इन्फोसिस'चे प्रमुख एन. आर. नारायण मूर्ती राष्ट्रपती झाले तर ही घटना "फॅंटॅस्टिक' असेल, असे राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी आज येथे सांगितले. ....येथील इन्फोसिस ग्लोबल एज्युकेशन सेंटरमध्ये आज झालेल्या प्रश्नोत्तरांमध्ये "नारायण मूर्ती राष्ट्रपती व्हावेत, असे आपणास वाटते काय' या प्रश्नावर कलाम यांनी "फॅंटॅस्टिक, फॅंटॅस्टिक, फॅंटॅस्टिक... आय विल से फॅंटॅस्टिक' असे उत्तर दिले. (सौजन्य - www.esakal.com)
खरच काय हरकत आहे? ऊलट हि घटना केवळ कवी कल्पना न रहाता प्रत्यक्षात खरी झाली तर ? खर म्हणजे राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यानींच परत पुढिल पाच वर्षे राष्ट्रपतीपदावर राहण्यासाठी अनुमती दिली तर ऊत्तमच, पण राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यासारखे चांगले राष्ट्रपती आपल्याला लाभल्यानंतर परत एखादी राजकारणी व्यक्ती ह्या पदावर न येता एन. आर. नारायण मूर्ती राष्ट्रपती झालेतर बहार येयील. किबंहुना सर्व राजकारणी व्यक्तीना विजनवासात पाठवुन ( श्री मनमोहन सिंग , चिदंबरम, सुरेश प्रभु , जयंत पाटिल ह्याचासारखे अपवाद वगळता ) , एन. आर. नारायण मूर्ती व तत्सम ह्याचा हाती ह्या देशाची सुत्रे देण्यास काय हरकत आहे ?
No comments:
Post a Comment