Friday, October 31, 2008

ही रांगोळी निरखुन पहा




ही रांगोळी निरखुन पहा , उभ्या ठेवलेल्या स्टील च्या बार मधले प्रतिबिंब न्याहाळा।
आणि ठरवा व्यसनाला बळी पडायचे का ?



रांगोली प्रदर्शन - श्री गुणवंत मांजरेकर यांचे


रांगोळी प्रदर्शन म्हटले की सर्व प्रथम डोळ्यासमोर नाव येते , श्री गुणवंत मांजरेकर यांचे । रंगावली सम्राट श्री गुणवंत मांजरेकर यांचे व रांगोळीचे जन्माजन्माचे अतुट नाते। रांगोळ्या काढ्याव्यात तर त्यांनीच।

बरीच वर्षे झाली असतील त्यांनी रेखाटलेल्या अजरामर कलाकृति पाहुन। अलीकडच्या काळात प्रदर्शन
दुर्मिळ झाले होते ।

यंदाला दिवाळीला ही कसर भरून काढलीय। विरह संपलाय। दादरच्या भंडारी सभागृहात त्यांनी व त्यांच्या शिष्यांनी भरभरून रांगोळ्या काढल्या आहेत।

Thursday, October 30, 2008

दिवाळी पहाट - आकाशवाणीमधे

लक्ष्मीपुजनाच्या दिवशी पहाटे सहा वाजता आकाशवाणीमधे सुगम संगीताचा मस्त कार्यक्रम आयोजित केला होता जो थेट प्रसारित केला गेला। सभागृह रसिकांनी अगदी तुडुंब भरले होते, भल्या पहाटी जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी।
मला मात्र तासाभरात कंटाळा आला। तीच गाणी, तीच भावगीते, त्याच लोकप्रिय गायकांनी, गायिकेंनी गायलेली, तेच गीतकार, तेच कवि आणि तेच किस्से ( या सर्वांची क्षमा मागतो )
वाटु लागले अजुनही आपण जुन्या आठवणीत जगत नवनिर्मिति कड़े केवढे दुर्लक्ष करत आहोत। तरुण पिढी किती गुणी आहे , पण त्यांना तेवढे Exposure मिळत नाही , ५०- १०० सालापुर्वींच्या कलावंतां बद्दल अजुनही भरभरून लिहिले जाते, पण उद्याचा इतिहास आज रचणारे , त्यांचाबद्द्ल काहीच वाचनात येत नाही।
"शुक्र तारा मंद वारा" किती दिवस ?
नविन काही ?

दिवाळी पहाट - आकाशवाणीमधे

लक्ष्मीपुजनाच्या दिवशी पहाटे आकाशावानिमाधे

भावनांचे राजकारण कुठपर्यंत ?

भडकलेल्या भावनांचे रूपांतर हळूहळू विद्वेषात होवु लागते, आणि हे विद्वेषाचे राजकारण परत सुरु करून आपण मराठी माणसांनी काय साधले ? आपल्याला यातून खरच काय मिळाले ? केवळ राजकीय लाभ ?
आपले नेते एक गोष्ट विसरतात, तत्कालीन लाभापोटी, सत्ता मिळवण्याच्या नादात ।
आज आपली मराठी माणसे जगभर नोकरी, व्यवसाय, शिक्षणानिमीत्ते जगभर पसरली आहेत।
आपण इतरांना जी वागणूक आपल्या महाराष्टात देत आहोत त्याची चेन रिअक्शन म्हणुन तेथले स्थानिक लोक या परप्रांतीय मराठी मानसांवर बुमरँग सारखे उलटु शकतात।
परवा मुंबइच्या लोकल ट्रेन मधे चार परप्रांतियांना झालेल्या अमानुष माराहाणीत एक तरुण नाहक मरण पावला , तर एक तरुण माथेफिरू होवुन बस मधल्याना धमकावु लागला व पोलिसांकडून मारला गेला।
हा आपला ढळलेला तोल आपल्याला कुठवर घेवुन जाणार आहे ?

Monday, October 27, 2008

ऐसी लगन लगाई - राग बसंतमुखारी - मंजिरी अनासरे केळकर




दिवाळी म्हणजे सूरप्रभात।


ऐसे स्वर्गीय संगीत यापुर्वी ऐकले नाही ।




बहार आली । ही अशी दिपावलीची अप्रतिम सुरवात !! वा! मजा आली ! यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मधे दिवाळी पहाट सुरमई होवुन आली।

दिवाळी म्हणजे ....




दिवाळी म्हणजे उटणे लावून केलेले अभ्यंग स्नान आणि त्यांतर केलेला फराळ

दिवाळी म्हणजे ....






दिवाळी म्हणजे रंगावाली प्रदर्शन , गिरगावात दरवर्षोप्रमाणे भीमाबाई राणे शाळेत, सेंट्रल सिनेमा समोर अप्रतिम रांगोळीचे प्रदर्शन भरले आहे ।

दिवाळी म्हणजे ....







दिवाळी म्हणजे दिवाळी अंक

दिवाळी म्हणजे ....
















दिवाळी म्हणजे खरेदी आणि खरेदी , नल्ली मधे, महालक्ष्मी आणि मांटुंगा दोन्ही कड़े।

Friday, October 24, 2008

दिवाळीची पोस्ट

दिवाळीची पोस्ट मागायला कोणी घरी आले की प्रथम कपाळाला आठ्या पडतात , मग त्या माणसावर उपकार केल्या सारखे पाच-दहा रुपये त्याच्या हातावर टेकवायचे किंवा हाकलुन लावायचे।
जर मला एवढा पगार मिळत असुन देखील मनातुन कोठेतरी दिवाळी सणाला काहीतरी "एक्स्ट्रा" मिळावे असे वाटत असाल तर मग त्यातील काही भाग मी सामाजिक कार्यासाठी, माझ्या आजुबाजुच्या कष्ट्करी , माझ्यासाठी राबणार्याचा सण आनंदात जावा या साठी खर्च केला पाहिजे ।
मग या भावनेतुन म न पा चे सफाई कामगार, आम्ही नेमलेले कचरावेचक संघटनेचे जमादार, घरी कामे करानार्या तिघी जणी या सर्वांना नवीन कपडे शिवले।
जर आपण सण आनंदात साजरे करतांना त्यात सर्वांना सामिल करून घेतले तर त्याचा आनंद द्विगुणित असा होतो

दिवाळी म्हणजे







आणि दिवाळी म्हणजे दिवाळे।
या बायकांचे कितीही खरेदी केली तरी समाधान होत नाही , "नल्ली" मधे ३ भारीतल्या साडया घेतल्यातरी मंगलदास मार्केट्ची वारी काही टळली नाही ।
दिवाळी म्हणजे ..........

दिवाळी म्हणजे

दिवाळी म्हणजे रांगोळी,



दिवाळी म्हणजे आकाशकंदील

Thursday, October 23, 2008

पुवर गाय




जेव्हा. जेव्हा मी रस्तावर जड़ सामानांनी लादलेली हातगाडी ओढतांना कष्टकारी माणसांना बघतो तेव्हा तेव्हा मला Busybee या थोर स्थंभलेखकानी त्यांच्या वर लिहिलेला लेख आठवतो।
This poor man has got Right Of Way। Busybee नी लिहिले होते .
भर रस्तावर गर्दीत हातगाडी ओढ़णे वारंवार थांबणे, गाड़ी खेचण्यासाठी जोर लावणे , आणि कामे करत असतांना इतर वहानचालक, पादचारी यांच्याकडुन शिव्या खाणे

