Wednesday, January 02, 2008

बेस्ट चे बेस्टचालक

म्हटलं, पाहु बर हे बेस्ट चे बसचालक "रस्ता सुरक्षितता सप्ताह" मधे किती सुरळीत बस चालवतात.
मान्य, अगदी प्रतिकुल परिस्थितीत, माणसांच्या महा प्रचंड गर्दीत, अफाट व बेताल टॅक्सी चालक, रिक्शाचालक, दुचाकीस्वार, खाजगी वाहान चालक, हातगाडीवाले, अरुंद रस्ते, वळणे यांच्या भुलभुलय्या मधुन भली मोठाली बस चालवणे जिकरीचे आहे, तरीपण आपण होवुन वाहतुकीचे नियम मोडणे अक्षम्य.
दुचाकी चालवत असतांना मागुन भों भों, करत कर्णकर्कश भोंगा वाजवत जेव्हा हे बस चालक अंगावर येत असतात, बाजुला दाबायला बघत असतात ना तेव्हा तर प्रत्यक्ष यमराजाचा रेडा मागे लागल्याचाच भास होतांनाचा अनुभव बऱ्याच जणांनी घेतला असेल.
आज सकाळी वर्तमानपत्रात "बेस्ट चे बेस्टचालक " ही बातमी वाचली, सकाळी कार्यालयास जाण्यास निघालो, बस पकडली. चौकात समोर जाण्यासाठी सिग्नल लाल होता, आडवी वाहतुक सुरु होती, मग समोरुन येणारी वाहतुक सुरु होणार होती, उजव्या व मधल्या रांगेत लहान वहाने शिस्तीत उभी होती, आमच्या बसचालकानी उजवीकडुन चक्क डाव्या बाजुला येत सरळ बेधडकपणे चौकात गाडी घुसवली व कोणाची ही पर्वा न करता , लाल सिग्नल तोडुन गाडी सरळ हाणली.

योगायोगाने त्याच वेळी बसवाहक शेजारीच उभे होते, त्यांच्या निदर्शनास ही बाब आणली, म्हटले पहा हा लाल सिग्नल व हा कायद्याचा भंग. आज तुम्ही सुरक्षा बॅच आपल्या छातीवर लावला आहात, निदान त्याचा तरी मान राखा व आणि या सप्ताहात तरी नियम तोडु नकात. जा, जावुन ही गोष्ट बसचालकांना सांगा. बोलतांना माझा आवाज जरा चढलाच होता. इतर प्रवाशी मात्र उदासीन. असे वाहतुकीचे नियम असतात काय ? या विचारात.

त्या वेळी माझ्या डोळ्यासमोर दिसत होती ती कालच्या मरीन डाईव्ह वर अपघातात मरण पावलेली चार मुले. माझा मुलाचे ते शाळेतले मित्र.

1 comment:

A woman from India said...

या लेखाला लेबल दिलेले पाहिले. :) फार महत्वाचे आहे लेबल देणे. शोध यंत्रांमधेही लेबलचा उपयोग केल्या जातो.
जुन्या लेखांना लेबल दिल्यास ते पुनःप्रकाशित करावे लागतील असे वाटते.