍नावर कलाम यांनी "फॅंटॅस्टिक, फॅंटॅस्टिक, फॅंटॅस्टिक... आय विल से फॅंटॅस्टिक' असे उत्तर दिले. (सौजन्य - www.esakal.com)
खरच काय हरकत आहे? ऊलट हि घटना केवळ कवी कल्पना न रहाता प्रत्यक्षात खरी झाली तर ? खर म्हणजे राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यानींच परत पुढिल पाच वर्षे राष्ट्रपतीपदावर राहण्यासाठी अनुमती दिली तर ऊत्तमच, पण राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यासारखे चांगले राष्ट्रपती आपल्याला लाभल्यानंतर परत एखादी राजकारणी व्यक्‍ती ह्या पदावर न येता एन. आर. नारायण मूर्ती राष्ट्रपती झालेतर बहार येयील. किबंहुना सर्व राजकारणी व्यक्‍तीना विजनवासात पाठवुन ( श्री मनमोहन सिंग , चिदंबरम, सुरेश प्रभु , जयंत पाटिल ह्याचासारखे अपवाद वगळता ) , एन. आर. नारायण मूर्ती व तत्सम ह्याचा हाती ह्या देशाची सुत्रे देण्यास काय हरकत आहे ?

RAHUL DESHPANDE

तात्या अभ्यंकर.: एक रंगलेला मधुकंस..

भैरवनाथ रसवंती ग्रूह


४२ अंश तापमान असता आपल्याला ऊन्हाची लागलेली झळ कमी करण्यासाठी राबणारे श्रमिक.

भास्कर हे गगनराज


नभ मेघांनी आक्रमिले तारांगण सर्व झाकोनी गेले


Sunday, April 08, 2007

पं. मुकुल शिवपुत्र व राहुल देशपांडे

पं. मुकुल शिवपुत्र

राहुल देशपांडे
श्री. मुकुल शिवपुत्र नामक अवलियाचे स्वर्गीय संगीत, गाणे ऎकण्याचे भाग्य कुणा भाग्यवंतालाच लाभत असावे. नशिबाने माझी गणती त्यात होणे आहे. आज सकाळी पुण्यात, गरवारे सभागृहात, कुमार गंधर्व जयन्ति समारोह निमित्ते मुकुल शिवपुत्रांचे गाणे ऎकण्याचा मणिकांचन योग जुळुन आला.
आनंदाने परीसीमा गाठल्यावर त्या क्षणी " बस्स मौत अगर आनी है तो इसी वक्‍त आये " असे भावना व्यक्‍त करतांना म्हणायची पद्धत आहे, मला तर अशी मौत बार बार स्वीकारत जगायला आवडेल.
आज मुकुल शिवपुत्रच्या साथीला तानपुऱ्यावर राहुल देशपांडे होते. राहुलजीचे मी ४-५ वर्षापुर्वी इंदोरला दिवाळीत पाडव्याच्या पहाटे प्रथम ऎकले त्या क्षणापासुन मी त्याच्यावर फिदा झालो आहे. त्यांनी त्यावेळी जवळ जवळ ३-४ तास नाट्यगीते गायली होती. गेल्या वर्षी विलेपार्लेला त्यांचा शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाला सुद्धा मी गेलो होतो.
ह्या दोघांचा कार्यक्रम मी सहसा चुकवत नाही.

गायनातून शिवपुत्र यांची कुमार गंधर्वांना आदरांजलीपुणे, ता. ८ - युगप्रवर्तक गायक पंडित कुमार गंधर्व यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे पुत्र, शिष्य आणि प्रतिभावंत गायक पं. मुकुल शिवपुत्र यांच्या गायनाची सकाळची विशेष मैफल आज रंगली. कुमारांच्या अनोख्या बंदिशींचा आनंद तर त्यांनी दिलाच; पण स्वतःच्या एका वेगळ्या शैलीचाही सुरेल प्रत्यय दिला. ........कुमार गंधर्वनिर्मित "धूनउगम' रागांपैकी एक "बिहाडभैरव'ने मुकुल यांनी मैफलीचा प्रारंभ केला. विलंबित त्रितालातील "ये हो रे श्‍याम' आणि त्याला जोडून द्रुत त्रितालातील "बना बनी आयो' ही रचना त्यांनी सादर केली. त्यानंतर "पिलू' रागातील "धूली भरे अती सोभित' हे रसखान यांचे पद त्यांनी गायिले. मध्यंतरानंतर त्यांनी राग "खट'मधील "आयी अंबुवा' ही बंदिश, "देसकार' रागातील कुमाररचित "आ दिलबरा' ही बंदिश पेश केली. "छैलवा न डारो गुलाल' या भैरवी ठुमरीने मुकुल यांनी आपल्या गायनाची सांगता केली. त्यांना सुरेश आचरेकर (तबला), सुरेश फडतरे (हार्मोनिअम), राहुल देशपांडे आणि विनय चित्राव यांनी तानपुऱ्यावर साथ केली.