खेल ख़तम सब लोग अपने अपने घर जाव

Wednesday, October 22, 2008

पंचतंत्र- त्यांचा खेळ होतो व दुसरयाचा जीव जातो

शाळेतली मुले। सहल गेलेली । शांत निसर्ग रम्य वातावरण , पाण्याने तुडुब भरलेली विहिर। एका खट्याळ पोराने त्यात खडा मारला , डुबुक ,चुबुक आवाज आला, पाणी वर उसळले, पोराला मजा आली , परत दगड पाण्यात टाकला, परत मौज आली, त्याचे पाहून इतर मुलेही पाण्यात दगड टाकू लागली , त्यांना एक नवा खेळ मिळाला।

पाण्यात रहाणारया बेडकांना समजेना काय होते आहे । ते सैरावैरा पळू लागले , दगड अंगावर लागून जख्मी होवू लागले, मरू लागले।

एका तरुण बेडुकानी जाणत्या बेडुकाला विचारले "हे काय चाललय ? आज आपल्यावर हा घोर प्रसंग का आला आहे ?

काही नाही रे " त्यांचा खेळ होतोय व आपला जीव जातोय "

मुले आणि राजकारणी , काही फरक आहे का ?


महाभारत

सुईच्या अग्रावर रहाणार येवढीसुध्द्दा जमीन आम्ही तुम्हाला देणार नाही , दुर्योधन गरजला आणि महाभारतातील महाभयानक, संहाराला सुरवात झाली।
कौरव आणि पांडव या चुलत भावांनी जर समजुतदार पणे घेतले असते, हस्तिनापुर सारखे लहानसे राज्य वाटुन घेवुन सुखासमाधानाने राज्य केले असते तर त्यांच्या सत्तासंघर्षात व त्या मुळे झालेल्या युद्ध्यात अज्बावधी लोक मरण पावले नसते।
युद्ध जिंकुनही पांडवांचा खरोखरीच विजय झाला का ?

चांद्रयान


प्रांतवाद, सीमावाद, वांशिकवाद, भाषावाद , या सर्व सर्व मानवी समाजाची विभागणी करणार्या क्षुद्र गोष्टींना मागे टाकुन चांद्रयान आज पहाटे झेपावाले चंद्राच्या दिशेने।

संबधीतांचे अभिनंदन ।

Tuesday, October 21, 2008

स्वतासाठी दिवसातुन एक तास देताना - महालक्ष्मी रेस कोर्स







लोपामुद्रानी पाठीशी चांगलाच झक्कु लावुन दिलाय। त्या मुळे कायकाय करायला लागते। सकाळ म्हणु नका, संध्याकाळ म्हणु नका । व्यसनच लागले आहे। शरीर वेळ झाली की मागणी करू लागते।


गेल्या गुरुवारी पुण्यातील बिग बाजार मधे गेलो होते , संध्याकाळची सहाची वेळ , वर्क आउट चा टाइम झाला, शरीर फुरफुरु लागले , अस्वस्थ होवु लागले ।


कस व्हायच।


http://lopamudraa.blogspot.com/2008/02/blog-post.html


(अर्थात या बद्दल मी त्यांचा ऋंणी आहे )


Monday, October 20, 2008

स्वतासाठी वेळ देतांना

कालच्या लोकासत्तेमधे दोन चांगले लेख आलेले आहेत।

Sunday, October 19, 2008

राज्य परिवहान मंडळाचे बस डेपो।

कोण म्हणते जगात कोणतीच गोष्ट शास्वत नसते , सतत बदल घडत असतात ?
सारे जग बदलले , बदलले नाहीत रे आपल्या मायबाप राज्य परिवहान मंडळाचे बस आगर, डेपो।
जसे होते , जेथे होते अगदी तस्सेचा , कायमचे, वर्षानुवर्ष । त्याच स्थितीत मायबाप प्रवाश्यासाठी .
तीच कळकट , मळकट उपहारगृहे, तेच वडे तीच मिसळ, उसळ । तीच दुर्गँधीयुक्त, वासवाली मुत्री नव्हे स्वच्छताग्रृहे। मग ती मुंबई पुण्यासारख्या महानगरातील असतो का खेड्यातली असतो सर्वांची अवस्था एकच।
आज मुंबई पुण्या मधली प्रवाशी वाहतुक एवढी वाढली आहे , परंतु दादरचा बस डेपो मात्र आहे तसाच , तो काही वाढायचे नाव नाही। अरुंद रस्ताच्या कडेला गैरसोईत बसीस उभ्या रहातात , धड पणे रांगा लावायालाही जागा नसते ।
आणि हो , आणखीन एक बदलले नाही। एक प्रवासी, तो म्हणजे मी। अजुनही मी प्रवास करतांना राज्य परिवहान मंडळाच्या बसनीच प्रवास करतो, तो अधिक सुरक्षीत असतो।


Thursday, October 16, 2008

त्यांचे शक्तिप्रदर्शन आणि आमचे हाल

अधुन मधुन शक्तिप्रदर्शन करण्याची नेते मंडळीना गरज का बरे भासते ? त्यांचे गर्दी जमवणे आणि आमचे त्यामुळे झालेल्या वाहतुक जँम मधे अडकुन रहाणे।

Wednesday, October 15, 2008

ये चांद, प्यार मेरा


ये चांद, प्यार मेरा तुझसे ये कहा रहा है , तु बेवफा न होना दुनिया तो बेवफा है !

सब आसरे तो छुटे अब तेरा ही आसरा है ! ( बहुतेक सी रामचंद्र )


तु चंदा शीतल कहलाता फिर क्यु मेरे अंग जलाता

फुलसा कोमल बान मदनाका शुल बनके तनमे क्यु चुभ जाता ( स्त्री, सी रामचंद्र )


काल कोजागिरीचा पुर्ण चंद्र पाहिला आणि लतानी गायलेली ही गाणी आठवली। काल चंद्रोदयाचे अविस्मरणीय दृश्य पाहिले , मुंबई शेयर बाजाराच्या उंच इमारतीवरुन तो हळुवार पणे डोके वर काढत होता। अजुन एक दृश्य आठवते, शिरुर वरुन येताना पाहिलेला चंद्रोदयाचे ।


Tuesday, October 14, 2008

आयी चांदनी रात शरद की

"आवो सजना " - विलंबित व "आयी चांदनी रात शरद की, पुर्ण चन्द्रमा गगन बिराजे " द्रुत
शरदाच्या टिप्पुर चांदण्याचे, मनमोहक चंद्रमाचे , कोजागिरीच्या प्रसन्न रात्रीचे बहारदार वर्णन राग मधुकांसातील या चीजे शिवाय दुसरा कोणत्या रागात झाले असते ?
आणि म्हणुनच भोपाळच्या युवा पिढीतील सुप्रसिद्ध गुणी गायिका सौ. सुलेखा भट यांनी या समयी गातांना हाच राग निवडला ।
मुंबईत कालच्या रविवारी "स्वर साधना समिति " तर्फे त्यांच्या गाण्याची महफिल आयोजित केली होती। त्यांचे गाणे मी "कल के कलाकार संगीत" संमेलनात प्रथम ऐकले होते , खुपच प्रभावित झालो होतो। मुंबईत गाणे असल्याचे त्यांनी आवर्जुन कळवले.
सुरेख, सुरेल, बहारदार, बढिया असे गाणे ऐकुन या ऋतुचा आनंद अधिकच द्वुगुणित झाला।
त्या नंतर त्या "सोहनी " राग गायल्या। हा ही माझ्या आवडीचा राग , दिल खुश झाले।
खंत एकाच या कार्यक्रमाला रसिकांची उपस्थिति खुपच कमी होती। आयोजक लोकांपर्यंत पोचायला कमी पडतात। जे आले नाहित त्यांना आपण कशाला मुकलो आहोत हे केव्हाच कळणार नाही।
सौ. सुलेखा भट यांचे गाणे परत गुणिदास संमेलनात होणार आहे ।

त्यांच्या web site चा पत्ता आहे - http://www.sulekhabhat.com/

Monday, October 13, 2008

पायी चालणाऱ्याची सुरक्षा आणि पदपाथाची दैनावस्था

ज्या महानगरात करोडो माणसे रस्तावरुन पायी चालतात त्यांच्या सुरक्षित चालण्यासाठी पदपाथ असणे अत्यावश्यक आहे , पण प्रत्यक्षात चित्र वेगळेच असते। आपल्याकडे नगरनियोजनात पायी चालणाऱ्याचा विचार सर्वात शेवटी केला जातो किंबहुना केलाच जात नाही , त्याचे हे बोलके फोटो ।


पदपाथावर अतिक्रमण अगदी पोलिसांनी सुद्धा केलेले आहे। महानगरपालीकेने सुद्धा ।

Saturday, October 11, 2008

निर्भळ हास्य






वाढत्या वया बरोबर हे निरगस हास्य लुप्त व्हायलाच हवे काय ?

मशीन v/s माणुस


कामे करण्याचा वेग कोणाचा जास्त असतो ? अर्थातच मशिनचा. 

याला काही अपवाद असतात.  मुंबईत   रेल्वे स्थानकांवर ज्या खिड्क्यांवर उपनगरीय लोकल साठी  तिकिटे देण्यासाठी संगणक बसवले आहेत त्यांच्या पुढे जास्त रांग लागलेली आढ्ळुन येते.  बटन दाबणार, प्रिटर तिकीट प्रिंट करणार, मग ते फाडुन देणार यात जास्त वेळ लागतो. 

त्या पेक्षा पुर्वीची मॅनुयल पद्ध्त जलद होती. स्लॉट मधे तिकीटे ठेवलेली होती, एका झटक्यात तो माणुस तिकीट बाहेर काढायचा, पंचींग मशीन मधे वेळ पंच करायचा , समोर तिकिट दयायचा. हात मशीन पेक्षा जास्त वेगाने चालायचा, रांगेत जास्त वेळ उभे रहायला लागा्यचे नाही.        

फिटनेस नेते मडंळींचा

मध्यंतरी एक चांगला लेख वाचला होता. राष्ट्राचा नेता कसा शारीरीकदॄष्ट्रा  फिट  असावा, सक्षम असावा,  जैसे की रशियाचे पुतीन , अमेरीकेचे भावी अध्यक्ष ओबामा,  फ्रान्सचे अध्यक्ष आदी. 
 
नाहीतर आपल्या कडे उजेडच उजेड.  

Friday, October 10, 2008

प्रश्न पडलाय !

जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय शहरी पुनर्निर्माण योजनेअंतर्गत मिळालेल्या २५०० कोटी रुपयातून पुणे शहराचे पुनर्निर्माण व्हायचय की ऑलरेडी पुनर्निर्माण झालय ?  

का नाही ?

एका कार्यशाळेत शिकलोय या प्रश्नावर विचार करायला. " का नाही ? Why Not ? " 

 आपण केवळ एकांगी विचार करत असतो, दुसऱ्या पर्यायाचा फारसा विचार करत नाही आणि या दोन पर्यांया पलीकडे ही काही असु शकते या वर तर आपला अजीबात विश्वास नसतो. 

या प्रश्नाने  नवा दॄष्टीकोनातुन समस्येचा  विचार करायला  शिकवल.  
 



डॉ. प्रकाश केतकर, निसर्गोपचार तज्ञ, उरळी कांचन

आयुष्यात अनेक टप्पांवर आपल्याला अश्या काही व्यक्ती भेटत असतात जे तुमच्या जीवनावर दुरगामी परीणाम करतात, अर्थातच चांगला. जे तुम्हाला मार्गदर्शन करतात, सावरतात, तुमचे जीवन अधिक समॄद्ध करतात. खर म्हणजे त्यांचा व तुमचा तसा काही विशेष संबंध नसते पण अगदी निरपेक्ष वॄत्तीने ते आपल्या कार्यक्षेत्राबाहेर जावुन तुम्हाला मदत करत असतात. 

डॉ. प्रकाश केतकर, निसर्गोपचार तज्ञ, हे त्या पैकी एक.

१४-१५ वर्षे झाली असतील, माझी मनस्थिती फारशी चांगली नव्हते, शारीरीक आणि मानसीक त्रासाने , नैराश्याने घेरलेल्या अवस्थेत मी पोचलो उरळीकांचन येथेल्या निसर्गोपचार केंद्रात. माझा तसा निसर्गोपचाराचा बऱ्या पैकी अभ्यास होता. व या विषयाची आवडही होती, गोडी होती. 

पहिल्या दिवशी दुसऱ्या एका तज्ञांनी माझी दिनचर्या ठरवली. दोन दिवस उलटले पण 
कुछ जचा नही, हवे ते सापडत नव्हते. अश्या वेळी दुपारी डॉ. केतकर राउंड ला आले. त्यांच्याशी माझे बोलणे झाले, आपल्या छत्रछाये खाली त्यांनी मला घेतले. 

अतिशय कडक स्वभावाचे, शिस्तप्रिय, स्पष्टव्यक्ते, कुणाची ही भीडभाड न बाळगता आपल्याला योग्य वाटते ते बोलणारे डॉ. तसे अप्रिय असावेत, लोक त्यांना घाबरत असावीत (अर्थात हे माझे मत आणि माझा स्वभाव चक्रम, विक्षिप्त असल्या मुळे अश्या लोकांशी माझे चांगले जमते असे माझ्या बायकोचे मत.)

सायंकाळी आपल्या घरी बोलवुन त्यांनी मला मार्गदर्शन केले, स्वतःकडली चांगली पुस्तके मला वाचायली दिली, वैयत्तीक लक्ष पुरवले. त्यांनी मला जे जे करायला सांगीतले तसे अगदी मी तंतोतंत केले. 

पहाटे लवकर उठणॆ , मग चालणॆ, वमन, मालीश, योगासने , बाष्पस्नान, पोटावर मातीची घडी ठेवणॆ. पहिले तीन चार दिवस लंघन, फक्त फळांचे, भाज्यांचे रस ते ही मोजुन मापुन पिणॆ, मग पुढील तीन चार दिवस फक्त फलाहार, मग एक दोन दिवस सॅलेडस, मग हळुहळू आहारास सुरवात, बीन तेलाचे, बीन मिठाचे , वाफलेले जेवण. दुपारी वामकॄक्षी, सायंकाळी योगनिद्रा, भजने, आदी. 


दोन आठवडया नंतर कायाकल्प झालेला मी घरी पोहोचलो तेव्हा माझा बायकोचा हाच का आपला नवरा यावर विश्वास बसेना. 

Thursday, October 09, 2008

विजयादशमी


विजयादशमीच्या सर्व ब्लॉगल्सना हार्दीक शुभेच्छा.


लुटा आनंद जिवनाचा, आवडणाऱ्या सर्व आनंदच्या अनेकविध रंगांच्या छटातुन

आणि त्याचे आयुष्य सावरले.

मला एक सांगा "एकाच प्रकारचे काम सतत अनेक वर्षे करत आल्याने तुम्हाला कंटाळा नाही आला ?"

मुलाखात घेणाऱ्यांना त्याच्या मनस्थितीची चांगलीच कल्पना नक्कीच होती.

येतोना , आलाय ना खुप कंटाळा आलाय, त्यानी प्रामाणिक पणे उत्तर दिले.

पण त्याच क्षणी त्याला अकस्मात उमजले, जाणवले, जे इतके वर्षे निराश व हताश मनस्थिती मधे त्याच्या मनाची कवडे बंद झाल्यामुळे जाणवत नव्हते, अरे आपण करत आलोय ते केवळ रुटीन कामे. पण आपले हे क्षेत्र केवढेतरी मोठे आहे , त्यात दरोरोज जगभर अनेक घडामोडी होत असतात, यात कितीतरी शिकण्यासारखे आहे, त्यासाठी आपल्या वाचनाची व्याप्ती वाढवायला हवी, आपल्या ज्ञानाच्या कक्षा अनेकपटीने रुंदवायला हव्यात, अजुन यात आपल्याला खुप प्रगती करता येईल .

मग त्यानी आपल्या मनात क्षणार्धात आलेले हे विचार त्यांना सांगीतले.

आणि हा साक्षात्कार होण्यामागे कारणीभुत होते ते मुलाखात घेणाऱ्याचे कौशल्य, त्यांचा चांगुलपणा. मदतीचा हात देण्याची इच्छा, उमेदवारास "इज" मधे आणण्याची कौश्यल्य.

आणि मग त्याचे आयुष्य बदलले. जी कामे पहाडा सारखी वाटत होती तीच कामे आता ?

रेडी टु मुव्ह टु द नेस्ट लेव्हल.

Wednesday, October 08, 2008

Rupee View - 08/10/08

Demand for greenback continues to remain high and today the USD/INR pair has opened at 48.21 and currently trading at 48.36/39, today’s expected range for the USD/INR pair is 47.95-48.50.

Monday, October 06, 2008

जिकडे तिकडे राजकारण

उंबरठ्यावर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आल्या आहेत तरी राजकारणी मंडळीचे राजकारण काही संपतच नाही।
आता तरी मतभेद आवारा।



सकाळ मधुन-
केवळ कलमाडी नको म्हणून पुणे पॅटर्न'
पुणे, ता. ५ - "केवळ कलमाडी नको, म्हणून पुणे पॅटर्न अस्तित्वात आला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी येणाऱ्या बॅटन रिलेला निधीही उपलब्ध करून देण्यास पुणे महापालिकेने नकार दिला.त्यामुळे आता तुमच्यावर जबाबदारी आहे. बॅटन रिलेचे जोरदार स्वागत करा,' असे आवाहन खासदार सुरेश कलमाडी यांनी रविवारी येथे केले. कॉंग्रेस पक्षातर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी कलमाडी यांनी हे आवाहन केले. आमदार रमेश बागवे, चंद्रकांत छाजेड, आझम कॅम्पसचे पी. ए. इनामदार, शहराध्यक्ष अभय छाजेड आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. केंद्र आणि राज्यात कॉंग्रेसबरोबर त्यांना आघाडी चालते; परंतु पुण्यात त्यांनी जातीयवादी शक्तींबरोबरच जाण्याचा निर्णय घेतला. केवळ कलमाडींना विरोध म्हणून "पुणे पॅटर्न'चा जन्म झाला,

राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेच्या निमित्ते

काय झपाट्याने , विलक्षण गतीने, वेगाने रस्ताची, पुलाची, शुशोभीकरणाची , उरली सुरली कामे पुरी होत आहेत।

याचाच दुसरा अर्थ असा होतो ही कामे करण्यांची या यंत्रणेची प्रचंड कार्यक्षमता आहे, मनात आले तर रे करुन दाखवु शकतात, असे असून देखील नाहक ( ??? ) ही कामे वर्षानीवर्ष रेंगाळत ठेवण्यात येतात, नागरिकांना होणारया त्रासाची पर्वा न करता ।

आता कामे पुर्ण झाल्या बद्दल पाठ थोपटायची की इतके दिवस झोपले व शेवटच्या क्षणी जागे झाले म्हणुन कीव करायची ?

लेकिन , All's well that ends well।

दुर्गोत्सोब - कोलकाता अवतरले शिवाजी पार्क वर




Sunday, October 05, 2008

धर्मांध

ओरीसा राज्यात काय चाललय तरी काय ? धर्मांधांनी घातलेला हा नंगा नाच, मृत्युचे थैमान पाहुन डोके ठिकाणावर असलेल्या कोणत्याही मानवाची मान शरमेने झुकावी. स्त्रीयांवर बलात्कार, निरपराधांचे बळी घेणॆ हेच का आपल्या या प्राचीन, पवित्र भारतीय संस्कुतीने, जीचे आपण सदैव गोडवे गात फिरत असतो तिने आपल्याला शिकवले आहे ? त्यात ज्या सरकारने सर्वसामान्यांच्या जीवाची काळजी घावी ते हे असे निष्क्रीय अवस्थेत.

