Tuesday, January 15, 2008

मी एक ’रत्न’

कित्ती कित्ती वाट पाहिली, कोणाकोणाला आडुन आडुन सांगुन झाले, काय काय केले, पण कश्या कश्शाचा उपयोग होतच नाही, कोण्णी कोण्णी माझे नाव सुचवायला मागतच नाही, तय्यार नाहीच मुळी.

आपल "मी एक रत्न " पुरस्कारासाठी हो ! ("काय पण हे रत्न आहे" मधला रत्न नव्हे), त्या साठीच हा सारा खटाटोप. एकदा का तो मिळाला की सारे पावले.

नाही तर नाय . पुर्ण विचाराअंती, सर्व बाबींचा साधक बाधक विचार करुन, एकमुखाने (माझ्याच मुखाने) आम्ही असा निर्णय घेतला आहे की आपण स्वःतच, आपलेच नाव या पुरस्कारासाठी सुचवायचे व आपणच त्यास अनुमोदन द्यायचे.

हं. तर मी कोण व मी अस्मादीक या पुरस्कारासाठी किती योग्य आहेत ?

मी एक सामान्य माणुस, अगदी आर.कें. च्या "कॉमन मॅन " सारखाच. या अश्या महागाईच्या काळात , प्रामाणीक पणे कष्ट करुन हाता तोडांची भेट दोन वेळ, माझ्यासाठी व माझ्या कुटुंबियांच्यासाठी घालुन देणारा ( यात माझे हॉटेलींग धरलेले नाही).

माझ्या नावाचा हा पुरस्कार देण्याकरीता गांभिर्याने विचार करण्यात यावा अशी माझी सर्व निवड कमीटीच्या सदस्यांना प्रामाणीक व तळमळीची विनंती आहे.

No comments: