Thursday, January 31, 2008

मुले का भारवाहक ?

काय ग ताई, केवढी जड ग तुझी ही शाळेची बॅग, मलाच उचलवत नाही.
अरे काका , ही बॅग घेवुन मी रोज शाळेत पाच जीने चढुन क्लासरुम मधे जाते. माझी पुतणी. दुसरीत आहे.
का ग , तुझ्या स्कुल मधे लिफ्ट आहेना.
असा कसा रे काका तु वेडा, लहान मुलींना त्यातुन जायला परमीशन नाही.
घ्या. आता.
हि मुले आहेत का भारवाहक ?
शाळेने लहान मुलींचे वर्ग तळमजल्यावर तरी ठेवावेत किंवा लिफ्टमन तरी ठेवावा नाहीच जमले तर वह्यापुस्तकांचे बोझे कमी तरी करावेत.
शिक्षणमंत्री , तज्ञ आपण हे वाचताहेत ना !

Wednesday, January 30, 2008

मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा

आपल्या देशातुन परागंदा झालेले पारशी लोक जेव्हा संजाणच्या किनाऱ्यावर उतरले व तेथल्या राजाकडॆ आश्रय मागीतला, तेव्हा त्या राजाने दुधाने काठोकाठ भरलेला प्याला त्यांचा समोर ठेवला.
त्या दुधात पारशी लोकांना साखर टाकली व ते राजाला परत केले, आम्ही हि असेच मिळुनमिसळुन राहु हा संदेश दिला. या दुग्धशर्करा योगाने राजा खुश झाला, त्यांना आपल्यात सामावुन घेतले.
सांगण्याचे तात्पर्य असे की आपण ही सर्वांशी असेच मिळुनमिसळुन रहायला हवे, मी मराठी , तु मद्राशी, तु गुजराथी, तु बिहारी , तु भय्या असा भेदभाव करता कामा नये. स्थानीक, परप्रांतीय या संकुचीत मनोवॄत्तीचा आपण त्याग करायला हवा, आपण सारे भारतीय बांधव आहोत याचे आपण भान राखायला हवे.
प्रांतवाद नको रे मना, वाद करीणे टाळीजे.

Sunday, January 27, 2008

काचे पल्याड


काचे पल्याड या स्नेहा नी लिहीलेल्या "स्टीट चिल्डन" वरील लेखानी खुप अंतर्मुख होयला लावलय !




या कॅमेराच्या बंद शटर प्रमाणे आपण आपले डोळॆ व मन देखिल यांच्या साठी बंद केलेले असते.
कोणीतरी फेकुन दिलेल्या पेप्सीच्या कॅन मधुन उरलेसुरलेले पेय पिण्याचा प्रयत्न .

श्री. अंबुमणी रामादोस व श्री. टी. चंद्रशेखर

राजकारणी माणसांना, नेत्यांना ,मंत्रांना आपण नेहमीच नावे ठेवत आलो आहोत, त्यांना हसत असतो, त्यांच्याबर टिका करत असतो, परंतु एखादा मंत्री खुप चांगले निर्णय घेत असेल तर त्याला पाठीबां देणाऱ्यांची संख्या फार सीमीत असते.

धुम्रपान विरोधी कायदे कडक करणारे, त्याचा आरोग्यावर होणारा विपरीत परीणामासंबधी जनजागॄती वाढवण्याचा प्रयत्न करणारे श्री. अंबुमणी रामदास यांच्या पाठीशी आपण किती बरे उभे राहीलो ? किती बरे त्यांना या मोहीमेत साथ दिली ?

सरकारी इमारतीत व तिच्या आवारात, सार्वजनीक ठिकाणी ध्रुमपान बंदी, कार्यालयात ध्रुमपान बंदी, चित्रपटात नटनट्यानी पडद्यावर ध्रुमपान करु नये या साठीचे त्यांचे प्रयत्न.

आरोग्यमंत्रांचे काम खरोखरीच कौतुकास्पद आहे.

(एक गोष्ट मला नेहमीच खटकते सरकारी इमारतीच्या आवारात, सार्वजनीक ठिकाणी ध्रुमपान बंदी जरी असली तरी तिच्या आवारात सिगरेट्सच्या विक्रीवर काहीच पाबंध नाही का ? बहुदा नसावाच. असता तर त्या शासकीय आवारात ही विक्री झालीच नसती )

हीच गत श्री. टी. चंद्रशेखर यांची झाली आहे. ठाण्याच, नागपुरचा कायापालट करणाऱ्या श्री. टी. चंद्रशेखर यांना अखेरीस मुंबईत सरकारी नोकरीचा राजीनामा द्यावा लागला.

दुर्दैवांने कोणाकडुन ही एक साधा निषेधाचा सुर उमटला नाही.
ठाण्यामधे त्यांना जसा कठोरपणे वागुन शहराचे प्रश्न सोडवतांना मिळालेला सर्वसामान्यांपासुन ते नेत्यांपर्यंतचा पाठीबा मिळाला तो मात्र त्यांना मुंबईत मिळाला नाही.
एका पर्वाची अखेर झाली.
TOI: Concerned over the impression they leave on youngsters when they smoke on silver screen, Union Health Minister Anbumani Ramadoss has urged Bollywood mega stars Amitabh Bachchan and Shah Rukh Khan to desist from smoking in their films.
"The movies are most responsible (for encouraging smoking). When I said movies should not have smoking scenes we have statistics which show that 52 per cent of children have their first puff of a cigarette because of movie celebrities," he said.
Questioned on his pet theme of pictorial warnings on cigarette and bidi packets, he said, "I am sure they would be very effective. All this time we have been saying things to people.
But I believe it is now time to scare them. "In contrast to developed countries where tobacco incidence is going down, in India, it is going up frighteningly," the minister said.

Saturday, January 26, 2008

वैष्णव जन तो तेणे कहीये जे पीड परायी जाणे रे





महात्मा गांधीजींच्या अस्थी असलेला कलश मुंबईत मणि भवन मधे ठेवण्यात आला आहे.
३० तारखेला सकाळी ९.३० वाजता त्याचे गिरगाव चौपाटी येथील समुद्रात विसर्जन करण्यात येणार आहे.
प्रिय महात्माजी,
तुम्हाला केवळ एकदाच मारुन भारतवासी थांबलेले नाहीत, जेव्हा जेव्हा या आपल्या देशात जातीय, धार्मीक दंगेफसाद होतात, वांशीक, जातीय भेदभाव होतात, खैरलांजी सारखी हत्याकांड होतात, तेव्हा तेव्हा परत परत आपला वध करत असतो.
सर्वात मोठे दुःख म्हणजे ..........

Friday, January 25, 2008

रातराणी


रोज रात्री हॉस्पीटलमधुन घरी परततांना ही बहरलेली रातराणी मरगळलेल्या मनाला राह्त देत असते. पाच मिनीट हिच्या सहवासात मी तीचा सुवास रोमरोमात भरुन घेण्यासाठी थांबतोच थांबतो.

मणि भवन -मुंबई

Thursday, January 24, 2008

ब्रेट ली व अस्मादिक


मैदानात हे खिलाडु भले कसे ही वागोत, पण बाहेर , मी त्याच्या दिलखुलास व्यक्‍तीमत्वाचर बेहद्द खुश आहे

भस्म

अस म्हणतात या यज्ञात की यागात, (कोण जाणे ), या अश्या अश्या आहुत्या दयायच्या असतात, मग त्यातले भस्म कपाळी लावले की बुद्धीमत्ता प्रखर होते, ते ग्रूहस्थ मला सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण माझे मन त्यांच्या बोलण्याकडॆ नव्हते.
मी विचार करत होतो, हे भस्म किती लाखाला पडणार आहे ? आपल्या अशास्त्रीय समजुतीखातीर लाखो रुपये असे जाळुन यांना काय मिळणार आहे ?
त्या ऐवजी माझ्या " आपण या पैशातुन आपल्या विभागातील गरीब मुलांच्या संपुर्ण उच्च शिक्षणाची जबाबदारी उचलुया " या सुचनेचा गंभीरपणे विचार केला गेला असता तर ?
वर्षभर केवळ सण साजरे करण्यात खर्ची पडलेल्या लाखो रुपयात कैक विद्यार्थांचे आज भस्म कपाळी लावुन बुद्धी वाढवण्याऐवजी उच्च शिक्षणाच्या माध्यमातुन भविष्य उज्जल झाले असते.

Tuesday, January 22, 2008

मानव व जनावरे

मानवी स्वभावातील गुणदोषाचे वर्णंन करतांना बऱ्याच वेळा त्याला जनावरांच्या उपमा दिल्या जातात, बिरुदे मिरवली जातात, एखाद्याचा स्वभाव गाई सारखा गरीब आहे, तो बैला सारखा ढोर मेहनत करतो, तो कुत्रासारखा प्रामाणिक व इमानदार आहे, कोल्ह्यासारखा धुर्त आहे, लांडग्यासारखा लबाड आहे, हरीणासारखा चपळ आहे, गाढवासारखा बुद्धु आहे, माकडसारखा चेष्टा करणारा आहे, वाघसिंहासारखा पराक्रमी आहे, बलवान आहे, त्याची कातडी गेंडयाची आहे, हत्तीसारखा कुशाग्र बुद्धीचा आहे वगैरे वगैरे.

पण आपण एक गोष्ट विसरतो, हे प्राणी त्यांना निसर्गाने आखुन दिलेल्या मर्यादेच्या आत, निसर्गनियमानुसारच वागत असतात.

मानव अमानवी वागतांना आपण पहातो, ऐकतो, अनुभव घेतो, जनावरांना कधी "अजनावरीय" वागतांना पाहिले आहे का ?

बिल्किस बानु व आपण

आज परत एकदा मन सुन्न झालय. आपण व आपला समाज येवढा विवेकशुन्य व संवेंदनाहीन कसा ? ६ महिने गरोदर असलेल्या बिल्किस बानुवर सामुहीक बलात्कार करणे, तिच्या तीन वर्षाच्या मुलीला मरेपर्यंत अमिनीवर आपटुन ठार मारुन टाकणे, तिच्या कुटुंबीयातील १४ जणांचा खून करणॆ , तिच्या आईवर आणि मावशीवर बलात्कार करणॆ !. आपण किती सहजरित्या हे वर्तमानपत्रात वाचतो व एक दोन मिनीट हळहळ व्यक्‍त करतो व विसरुन जातो. काही जणांना तर आसुरी आनंद ही होतो.
आज या खटल्यातील ११ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. निरपधरांची झालेली परवड, शोकांतीका, त्यांचे दुःख, त्यांच्या यातना,त्यांनी गमवलेले आयुष्य कशानेही भरु येवु शकत नाही अगदी कुबेराचा खजीना त्यांच्यासमोर रीता केला तरी.
या पुढे जातीय दंगली झाल्याच तर दुसऱ्याच क्षणी तेथल्या राजकारण्यांना बाजुला सारुन त्वरीत तो विभाग सैन्याच्या ताब्यात देवुन, दंगलेखारांना कोणतीही दयामाया न दाखवता कठोरात कठोर उपाययोजना केली जावी. मानवतेच्या या शत्रुंना, या दंगल माजवणाऱ्या सैतानांना सैनिकांनी सरळसरळ गोळ्या घालाव्यात , अशी जबरी दहशत बसल्यानंतरच परत दंगली करण्याची या समाजकंटकांची, अमावनी वृतीची, हैवानांची, हिम्मत होणार नाही. ते धजावणार नाहीत. आपले कोण काय वाकडॆ करु शकते, आपल्याला सांभाळून घेणार आहेत हा समज परत कोणीही गुन्हा करतांना बाळगला जावु नये.
दंगलग्रस्तांचे दुःख, वेदना ह्या आपल्याही आहेत.

Sunday, January 20, 2008

तुम दौडो हम देखता है


रन बेटा रन



काकाच्या ’लिटील प्रिंन्सेस’ नी आज खुप धम्माल केली. काश आज तीचा काका व काकी फिट्ट असते तर.

रन बेटा रन

काकाची ’लिटील प्रिंन्सेस’ नी आज खुप धम्माल केली. काश आज तीचा काका व काकी फिट्ट असते तर

क्या बात है - भास्कर तुसी तो मैनी पहचाणा ही नही

धडकते दिल कि तमन्ना हो मेरा प्यार हो तुम ! दिले करार नही कबसे बेकारार हो तुम


हे मत अस्मादिकांचे नसुन त्यांच्या अर्धागीनींचे आहे. आज दुपारची झोप पण ती डोळे उघडे ठेवुन घेत आहे, ज्या डोळ्याने जॉन भाय ला डोळे भरभरुन पाहीले ते म्हणॆ बंद करायचे नाही . पण माझे मत मात्र नेहमी प्रमाणेच तिच्या विरुद्ध आहे. कोणी स्वप्नात वगैरे आली तर.

मुंबई मॅरेथोन २००८ एक गंमत जंमत

Saturday, January 19, 2008

हेल्मेट विना पोलिस

पोलिसांनी पोलिसांनाच दंड केल्याचे कधी ऐकले आहेत ? बघितले आहे काय ? नाही ना. मी सुद्धा नाही .
दंड केला असतात तर आतापर्यंत उघडउघड मुंबई पोलीस कार्यलयाने कामासाठी दिलेल्या आपल्या मोटरसायकल वरुन हेल्मेट विना रस्तावरुन फिरले नसते.
ऑन ड्युटी वर असताना व नसतानांसुद्धा पोलिसांनी कायद्याचे पालन करायलाच हवे. निदान स्वःताच्या सुरक्षततेसाठीतरी. त्यातुन सुटका नाही.
हाच प्रश्न आज मी दोन वाहतुक पोलिसांना व त्यांच्याच जवळ उभ्या असलेल्या मुंबई पोलीसांना विचारला. हसण्याशिवाय व माझ्या तोडाकडॆ बघण्याशिवाय त्यांच्या कडे काहीच उत्तर नव्हते.

नळाला नाही पाणी घागर उताणी रे


दक्षिण मुंबईत रहाणाऱ्यांच्या मागची पाण्याची लागलेली साडेसाती काही सुटायचा मार्ग नाही.

नळाला B.M.C. चे पाणी पहाटॆ ४.३० येते.

ना मारो नजरीका के बाण, अकेली आयी पनीया भरनार, तुम क्या जानो नटखट कान्हा, सांस ननंद मोहे दे देगी ताना ! नदीवर पाणी भरायला जाण्याऱ्या गोपिका व त्यांची छेड काढणारा किसनकन्हेया हे किती काव्यात्मक असले तरी साखरझोपेतुन भल्या पहाटॆ नळावर पाणी भरण्यासाठी उठणॆ तेवढे आनंददायी नाही.

आणि नेहमी पाणी भरुन होण्याचा आत नळचे पाणी जाते, हे पाणी बंद करण्याचे काम करते कोण ? तर ही लोक.

मराठी बॉग विश्व

आता आपल्या वरील , मराठी बॉगल्स वरील जबाबदारी फार वाढली आहे. केवळ कथा, कविता, अनुभव, या विषयांपुरते आपले बॉग मर्यादित, सिमीत ठेवुन चालणार नाहीत.

अधिक माहिती साठी वाचा " मराठी बॉग विश्व" चतुरंग, लोकसत्ता दिनांक १९-०१-२००८.

बॉबी फिशर


बुद्धीबळाच्या पटावर वझीरालाच चेक मेट झाला. बॉबी फिशर वर मॄत्युनी मात केली.
रशियन पोलादी पडद्याचे आक्रमण रोखणारा, त्यांना नवविणारा, त्यांना आपल्या खेळीच्या जाळ्यात फशी पाडणारा जगज्जेता काळाच्या पडद्याआड गेला.



त्याच्या "माय मेमोरेबेल ५० गेम्स " मधुन मी बरेच धडे गिरवले, शिकलो. त्याची पडलेली भुरळ आयुष्यभर पुरत आहे.

Friday, January 18, 2008

समस्या व तिचे समाधान

आपल्या पुढे एखादी समस्या निर्माण झालेली असते, समोरच्या माणासाकडे त्याचे उत्तर असते, दोन केवळ दोन चार मिनीटात ती समस्या तो सोडवु शकत असतो, आपण त्याच्या कडे धाव घेतो वेळेवर मदत मिळावी म्हणुन. पण.

ते गॄहस्थ दुरध्वनी वर बोलण्यात मग्न असतात, १० मिनीट, १५,२०,अगदी २५ मिनीटॆ, किंवा दुसऱ्या कोणत्यातरी व्यक्तीशी त्यांचे संभाषण सुरु असते, तुम्ही त्यांचे लक्ष वेधुन घेण्याचा प्रयत्न करतात, तुमची डेस्परेट अवस्था त्यांच्या कदाचीत लक्षात आलेली ही असते, पण त्यांचे बोलणे काही संपत नाही, तुमची बैचेनी काही दुर होत नाही. तुम्ही आपले समोर तसेच चुळबुळत उभे ताटकळत.

गरज असते ती त्यांनी आपल्या संभाषणातुन क्षणभर पॉज घेण्याची, समोरच्याला जरासे होल्ड करण्याची. तुम्हाला जाणुन घेण्याची.

कंटाळुन तुम्ही तेथुन निघुन जातात, समस्येचे ओझे डोक्यावर घेवुन.

मुंबई मॅरेथोन

मुंबई मॅरेथोन मधे धावायच अ.. आपल चालायच म्हणतोय.

Thursday, January 17, 2008

दाम न करी काम !

काय करताहेत काय ही मंडळी, आपली प्रशासकिय अधिकारी व राजकारणी हो, किती अमुल्य संधी वाया घालवायच्या की हो. आपल्या विकासाच्या हो, म्हणजे आपल्या विभागाच्या, शहराच्या ना हो. आता काही कुत्सीत मंडळी म्हणतील नक्की शहराचाच विकास ना हो, की आपल म्हणजे कस आहे, विकास म्हणे विकास. सरकार म्हणते अहो महानगरपालिकेचे कारभारी, बजेट आखा, किमान पायाभुत नागरी सुविधा साठी तरतुद करा, तरतुद केलेला निधी खर्च करा ! पैसे खर्च कराल तेव्हाच विकास होईल, नागरीकांना किमान पायाभुत नागरी सुविधा मिळतील, राहाणीमान सुधारेल.

