Tuesday, January 04, 2022

विनय हेल्थ होम

 बरं झाले आज "विनय हेल्थ होम" मधे गेलो, जणु काळेकाका आज काळेकाकुंना घेवुन "डेट" वरच गेले. 

आज राजाभाऊंसाठी त्यांना आपला वातानुकुलीत हॉल उघडुन त्यात बसायची सोय केली.  


हॉल मधे फक्त ते आणि ती. चांदनी राते, प्यार की बाते. कॅंडल लाईटचीच उणीव होती.

मजा आली.


राजाभाऊंच्या मनात मात्र आज "मधुर, साजुक नाजुक, मलईयुक्त, गरमागरम , सात्विक, मस्त, कुरकुरीत, हलकेफुलके, चटकदार, झणझणीत, चुरचुरीत, चविष्ट  , फक्कड, मसालेदार, गारेगार, मसालेयुक्त, तिखट, लोणकडी, ताजे " खाण्याचे घाटत होते. 

मग त्यांची पावले विनय कडे वळली.


(खरं कारण म्हणजे बाहेर करोनामुळे आसनक्षमता ५०% केली आहे. बाहेर जागा नव्हती म्हणुन आत त्यांच्यासाठी खास हॉल उघडुन दिला )






No comments: