Showing posts with label RESTAURANT. Show all posts
Showing posts with label RESTAURANT. Show all posts

Wednesday, February 23, 2022

आस्वाद

 अखेरीस आज तडफडणारा जीव शांत झाला, जिव्हेची तृप्ती झाली, आत्मा समाधान पावला आणि आधीच लंबोदर असलेले राजाभाऊ काहीसे अधिकच लंबोदर होवुन राहिले.

किती वाट बघायला लागली, एक साधी गोष्ट पण ती मिळवायला किती प्रतिक्षा करायला लागली ?  जेव्हा जेव्हा जागतीक स्तरावरचे मानांकन मिळालेल्या मिसळीचा "आस्वाद" घ्यायला जायचे तेव्हा तेव्हा बाहेर प्रतिक्षेत असलेली गर्दी बघुन राजाभाऊ हबकुन जायचे व माघारी फिरायचे. पुढे "प्रकाश" मधे जायचे. भुलेल्या पोटी अन्नाची वाट बघत रहाणे हे फार क्लेषकारक असल्यामुळे. आज हे दुष्टचक्र संपायचे होते. सेनाभवनवरुन पुढे जातांना राजाभाऊंनी "आस्वाद" च्या बाहेर गर्दी किती आहे ह्याची टेहाळणी केली. कमी गर्दी दिसली तेव्हाच ठरले होते आज येथेच. काम आटोपले आणि मग काय काळेकाकुं सोबत काळेकाका "आस्वाद" मधे , मिसळ आणि पोळाउसळ खायला.

आत शिरायला, टॆबल मिळायला फारशी वाट बघायला जरी लागली नाही तरी पण नशिबी जो विलंब व्हायचा होता तो होवुन गेला.  अशी जागा मिळाली की टेबल आणि खुर्ची यांच्यामधे राजाभाऊंचे पोट आडवे आले. दोघांच्या मधे शिरता आले तरी बसता नाही आले. मग योग्य ते टेबल मिळायला अंमळ थांबावे लागले.

टॉमेटो सार. पोळाउसळ  आणि ज्या मिसळीला पुरस्कार मिळाला ती मिसळ, दही मिसळ.शेवटी खरवस.









Sunday, February 06, 2022

ली कॅफे

 वाशीच्या दिशेने चाललेली गाडी राजाभाऊंच्या मुलाने उलटी चेंबुरच्याकडे फिरवली तेव्हाच खरं म्हणजे त्यांच्यापेक्षा रेस्टॉरंट्स शोधुन काढण्यात पुढे असलेल्या चिरंजीवाच्या मनात काय आहे हे ओळखायला हवं होते.

पण राजाभाऊंनी विचार केला कुठेतरी आतल्या बाजुला हा घेवुन चालला आहे, येथे असुन असुन किती पॉश रेस्टॉरंट असु शकेल ? पण राजाभाऊ वॉज रॉंग. 

ते "ली कॅफे ’ नामक एका  जेवण मिळणाऱ्या कॅफेमधे गेले.   ’हॉटॆल ज्युवेल ऑफ़ चेंबुर" मधे दोन रेस्टॉरंट्स आहेत. एकात पंजाबी, चायजीज मिळते तर दुसऱ्यात कॉन्टिनेंटल फुड.

सुनेने निवड अर्थात कॉन्टिनेंटल फुड ची केली. राजाभाऊंचे तिने केलेली निवड पाहुन दिल खुश झाले.

Le Cafe Nacho.

Ginger Monk.

Elixie

Stroganoff veg.

Le Cafe Chicken.

Potato Mash.

Jerk paneer Pizza.

Fresh Lime Soda.











Tuesday, February 01, 2022

हॉटेल लक्ष्मी

 एखादे उपहारगृह अगदी ग्रेट असेल  असे नाही पण तुम्ही तेथे जात रहाता, कदाचीत साधी थाळी खायला मिळत असल्यामुळे असावे.


पुण्याहुन थेऊरला गणपतीच्या दर्शनाला निघालेले राजाभाऊ पोचले पुणे-सासवड रस्तावर  खास ’लक्ष्मी हॉटेल" मधे जेवणासाठी.


खरं म्हणजे घरुन निघतांना देवस्थानात जेवायचे असे त्यांच्या मनात होते पण काय झाले देव जाणे ,दाने दाने पर लिखा है खानेवाले का नाम.




हॉटेल लक्ष्मी

भाडले वस्ती,देवाची उरळी,

पुणे सासवड  रस्ता

मो.क्र. ८३८००६९३२५ / ९९७५०२८७२१



आशा डायनिंग हॉल.

 आशा डायनिंग हॉल.


जेव्हा थाळीची किंमत रु.३५\- होती तेव्हापासुन आपटे रोड, पुणे येथील ”आशा डायनिंग हॉल मधे राजाभाऊ जेवायला जात आहेत. 






राजाभाऊंच्या पुणे मुक्कामी ते "श्रेयस" मधे जेवायला गेले नाहीत असं कधी होणे नाही.


Monday, January 24, 2022

कॅफे भोसले , फोंडा

 हिटलरी राजाभाऊंना कधी कधी पोरांचे पण ऐकायला लागते. 

मग त्यांच्या बोलण्याप्रमाणॆ केल्यानंतर वाटतं, बरे झाले आपण आपल्या हेकेखोर स्वभावाला मुरड घातली. 

पोरं बिचारी चार दिवस देवस्थानात जेवुन सुकुन गेली होती. कोबीची भाजी आणि चवळीची भाजी. चवळीची भाजी आणि कोबीची भाजी. 

लोटलीवरुन केरीला जातांना राजाभाऊंची फार इच्छा होती की आजचे भोजन "विजयादुर्गा देवस्थान " मधे व्हावे. आपल्या बापाचा हाच बेत असणार हे ठावुक असलेल्या युवराजांनी मग फर्मान काढले, आता आपण फोंडामधे जेवु. आदल्या रात्री प्रभुंकडे काजु आणायल गेलो असतांना त्यानी ह्या उपहारगृहाची टेहाळणी केली होती.

"कॅफे भोसले " 

उत्तम जेवण मिळाले. बटाट्याच्या आवडलेल्या भाजीसोबत चार पुऱ्या जास्तच खाल्या गेल्या.





Tuesday, January 11, 2022

आस्वाद, सेनाभवन समोर, शिवाजी पार्क.

आस्वाद, सेनाभवन समोर, शिवाजी पार्क.

येथे काय खायचे ते राजाभाऊंचे ठरलेले असते. एकतर कुर्मापुरी किंवा मग पोळा उसळ.

मुंबईमधे "आस्वाद" हे मराठमोळं खाद्यपदार्थ सर्वात टॉपचं उपहारगृह आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरु नये.










 

Sunday, January 09, 2022

धुंदूर मास सोहळा साजरा करतांना "आस्वाद" मधे


 

Vasudev . Dhundur Mass in "AASWAD"

धुंदूरमास साजरा करतांना "आस्वाद" मधे

https://www.facebook.com/pkale/posts/10223802546205855?comment_id=10223802708889922&notif_id=1641708464232481&notif_t=feed_comment&ref=notif 

धुंदूर मास साजरा करायला भल्या पहाटे राजाभाऊ पोचले "आस्वाद" मधे

 धुंदूर मास साजरा करायला भल्या पहाटे राजाभाऊ पोचले "आस्वाद" मधे


सनईचौघडा वादन, पारंपारीक रांगोळी, वासुदेव, मंत्रोच्चार, तीर्थप्रसाद, हळदीकुंकू, व सकाळचे प्रसन्न वातावरणात मन आणि जीव्हा दोनी तृप्त झाली.


धुंदूर मास थाळी मधे समाविष्ट : लिंबू-मध पाणी, बोरन्हाणमधील चुरमुरे, रेवडी, बोरं, हरभरा, पातळ मऊ भात सोबत तूप आणि मेतकूट, कुरडई, लिंबाचे लोणचे, ज्वारी-बाजरी थाली पीठ, लोणी, आंबोळी, लसूण दही चटणी, तीळ साटोरी, दाणे गूळ, उसाचे करवे आणि खारीक खीर असा साग्रसंगीत बेत.


मजा आली. 


पण एक खटकलं. थाळी मर्यादीत होती. रु. ३५०/= च्या हिशेबाने राजाभाऊंच्या मते साटोरी, थालीपीठ, आंबोळी जास्त हवे होते.


आस्वाद, सेनाभवन समोर, शिवाजी पार्क, मुंबई.