पण आम्ही आपले बचत करण्याच्या मागे. कश्शाला उगाचच पैसे वाया घालवायचे फुकटच्या नागरी सुखसुविधा पुरवण्यात ? लोक काय, त्यांना आहे त्यात रहाण्यात समाधान मिळते, रहातील तसेच, जरासे पदपाथाचे लादीकरण केले, दोनचार ठिकाणी डांबरीकरण केले कि झाले, होते त्यांचे समाधान, हवा कशाला नसता व्याप.
कस व्हायच.
पायाभूत सुविधांसाठी तरतूद रुपयाची; खर्च चार आणे!महापालिकांची "कार्यक्षमता' सरकारी अहवालात उघड- मनीष कांबळे - सकाळ वृत्तसेवापुणे, ता. १६ -
देशातील कोणत्याही महापालिकेने एखाद्या कामासाठी शंभर रुपयांची तरतूद केली, तर वर्षअखेरीस त्यांपैकी किती रुपये खर्च झालेले असतील, याचे उत्तर आहे केवळ २४ रुपये! पुण्यासह देशातील प्रमुख ३५ महापालिकांनी दाखविलेली ही "कार्यक्षमता' रिझर्व्ह बॅंकेला सादर करण्यात आलेल्या अहवालात ठळकपणे पुढे आली आहे. ""महापालिकांच्या या अकार्यक्षमतेमुळे पायाभूत सेवांचा "बॅकलॉग' (अनुशेष) वाढत चालला आहे. महत्त्वाच्या विकासकामांच्या निधीतील ७६ टक्के रक्कम वर्षभरात तशीच पडून राहते. किमान नागरी सुविधा निर्माण करता येईल एवढा खर्चही महापालिकांना करता येत नसल्याने, शहरे असमतोल विकासाकडे झुकत चालली आहेत,'' अशा शब्दांत अहवालात महापालिकांच्या कारभारावर ताशेरे ओढण्यात आले आहेत

पतंगबाजी अजुन किती बळी घेणार ?

पतंगबाजी अजुन किती बळी घेणार ? आणि या बद्द्ल कोणाला जबाबदार ठरवणार ? धारधार मांज्यामुळे किती पक्षी जायबंदी होतात, मरतात याची आपल्याला फिकीरच नसते पण निदान मानवी जीवाचे तरी मुल्य आपण जाणायला हवे, ठेवायला हवे.
रस्तावरुन दुचाकीवरुन जाणारे , ज्यांचा या खेळाशी संबध ही नाही ते धारधार मांज्याने गळा चिरुन मरण पावतात, गच्ची वरुन पतंगबाजाच्या नादात वरुन खाल पडुन मुले, माणसे मरतात, जायबंद होतात, रस्तावर पतंग पकडण्याच्या नादान बेहोशीने धावल्या मुळे मुलांना अपघात होतात.
आपले सणात हे असेच,या प्रकारचे उपद्रावमुल्य असायला हवेच का ?
गोविदा, उंच दहीहंडी फोडतांना थर कोसळुन जखमी होणे, दिपावलीत फटाक्यांमुळे मुले भाजणे, ( माझ्या माहीतीत एका मुलाला आपला डोळा अनारामुळे गमवावा लागला ), फटाक्याचे ध्वनी,वायु प्रदुषण, होळीत पाण्यानी भरलेले फुगे मारल्या मुळे डोळ्यावर गदा येणे, गुलाल व ईतर कॄत्रीम रंगांमुळे ईजा होणे . गणेशोत्सावातील, नवरात्रीमधी ध्वनीप्रदुषण, त्या लाउडस्पिकरच्या भिंती, रस्ते अडवुन बांधलेले मंडप .
कोठेतरी आपण यातुन मार्ग काढायला हवा .
Time of India
MUMBAI: The Makar Sankranti festivities this year had a macabre touch. A stray 'manja' (the string that's used to fly kites) nearly slit Mira Road youth Santosh Shetty's throat on Tuesday afternoon along the busy Western Express stretch between Kandivli and Borivli

गोव्यात पुन्हा आटापाट्यांचा पोरखेळ सुरु

अस्थिर सरकार म्हणजे काय ? हे गोव्यातील आमदारांकडुन शिकावे. प्रत्येक आमदाराला येथे मुख्यमंत्री होण्याची संधी का बर देत नाहीत. सर्व पक्षांनी मिळुनमिसळुन एक सरकार बनवावे , हवे कशाला सत्ताधारी व विरोधी पक्ष. दर दिड महिन्याला एक नवा मुख्यमंत्री, कोणाचे सरकार गडगडला नको.
त्या पोरखेळा पेक्षा हा खेळ बरा. सर्व सुखी, समाधानी.
दै. सकाळ - पणजी, ता. १६ - सरकार व्यवस्थित चालले नसल्याचे कारण देत गोव्यातील तीन मंत्री व कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असलेल्या संसदीय सचिवांनी आज राजीनामे दिल्यामुळे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचे सरकार अडचणीत आले आहे.

Tuesday, January 15, 2008

लोक काय दोन्ही तोंडानी बोलतात

प्रिय श्री. रतन टाटा,
यांसी,
आपण काय कोणतीही टीका मनाला लावुन घेवु नकात. लोक काय दोन्ही तोंडानी बोलतात.
आधी सामान्यांच्या आवाक्यात चारचाकी मोटारगाडी नाही, त्यांना परवडेल अशी गाडी हवी, करत रडत होते.


आता गाडी येवु घातली आहे तर रस्तावरच्या गाडयांची संख्या वाढेल, वाहतुकीचा प्रश्न निर्माण होईल, करत चिंता व्यक्त करु लागली आहेत.


आपले विचार आपण जेव्हा पुर्वी मांडलेत तेव्हाच या बाबीचा टिका करणाऱ्यांनी विचार करायला हवा होता, व आपल्या ते निदर्शनास आणायला हवे होते.


आपल्या गाडीची वाट पहाणारा

लोक काय दोन्ही तोंडानी बोलतात

प्रिय श्री. रतन टाटा,
यांसी,
आपण काय कोणतीही टीका मनाला लावुन घेवु नकात. लोक काय दोन्ही तोंडानी बोलतात.
आधी सामान्यांच्या आवाक्यात चारचाकी मोटारगाडी नाही, त्यांना परवडेल अशी गाडी हवी, करत रडत होते.

आता गाडी येवु घातली आहे तर रस्तावरच्या गाडयांची संख्या वाढेल, वाहतुकीचा प्रश्न निर्माण होईल, करत चिंता व्यक्त करु लागली आहेत.

आपले विचार आपण जेव्हा पुर्वी मांडलेत तेव्हाच या बाबीचा टिका करणाऱ्यांनी विचार करायला हवा होता, व आपल्या ते निदर्शनास आणायला हवे होते.
आपल्या गाडीची वाट पहाणारा

माझी शेरेबाजी

आम्हाला शिकवण्यात आले ह

मी एक ’रत्न’

कित्ती कित्ती वाट पाहिली, कोणाकोणाला आडुन आडुन सांगुन झाले, काय काय केले, पण कश्या कश्शाचा उपयोग होतच नाही, कोण्णी कोण्णी माझे नाव सुचवायला मागतच नाही, तय्यार नाहीच मुळी.

आपल "मी एक रत्न " पुरस्कारासाठी हो ! ("काय पण हे रत्न आहे" मधला रत्न नव्हे), त्या साठीच हा सारा खटाटोप. एकदा का तो मिळाला की सारे पावले.

नाही तर नाय . पुर्ण विचाराअंती, सर्व बाबींचा साधक बाधक विचार करुन, एकमुखाने (माझ्याच मुखाने) आम्ही असा निर्णय घेतला आहे की आपण स्वःतच, आपलेच नाव या पुरस्कारासाठी सुचवायचे व आपणच त्यास अनुमोदन द्यायचे.

हं. तर मी कोण व मी अस्मादीक या पुरस्कारासाठी किती योग्य आहेत ?

मी एक सामान्य माणुस, अगदी आर.कें. च्या "कॉमन मॅन " सारखाच. या अश्या महागाईच्या काळात , प्रामाणीक पणे कष्ट करुन हाता तोडांची भेट दोन वेळ, माझ्यासाठी व माझ्या कुटुंबियांच्यासाठी घालुन देणारा ( यात माझे हॉटेलींग धरलेले नाही).

माझ्या नावाचा हा पुरस्कार देण्याकरीता गांभिर्याने विचार करण्यात यावा अशी माझी सर्व निवड कमीटीच्या सदस्यांना प्रामाणीक व तळमळीची विनंती आहे.
तिळगुळ घ्या गोड गोड बोला

Monday, January 14, 2008

माझी शेरेबाजी

भारतीय उद्योजकांना चीन कडुन शिकण्यासारखे खुप काही आहे.
- फक्त उद्योजकांनाच ?

प्रायमरी निवडणुकीत मॅडमच्या डोळे पाणावले
- दोन अश्रु इराक मधे मॄत्युमुखी पडलेल्यासांठी सुद्धा यावे

"तारे जमीन पर " हा चित्रपट पहातांना त्यांच्या डोळ्यात अश्रु आले
- दोन अश्रु दंगलीत व हत्याकांडात होरपळलेल्यांसाठी सुद्धा यावे

Sunday, January 13, 2008

अजब तेरी दुनिया मेरे मालीक

अण्णा तोंडओळख असलेल्या व्यक्तीस भेटण्यास खास रुग्णालयात जातात व वर त्याच्या भानगडी माहीत नव्हता, त्याने खडंणी वसुल केल्याचे माहीत नव्हते हा खुलासा करतात. मंत्रांवर , त्यांच्या खात्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात, व त्यांनी समाधान केल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र ही देवुन टाकतात.
हा अण्णांचा भाबडेपणा म्हणायचा की आणखी काय ?

आजच्या लोकसता मधे " आण्णांची.. अण्णांसाठी.. अण्णाशाही " ही एक बातमी आहे.
व्यक्‍ती व तिचे कार्य कितीही महान असले तरी संविधान बाहेरील असे केंद्र निर्माण होवु नये.

Friday, January 11, 2008

पडु आजारी भारी मौज वाटॆ

आजारी पडण्यात भारी सुख असते,पण कोणाला ? कार्यालयात काम करणाऱ्यांना. सिक लिव्ह मारुन घरी तंगड्या ताणुन आडवे होणाऱ्यांसाठी.
गॄहीणीचे काय ? तिला आजारी पडणे फारसे परवडत नाही, घरातील तिची कामे तिलाच करायची असतात, या कामात आपल्या नवऱ्याने किंवा मुलाने मदत करावी हि तिने अपेक्षा बाळगणॆ झुट.
दुसरी मजा असते ती आमदारांची, मंत्रांची , त्यांच्या कुटुंबियांची.
आजारपणासाठी खर्च झालेला, न खर्च झालेला सर्व पैसा त्यांना सरकार कडुन पर्यायाने आपल्याच कडुन मिळत असतो.

Thursday, January 10, 2008

शाकाहारी व मासांहरी

खाण्याच्या बाबतीत माझ्या मनावर सर्वात जास्त दडपण केव्हा येत असेल तर ते जेव्हा तुमच्या बरोबर जेवणासाठी मांसाहारी लोक असतील तेव्हा. मग ते जेवण तुम्ही घरात करत असाल की बाहेर उपहारगृहात त्यांना सोबत घेवुन जाणार असाल.

शाकाहारी पदार्थ कितीही चविष्ट, रुचकर, उत्तम, सर्वोत्तम, सर्वश्रेष्ट असले तरी त्यांना त्यात रस नसतो, त्यांना हवे असते ते चिकन, मटन, मासे आणि अंडी. मग ते कसे ही असो. नाईलाज झाल्यागत ही लोक तोंड वाकडी करत शाकाहारी खात रहातात. तुमची सारी मजा जाते.

शाकाहारी व्यक्ती मांसाहार करु शकत नाही, पण मांसाहरी मात्र कधी ना कधीतरी शाकाहार करतच असतात हे ते विसरतात.

जेथे सामीष भोजन मिळते अश्या ठिकाणी जेवायला जाण्याचा मला फारसे आवडत नाही. मी ते टाळतो. पुर्वी निदान भीडेखातर तरी जायचो, पण आत्ता जातच नाही, भीड गेली चुलीत.
जर ते तुमच्या साठी आनंदाने तुमचे अन्न जेवणार नसतील तर तुम्ही तरी का तडजोड करावी ?

नॅनो व श्री रतन टाटा - बोले तैसा चाले



चला मग, तयार व्हा. आता जरापण वेळ घालवु नकात. इती माझी सीईओ.
अग पण, नॅनोचे बुकींग जुन महिन्यापासुन सुरु होणार आहे.
ते काही नाही. मला नेहमी प्रमाणे शेंडया लावु नकोस. मला आत्ता म्हणजे आत्ता गाडी पाहिजे.
अग जर धीरसबुरी आहे की नाही !
नाही. अजिबात नाही.
श्री रतन टाटांना सलाम. कबुल केल्याप्रमाणे त्यांनी सर्वसामान्यांना परवडेल अश्या किमतीत अखेरीस गाडी तयार केली.
आता प्रतिक्षा त्याचे बुकींग केव्हा सुरु होते याची. आदल्या रात्र शोरुम बाहेर नंबर लावायला रस्तावर झोपायलाच जाईन म्हणतो मी.

Wednesday, January 09, 2008

पुर्णिमा बालसुब्रमण्यम व स्वेता रवीशंकर - भरत नाट्यम

मॅडम, आपण येथे काय करत आहात ?
का बर ? मला सांगा तुम्ही येथे कसे ?
मी तर गेले ५ दिवस या स्वामी हरीदास संगीत संमेलनाला येत आहे.
पण आपण ?
आज माझ्या मुलीचा येथे या महोत्सवात भरतनाट्यम चा कार्यक्रम आहे.
अनेक वर्षे एकाच कार्यालयात काम करत असुनही आपल्याला दुसऱ्यांबद्दल काहीच माहीती नसते ?

कार्यक्रम उत्तम रंगला हे वेगळे सांगणे नलगे. या पाच दिवसामधे सर्वात जास्त टाळ्या या नॄत्याच्या वेळी पडत होत्या. सर्वजण तॄप्त मनाने घरी परतले.

Tuesday, January 08, 2008

मेरा भारत महान.


अन्याय घोर अन्याय , हा केवळ हरभजनसिंग वरीलच नव्हे साऱ्या भारतिय क्रिकेटसंघावरील व त्याच प्रमाणे सर्व क्रिकेटप्रेमी व समस्त भारतावर झालेला महाघोर अन्याय आहे व याचा निषेध आम्ही व्यक्त करीत आहोत. आमचा स्वाभिमानाला या अन्यायकारक वागणुकीने भयंकर ठेच पोहोचली असुन त्याची भरपाई कशानेही होणार नाही.


यजमान आपल्या देशात आलेल्या पाहुण्यांना अशी कधी वागणुक देतात का ? ते आमच्या देशात आले , खेळले आणि आमच्या नेत्यांना विजयाच्या अतिरेकाच्या भरात उर्मटपणे व्यासापीठावरुन खाली ढकलुन देण्यापर्यंत त्यांची मजल गेली , तरी आम्ही शांत राहीलो कारण पाहुण्यांचा मान राखणे ही आमची संस्कॄती आहे, पण आता मात्र अतिरेक झाला.


आपण त्यांचा गांधीगिरीच्या मार्गाने निषेध करु या का ? अजिबात परत यायचे नाव काढायचे नाही. खा, प्या, मजा करा, भरपुर भटकुन घ्या. सामन्यात प्रत्येक खेळाडुने फलंदाजी करताना या केवळ एकच चेंडु खेळावा व पुढच्या चेंडुंत बाद व्हावे . गोलंदाजानेही लहान मुलाला ज्या प्रमाणॆ चेंडु टाकतात त्या प्रमाणॆ टाकावा, कोणिही त्यांनी टोलावलेला चेंडुच्या मागे धावत जावु नये.
मेरा भारत महान.

३१ डिसेंबर ची ती दुःखद घटना.

त्या तरुणींची विटंबना दोनदा झाली. एकदा प्रत्यक्ष ती घटना घडली तेव्हा व दुसऱ्यांदा हिंदुस्थान टाईम्स नी ती घटना भडक स्वरुपात अगदी फोटोंसहीत प्रकाशीत केली तेव्हा.

वर्तमानपत्राला या घटनेला ठळक प्रसिद्धी देण्याची गरजच काय ? आपला खप या पलिकडे काहीच कारण दिसत नाही. या अश्या बातम्या न छापता दोषी व्यक्तींना शासन करण्यासाठी त्यांनी पोलिस कमिशनरांकडे पुराव्यानिशी या बाबत तक्रार करायला हवी होती.

Sunday, January 06, 2008

जे न सौख्य लाभे महाली ते लाभे या पदपाथावर मला



यांना हव्या कशाला गाद्या गिरद्या ? त्या शिवाय झोप चांगली लागते.
खर म्हणजे आपल्यासाठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे. या थंडीच्या दिवसात पण त्यांना हाच आसरा. करोडो रुपये देवस्थानांना दान देण्यापेक्षा, सोन्याची सिंहासने नी भक्त निवास बांधण्या ऐवजी या गोरगरीबांसाठी काही तरी करा.


त्यांना भीक नको तर त्यांना स्वःताच्या पायावर सन्मानेने जगता येईल अशी परिस्थीती या कोट्यावधी रुपयातुन निर्माण करा की. देणाऱ्यांनी व घेणाऱ्यांनी सुद्धा विचार करा.

यांना फुकटची जेवणावळी , भंडारा, भंडारा, अन्नछ्त्र, करत घालु नकात तर त्यांचासाठी रोजगार निर्माण करा.

बापसे बेटी सवाई. पं. सुरेश तळवळकर व सावनी.

ताल योगी पं.सुरेश तळवळकर यांचा अप्रतीम तबला वाजनाचा कार्यक्रम पहाण्याचा योग काल रात्री जुळुन आला.

अंतरंग या संस्थेनी आयोजीत केलेला "ताल नाद" हा त्यांचा शुभारंभाचा सुरेल कार्यक्रम. असे अनेक दर्जेदार कार्यक्रम आयोजित करण्याचा त्यांचा हेतु आहे. त्यांनी असेच देखणे कार्यक्रम आयोजीत करावे व आम्ही त्यांचा असाच आस्वाद घ्यावा.


Saturday, January 05, 2008

पं.कालीनाथजी मिश्रा

भाई, हम तो दिवाने है पं.कालीनाथजी मिश्रा के. कथ्थक नॄत्याला तबल्यावर साथ संगत करावी तर त्यांनीच. अनेक वेळा त्यांना ऐकण्याची संधी मला मिळाली. प्रत्येक वेळी दिल खुश हुवा. बार बार लगातार.

स्वामी हरीदास संगीत संमेलन

video recording is done by Mr.Hans Asscheman, Music and Dance Promoter (Foundation Heisa ) from The Netherland

The video's you can find on:

http://www.stage6.com/Swami-Haridas-Sanget-Sammelan/

http://www.stage6.com/Indian-classical-dance/video/2017339/Sanjukta-Datta

Thursday, January 03, 2008

स्वभाव

काही जणांचे बोलणे किती मधाळ असते, मुखी जणु खडीसाखर, ते किती गोड बोलतात, लाडे , लाडे, फारच लाघवी. ऐकत रहावेसे वाटते त्यांचे ते बोलणे व ते दिलखुलास हास्य.

पण जरासे तटस्थ राहुन न्याहाळले असता जाणवते हे सारे त्यांच्या भात्यातले हुकमी बाण, विशिष्ट वेळी, खास माणसांकडेच , जेव्हा जेव्हा त्यांचा स्वार्थ दडलेला असतो, तेव्हा तेव्हा हे त्यांच्या भात्यातुन बाहेर काढले जातात. मग त्यातली कॄत्रीमता जाणावायला लागते, त्यांची वस्तादगीरी कळू लागते.

मतलब की दुनीया है रे भाई.

तर काहीचे बोलणे फणसासारखे. काटेरी. फणस म्हणुन घ्यायला त्यांना काय अहंकार वाटतो.

कस व्हायच !!
काही जणांचे बोलणे किती मधाळ असते, मुखी जणु खडीसाखर, ते किती गोड बोलतात, लाडे , लाडे, फारच लाघवी. ऐकत रहावेसे वाटते त्यांचे ते बोलणे व ते दिलखुलास हास्य.


पण जरासे तटस्थ राहुन न्याहाळले असता जाणवते हे सारे त्यांच्या भात्यातले हुकमी बाण, विशिष्ट वेळी, खास माणसांकडेच , जेव्हा जेव्हा त्यांचा स्वार्थ दडलेला असतो, तेव्हा तेव्हा हे त्यांच्या भात्यातुन बाहेर काढले जातात. मग त्यातली कॄत्रीमता जाणावायला लागते, त्यांची वस्तादगीरी कळू लागते.


मतलब की दुनीया है रे भाई.

तर काहीचे बोलणे फणसासारखे. काटेरी. फणस म्हणुन घ्यायला त्यांना काय अहंकार वाटतो.


कस व्हायच !!

Wednesday, January 02, 2008

बेस्ट चे बेस्टचालक

म्हटलं, पाहु बर हे बेस्ट चे बसचालक "रस्ता सुरक्षितता सप्ताह" मधे किती सुरळीत बस चालवतात.
मान्य, अगदी प्रतिकुल परिस्थितीत, माणसांच्या महा प्रचंड गर्दीत, अफाट व बेताल टॅक्सी चालक, रिक्शाचालक, दुचाकीस्वार, खाजगी वाहान चालक, हातगाडीवाले, अरुंद रस्ते, वळणे यांच्या भुलभुलय्या मधुन भली मोठाली बस चालवणे जिकरीचे आहे, तरीपण आपण होवुन वाहतुकीचे नियम मोडणे अक्षम्य.
दुचाकी चालवत असतांना मागुन भों भों, करत कर्णकर्कश भोंगा वाजवत जेव्हा हे बस चालक अंगावर येत असतात, बाजुला दाबायला बघत असतात ना तेव्हा तर प्रत्यक्ष यमराजाचा रेडा मागे लागल्याचाच भास होतांनाचा अनुभव बऱ्याच जणांनी घेतला असेल.
आज सकाळी वर्तमानपत्रात "बेस्ट चे बेस्टचालक " ही बातमी वाचली, सकाळी कार्यालयास जाण्यास निघालो, बस पकडली. चौकात समोर जाण्यासाठी सिग्नल लाल होता, आडवी वाहतुक सुरु होती, मग समोरुन येणारी वाहतुक सुरु होणार होती, उजव्या व मधल्या रांगेत लहान वहाने शिस्तीत उभी होती, आमच्या बसचालकानी उजवीकडुन चक्क डाव्या बाजुला येत सरळ बेधडकपणे चौकात गाडी घुसवली व कोणाची ही पर्वा न करता , लाल सिग्नल तोडुन गाडी सरळ हाणली.

योगायोगाने त्याच वेळी बसवाहक शेजारीच उभे होते, त्यांच्या निदर्शनास ही बाब आणली, म्हटले पहा हा लाल सिग्नल व हा कायद्याचा भंग. आज तुम्ही सुरक्षा बॅच आपल्या छातीवर लावला आहात, निदान त्याचा तरी मान राखा व आणि या सप्ताहात तरी नियम तोडु नकात. जा, जावुन ही गोष्ट बसचालकांना सांगा. बोलतांना माझा आवाज जरा चढलाच होता. इतर प्रवाशी मात्र उदासीन. असे वाहतुकीचे नियम असतात काय ? या विचारात.

त्या वेळी माझ्या डोळ्यासमोर दिसत होती ती कालच्या मरीन डाईव्ह वर अपघातात मरण पावलेली चार मुले. माझा मुलाचे ते शाळेतले मित्र.

