Saturday, March 14, 2009

अरे वेड्‍या ही पानगळती नव्हे, कुणी सुंदरी श्रुंगार कराया आपला सारा साजश्रुंगार उतरवुन ठेवत आहे


गेल्या वर्षी , ज्याने वेडापिसा करुन सोड्ला होता तो हा अमलताश






का बरे हा असा ओकाबोका !

फार आशेने गेलो होतो पहावया याचे सौदर्य बेमौसमी, एका खोट्या इच्छेने, पण पदरी पडली ती निराशाच. वास्तविक पहाता बहाबा डवरायला अजुन अवकाश आहे , तरी पण बालेवाडीच्या आवारातील एक छोटुसा बहावा फुललेला पाहिला आणि गेल्या वर्षी धारेश्वराच्या अंगणात फुलेलेले याचे रुप आठवले, म्हटले एक चक्कर टाकावी, असे होवु नये बहार येवुन गेला आणि आपल्याला कळालेच नाही.


जेव्हा जेव्हा मी हे निष्पर्ण वॄक्ष पहातो तेव्हा तेव्हा श्री नरेंद्र सिनकर यांच्या बहुदा "माझे रशियातील दिवस " या पुस्तकातील एक शेर आठवतो. मुळ शेर काही लक्षात नाही.


"अरे वेड्‍या ही पानगळती नव्हे, कुणी सुंदरी श्रुंगार कराया आपला सारा साजश्रुंगार उतरवुन ठेवत आहे " अश्या काहीश्या अर्थाचा.

हा ओकाबोका अमलताश पाहिला आणि आज त्याचा अर्थ उमजला. 

असं आहे काय.       

4 comments:

sonal m m said...

पण हरेकृष्‍णजी, यंदा अंमळ उशीरच झालाय अमलताशच्‍या बहराला. आमच्‍या घरासमोरील बहावा फेब्रुवारी च्‍या अखेरीस पर्यंत बहराचा सुगावा द्‍यायचा...यंदा अजुनपर्यंत काही पत्ता नाही...तो तसाच ओकाबोका आहे...मलाच घाई झालीये कधी एकदाचा तो बहरतो....

यशोधरा said...

Krishnakaka, amalatashache photo kiti sundar!

HAREKRISHNAJI said...

Sonal
I think it blooms only in Apr - May

Yashodara,

You should have seen the real beauty in person

sonal m m said...

te kahi nakki mahit nahi harekrishnaji, me jevhapasun amcha amaltash pahate aahe to feb end/march suruvat paryanta navin baharachya khuna dakhavto...karan khara sangaycha tar mazya mnulach naav amal - tithunach prerna gheun aalela aahe. konas thauk bahudha global warming ule ki kar...bahava sudha kuthetari balance visarla asava !! ani atahi pivlya manyanchchi raang disayla lagli aahe ithe.