Sunday, October 19, 2008

राज्य परिवहान मंडळाचे बस डेपो।

कोण म्हणते जगात कोणतीच गोष्ट शास्वत नसते , सतत बदल घडत असतात ?
सारे जग बदलले , बदलले नाहीत रे आपल्या मायबाप राज्य परिवहान मंडळाचे बस आगर, डेपो।
जसे होते , जेथे होते अगदी तस्सेचा , कायमचे, वर्षानुवर्ष । त्याच स्थितीत मायबाप प्रवाश्यासाठी .
तीच कळकट , मळकट उपहारगृहे, तेच वडे तीच मिसळ, उसळ । तीच दुर्गँधीयुक्त, वासवाली मुत्री नव्हे स्वच्छताग्रृहे। मग ती मुंबई पुण्यासारख्या महानगरातील असतो का खेड्यातली असतो सर्वांची अवस्था एकच।
आज मुंबई पुण्या मधली प्रवाशी वाहतुक एवढी वाढली आहे , परंतु दादरचा बस डेपो मात्र आहे तसाच , तो काही वाढायचे नाव नाही। अरुंद रस्ताच्या कडेला गैरसोईत बसीस उभ्या रहातात , धड पणे रांगा लावायालाही जागा नसते ।
आणि हो , आणखीन एक बदलले नाही। एक प्रवासी, तो म्हणजे मी। अजुनही मी प्रवास करतांना राज्य परिवहान मंडळाच्या बसनीच प्रवास करतो, तो अधिक सुरक्षीत असतो।


2 comments:

मन कस्तुरी रे.. said...

खरं आहे. मला तर बस स्टॅंड वर पाय ठेवताच मळमळायलाच लागते.
त्या लाल बसेस, डिझेलचा दर्प, सिट्स च्या रेक्झीनचा ठराविक स्पर्श, स्टील च्या दांड्यांचा तोच मळमळविणारा वास, आणि भारताच्या क्रॉस सेक्शनचे दर्शन घडविणारे तेच शिणलेले प्रवासी...
कधी बदलणार हे? त्या मानाने रेल्वे स्टेशन जरा सुशिक्षीत, पुढारलेले वाटते.

HAREKRISHNAJI said...

Ashwini,

You have read my mind. That's exactly what I meant.