बेस्ट चे बेस्टचालक

म्हटलं, पाहु बर हे बेस्ट चे बसचालक "रस्ता सुरक्षितता सप्ताह" मधे किती सुरळीत बस चालवतात.
मान्य, अगदी प्रतिकुल परिस्थितीत, माणसांच्या महा प्रचंड गर्दीत, अफाट व बेताल टॅक्सी चालक, रिक्शाचालक, दुचाकीस्वार, खाजगी वाहान चालक, हातगाडीवाले, अरुंद रस्ते, वळणे यांच्या भुलभुलय्या मधुन भली मोठाली बस चालवणे जिकरीचे आहे, तरीपण आपण होवुन वाहतुकीचे नियम मोडणे अक्षम्य.
दुचाकी चालवत असतांना मागुन भों भों, करत कर्णकर्कश भोंगा वाजवत जेव्हा हे बस चालक अंगावर येत असतात, बाजुला दाबायला बघत असतात ना तेव्हा तर प्रत्यक्ष यमराजाचा रेडा मागे लागल्याचाच भास होतांनाचा अनुभव बऱ्याच जणांनी घेतला असेल.
आज सकाळी वर्तमानपत्रात "बेस्ट चे बेस्टचालक " ही बातमी वाचली, सकाळी कार्यालयास जाण्यास निघालो, बस पकडली. चौकात समोर जाण्यासाठी सिग्नल लाल होता, आडवी वाहतुक सुरु होती, मग समोरुन येणारी वाहतुक सुरु होणार होती, उजव्या व मधल्या रांगेत लहान वहाने शिस्तीत उभी होती, आमच्या बसचालकानी उजवीकडुन चक्क डाव्या बाजुला येत सरळ बेधडकपणे चौकात गाडी घुसवली व कोणाची ही पर्वा न करता , लाल सिग्नल तोडुन गाडी सरळ हाणली.


योगायोगाने त्याच वेळी बसवाहक शेजारीच उभे होते, त्यांच्या निदर्शनास ही बाब आणली, म्हटले पहा हा लाल सिग्नल व हा कायद्याचा भंग. आज तुम्ही सुरक्षा बॅच आपल्या छातीवर लावला आहात, निदान त्याचा तरी मान राखा व आणि या सप्ताहात तरी नियम तोडु नकात. जा, जावुन ही गोष्ट बसचालकांना सांगा. बोलतांना माझा आवाज जरा चढलाच होता. इतर प्रवाशी मात्र उदासीन. असे वाहतुकीचे नियम असतात काय ? या विचारात.


त्या वेळी माझ्या डोळ्यासमोर दिसत होती ती कालच्या मरीन डाईव्ह वर अपघातात मरण पावलेली चार मुले. माझा मुलाचे ते शाळेतले मित्र.

Tuesday, January 01, 2008

परदेशी प्रवास सुखाचा की हो !!

फारच वाईट, एकुणच कठीणच परिस्थीती आहे म्हणायची या साहित्य प्रांतातली मुसाफिरी फारच खडतर हो, मीना ताई, त्या पेक्षा आपली मेक्सीको, चीन , इजिप्त, तुर्की, या परदेशी वाऱ्या सोप्या म्हणायचा.
दै. सकाळ मधुन-
औरंगाबाद - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष निवडणुकीवरून झालेल्या वादात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने प्रसिद्ध लेखिका आणि निवडणुकीतील उमेदवार मीना प्रभू यांच्याविरोधात निर्णय दिला आहे. प्रभू यांना "पन्नास हजार रुपये खर्च बसविण्याचा' निर्णय महामंडळाच्या लवादाने घेतला आहे.

मिरवणुक व टॅफिक जॅम

आधीच पुण्यात वाहतुकीचा पुरता बोजवारा उडलेला, त्यात भर पडते ती तात्कालीन परिस्थीतीची.

शहरात अनेकविध कारणे जैसे की सामाजीक, राजकीय, धार्मीक, वैयक्तीक कारणे मिरवणुका निघत असतात, वाहतुकीच्या समस्येने आधीच त्रस्त झालेल्यांच्या समस्येत याने आणखीनच भर पडत असते. वेळ साजर करणाऱ्यांची हौस या निमीत्ते पुरवली जाते पण आपल्या हौसे खातीर आपण किती वाहतुकीचा खोळंबा करीत आहोत, इतरांना या पासुन केवढा त्रास होत असेल याची जाणिव आपल्याच विश्वात रमलेल्यांना नसते. या मिरवणुकी काढुन, हे लोक काय साधतात ते केवळ तेच जाणो.

लग्न, व्रतबंधन समारंभ, या खर तर संपुर्ण वैयक्तीक बाब, पण रस्तावरुन वाजत गाजत साऱ्या दुनीयेला ते झाल्याचे दाखवुन देण्यात काय हशील ? मंगल कार्यालयाच्या आवारात हवे तेवढे नाचाना. लग्न तुमचे, विवाह बंधनात अडकणार तुम्ही, टॅफीक जॅम मधे फसणार मात्र आम्ही. वाहतुक पोलीस यांना परवानगी देतातच का व कशी ?

हरे रामा हरे कॄष्णा, इस्कान वाले भजन म्हणत, वाजत गाजत आणि नाचत रस्तावरुन आपल्या भक्तीचे प्रदर्शन करीत मेळावे काढत असतात, का ? पण का ? रस्तावरुनच का ? मंदिराचे आवार आहे ना , ते कमी पडते काय ?

मध्यंतरी एका सामाजीक संस्थेंने आपल्या संमेलना निम्मीते रात्री टिळक रोड वरुन अती भव्य मिरवणुक काढली होती, तेच रथ, तिच वेषभुशा, तेच मावळे. सारा परीसर जॅम. परत यांच्या दिमाखीस, या मिरवणुकीची देखरेख करण्यासाठी लागणारा पोलीस बंदोबस्त.

बाबांनो, आपल्याला मिरवणुका काढायच्याच असतील तर जरुर काढा , पण गर्दीच्या वेळा टाळा, सुट्टीच्या दिवशी, भल्या पहाटे काढाना.