Saturday, March 07, 2009

तेरुओ आणि कांही दुरपर्यँत - गौरी देशपांडे

गौरी देशपांडेंच्या नायीका नेहमी अश्या का वागतात याचे उत्तर अखेरीस "कांहि दूरपर्यंत ’ या कथेत मिळाले तर !

"आयुष्यात काहीच उणीव नसणं हीच एक उणीव वाटली जणू तिला "

अस आहे तर. तरीच त्या नायिका मग उणीवा शोधत रहातात की काय ?

पण सर्वंच जणी तर शोधाच्या मार्गावर सुखाच्या हिंडोल्यावर डोलत नसतात ना आणि त्यातुन काही जणी या मार्गावरुन चालतांना घायाळ देखील होतातच की. 

जशी की जसु. 

जसुचे लहाणपण, तारुण्य फारसे सुखात गेले नव्हते. आई "उणीवा" शोधत कोणाचा तरी हात धरुन निघुन गेलेली, फटकुन रहाणारे  वडील, तुटक वागणारी बहीण आणि मग या साऱ्यांपासुन तिचा बचाव करणारे, तिच्यावर मायेची उबदार पाखर घालणारे " ओरुनदा ", तिच्या वडिलांचे मित्र, त्यांच्याच वयाचे, जसुला तारुण्यात पदार्पण करतांना पहातांना तिच्या प्रेमात पडलेले ओरुनदा, "चाळीस वर्षाची खाडी ओलांडायचा पूल बांधायला समर्थ ना तिचं तारुण्यात पाय टाकणार शरीर , ना माझ वार्धव्‍यात पाय टाकणारं "  असं स्वतःच्या मनाला बजावत माघार घेणारे "ओरुनंदा ".  

मॄत्युची चाहुल लागलेले हेच ओरुनंदा एके दिवशी फार मोठा सुड उगवतात, जसुची जनार्दनशी ओळख करुन देवुन. ही ओळख जसुला कोणत्या मार्गावरुन नेणार आहे हे ठावुक असतांना देखिल जाणुनबुजुन करुन देणारे ओरुनंदा.

मग मात्र लागलीच आपली चुक सावरायला बघणारे, माणसांना पटावरील प्यादी समजुन घेण्याची भुल करुन बसलेले ओरुनंदा , जसुला न त्या मार्गावरुन परतवु शकले ना उन्मळून पडलेल्या जसुला सावरु शकले.   

शहारुखचा , ओरुनंदाच्या सापळ्यात सापडु नकोस या सल्ला धुडकवुन पराभुत झालेली नायिका येथेच भेटते. 

नाहीतर.

तेरुओ उर्फ यामाहासान उर्फ उगवता सुर्य. 

उगवत्या सुर्याच्या देशात उगवत्या सुर्याच्या प्रेमात. मोहात  ती न पडली तरच नवल. 

तेरुओच्या सौम्य तेजात विरघळुन गेलेली जनकाची बायको. चाळीसीला आलेली , जपान मधे आपल्या नवऱ्यासोबत वास्तव्य करणारी एक हिंदी स्त्री. 

"जी’ बरोबर प्रांजळ पत्रव्यवहार करणाअरी , पण आपले हे गुपीत आपल्यापाशीच ठेवणारी
जनकाची बायको. जाईल त्या देशात "सुर्य" शोधणारी जनकाची बायको.

बिच्चारे नवरे. गौरी देशपांडॆच्या कथेतले.


No comments: