Friday, October 10, 2008

डॉ. प्रकाश केतकर, निसर्गोपचार तज्ञ, उरळी कांचन

आयुष्यात अनेक टप्पांवर आपल्याला अश्या काही व्यक्ती भेटत असतात जे तुमच्या जीवनावर दुरगामी परीणाम करतात, अर्थातच चांगला. जे तुम्हाला मार्गदर्शन करतात, सावरतात, तुमचे जीवन अधिक समॄद्ध करतात. खर म्हणजे त्यांचा व तुमचा तसा काही विशेष संबंध नसते पण अगदी निरपेक्ष वॄत्तीने ते आपल्या कार्यक्षेत्राबाहेर जावुन तुम्हाला मदत करत असतात. 

डॉ. प्रकाश केतकर, निसर्गोपचार तज्ञ, हे त्या पैकी एक.

१४-१५ वर्षे झाली असतील, माझी मनस्थिती फारशी चांगली नव्हते, शारीरीक आणि मानसीक त्रासाने , नैराश्याने घेरलेल्या अवस्थेत मी पोचलो उरळीकांचन येथेल्या निसर्गोपचार केंद्रात. माझा तसा निसर्गोपचाराचा बऱ्या पैकी अभ्यास होता. व या विषयाची आवडही होती, गोडी होती. 

पहिल्या दिवशी दुसऱ्या एका तज्ञांनी माझी दिनचर्या ठरवली. दोन दिवस उलटले पण 
कुछ जचा नही, हवे ते सापडत नव्हते. अश्या वेळी दुपारी डॉ. केतकर राउंड ला आले. त्यांच्याशी माझे बोलणे झाले, आपल्या छत्रछाये खाली त्यांनी मला घेतले. 

अतिशय कडक स्वभावाचे, शिस्तप्रिय, स्पष्टव्यक्ते, कुणाची ही भीडभाड न बाळगता आपल्याला योग्य वाटते ते बोलणारे डॉ. तसे अप्रिय असावेत, लोक त्यांना घाबरत असावीत (अर्थात हे माझे मत आणि माझा स्वभाव चक्रम, विक्षिप्त असल्या मुळे अश्या लोकांशी माझे चांगले जमते असे माझ्या बायकोचे मत.)

सायंकाळी आपल्या घरी बोलवुन त्यांनी मला मार्गदर्शन केले, स्वतःकडली चांगली पुस्तके मला वाचायली दिली, वैयत्तीक लक्ष पुरवले. त्यांनी मला जे जे करायला सांगीतले तसे अगदी मी तंतोतंत केले. 

पहाटे लवकर उठणॆ , मग चालणॆ, वमन, मालीश, योगासने , बाष्पस्नान, पोटावर मातीची घडी ठेवणॆ. पहिले तीन चार दिवस लंघन, फक्त फळांचे, भाज्यांचे रस ते ही मोजुन मापुन पिणॆ, मग पुढील तीन चार दिवस फक्त फलाहार, मग एक दोन दिवस सॅलेडस, मग हळुहळू आहारास सुरवात, बीन तेलाचे, बीन मिठाचे , वाफलेले जेवण. दुपारी वामकॄक्षी, सायंकाळी योगनिद्रा, भजने, आदी. 


दोन आठवडया नंतर कायाकल्प झालेला मी घरी पोहोचलो तेव्हा माझा बायकोचा हाच का आपला नवरा यावर विश्वास बसेना. 

No comments: