Friday, August 31, 2007

आपला गाव तंटामुक्त गाव

"आपला गाव तंटामुक्त गाव" हा एक नवा अभिनव उपक्रम महाराष्ट्र शासन सध्या राबवत आहे. शासनाच्या मला असे निदर्शनास आणुन द्यायचे आहे की याच धर्तीवरचा एक उत्तम उपक्रम गेले १८ वर्षे मी यशस्वीरित्या राबबत आहे. याची सरकारदप्तरी योग्य ती नोंद घेतली जावी.

या लोककल्याणकारी योजनेचे नाव आहे " आपले घर तंटामुक्त घर "

"आपण म्हणाल तसे", "तु म्हणशील तसे" ही या मोहीमेच्या यशाची गुरुकिल्ली. त्यात परत तंटा, भांडण, वाद, आदी यदाकदाचीत उदभवलेच तर ते सामोपचाराने कसे मिटवले जावेत याची पण मार्गदर्शनापर आचारसंहीता तयार आहे. मौनव्रत व असहकार या अमोघ माध्यमातुन ते यशस्वीरीत्या ताबडतोब सोडवले जातात. शरणांगती कमीतकमी किती मिनीटात व जास्तीत जास्त किती तासात मी स्विकारायची हे सुध्हा त्यात नमुद केलेले आहे. सर्व राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय पातळीवरचे निर्णय मी स्वतः घेतो, त्यात कोणीही ढवळाढवळ करत नाही. स्थानीक पातळी वरचे सर्व निर्णय गॄहमंत्री आपल्या अधीकारात घेतात. त्यात त्यांचा शब्द शेवटचा. अपिलला वाव नाही.

या साऱ्यांनो या, घराघरातुन सुरु करुया ही "तंटामुक्त मोहीम", आपले घर, आपला समाज, आपले गाव, आपले शहर, आपला देश, आपले विश्व, अवघे सारे तंटामुक्त करुया.

Wednesday, August 29, 2007

Word of Caution

Last week I was burning CD, and all of a sudden there was an explosion in the CD drive. The CD was broken in to pieces and not only the CD Drive cover, the pieces of broken CD also were just thrown out at a speed.
I was lucky enough to escape from the injuries. I have kept the PC on the table itself, facing the person sitting on the chair. Thank god, at that particular moment , I had shifted the chair on the left side otherwise my face, eyes would have suffered injuries.
The CD drive is now out of shape and needs to be replaced.
Word of caution : Never keep PC facing you. Please keep it down on the ground level.

Ustad Shamim Ahmed Khan


Tuesday, August 28, 2007

कॅमेरामनकी कमाल मालीका मे धमाल

गळकी ऐस्टी बस दाखवा व हजार रुपये मिळवा. या धर्तीवर साधी, सरळ, सोपी मालीका दुरचित्रवाणीच्या कोणत्याही मराठी, हिंदी वाहीनींवर दाखवा व पैसे मिळवा अशी घोषणा करण्यात काहीच अडचण नसावी. कोणालाच बक्षीस देण्याची वेळच येणार नाही.


पुर्वीच्या काळी निदान निरर्थक संवादच्या जोरावर दिवंसेदिवस, महीनेनीमहीने, वर्षोनुवर्षे मालीका रेटुन नेण्यात येत होत्या. आता नविन तंत्र गवसले आहे. कॅमेरामन च्या जोरावर दिवस ढकलायचा. त्याने अधुनमधुन ढॅण ढींग, ढीग ढॅण, करत सर्व पात्रांच्या चेहऱ्यावरुन कॅमेरा मारत, गरागरा फिरवत रहायचा, मधेच जवळुन, लगेच लांबुन. वाट्याला आलेल्या १५- २० मिनीटातली ४-५ मिनीटे सहज निघुन जातात.

किती किती म्हणुन अत्याचार सहन करायचे ?

मिठाई वरील चांदीचा वर्ख



मिठाई वर लावण्यात येणाऱ्या वर्ख बनवण्याच्या कॄती बद्द्ल आपण अज्ञानात आहोत हे किती बर आहे.
(मी दुरदर्शन वर ही कॄती बघीतली आहे. )
Since I am in the mood to appreciate, let me also mention Vidya, who brought it to my notice, that silver leaf, the stuff that I have used to garnish these Ladoos is made in such a way that it is not suitable for vegetarians. Vidya was kind enough to also provide a link which leads to several other ones that prove this fact. What makes me sad, though, is that the Mithai vendors in India, who are well aware of its production process, continue selling sweets covered with silver leaf, inspite of knowing that a large portion of their clientele consists of vegetarians. Whatever happened to social resposiblity?

कसं काय: गावो विश्वस्य मातरः - भाग १

कसं काय: गावो विश्वस्य मातरः - भाग १





फोटॊ - पांजंरपोळ, मुंबई

Sunday, August 26, 2007

उस्ताद शमीम अहमद खान



उस्ताद शमीम अहमद खान यांचे सतार वादन व तबला संगत पंडीत नयन घोष. दुग्ध शर्करा योग चुकवुन कसे चालेल ? पुण्याला जायला काल सकाळी निघालो होते. हा कार्यक्रम कळल्यावर जाणे रहीत केले. हा कार्यक्रम जास्त महत्वाचा. उस्ताद शमीम अहमद खान हे माझे आवडते सतारवादक. परत स्थळ माझ्या घराजवळच.

मग काय त्यांचे सतार वादन मनोसक्त ऐकले. माझा कॅमेरा आज मी म्यान केला. सतार ऐकताना मधेमधे त्याची लुडबुड नको. केवळ दोन -चार मिनीटांचे वादन स्म्रुतीसाठी कॅमेरात बंदिस्त केले.
साजन मिलाप या संस्थेने भारतीय विद्या भवन मधे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. साजन मिलाप नेहमीच दर्जेदार कार्यक्रम या गीता मंदिर हॉल मधे आयोजीत करत असतात. छोटेखानी हॉल मधे मोजक्याच लोकां समोर झालेले गायनवादन नेहमीच उत्तम रंगत असते.
लिहीणार - स्वर्गीय संगीतात आज डुंबुन गेलेला. ज्याला शास्त्रीय संगीत थोडेफार तरी कळायले हवे होते.

(Some problem with video upload. will try later on )


जर शार्क माणुस असता तर !

जर शार्क माणुस असता तर, तो छोट्या मासोळ्यांशी जास्त चांगला वागला असता का ? नक्कीच.
जर शार्क माणुस असता तर, त्यानी समुद्रातील छोट्या मासोळींना अनेक सुखसोयी उपलब्ध करुन दिल्या असत्या. अशा सुखसोयींमुळे छोट्या मासोळीं उत्साही व आनंदी झाल्या असत्या. छोट्या मासोळींनी निराश होवु नये यासाठी शार्क माशांनी समुद्रात मोठाले उत्सव साजरे केले असते. कारण

उत्साही व आनंदी मासोळ्या या निराश मासोळ्यांपेक्षा चविष्ट असतात.
जर शार्क माणुस असता तर ! या कथेतील वरील परीच्छेद मला फार भावला.
मुळ लेखक - बट्रोल बेस्त. स्वैर रुपांतर - नितीन जोगळेकर, साभार - लोकसत्ता.
लिहीणार - यासाठीच का निराशी रहाणारा ?

Saturday, August 25, 2007

वडेवाले आणि मी

चवहीन, रसहीन, रंगहीन, रुपहीन, आकारहीन. अरबट, चरबट, तेलकट. हे वर्णन आहे, बटाटवडयाचे, भज्यांचे, मिसळचे.

पुणे-मुंबई महामार्गावर वाकडच्या पुढे, एक्स्प्रेस वे वर वळण्याआधी असलेल्या एका सुप्रसिद्ध वडेवाले यांच्याकडे मिळणाऱ्या पदार्थांचे. तीच गत मिसळची. त्या बरोबर मिळणाऱ्या पावाची. त्यात हे वडे परत तळले असावे, तेल निथळायला सुद्धा अवधी दिला गेला नव्हता असे जाणवले.
काही काही उपहारगृहे कशाच्या जोरावर चालतात हे सांगणे फार कठीण असते.

पोटातल्या भुकेने विवेकावर मात केली, मुंबईस परततांना आम्ही येथे थांबलो, परत थांबणार नाही. त्यात परत वैशालीत उदरभरण करण्याचा बेत आयत्या वेळी बदलुन हे असे दर्जाहीन पदार्थ खाल्याने चीडचीड आणखीन वाढली. खर म्हणजे रुप बघितल्या नंतर तेथुन काढता पाय घेयला हवा होता, पण मग बरोबरची माणसे काय म्हणतील या विचाराने वडे, मिसळ खाण्याचे ठरवले. किती अत्याचार केला मी त्या वेळी माझ्या पोटावर !

या एक्स्प्रेस वे वर व्यवस्थीत चांगले, स्वच्छ व वाजवी किंमतीत खाण्यासाठी योग्य ती सोय अजीबात नाही.

अर्थात हे माझे वैयक्तीक मत आहे.

लिहीणार - आपल्याला खाण्यातले थोडेफार कळते याचा भ्रमनिरास झालेला.

ऐरोळी

एक वाटी बारीक रवा, एक वाटी चण्याचे पिठ, एक वाटी साखर एकत्र करुन हे सारे नारळाच्या दुधात दोन तास भिजवायचे. मग त्यात चारोळी, वेलची, किसमीस टाकावी. हे मिश्रण व्यवस्थीत ढवळुन घेतल्या नंतर, मंद आचेवर तापत ठेवलेल्या तव्यावर शुद्ध घरगुती तुपात पळीने टाकुन पसरावयाचे आणि दोन्ही बाजुने तळावे. कडा कश्या सर्व बाजुने खरपुस व्ह्ययला हव्यात. मधे मऊसुत असलेली ऐरोळी फार चवदार लागते.

श्रावणात आमच्याकडे एखाद्या सोमवारी हा पदार्थ करतात.


लिहीणार - बहुतेक डायबेटीस च्या उंबरठयावर उभा असलेला.

Friday, August 24, 2007

हेडलेस चिकन


पण काहीही म्हणा. "हेडलेस चिकन ! " काय चपखल शब्दप्रयोग श्री. रोनेन सेन यांनी केला आहे. मी त्यांच्या वर बेहद्द खुश आहे. आता पर्यंत ज्यातुन काहीही निष्पन्न होणार नसलेले गुऱ्हाळ घालणाऱ्यांच्या बद्दल विचार करताना मला "आपल्याच शेपटीचा पाठलाग करणारा कुत्रा" आठवायचा. पण हेडलेस चिकन ! वा, क्या बात है. मजा आली.
मोगॅंबो खुश हुवा.

काय समर्पक शब्द आहेत. हेडलेस चिकन. निर्बुद्ध पण कमालीच्या उत्साहात व वेगात काम करणाऱ्यास "हेडलेस चिकन" म्हणतात. तसे बघायला गेले तर "हेडलेस चिकन" व हेड असुन सुद्धा त्याचा वापर न करणारे मनुष्यप्राणी, "हेडलेस मॅन " यात फारसा फरक नसावा.

(साभार लोकसत्ता) - द पेनिन्सुला (दोहा, कतार ) यातले भाष्य अत्यंत बोलके आहे. ते म्हणतात " सेन यांचा विरोध प्रामुख्याने या कराराशी संबधीत उथळ चर्चेला असावा. एखाद्या धोरणाची चर्चा करताना त्याला असणारी राजकीय परिणामे अधिक ठळकपणे पुढे येतात. त्या मुळे मूळ मुद्दा विसरला जातो. अणुकराराशी संबधित जी विधाने समोर येत आहेत, त्यात गांभीर्याचा अभाव आहे. सर्व पक्षाचे नेते फार वरवरचे मुद्दे मांडत आहेत. हा विषय गांभीर्याने हाताळायला हवा. "

मला वाटते हे " द पेनिन्सुला (दोहा, कतार )" आपली मस्करी वगैरे तर करत नसावेना ? म्हणे विषय गांभीर्याने हाताळायला हवा. काय राव तुम्ही लोकसभा , विधानसभेतील अधिवेशनाच्या काळातील द्रुश्ये पाहीली नाहीत काय ? काय आमची थट्टा करता काय ?
तर सांगायचे म्हणजे रायगडचे सेझ प्रकल्प व त्यावर आंदोलकांचे राजकारण याला "हेडलेस चिकन" या व्याख्येत बसवता येईल काय ? मग एनरॉन व दाभोळच्या वीज प्रकल्पाचे काय? काश्मीर प्रश्न, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद, मुंबईतील गिरणी कामगारांचे आंदोलन, संप व देशोधडीस लागणे. नर्मदेवरील धरण प्रकल्प, ही यादी फार मोठी होवु शकते काय ? ज्या राज्यासाठी कौरव पांडवात महाभारत झाले, ते राज्य पांडवांना उपभोगायला तरी मिळाले का ? ज्या साम्राज्याच्या वाढीस सिकंदर जग जिंकायला निघाला त्याचा शेवट काय झाला ? एक ना अनेक अशी उदाहरणे या व्याख्येत आणता येतील काय ?

अरेच्या , मीच हे हेडलेस चिकन सारखे काय वागायला लागलो आहे ? कोणीकडॆ भरकटत चाललो आहे ? मुळ मुद्दा काय होता कोण जाणे?

सर्व विषयावर मी घोळ घातला पाहीजेच का ? .

Sanjukta Dutta - Odissi

Thanks Google and Blogger.com. Now I can upload video's directly to my blog. Earlier I had posted another clipping of the same artist on YouTube and received overwhelming response. So , I thought it's good to inaugurate Video upload with the extra-ordinary performance by Sanjukta Dutta.

It took appox. 15 mins to upload the 11 mb video.

पोळी नुडल्स

आता पर्यंत मी शिळ्या पोळॊचे लाडू खाल्लेले आहेत. आज मी पोळी पासुन बनवलेला नवीन पदार्थ खाल्ला.

साहीत्य -

पोळ्या - चांगल्या लांब पट्टीत कापुन घ्याव्यात.
पाव भाजी मसाला
कांदा (Sliced) - 1
भोपळी मिर्ची (Sliced) - 1
टॉमेटो - (cubed) - 1
लसुण, मिरच्या ( (finely chopped )- 1 tsp
लिंबाचा रस - चवी पुरता
मिठ, मिरपुड, मिरची पावडर - चवी पुरती
कोथीबीर
मस्का , किंवा ऑलीव्ह ऑईल व तेल ( एकत्र केलेले)

एका पॅन मधे मस्का , किंवा ऑलीव्ह ऑईल व तेल ( एकत्र केलेले) गरम करुन घेणे.
त्या मधे कांदा,भोपळी मिर्ची , टॉमेटो, लसुण, मिरच्या परतुन घेणॆ, त्यात पाव भाजी मसाला, मीठ, मीरपुड, व शेवटी पोळीच्या केलेल्या लांब पट्टया टाकणॆ, चांगले परतुन घेणॆ, वरती लिंबाचा रस ब कोथीबीर मारणॆ,
मला वाटते त्यात थोडॆसे बारीक कापलेले आले ही टाकले होते.
गरमागरम पोळी नुड्ल्स खाताना हिंदी चीनी भाई भाई म्हणत म्हणात खावे.
चुकभुल द्यावी घ्यावी.

Thursday, August 23, 2007

तुका म्हणॆ

तुका म्हणे देवा, बरे झाले माझे दिवाळे निघाले.

मी तर संत नाही. मग माझ्या अकलेचे दिवाळे का बरे निघाले ?

माझी श्रावण खाद्ययात्रा


ऐरोळी व अळुवडी. २ रा श्रावणी सोमवार.


लिहीणार - खाण्यासाठी जगणारा

Wednesday, August 22, 2007

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व अध्यक्षपद

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी सुप्रसिद्द लेखीका डॉ. मीना प्रभु यांची निवड व्हावी असे मला वाटते.
प्रवास वर्णन हा मराठी साहित्यातला तसा उपेक्षीत प्रांत. या विषयात त्यांनी अनेक एका पेक्षा एक सरस अशी पुस्तके लिहुन भटक्यांची उत्तम सोय केली आहे.

या निवडणुकीत त्यांना यश मिळो या साठी शुभेच्छा.

Sunday, August 19, 2007

दीड लाखाच्या उपस्थितीत शिराळ्यात नागपंचमी साजरीसंतोष

सकाळ मधे खालील बातमीतील "नृत्यांगना" चा उल्लेख वाचुन धक्का बसला.

या नॄत्यांगना कोण होत्या, कोठुन आल्या होत्या व यांचे या सणामधे काय काम होते याची सखोल चौकशी दै. सकाळ ने करावी हो इच्छा.

या "नृत्यांगना" कोण " ? त्या शिराळ्यात नाचताना E TV वरच्या बातम्यात काल संध्याकाळी पाहीले होते. त्यांच्या बद्द्ल E TV ने माहिती पुरवली. या तर आबांनी महाराष्ट्रातील संपुर्ण डान्स बार बंद केल्या मुळे बेकार झालेल्या बारबाला. नागपंचमी हा पारंपारीक सण साजरा करतना आपण कोणता मार्ग स्विकारतो आहे याचे ग्रामस्थांना भान नको ?
आता पर्यंत त्या केवळ आंबटशौकीनांसाठी बंद दारु बार मधे नाचत होत्या. आता त्या खुले आम भररस्तावर, उत्सवात, सर्वांसमोर आपली कला पेश (?) करु लागल्या आहेत. हे सारे सर्वांना चालते ?
सकाळ कडुन त्यांच्या बातमीत " नृत्याच्या तालावर कमरेला झटका देणाऱ्या नृत्यांगना युवकांच्या काळजाचा ठोका चुकवित होत्या. . बेळगावपासून मुंबईपर्यंतच्या नृत्यांगना अनेक गाड्यांवर आपली कला सादर करीत होत्या. गाण्यांवर थिरकणाऱ्या नृत्यांगना युवकांचे आकर्षण ठरल्या. " हे वर्णन अपेक्षीत नव्हते .
दीड लाखाच्या उपस्थितीत शिराळ्यात नागपंचमी साजरीसंतोष भालेकर/सकाळ वृत्तसेवाशिराळा, ता. १८ -
येथे आज दीड लाखावर भाविकांच्या उपस्थितीत नागपंचमी साजरी झाली. घरोघरी श्रद्धापूर्वक नागांचे पूजन झाले. . मिरवणुकीतील नागांच्या जाहीर प्रदर्शनावर न्यायालयाचे निर्बंध आहेत. नागांचे जाहीर प्रदर्शन नसल्याने भाविक, पर्यटकांमध्ये नाराजी होती. दिवसभर पावसाच्या सरी पडत होत्या. सारे जण न्हाऊन निघाले, तरीही रात्रीपर्यंत उत्साह कायम होता. नृत्याच्या तालावर कमरेला झटका देणाऱ्या नृत्यांगना युवकांच्या काळजाचा ठोका चुकवित होत्या. . बेळगावपासून मुंबईपर्यंतच्या नृत्यांगना अनेक गाड्यांवर आपली कला सादर करीत होत्या. गाण्यांवर थिरकणाऱ्या नृत्यांगना युवकांचे आकर्षण ठरल्या.

Saturday, August 18, 2007

नागपंचमी



आज नागपंचमी. आजच्या दिवशी, आपल्या शेतीप्रधान देशात, उंदीर व घुशींपासुन , शेताचे, धान्याचे संरक्षण करणाऱ्या नागदेवतेचे स्मरण त्यांची पुजा करुन केले जाते.
आमच्या कडे आज पाटावर याच धान्याचे ( तांदळाचे ) नागाची प्रतिकॄती तयार करुन त्याचे पुजन केले जाते. मग त्या व ह्या नागोबाला नैवैद्य हवाच. त्यात परत आज श्रावणी शनिवार.
उकडीचे मोदक, वालाचे सुके व ओले बिर्डे आणि ते ही केळीच्या पानात.


लिहीणार - नागोबा, मज्जा आहे बुबा एका माणसाची आज .

Shri Nana Chudasama and Banners


Throughout my life I have admired banners wih witty and timely commnets by Shri Nana Chudasama except this one.
I am confused and have failed to understand the message which author is trying to convince. I am even not pleased with the poor play with words : "SON" and "SUN".

गोविंद्याची तयारी


Rule of Thirds


Use of Rule of Thirds.
Most people tend to center their subjects. However, good compositions are those that use the rule of thirds. http://digital-photography-school.com/blog/rule-of-thirds/
As advised by sangeetagod
(My first attempt. I selected wrong White Balance )

लहान मुलांची स्थिती


"द ब्रेडविनर ", "परवाना", व "शौझिया" या पुस्तकात अफगाणिस्तान मधील लहान मुलांची दारुण अवस्था वाचली की मन सुन्न होते, संवेदना बधीर होतात. पण या पेक्षा वेगळी स्थिती प्रगतशील भारतात व प्रामुख्याने आर्थीक राजधानी असलेल्या प्रमुख शहरात लहान मुलांची आहे काय ? अफगाणिस्तान एवढी वाईट नक्कीच नाही पण चांगली ही म्हणता येणार नाही.

ऐकिकडे हॅरी पॉटरची महागडी पुस्तके विकत घेण्यासाठी रात्रभर दुकाना समोर हौसेखातीर जागणारी श्रीमंतीत लोळणारी मुले व दुसरीकडे पावसापाण्यात निवारा नसल्यामुळे रात्र रात्र जागणारी रस्तावर रहाणारी ही मुले.

जी माणसे स्वताचे पोट भरु शकत नाहीत ती रस्ताच्या कडेकडेने मानवी वंश वाढवण्याचे काम कशासाठी करत असतात ?

"द ब्रेडविनर ", "परवाना", व "शौझिया" - मुळ इंग्रजी लेखीका डेबोरा एलीस व अनुवाद अपणा वेलणकर

Friday, August 17, 2007

Home Spices: Batate mosaru gojju[Potato raitha]

Home Spices: Batate mosaru gojju[Potato raitha]

गोव्यात आमदारांच्या आटापाट्या

"बारा गावच्या बारा जनी, बारामतीत यांचे धनी".

डॉ. मीना नेरुरकर यांचा "सुंदरा मनामधे भरली" या कार्यक्रम नुकताच भारतात सुरु झाला होतो. महाराष्ट्रात युतीचे राज्य होते. अनेक अपक्ष आमदारांच्या पाठबळावर शिवसेना-भाजपाचे सरकार सत्तेवर आले होते. प्रमुख पाहुणे म्हणुन या सरकार मधे महत्वाच्या खात्याचे मंत्री असलेले एक अपक्ष आमदार आले होते. त्यांच्या वर लगेचच सुत्रधाराने टिपण्णी केली.

"हे अपक्ष आमदार म्हणजे कसे, तर बारा गावच्या बारा जनी, बारामतीत यांचे धनी".

सभागृहात, हे सारे संदर्भ माहीत असल्यामुळे हास्याचा धबधबा सुरु झाला.

सध्या गोव्यात आमदारांचा जो खेळखंडोबा चालला आहे, तो बघीतला आणि हा प्रसंग आठवला. या आटापाट्या खेळणाऱ्या आमदारांचे धनी कोण बरे असावे ?

Thursday, August 16, 2007

कसं काय: बदलत्या भाषा

कसं काय: बदलत्या भाषा http://kasakaay.blogspot.com/

कॉग्रेट्स. ऐम टी. (म.टा) फ़ॉर मराटी भाशेत न्यु वड्‌र्स ऍड केल्या साटी. आपण मराठी भाषेच्या शब्दसंग्रहात वैल्युअबल (मोलाची) भर टाकली आहेत. ठेवा इट var. (keep it up )

बट. होल्ड ऑन. लोकसत्ता यु टु ?

वन डाइंग सेकन्ड क्राइंग. सेकन्ड डाइंग थर्ड क्राइंग ( एक मरे त्याचा दुजा शोक वाहे ).

आजच्या मुंबई वॄतांत मधील बातमी " आकाशवाणीच्या प्राईम टाईममधून स्फूतीगीते हद्द्पार ". " रेडीयो टाइमवर घड्याळ अडजेस्ट करायच्या त्या काळात " "या स्फूतीगीतांना आऊट्डेटेट ठरविण्यात श्रोतेच जबाबदार "

Wednesday, August 15, 2007

HINDUSTANI CLASSICAL SANGEET




TO LISTEN TO HINDUSTANI CLASSICAL SANGEET ONLINE. THERE IS NO OTHER ALTERNATIVE THAN
TO DOWNLOAD HINDUSTANI CLASSICAL MP3 FILES

तिरंगा पुलाव व नवरत्न कुर्मा.


स्वातंत्र, रोजच्या डब्यातील पोळी भाजीपासुन. ६० व्या स्वातंत्रदिना निमित्ते खासा बेत. तिरंगा पुलाव व नवरत्न कुर्मा.

समोवर बचावो आर्टीस्ट को हटावो , समोवर बचावो आर्टीस्ट को हटावो


कलाकार मंडळींनो, हवे आहे कशाला आपल्याला आर्ट गॅलरी ? कलेचे प्रदर्शन मांडायला? प्रदर्शन मांडुन करणार काय ? कोणा लेकाला असते या कलेत स्वारस्थ ? कोण येते का कला बघायला ? समोवर मधे बघा, जरा बघा, जेव्हा बघावे, तेव्हा गर्दी असते. (*)

मी तर म्हणीन, हटाव, हटाव, जहांगीर आर्ट गॅलरीच हटाव . या संपुर्ण आर्ट गॅलरीचे रुपांतर एका उत्तम जागतीक दर्ज्याच्या उपहारगॄहात करण्यात यावे असा ठराव मी आज मांडु इच्छीतो. या उपहारगॄहात फक्त उच्चभ्रु लोकांनाच प्रवेश देण्यात यावा, सामान्य जनांनी याच्या जवळपास फिरकण्याचे ही धाडस जरी केले तर त्यांना दरवाना कडुन हाकलले जाण्यात यावे. (*)


मुढजनांना, कल्पनेत रमणाऱ्यांना काय ठावुक समोवर काय चीज आहे ? काय चीज आहे ? समोवर म्हणजे समोवर म्हणजे ..... अ.. समोवर म्हणजे अ,, मला असे म्हणायचे आहे की समोवर म्हणजे एक चळवळ आहे, फार्फार मोठी कलेच्या क्ष्रेत्रातील क्रांती आहे . थोरालीमोठाली माणसे येथे येवुन तासंन्तास महत्वाची वैश्वीक चर्चा करत बसतात (?). विश्वाच्या चिंते पुढे कुणा लेकाला खाद्यपदार्थांच्या महागडया दराची, सुमार दर्ज्याची चिंता व काळजी ? ती करावी फडतुस माणसांनी. ज्यांना परवडत नाही त्यांनी. या अल्पसंतुष्टांनी खुशाल आजुबाजुच्या टपरीवर वडापाव व कटींग चहा पिवुन गुजराण करावी. (*)


येथे समोवर मधे बिग बी, जया बी बरोबर म्हणे खायला व खाताखाता पुढील सहजीवनाचे स्वप्न रंगवण्यासाठी आले होते. येथे स्मॉल हरे (म्हणजे मीच ) आपल्या झालेल्या बायकोस भापवायला घेवुन आले होते . बिग बीं ना खाणे आवडले होते का ठायुक नाही पण आम्ही मात्र खाताना आता याच्या पुढे सामोवर मधे पावुल टाकायचे नाही यावी केलेली प्रतीज्ञा अजुनही कसोसीने पाळली आहे,


मुंबई मधील जहांगीर आर्ट गॅलरी मधे समोवर नावाचे एक उपहारगृह आहे. सध्या संपुर्ण जहांगीर आर्ट गॅलरी फक्त कला प्रदर्शनासाठीच राखुन ठेवावी, उपहारगृह बंद करुन या जागेचे रुपांतर शिल्पकलेच्या प्रदर्शनासाठी एका कलादालनात करण्यात यावे या साठी चित्रकार व शिल्पकारांनी आंदोलन सुरु केलेले आहे. नुकतेच ११९ वर्षीय बॉम्बे आर्ट सोसायटीने चित्र प्रदर्शनासाठी ही जागा मोकळी करा या साठी चळवळ उभारली आहे.


जहांगीर आर्ट गॅलरीत दरवर्षी देशातुन दोन हजाराच्या वर आपली कला मांडण्या साठी, लोकांपुढे आणण्यासाठी कलाकारांकडुन अर्ज येतात. परंतु जागे अभावी फार कमी जणांचे नंबर लागतात. या भावना लक्षात घेता, नुकतेच पहिल्या मजल्यावर असलेल्या केकु गांधी ( केमोक्ल्ड गॅलरी ) व चेतन आर्य ( टेरेस आर्ट गॅलरी ) यांनी आपल्या जागा सोडल्या.


(*) मी हे उपरोधिकपणे लिहिलेले आहे. शब्दशा खरे मानु नये.


लिहीणार - चित्रकार व शिल्पकारांचेच म्हणणे योग्य आहे हे जाणणारा. त्यांना आपली स्वताची हक्काची जागा ही हवीच.

Tuesday, August 14, 2007

कसं काय: प्रश्नं आपल्या काळातले

कसं काय: प्रश्नं आपल्या काळातले

आहार व आरोग्य: आहार व आरोग्य#links

आहार व आरोग्य: आहार व आरोग्य#links

गॄहीतक

आजचाच प्रसंग. बस मधुन माझ्या पुढुन कॉलेज मधली एक मुलगा व मुलगी खाली उतरली, त्यांच्या आधी उतरलेला माणुस व ते यांच्या दरम्यान किंचीतसा बिलंब झालेला. झाले. बस चालकास या बेजबाबदारपणावर तोंडसुख घ्यायला कारण मिळाले. ते दोघे बिचारे काही ही न बोलता निघुन गेले.

बसचालकाला आपल्या मागे काय झाले याच्याशी सोयरसुतक नव्हते. एक म्हातारी बाई काहीही कारण नसताना वाट अडवुन उभी होती. परत बस तशी रिकामी होती, तिला बसायला जागा होती. मुलांना वाटले हिला सुद्धा उतरायचे असेल. मग आपल्या चालीनी, हळुवारपणे बाई बाजुला झाल्यावर शांतपणे ती मुले, जरादेखील धक्काबुक्की न करता खाली उतरली.

आयुष्यात बऱ्याच वेळा असे होते, आपल्या अपरोक्ष काय परीस्थिती असते किंवा काय प्रसंगातुन इतर माणसे गेलेली असतात हे ठावुक नसताना, न जाणुन घेता उगीचच प्रखर प्रतिक्रिया दिल्या जातात.
त्यात तरुण पिढी बेजबाबदार हे एक चुकीचे गॄहीतक.

लिहीणार - बसचालकास चांगलेच झाडणारा

सर पे धरी गंग.


आज पवित्र श्रावणमासातील पहिला सोमवार. बाबुलनाथला शिव शंकर महादेव , जटा गिरधर त्रिनेत्र सुंदर, भोलेनाथाचे दर्शनास भाविकांची रीघ लागली होती. मंदीराच्या कळसाला मस्तपैकी विद्युत दिव्याच्या रोषणाई ने सजवले होते. मोहीत होवुन कळसाचे छायाचित्र काढण्यासाठी मी या साऱ्या पायऱ्या चढुन वर गेलो.
कळसाचा फोटो काढण्यास अर्थातच मनाई(?).
पोलीस दादांना म्हटले, अहो हे जर अगोदर ठावुक असते तर माझा हा अवजड देह या साऱ्या पायऱ्या चढण्यासाठी मी का बरे श्रमवला असता ? त्यात परत जेवणात प्रसादाला केलेले आप्पे हाणले होते.


इतने करीब हो मेरे नजरे उठाके क्या करु ।
दिल मे बसे हुवे हो तुम लब को हिला
के क्या करु ॥


लिहीणार - या निमीत्ते जरास्सा व्यायाम झालेला.

Sunday, August 12, 2007

मैदान व अनस्था


कोट्यावधी रुपयाचे उत्पन्न असलेल्या मुंबईतील देवस्थानाच्या अंगणातील, परीसरातील मैदानाची ही दुरावस्था.

मैदान दत्तक घेतले जावे, मुलांना, तरुण पिढीस खेळण्यासाठी त्याचे रुपांतर एका उत्कृष्ट, सुसज्ज मैदानात केले जावे ही सिद्धीविनायकाचरणी प्रार्थना.
लिहीणार- काही तरी करण्याची ईच्छा असणारा

दिवली अमावस्या

उतु नका मातु नका, घेतला वसा टाकु नका, या कथा आता विस्मॄतीत्त गेल्या आहेत.

आज दिवली अमावस्या. दिव्याची पुजा. मग मधरात्री नंतर सारे दिवे माळरानावर जमणार, चर्चा करणार, आज कोणाकडे काय खाल्ले , काय नेवेद्य होता याची . ( आमच्या कडे नारळाच्या करंज्या खाल्यात )

आता वेध श्रावणी सोमवारचे व त्या निमित्ते होणाऱ्या खाद्य महोत्सवाचे. उद्याचा बेत मुगाचे बिर्डे. व बहुतेक आप्पे.


लिहीणारा - खाण्यासाठी जगणारा
- काही खर नाही.

भारत माझा देश आहे



हा भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.


देशातील प्रत्येक बांधवास अन्न, वस्त्र आणि निवारा देण्यासाठी आम्ही कटीबद्द आहोत.


लिहीणार- एक हतबल

- उद्याच्या पिढीचे हे भवितव्य हताशपणे बघणारा.

दिवली अमावस्या




आज दिवली अमावस्या ,गटारी. मग उद्या पासुन श्रावण मास सुरु.
श्रावणात मांसाहार करायचा नाही हे शास्त्रवचन. साऱ्या महिन्याचा कोटा आज कंप्लीट करायचा.
मग महिनाभर मास, मटण, मच्छी खायला मिळणार नाही. माटूंग्याचे गोपी टॅंक बाजार आज ओसांडुन, भरभरुन , वाहत होता, त्यात परत आज रविवार, सुट्टीचा दिवस. मग या गटारीचा स्वाद द्विगुणीत झाला.
लिहीणार - शुद्ध शाकाहारी.
- ज्याने कधीतरी केव्हातरी कोलंबी, पापलेट व काप्री सरंगा चापले होते.

श्री. राहुल देशपांडे


यु खुदा के लीये छीनो ना मेरे होशो हवास । ऐसे गाया ना करो की ख़ुमार आ जाये ॥ (मुळ - ऐसे नज़रोसे ना देखो की ख़ुमार आ जाये). आज दिवली अमावस्या ,गटारी. तुडुंब मदिरापान करुन गटारात लोळायचा दिवस. सकाळी सकाळी मला नशा चढली आहे. तरी पण मी हे पुर्ण शुद्धीत राहुन लिहीत आहे.

कारण ही नशा सुरेची नाही तर सुरांची आहे. तरुण पिढीतील अग्रणीय गायक श्री. राहुल देशपांडेचे गाणे ऐकुन आलेली ही झिंग आहे.

आज मुंबईत कर्नाटक संघात खयाल ट्र्‌स्ट नी पं.कॄष्णराव शंकर पंडीत यांच्या स्मॄती उत्सव निमीत्ते आयोजील्या शास्त्रीय संगीताच्या दोन दिवशीय महोत्सवात श्री. राहुल देशपांडे सर्व रसीकांना राग रामकली, नटभैरव, चीज सावरे आजय्यो, व निर्गुणी भजन गावुन तॄप्त करुन राहीले.

(Video upload pending )

लिहीणार - राहुलजींचा चाहता.

- ज्याला थोडे तरी गाणे कळायला हवे होते.

Saturday, August 11, 2007

बॉलीवूडची अनधीकॄत " पार्टनरशिप " धोक्यात आली की हो

हे काय भलतेच. असे कधी झालय का ? बॉलीवूडची अनधीकॄत " पार्टनरशिप " धोक्यात आली की हो .

"हिच" चित्रपटावरुन प्रेरणा घेतल्या बद्द्ल पार्टनर चित्रपटाच्या निर्मात्यांना कोर्टात खेचण्याची तयारी विल स्मिथ व सोनी पिक्च्रर्सने चालवली आहे असे ऐकले ते खरे आहे का हो ? बहुतेक हे खरे नसावे ना, नाही ना, खर सांगा, गरीबांची अशी थट्टा नका हो करुत. ही उचलेगिरी खरच नाही हो, हा असलाच तर निव्वळ योगायोग आहे की हो.

नका हो नका असे काही तरी भलतेसलते करु. सायबांनु, हा दावा मान्य झाला तर आमच्या सर्व बॉलीवूड मधल्या गरीब बिच्चाऱ्या प्रतिभाशाली. प्रतिभावंतांच्या पोटावर पाय येयील ना हो, त्यांनी याचा पुढे कोण्याच्या तोडाकडे आपल्या रोजीरोटि साठी पाहावे ? नका हो नका त्यांच्या पोटावर असे मारु नका हो.

दादा, केवळ पडदयावरील चित्रे तीन तास सतत हलत रहावी येवढाच प्रामाणिक व शुद्ध हेतु पार्टनरच्या निर्मात्यांचा आहे हो. पैसे कमावायचा हेतु खरच नाही. अगदी गळ्याची शप्पथ.

दादानों, असा नका हो अनिष्ट पायंडा पाडुत हो, मग जगातुन किती आणि कोण कोण उठेल व अश्याच कॉर्टात केसीस करत बसेल. आता या वयात देव आनंदवर ग्रेगरी पेक नी माझी नक्क्ल का केलीस म्हणुन केस केलीत तर कॉटाची पायरी चढायची वेळ येईल की हो. आणि चित्रपटसंगीताचे काय होईल त्याचा पण जरा सहानभुतीने विचार करा ना, गाण्याशिवाय सिनेमे, आईग्ग, विच्चार सुद्धा करवत नाही हो.

ओ, राव ऐका की जरा. लोक म्हणतील पार्टनर ऐवढा भिक्कार तर मुळचा हिच किती वाईट असेल. पहा बरे तुमच्याच धंदयावर वाईट परीणाम होईल. परत विचार करा. तुम्ही तर आमच बॉलीवुडच बंद करायला निघालात. एवढ दाताच्या कण्या करुन सांगतो तर कळत नाही का ?

ऐ, आमचच ओरीजीनल हाय लक्षात ठेवा, तुमीच लबाडी करुन चित्रपट आधी प्रकाशीत केलात. जा काय करायच ते करा. कल्पना काय तुम्हालाच सुचतात ? आम्हाला नाही काय ?

Thursday, August 09, 2007

इंद्रायणीकाठी

इंद्रायणीकाठी चोरांची आळंदी, जाहली समाधी बंगल्यांची हो बंगल्याची । इंद्रायणीकाठी ।

ग्राहकराजा, हो, कार्ल्याला बुडतो पाण्यात, नाचती सरकारी नोटीसी मागे पुढे ॥

मागे पुढे दाटे भरावांचा अडथळा, अंगणात पाणी पुराचे हो ।

केडिया आणि दलाल, बिल्डरा, मायबापा ॥

पुरात राहीले गॄहप्रकल्पांत फसुन, मारोती, राजन, मेघाबाई॥

(क्षमा असावी चुकभुल दयावी घ्यावी)

संदर्भ- सकाळ- इंद्रायणीच्या पाण्यात बुडाली अतिक्रमणे
पुणे, ता. ८ - ज्या गृहप्रकल्पांनी कार्ला (ता. मावळ) येथे इंद्रायणी नदीच्या पात्रात अतिक्रमणे केली, ते दोनही प्रकल्प आता इंद्रायणीच्या पाण्याखाली पूर्णपणे गेले आहेत. एवढेच नव्हे तर यामुळे कार्ला परिसरातही पाण्याची पातळी वाढली असून, त्यामुळे पुराचा मोठा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, या प्रकल्पांच्या कामाला मनाई करण्याची मागणी करणाऱ्या दाव्याचा आज (गुरुवार) निकाल आहे. ........कार्ला येथे बांधकाम व्यावसायिकांनी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात भराव टाकला आहे. केडिया आणि दलाल या दोन बांधकाम व्यावसायिकांनी थेट नदीपात्रातच बांधकाम केले आहे. त्यामुळेही नदीच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाला आहे. ही बांधकामे पूररेषेच्या आत आहेत. त्यामुळे साहजिकच ही बांधकामे पुरात बुडाली. मात्र याचा धोका परिसराला होत असून, पुराचे पाणी जास्त भागात यंदा पोचले. त्यामुळे ही अतिक्रमणे हटविण्याची मागणी होत आहे.

Tuesday, August 07, 2007

Flower Surprise

हि परी खरी आहे का हा केवळ पुतळा आहे ?


ओळखा बघु यात माणुस कुठे आहे ?

दुबई मधील बर्जुमान या मॉल मधे समर फेस्टीवल मधले Flower Surprise.

केक





हे मनमोहक केक पाहिल्यानंतर जरी "जी ललचाये रहा न जाये " अशी मनाची खुळावलेली अवस्था झालेली असली तरी प्रत्यक्षात हि अप्रतिम कलाकॄती कापण्यासाठी हात धजावत नाहीत.
पण अखेरीस लालच बहुत बुरी बला है !!

दुबई मधील बर्जुमान या मॉल मधे समर फेस्टीवल मधे हे सारे पाहिले की मन थक्क होते.

तुम्हाराही बराबर, और तुम्हाराभी बराबर

मटण कैसा किलो ? मटण कैसा किलो ? हाताची दाही बोटे मटणवाल्यापुढे सतत नाचवत भाउंनी विचारले. दाही बोटात चांगल्या सोन्याच्या घसघसीत अंगठया होत्या. या वैभवाच्या अती प्रदर्शनाने दुकानदार चांगलाच वैतागला.

मटण सौ रुपय्या किलो, सौ रुपय्या किलो, आपली संपुर्ण बत्तीसी विस्कारुन, दुकानदाराने भाव सांगितला. त्याचे बत्तीस ही दात सोन्याचे होते. झाले दोघांची लग्गालग्गी, गुद्दादुद्दी सुरु झाली. भांडण सरपंच बाई पर्यंत पोहोचले. दोघांचे म्हणणे ऐकल्या नंतर बाईंनी आपला फैसला सुनावला.

मान उजवीकडे वळवुन भाऊरावांकडे बघुन त्या म्हणाल्या तुम्हारा ही बराबर. मग हळुवारपणे मान डावी कडे वळवुन मटणवाल्याला म्हणल्या तुम्हाराभी बराबर.

सरपंचबाईच्या कानात भल्यामोठाल्या हिऱ्याच्या कुडी होत्या.

सध्या महाराष्टात दोन राजकीय पक्षातील युती तोडण्या / रहाण्या वरुन होण्याऱ्या कुरबुरीवरुन ,युक्तीवादाबद्द्ल ही असेच म्हणावेसे वाटते. तुम्हाराही बराबर, और तुम्हाराभी बराबर

CAKES

Sunday, August 05, 2007

सौ. अमिता गोखले - राग तोडी

विनामुल्य कार्यक्रम व निमंत्रणपत्रिका

बरेचसे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम विनामुल्य असतात. बऱ्याचदा चांगल्या कार्यक्रमाची एक पुर्वाअट असते. विनामुल्य निमंत्रणपत्रिके विना (फ्री पासाशिवाय) प्रवेश नाही. त्याचे फ्री पासेस चे वितरण काही दिवस आधी सभागॄहात केले जाते. अर्धेअधिक पासेस संयोजकानी स्वःता वाटण्यासाठी ठेवलेले असतात.
विनामुल्य पासेस म्हटल्यावर बऱ्याच व्यक्ती अनेक पासेस घेवुन जातात. जास्तीचे असलेले बरे. ऐन वेळी कोणी मागितले तर? या शुद्ध (?) हेतुने. तसेच अनेक वेळा संयोजकांकडेही ते पासेस तसेच पडुन रहातात.

फुकटचे पासेस घेवुन गेलेली माणसे कार्यक्रमाला येतातच असे नाही. परीणामी कैक वेळी सभागॄह अर्धेअधीक रिकामे असते, सर्व पासेस संपलेले असुन सुद्धा. दुसरी बाब म्हणजे या पासेसचे वितरण ज्या वेळेत केले आते तेव्हा आपण कार्यालयात असतो. पासेस आणायला जाणे जमत नाही.

ह्या पेक्षा सभागॄहात कार्यक्रमाच्या वेळेस रसिकांना रांगेने, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वानुसार शिस्तीने प्रवेश करु द्यावा. पासेस छापणे, वाटणे व ते आणणे याचे श्रम व पैसा दोन्ही वाचतील.
किंवा निमंत्रणपत्रिकेचे नाममात्र शुल्क आकारावे, जेणे करुन फुकट्यांना आळा बसेल.

राग शुद्ध सारंग- पं.शशांक कट्टी व चिराग कट्टी - जुगलबंदी

पं. शशांक कट्टी व चिराग कट्टी / सौ. अमिता गोखले


आज कितीतरी दिवसांनी सुरेल सतार ऐकली. पं. शशांक कट्टी व चिराग कट्टी यांच्या सतारजुगलबंदीचा छानसा कार्यक्रम प्रो. देवधर स्कूल ऑफ इंडियन म्युझीक मधे झाला. सुरवातीचा राग होता नटभैरव, मग शुद्ध सारंग.


पं. शशांक कट्टी हे त्यांच्या संगीतोपचारा बद्द्ल प्रसिद्ध आहेत. अनेक रोग संगीताने बरे करता येतात. या साठी ते कार्यशाळा आयोजीत करत असतात. या विषयी त्यांच्या अनेक सी.डी व कॅसेटस ही उपलब्ध आहेत. (माझ्याकडे त्यांची चिंता व निद्रानाशावर उपचार करणारी कॅसेट आहे. )

त्या आधी सौ. अमिता गोखले यांचे गायन झाले. त्यांनी तोडी व देवगिरी बिलावल गायला.
मजा आली.

आता वेध १० तारखेला नेहरु सेंटर मधे असणाऱ्या श्रीमती. अश्विनी भिडे देशपांडे यांचे गाणे ऐकण्याचा.

पं. शशांक कट्टी व चिराग कट्टी / सौ. अमिता गोखले




आज कितीतरी दिवसांनी सुरेल सतार ऐकली. पं. शशांक कट्टी व चिराग कट्टी यांच्या सतारजुगलबंदीचा छानसा कार्यक्रम प्रो. देवधर स्कूल ऑफ इंडियन म्युझीक मधे झाला. सुरवातीचा राग होता नटभैरव, मग शुद्ध सारंग.



पं. शशांक कट्टी हे त्यांच्या संगीतोपचारा बद्द्ल प्रसिद्ध आहेत. अनेक रोग संगीताने बरे करता येतात. या साठी ते कार्यशाळा आयोजीत करत असतात. या विषयी त्यांच्या अनेक सी.डी व कॅसेटस ही उपलब्ध आहेत. (माझ्याकडे त्यांची चिंता व निद्रानाशावर उपचार करणारी कॅसेट आहे. )



त्या आधी सौ. अमिता गोखले यांचे गायन झाले. त्यांनी तोडी व देवगिरी बिलावल सुरेख गायला.
मजा आली.



आता वेध १० तारखेला नेहरु सेंटर मधे असणाऱ्या श्रीमती. अश्विनी भिडे देशपांडे यांचे गाणे ऐकण्याचा.

Saturday, August 04, 2007

indori topi


आपण जगा व दुसऱ्याला जगु द्या.

दि.३ ऑगस्टच्या म.टा.मधे एका वाचकाने लिहीलेल्या पत्रात, भटक्या कुत्रांविषयी आपले मत प्रदर्शित केले आहे. यात त्यांनी मुबई महानगरपालिकेचे आयुक्तांच्या "भटक्या कुत्रांना मारलेच पाहिजे " या मताची भलावण केली आहे. खरे म्हणजे एक महत्वाच्या सरकारी अधिकारी व्यक्तीनेच असे विधान करणे हिच मुळात दुर्देवाची गोष्ट आहे. हे वाचक पुढे लिहीतात " एक वेळ अशी येयील की, माणसे कमी व कुत्रांची संख्या जास्त असेल. आणि हा हा म्हणता मुंबई शहर हे कुत्रांचे शहर म्हणुन गिनीज बुकात नोंद होईल."
माणसाने अतिशयोक्ती करावी ती तरी किती? केवळ आपले म्हणणे मांडण्यासाठी? दुसऱ्या प्राण्याला, जीवाला कोणत्याही कारणाशिवाय मारुन टाका हा अनाहुत सल्ला देण्याआधी मानवाने, मानवाचीच संख्या नियंत्रीत ठेवली तरी पुरेसे आहे.

या वसुंधरेवर जगण्याचा मक्ता फक्त आपणच घेतला आहे हा गोड गैरसमज मानवाने करुन घेतला आहे. आपणच या पॄथ्वीलोकावरच्या किती जाती प्रजाती, प्राणी, पक्षी, किटक , एक जीवनचक्र नष्ट करतो आहोत याचे त्यांनी कधी भान ठेवले आहे का ? कधी खाण्यासाठी, कधी शिकारी साठी, कधी आपल्या शौक खातीर, मजे खातीर, छंदाखातीर, खोट्या समजुतीपायी.

केवळ आपल्या स्वार्थासाठीच त्याने जंगलेच्या जंगले नष्ट केली, निसर्गाचा तोल बिघडवला आणि आता पुरातन काळापासुनचा मानवाचा सोबती असलेला कुत्रा त्याला नकोसा झाला आहे ? का ? तर हे भटके कुत्रे म्हणे रस्तावरुन जाणाऱ्या येणाऱ्या माणसांना चावत असतात म्हणुन ? असे किती कुत्रे किती जणाना चावले असतील बरे? आपण हे विसरतो की त्या पेक्षा जास्त, माणसेच इतर माणसांवा चावत असतील, त्रास देत असतील , आपले रोजचेचे जीवन बऱ्याच वेळा दुसऱ्या माणासांनी असह्य करुन ठेवेलेले असते. आणि हो, या पेक्षा जास्त संहार मानवानेच, मानवाचा युद्ध्यात केला आहे, धर्माच्या नावाखाली केलेल्या दंगलीत केला आहे, चोरी, डाका, दरोडेखोरी, लुटमार, करताना केला आहे.

या भटक्या कुत्रांना माया द्यावी,त्यांना लळा लावावा असे आपल्याला कधी वाटतच नाही का? खर बघायला गेले तर ते कुत्रे प्रामाणीकपणे, रात्री बेरात्री आपल्या सोसायटीत, गल्लीत, रस्त्यावर न सांगता कोणत्याही मोबदल्याशिवाय पहारा करत असतात. त्यांची आपल्याला हॊ मोलाची मदत होत असते. बाहेरील माणसांवर त्यांचे बरोबर लक्ष असते.

मधे तर एका गॄहस्थाने चक्क महात्मा गांधीजीची साक्ष काढली होती, गांधीजीचे ही भटक्या कुत्रांना मारले पाहीजे असे मत असल्याचे पत्र लिहीले होते. बहुदा या सदग्रुहस्थांना पिसाळलेला कुत्रा व भटका कुत्रा यातला फरक जाणवला नसेल.

आपण जगा व दुसऱ्याला जगु द्या.

Friday, August 03, 2007

बिचारा ??

नो कॉमेंटस

फुलांची रांगोळी


संथ वाहते कॄष्णा माई । तीरावरल्या कचरा,घाणीची जाणीव तिजला नाही ॥





देवालयाच्या सुरेख दगडी भिंतीवर भल्यामोठाल्या अक्षरात त्यांनी महत्वाची सुचना ठेवल्या रंगवुन ठेवल्या आहेत. " सुचना क्र. ३ . देवालयावर जाहीराती. बोर्ड लावू नये. देवालयावर, भिंतीवर काहीही लिहू नये." केवढा मोठा हा विनोद. आपणच हे सारे लिहुन, रंगवुन ही पेशवेकालीन दगडी वास्तु विद्रुप केली आहे ह्याची ना जाणीव ना खेद, खंत.

आणि या साऱ्या परीसराततील अस्वच्छता पाहीली की मन विषण्ण होते. पवित्र कॄष्णानदीच्या घाटांची लोकांनी घाण टाकुन अक्षरशा माती केली आहे. हा सारा परीसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी कोणाची ?
तीर्थक्षेत्र वाई, ढोल्या गणपती मंदीरा बाहेरील हा परीसर. २७ जानेवारीला आम्ही दर्शनाला गेलो होतो तेव्हाची ही परिस्थीती. जेव्हा व्यवस्थापकच दोषी असतील तेव्हा दाद कोणाकडे मागावी?

Thursday, August 02, 2007

गुरु श्री. विभव नागेशकर

गुरु श्री. विभव नागेशकर, माझ्या आवडते एक व्यक्तीमत्व. एक जेष्ठ तबलावादक.
मुंबई विद्यापीठात गुरुपोर्णीमेच्या निमीत्ते त्यांचे एकल तबला वादन झाले.
त्यांच्या आधी व्यासपिठावर सीनेअभिनेत्री जुही चावला गावुन गेली. तीचे गाणे त्यापेक्षा तीचे गॅमर, संपल्यानंतर, मिडीयाची नौटकी संपल्यानंतर हॉल जवळजवळ रिकामा झाला.
मागे राहीली ती शुद्धता. मोजकेच जाणकार रसीकांचे मन गुरु श्री. विभव नागेशकरांच्या तबला वादनाने समाधानाने भरुन गेले.
आता प्रतीक्षा गुरु श्री. विभव नागेशकरांच्या शिष्यांनी केलेल्या गुरुपौर्णीमे च्या कार्यक्रमाची

Wednesday, August 01, 2007

जुही चावला नी गायलेला मिया का मल्हार - ऐका

एक सफर सराफाची, इंदौर ची. बचेंगे तो और भी खायंगे.

