आधीच पुण्यात वाहतुकीचा पुरता बोजवारा उडलेला, त्यात भर पडते ती तात्कालीन परिस्थीतीची.
शहरात अनेकविध कारणे जैसे की सामाजीक, राजकीय, धार्मीक, वैयक्तीक कारणे मिरवणुका निघत असतात, वाहतुकीच्या समस्येने आधीच त्रस्त झालेल्यांच्या समस्येत याने आणखीनच भर पडत असते. वेळ साजर करणाऱ्यांची हौस या निमीत्ते पुरवली जाते पण आपल्या हौसे खातीर आपण किती वाहतुकीचा खोळंबा करीत आहोत, इतरांना या पासुन केवढा त्रास होत असेल याची जाणिव आपल्याच विश्वात रमलेल्यांना नसते. या मिरवणुकी काढुन, हे लोक काय साधतात ते केवळ तेच जाणो.
लग्न, व्रतबंधन समारंभ, या खर तर संपुर्ण वैयक्तीक बाब, पण रस्तावरुन वाजत गाजत साऱ्या दुनीयेला ते झाल्याचे दाखवुन देण्यात काय हशील ? मंगल कार्यालयाच्या आवारात हवे तेवढे नाचाना. लग्न तुमचे, विवाह बंधनात अडकणार तुम्ही, टॅफीक जॅम मधे फसणार मात्र आम्ही. वाहतुक पोलीस यांना परवानगी देतातच का व कशी ?
हरे रामा हरे कॄष्णा, इस्कान वाले भजन म्हणत, वाजत गाजत आणि नाचत रस्तावरुन आपल्या भक्तीचे प्रदर्शन करीत मेळावे काढत असतात, का ? पण का ? रस्तावरुनच का ? मंदिराचे आवार आहे ना , ते कमी पडते काय ?
मध्यंतरी एका सामाजीक संस्थेंने आपल्या संमेलना निम्मीते रात्री टिळक रोड वरुन अती भव्य मिरवणुक काढली होती, तेच रथ, तिच वेषभुशा, तेच मावळे. सारा परीसर जॅम. परत यांच्या दिमाखीस, या मिरवणुकीची देखरेख करण्यासाठी लागणारा पोलीस बंदोबस्त.
बाबांनो, आपल्याला मिरवणुका काढायच्याच असतील तर जरुर काढा , पण गर्दीच्या वेळा टाळा, सुट्टीच्या दिवशी, भल्या पहाटे काढाना.
No comments:
Post a Comment