Tuesday, March 29, 2011

तुमचे म्हणणे बरोबर आहे, पण

तुमचे म्हणणे बरोबर आहे, पण

असा राग येतो, किती ही वाद घाला , युक्‍तीवाद करा, आपले योग्य ते म्हणणे समोरच्याला पटवुन देण्यासाठी.

भिंतीवर डोके फोडुन घेणे.

"तुमचं म्हणणे अगदी बरोबर आहे, मला ते पटलयं, पण  तरी सुद्धा तुम्हाला "

अस्सा राग येतो.

"नाही" आणि " होय"

ज्यांच्याकडे "नाही" म्हणण्याचा अधिकार आहे ते कधीकधी काहीही विचार न करता, विनाकारण, किंवा कोणतेही सबळ कारण नसतांना तो का वापरतात ?

आणि मग

वरिष्ठांनी त्यामधे लक्ष घालुन दुसऱ्याला "नाही" मुळे झालेली गैरसोय दुर केली तर मग राग मनात ठेवुन का वागतात ?

" होय"म्हणण्याचा वरिष्ठांच्या अधिकाराचा त्यांनी मान ठेवायला नको ? 

Monday, March 28, 2011

यंदाला आंबा नुसता बघण्यावर समाधान मानावे लागणार की काय ?
हे भाजीवाले फार शहाणे.
त्यांना ठावुक  आहे, या महंगाईच्या जमान्यात  किलोचा भाव सांगितला तर खरेदी करणारा चक्क पळुन जाईल.
ते आपले पाव किलोचा भाव सांगायला लागले.

आंबा विक्रीते.
पुर्वी पाटीचा भाव सांगायचे. चार डझनाची पाटी, तीन डझनाची पाटी.

मग हळुहळु ते देखिल डझनाचा भाव सांगु लागले, ८०० रु. डझन, १००० रु. डझन.

आता ते नगाचा भाव केव्हा सांगायला सुरवात करणार ?  

Wednesday, March 23, 2011

पुन्हा एकदा कॉपर चिमणी , वरळीचे.

राजाभाऊंच्या मित्राच्या मुलाचे लग्न झाले.
आता राजाभाऊंना वेध लागले आहेत ,सुनमुख बघण्याचे, आपल्याला मुलगी नाही याचे जे सतत वाईट वाटत आले आहे त्याचे उट्टॆ काढायचे, तिचे खुप खुप लाड, कौडकौतुक करायचे (आणि हे असे सासऱ्यांना असे वागतांना बघुन सासुची जी तळपायाची आग मस्तकी जात असेल ते ही पहाण्याचे )

मुलगा सज्ञान झाला, कायद्याने आता लग्न करायला मोकळा झाला, त्याच्याशी या दिवसात, या विषयावर बोलुन त्याचे मन जाणुन घेवुया हा विचार करत राजाभाऊंनी त्याच्या साठी मेजवानी आयोजीत केली वरळीच्या कॉपर चिमणी मधे.

हे मुळचे कॉपर चिमणी. आधी नॅबच्या जागेत होते मग सध्याच्या जागेत , लोटस कोर्ट मधे त्यांचे स्थलांतर झाले बऱ्यासच्या विसंवादानंतर.  पण झाले ते बरं झाले, ही जागा प्रशस्त आहे.

अत्यंत चविष्ट, रुचकर  अन्न.

कबाब ही यांची खाशीयत.
येथे जाण्याचे दुसरे कारण म्हणजे राजाभाऊंच्या राज्यात कायमचे शाकाहारीच जेवण खायला लागत असलेल्या त्यांच्या वडीलांसाठी तेवढाच रुचीपालट, लुसलुशीत चिकन कबाबांवर ताव मारत, मान डोलवत.


येथे मिळणारा काबुली नान लाजबाब. एका नान खात त्यामधे संपुर्ण कुटुंब जेवते.


Tuesday, March 22, 2011

दादरच्या "**** " यांचा मसालेभात

रविवारी पुण्याहुन परततांना राजाभाऊ एकच ध्यास घेवुन निघाले, आज ब्राम्हणी पध्दतीचे जेवण जेवायचे प्लाझा समोरील "तृप्ती " मधे.