ओ बॉगवाले भय्या, जन्माला यावे, मस्तपैकी मनसोक्त्त खावे, पण चवीचवीने, आस्वाद घेत, तबीयतनी, मग सराफात न जावुन कसे चालेल? इंदौरला यावे, रात्रीअपरात्री राजवाडयाजवळील सराफ्यात फेरफटका मारावा व तब्बेतीने एकसोएक बढीया पदार्थ खावे, वर मस्तपैकी रबडी, मालपुवे, खावुन शीकंजी रिचवावी, आयुष्य सार्थकी लागले म्हणायचे. वैशिष्ट म्हणजे खाण्याचा प्रत्येक पदार्थ सजधजके आपल्या पुढे नजाकतीने पेश केला जातो, त्यानेच मन कसे प्रसन्न होते.

इंदौरला छप्पन बझार तसा आमच्या घराजवळ. सर्वप्रथम विजय चाट हाउस मधे गरमागरम खोबरा कचौरी, पॅटिस, ते पण लाजबाब तिखटमिखट, गोड, चटण्यात डुंबलेले, हाणावे. वरती बटाट्याचे आवरण, आत मधे खुसखुशीत खोबऱ्याचे सारण, चोय. मग दोन पावले जरा चाललो की "मधुरम" हे सुप्रसिद्ध मिठाईचे दुकान लागते, तेथे मधे गुलकंद भरलेली काजुकतरी मिळते तीचा आस्वाद घ्यावा, जवळील ओम के नमकीन मधे जावे, नमकीन चे शेकडो प्रकार बघुन पागल व्हावे, नमकीन हाणत घरी परतावे हा एक दिनक्रम. मग कधीतरी उपवासाच्या दिवशी कोठारी मार्केट समोर फरीयाली साबुदाणा खिचडी खायला जावी. आपण खातो ती साबुदाणा खिचडी एकदम सपक. रसहीन. रंगहीन. खिचडीवर साध्या, तिखट बटाटा वेफर्सचा, सळी, जाळी वेफर्सचा चुरा पेरावा, लालचुटुक डाळीबाचे दाणे, तिखटमाखट शेंगदाणे पेरावेत, रंगांची उधळाण जराशी वाढावी म्हणुन बारीक चीरलेली कोथींबीर पेरावी, मग मसाला भुरभरावा, खावी पण वेफर्सच्या साहाय्याने. मग समोरील स्टॉलवर फ्रुटचाट खावा, ब्रम्हानंदी टाळी.

पण ही म्हणजे एक रंगीत तालीम. सराफ्याची चव घेण्याआधीची. सावधान. सराफात प्रवेश करताना काळजी घ्यावी. सकाळी आहार माफक असावा, पोट पुरते रिकामे असावे, मुखवास, पाचकचुर्ण, हिंगगोली, जीरागोळी, आल्याचा रस, वेळप्रसंगी जेलुसील वगैरे तयार असावे, अती खाण्याने त्रास होवु शकतो, पण तो वेळोप्रसंगी सहन करण्याची तयारी ठेवावी, सकाळी बायकोला घेवुन सराफा मधे गेलो कि दागदागिन्याच्या मोहापायी खुप खर्च होण्याची शक्यता असते.

रात्री सराफातील सोन्याची दुकाने बंद झाली की मग त्याचे रुप पालटू लागते. हलवाई आपले थाळे घेवुन रस्तावर प्रगट होवु लागतात. जातीच्या खव्वयांची वर्दळ वाढू लागते, रात्र उत्तरोत्तर रंगु लागते. थाळ्यांवर, कलथे आपटल्यावर त्यातुन निर्माण होणारा मधुर नाद कानी पडाता, भुक प्रज्वलीत होवु लागते.

सराफाची प्रवेशाची सुरवातच मोठी लज्जतदार असत, दोन्ही अंगाला खुप चांगली दुकाने आहेत. उजवीकडील विजय चाट हाउस मधे प्रथम गरमागरम खोबरा पॅटीस, कचौरी (चटणी मारके) खावेत, पॅटीसची चव चटणीमुळे वाढते की चटणीची चव कचौरी मुळे, या वादात जास्त लक्ष न घालता, बाजुलाच फळांचे रस व आईस्क्रीम चे दुकान आहे, त्यात तहान भागवण्यापुरते रस पियावा, डाव्या बाजुला मग गरमागरम भल्यामोठाल्या कढईतील गुलाबजामुन मोहवीत असतात. पण ते जास्त हादडुन चालण्यासारखे नसते, कोणा लेकाला पहिल्याच फेरीत गारद होण्याची इच्छा असते? वरती परत मालपुवे ने नॉक आऊट होवुन सुद्ध्या चालणार नसते. बचेंगे तो और भी खायंगे.

मग आत शिरले की डाव्या हाताला लागते ते दुकान ज्यात, जगप्रसिद्ध, सुविख्यात " जोशी के दहिबडे " मिळतात, काठोकाठ दह्याने भरलेला द्रोण त्यातले ते वडे, हा द्रोण भरताभरता दुकानदार हवेत उंच कसा उडवतो ते न्हाहाळत मटवावेत. होशीयार , खबरदार, अजुन तळलेले गराडु, वर लिंबु पिळुन, मसाला भीरभीरुन, सादर केलेले चाखायचे आहेत. जर "भुट्टे का कीस" नजर अंदाज झालाच तर या चुकीस क्षमा नाही. आपल्याला रताळाचा कीस, बटाट्याचा कीस खाल्यामुळे माहीती आहे, पण मक्याच्या दाण्याचा हा आपल्या पुढे नजाकतीने, आब राखुन, थाटात पेश केलेला हा भुट्टे का कीस , आपणच संस्थानीक असल्याचे जाणवुन देतो.

आता गोड जास्त झाल्यावर या वर उतारा म्हणुन मग तिखटाला छोलेपॅटिस, आलु तिक्कीया बरे शोभतात. मग गव्हर्नरची गाडी साठी रस्ता मोकळा करायलाच हवा, अरे जिलेबीवाले भय्या, एक किलो जिलेबी खिलाईये. मग आपल्या समोर हलवाईजी जिलेबी करायला घेणार. आपल्या कडॆ मिळतात तश्या लहान लहान आकाराच्या नव्हे तर एकच भली मोठी. जी खायला काळीज ही सिंहाचे लागते. आपल्या कडच्या चार-पाच जिलेबी जरी खाल्या ना तर त्या केवळ दातामधल्या कॅवेटीतच जातात, पोटात जाणे दुरच. वर एक ग्लास गरमागरम दुध, तबियत खुश झाली पाहिजे.

हे सारे खावुन झाले की अखेर भैरवी, शिकंजी किंवा रबडी शिवाय सुटका नाही.

हे सारे पचायला मदत हवीच. मुखवास, जीरागोळ्या चघळत तबीयतशीर घरी परतावे.

मग कधीतरी रात्री काचमंदीर समोरील उपहारगृहात जावे. किंवा सराफामधील राजहंसमधे, तेथे डालबाफले मिळतात ते भरपुर किलोकिलोनी तुप घालुन खावे.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठावे ते केवळ राजवाडयाजवळ पोहे खाण्यासाठी व पलाशिया तील अगरवाल या मिठाईच्या दुकानात किंवा छावणी मधील मथुरावाला मधे मिठाई खाण्यासाठीच.

मन तॄप्त, चीत्ती समाधान.

नैना न माने मोरा । छ्तिया थरक गई रे पियरवा