Sunday, January 09, 2022

धुंदूर मास साजरा करायला भल्या पहाटे राजाभाऊ पोचले "आस्वाद" मधे

 धुंदूर मास साजरा करायला भल्या पहाटे राजाभाऊ पोचले "आस्वाद" मधे


सनईचौघडा वादन, पारंपारीक रांगोळी, वासुदेव, मंत्रोच्चार, तीर्थप्रसाद, हळदीकुंकू, व सकाळचे प्रसन्न वातावरणात मन आणि जीव्हा दोनी तृप्त झाली.


धुंदूर मास थाळी मधे समाविष्ट : लिंबू-मध पाणी, बोरन्हाणमधील चुरमुरे, रेवडी, बोरं, हरभरा, पातळ मऊ भात सोबत तूप आणि मेतकूट, कुरडई, लिंबाचे लोणचे, ज्वारी-बाजरी थाली पीठ, लोणी, आंबोळी, लसूण दही चटणी, तीळ साटोरी, दाणे गूळ, उसाचे करवे आणि खारीक खीर असा साग्रसंगीत बेत.


मजा आली. 


पण एक खटकलं. थाळी मर्यादीत होती. रु. ३५०/= च्या हिशेबाने राजाभाऊंच्या मते साटोरी, थालीपीठ, आंबोळी जास्त हवे होते.


आस्वाद, सेनाभवन समोर, शिवाजी पार्क, मुंबई.












































No comments: