बांध प्रीती फुलडोर मन लेके चितचोर ।
दूर जाना ना दूर जाना ना दूर जाना ना ॥
मनके किवार खोल मीत मेरे अनमोल ।
भूल जाना ना भूल जाना ना भूल जाना ना ।
मालतीमाधव चित्रपटातील लता मंगेशकरनी गायलेले व सुधीर फडकेंनी संगीत दिलेले जयजयवंती रागातील हे अतिशय सुरेल गाणे मध्यंतरी परत अचानक आठवले. सुधीर फडकेंनी काही मोजक्या हिंदी चित्रपटांना अप्रतिम संगीत दिले आहे. मालती माधव हा त्या पैकी एक. माझ्या आवडीचे हे एक गाणे.
sangeetagod ह्याच्या खालील लेखात राग जयजयवंती चा उल्लेख वाचुन मागे मी या गाण्याबद्दल लिहिले होते
http://kasakaay.blogspot.com/2007/04/blog-post.html#links
परमेश्वरानी धरतीवर दर्द (दर्द वरुन लताचे एक दुसरे गाणे आठवले - दर्द मिला हे तेरे प्यार की निशानी ओ देने वाले तेरी मेहरबानी हाय ) प्रथम निर्माण केला तो भोगण्यासाठी माझ्या सारख्यांना पाठवले, नंतर दया येवुन दर्द सुसह्य करण्यासाठी लता, तलत सारखे आवाज निर्माण केले. त्याचा सोबत हुस्नलाल-भगतराम, अनिल बिस्वास, श्याम सुंदर, मदन मोहन, रवी, विनोद, सज्जाद हुसेन, सी. रामचंद्र, गुलाम हैदर, वसंत देसाई, शंकर-जयकिसन आदी संगीतकारांची कुमक दिली
ही गाणी राजाभाऊंपर्यंत पोचावीत या साठी प्रकाश कद्रेकर सारखे दोस्त दिले. डॉ.प्रकाश जोशी, उदय द्रविड, नारायण मुलानींसारख्यांची भेट घालुन दिली. प्रकाश कद्रेकरनी त्या काळात ही दुर्मीळ असलेली गाणे भल्या मोठ्या मेहनतीने, मोठाले दाम मोजुन मिळवावीत व राजाभाऊंनी त्यावर डल्ला मारावा।