शरम वाटते मानव म्हणुन घ्यायला.

कर्नाटक राज्यात हाच प्रकार चालु आहे. दुसऱ्यांच्या प्राथनास्थळावरील हल्ले ? आपल्या धर्मा व्यतीरिक्त इतर धर्मीय आपल्या भुमीत नुसतेच नव्हे तर जिवंत देखील रहाता कामा नये हा कुठला विचार ? आपण अजुनही आदी मानवाच्याच काळात वावरतो आहोत काय ?

मेनलॅड चायना -सेनापती बापट रोड


पुणे खुपच बदललय हो. माझ्या वाढदिवस साजरा करण्यासाठी बाहेर एकाद्या उत्तम ठिकाणी जेवायला कोठे जायचे याचा विचार करतांना मला प्रकर्षाने आठवण झाली श्री. शंतनु घोष यांच्या ब्लॉगची. जंगली महाराज रोड काय किंवा फर्गुसन रस्ता काय याच्या पलीकडेही जग आहे आणि ते ही अत्याधुनीक हे त्यांचे सर्वोत्तम खाण्यावरचे लेख वाचतांना लक्षात आले होते, वाढदिवसाच्या निम्मीत्ते या जगाची हळुहळू खाद्यभटकंती करायला सुरवात करणाचे ठरवले.


खर तर आधी ठरवले होतो सन ऍड सॅन्ड मधे त्यांच्या शिफारीस प्रमाणे सकाळी बुफे जेवायला जायचे. पण मुलानी त्याला विरोध केला व तो बेत बारगळला, त्याला रात्रीचेच जेवयला जायचे होते. मग दोन पर्याय समोर होते "सिगरी" की मेनलॅड चायना ? मग शेवटी त्याला चायनीसच खायचे असल्यामुळे सेनापती बापट मार्गावर असलेल्या मेनलॅड चायना मधे जाण्याचे ठरवले.

रात्री अभिरुची ते माणीक बाग पर्यंत जबरदस्त टॅफीक जॅम होता , त्यात पडणारा कंटाळवाणा पाऊस. पोचायला अंमळ उशीरच झाला. पण त्या नंतर जेवणाची जी अनुभुती मिळली त्यात हा त्रास, आलेला शिण नाहीसा जाला.

अगदी डेलीकसी असणारे , नजाकतीचे, वन ऑफ द फायनेस्ट, मस्त जेवणाचा येथे आस्वाद घेतला. पुण्यामधले हे सर्वोत्तम, सर्वश्रेष्ठ चायनीस आहार मिळाणारे रेस्टॉरंट आहे. प्रशस्त जागा, उत्तम ऍंबीयंस, बरे झाले आधी टेबल बुक केले होते, नाहीतर गर्दी पाहात थांबावे लागले असते.

जेवणाची सुरवात एका नव्या बार्बेक्यु बटाट्याची डिश नी केली. त्या बरोबर मागवले व्हे. फ्राईड वॉंटॉन व व्हे.क्रिस्पी चिली . वा, प्रथम घासे बहार आली . मुख्य जेवणात एक नव्या प्रकारचा नाजुक फ्राईड राईस मागवला, चक्क कमळाच्या पानात लपेटलेला, बदाम घालुन शिजवलेला. त्याच बरोबर मागवले मिक्स व्हेजीटेबल फ्राईड राईस, व्हे. डंपलिंग इन चिली सोया सॉस, स्वीट ऍड सार क्रिस्पी नुडल्स.
बहार आली. पण जरा व्हे.डिशीस कमी पडल्या, एकादी ग्रेव्ही वाली डिश आणखी मागवायला हवी होती.

जेवणाचा शेवट माझ्या बायकोने तिला परमप्रिय असणाऱ्या डेसर्ट नी, हनी नुडल्स आमंद प्लेक्स विथ वॅनीला आईस्क्रिम नी व मी डेट पॅन केक नी केला.

ही रात्र आता सदैव लक्षात राहील.