Wednesday, April 04, 2007

Air Cool - एअर कूल



The Signboard says “50 Years of Service”

I would say “ 50 Years of excellence Service “ and I am also proud to say that during Air Cool’s journey of 50 years, three generations of ours are associated or rather enjoying the ever smiling service. Firstly my father, then me for last say 25 -30 years along with my son since his childhood. During those years I think only twice or thrice I dared, yes I dared to find out or tried other alternative out of compulsion of course and glad that I miserably failed.

Air Cool is Gents Hair Dressers opp. Churchgate railway station, one of the cleanest saloon I have seen , the only saloon where mothers do not feel awkward at all bringing their kids for the nice and neat, decent haircut.

In Air Cool, the warmth service received from the smiling, friendly, highly skilled hairdresser’s in pure white uniform makes you special. No doubt if you happen to visit during evening, you may have to wait for a while as office goers, makes it a point to go for haircut on the way home. It still worth it.

What makes Air Cool so special? The pleasant atmosphere, the décor, and the most important the rules of maintaining hygiene level followed by them. And the staff, the major credit goes to their staff for the successful business.

Tuesday, April 03, 2007

गॅलप्स

महालक्ष्मी रेसकोर्सला लग्नाआधी मित्राबरोबर व नंतर कुटंबियासमवेत मी नियमित,नित्यनेमाने भेट देत असे, अगदी अलिकडच्या काळापर्यत. खुप पैसे आतापर्यत मी घालवले असेन. खर्च केले असेन, रेसकोर्सवर. ह्यात अस्मादिकांची बायको आनंदाने सामील होत असे. (मी वाल्या कोळी का ?) त्यावेळी माझ्याकडे क्रेडीट कार्ड ही भरपुर होती. सह्या करताना मजाही येत होती. तारुण्याची नशाहि होती.

अलीकडे बरेच दिवस, महिने कि वर्षे ? झाले असतील गेलो नाही हो आम्ही "गॅलप्स" मधे रात्रीचे जेवायला. नेहमीचीच मध्यमवर्गीय रड, पैसाची चणचण. फार फार आठवण येत आहे त्या चवदार, रुचकर जेवणाची, त्या माहोलची.

गॅलप्स हे महालक्ष्मी रेसकोर्सच्या आत असलेले अप्रतिम उपहारगॄह आहे. कौटीनेन्ट्ल व भारतीय (गोवा, पंजाबी, हैद्राबादी, ई.) पदार्थ खावेत तर येथेच. येथे जाण्यासाठी आपण टर्फ़ क्लबचे सभासद असण्याची गरज नाही.

आम्ही पडलो शाकाहारी त्यामुळे केव्हाकेव्हा मासांहार करणाऱ्यांचा हेवा वाटतो. आम्ही आपले पनीर माखनवाला, कडई पनीर, पनीर दम पुख्त, कोर्न कॅप्सिकम, वेज. कोफ़्ता करी, पहाडी साग भुर्जी, मा की डाल. हर हर की डाल, सब्जी का पुलाव आदिवर समाधान मानतो. पण मांसाहार करणाऱ्यांची मात्र येथे चंगळ आहे.

अगदी छान पैकी आरामात गप्पाटप्पा करीत गॅलप्सात "फ़ौर कौर्स डिनर" घ्यावे. सुप, जेवण्याआधीचे चघळणे, मुख्य जेवण व त्यानंतर ऍपल पाय विथ आईसक्रीम किंवा चोकलेट मुस खाण्यास विसरु नये.
तॄप्त मनाने, भरल्या पोटने बाहेर पडावे.

