Friday, March 20, 2009

राज्य लावणी महोत्सव

राजाभाऊ आवरा की आता स्वतःला, नाहीतर होईल की तुमचा सुद्द्धा मास्तर "पिंजरा" मधला. चालले आपले ढोलकीवरची थाप आणि घुंगरुचा नाद ऐकला की. वळली आपली पावले आपसुक. 

राजाभाऊ, हे सांस्कृतीक कार्य संचालनालय, आणि टाटा वाले तुमाला येडाखुळा करुन सोडणार की काय। राव हे तमाशाचे खुळ बर नव्हे

तर मग संपला, एकदाचा. "राज्य लावणी महोत्सव ".

तीन दिवसीय राज्य लावणी महोत्सवाची काल रात्री सांगता झाली. हि रात्र दणाणुन सोडली, गाजवली ती छबु लोचना अंतरवेलीकर यांच्या कलापथकाने. नादावलेल्यांनी, चार चार, पाच पाच वेळा परत परत वन्स मोअर देत " मला म्हणतात "डोंगरची मैना" ही लावणी सादर करायला लावली। या बाईंनी फड जिंकला.


या कलापथका व्यतिरीक्त काल राजश्री काळे नगरकर आणि रेखा सारीका केजकर यांनी देखील लावणी महोत्सव मधे भाग घेतला.

3 comments:

मन कस्तुरी रे.. said...

काय हे हरेक्रिश्नाजी? टायटल्स तरी काय देता एकेक पोस्टस ला.......

तुमचा एकदम साधा सोज्वळ ब्लॉग असा कसा काय जहाल होऊ लागला?

HAREKRISHNAJI said...

Oh that. I am sorry. Those are the bols of Lavanis'

Last 2 days I have been attending Lavani Mahotsav, may be becasue of that.

HAREKRISHNAJI said...

अश्वि्नी

टायटल्स बदलली आहेत.