आता आम्हाला एखादा क्षण साजरा करण्यासाठी गॅलप्सा मधे जायलाच हवे

Monday, April 02, 2007

हार्मोनी शो, नेहरु सेंटर

आर्ट, कला ह्या माध्यमाद्वारे भरपुर पैसे कमवायचे आहेत का ? एक मध्यम आकाराचा सफेद रंगाचा कॅनव्हास घ्यावा, बरेचशी सेफ्टी पिने ( बायका साडीला लावतात त्या ) घ्यावीत व ती कॅनव्हासवर सरळ रेषेत अडकावीत मधेच वेटॊळे घ्यावे व वरती डॊक्याकडे गोलगोल करीत उरलेली बाकी पीने लावत संपवुन टाकावीत रु. ३५,००० कमवाल. त्यापेक्षा बांधकामावर वापरली जाणारी रेती घ्यावी, ती सरळ जमिनीवर पसरावी, फाटक्यातुटक्या रबरी सपाता त्यावर पाऊलखुणा प्रमाणे मांडुन ठेवाव्यात जवळजवळ दोन लाख रुपये कमवाल. पण अट एकच तुम्हाला नेहरु सेंटर मधे दर वर्षी आयोजल्या जाण्याऱ्या हार्मोनी शो मध्ये तुमची कला सादर करण्याची संधी मिळाली पाहिजे.
ह्या हार्मोनी शो मधल्या कलाकॄती चांगल्या असतात ह्या बद्द्ल वादच नाही पण त्यांच्या किंमती पाहिल्यातर माझ्या सारख्या सामान्य माणसाच्या मेंदूस झिणझिण्या येतात एकेका चित्राची किंमत लाखो रुपयाच्या घरात जाते. हि किंमतीची गहन गणिते सोडवणे माझ्या आकलना पलिकडचे आहे.
कोणी कलेचा जाणकार ह्याबद्द्ल मार्गदर्शन करील का ?

डोर

माझे व्यक्‍तिमत्व जर मला नव्याने घडवायचे असेल तर ते मला डोर चित्रपटातील गुल पनांग नी साकार केलेल्या झि़नत ह्या व्यक्‍तिरेखेसारखे असेल. निर्भय, आत्मविश्वासी, स्वताला काय हवे हे जाणणारे व त्यासाठी मेहनत करणारे , स्पष्ट बोलणारे, सर्वांची काळजी घेणारे, निराश, हताश न होणारे, मैत्रीला जागणारे , प्रियकरावर, साथीदारावर जीवापाड प्रेम करणारे.
आणि मीरा सारखे सुद्धा, जीवनात बंड करुन परत ऊभारी धरणारे.
ह्या दोन्ही कलाकारांनी ह्या भुमिका अगदी ताकदीने साकार केल्या आहेत.

भारतीय क्रिकेट विश्वाला हादरा

आत्ताच दुरदर्शन वर बातम्यात भारतीय क्रिकेट विश्वाला हादरा बसल्याचे ऐकुन वाईट वाटले.
ऐवढी टोकाची भुमिका सर्वांनी घेयला नको होती. बातम्यात सांगितले कि
नुकत्याच झालेल्या विश्वचषक स्पधेत झालेल्या लाजिरवाण्या पराभवाची जबाबदारी स्विकारुन आज संपुर्ण संघाने आपली स्वेच्छानिव्रुती जाहिर केली आहे तसेच त्यात भरीसभर म्हणुन B.B.C.I च्या सर्व पदाधिकाऱ्यानी सुद्धा आपले राजिनामे मंडळाचे अध्यक्ष श्री शरद पवारांकडे पाठवले पण त्या आधीच श्री शरद पवारंनी स्वःताच राजिनामा दिला असल्याने आता पेचप्रसंग निर्माण झाला आहे.
परंतु ह्यात तोडगा काढण्यासाठी पुढे येत रेल खात्याची परिस्थितिसुधारणऱ्या श्री लालु प्रसाद यादवनी भारतीय क्रिकेट बोर्ड आपण ताब्यात घेत संपुर्ण नविन युवा संघा आपण उभारित असल्याचे जाहिर केले.
पाहु आता ह्यात श्री लालु प्रसाद यादव कितपत सफल होतात ते
All the Best,