रविवारी पुण्याहुन परततांना राजाभाऊंची बायको एकच ध्यास घेवुन निघाली, आज पोळा उसळ खायची " सेनाभवना समोरील "आस्वाद" मधे.

खाण्याच्याच विचारात गुंगल्यामुळे लक्षात काही आले नाही आज धुळवळीमुळे उपहारगृह बंद असु शकतील. 
प्रकाशही बंद बघितल्यावर मात्र त्यांच्या समोर फार मोठी समस्या उभी राहीली ? 
आता पुढे काय ?

हा सारा Single Track Mind चा परिणाम. 
आता पुढे काय.

पुढचे एक उपहारगृह उघडे होते.

राजाभाऊ एक नविन चीज शिकले.

भरपुर वांगी, भरपुर वटाणे फोडणीच्या भातात टाकले की झाला मसालेभात तयार.

आता परत जाणे नाही.

फडके उद्योग मंदिर, ताजे घरगुती पदार्थ मिळण्याचे ठिकाण- विलेपार्ले

राजाभाऊंचा मोबाईल खणखणला.
संध्याकाळचा दुसरा प्रहर सुरु होता. आज उशिरापर्यंत बसुन कामाचा फडशा पाडण्याचा त्यांचा मानस.

"उद्या सकाळी नास्ताला मिसळ करणार आहे "

"ठिक आहे "

पुढे काय करायचे हे राजाभाऊंना ठावुक होते.
शट डाउन आणि पावले आपसुकच वळली फडके उद्योग मंदिराकडॆ.
पोह्याचा चिवडा, फरसाण, शेव इत्यादी इत्यादी.
फडके उद्योग मंदिर, ताजे घरगुती पदार्थ मिळण्याचे  ठिकाण- विलेपार्ले.

आता मालकांच्या गोड बोलण्यामुळे येथे येणे होते की येथे मिळणाऱ्या , संतुष्ट करुन सोडणाऱ्या पदार्थांमुळे की या दोन्ही गोष्टी एकत्र झाल्यामुळे ?

कधी उपवासाचा फराळी चिवडा, कधी जरासा तिखट बटाट्याचा चिवडा, मधेच डिंकाचा , मुगाचा लाडु, बटाट्याची शेव, साधी शेव, एखादे  भेळीचे पाकीट, तर कधी आलेपाक , कधी हे तर कधी ते. 

अनारसे मात्र राहुन गेली आहेत आगावु मागणी न नोंदवल्यामुळे आणि अजुन येथे मिठाई देखील खायची आहे.

विलेपार्लेच्या खाद्यभ्रमंतीत सापडुन गेलेले एक चविष्ट ठिकाण. 

अश्या ठिकाणी राजाभाऊ गेले की त्यांना काय खरेदी करु नी काय नाही असे होत रहाते आणि मग त्यांच्या बायकोला त्यांच्यावर भडकायला आणखीन एखादे निमित्त मिळते.

Monday, March 21, 2011

बादशाहा आणि त्यांचा फालुदा

प्रश्न पडला होता, लोहार चाळीतल्या खरेदी आधी बादशाहा मधे जावुन फालुदा प्यायचा की खरेदी झाल्या नंतर श्रमपरीहारार्थ  येथे जावुन मस्तपैकी थंडथंड कुल कुल व्हायचे ?

खरेदी करण्याआधी जर नाही गेलो तर रिकाम्या पोटी काय खरेदीत लक्ष लागणार ? 


जगामधे सर्वात चांगला फालुदा जर कोठे मिळत असेल तर तो ह्या बादशाहा मधे.  किती प्रकार , या फालुद्याचेच किती प्रकार  ? 

तिची नेहमीचीच ऑर्डर " अमेरीकन शेव पुरी " आणि त्यांची नेहमीचीच " रॉयल फालुदा "

सबजा, शेवया, थंडगार दुध, सरबत आणि आईसक्रीम.

प्रश्न पडलायं,  हे सारे चमच्याने रमतगमत खायचे की एका फटक्यात ग्लास तोंडाला लावुन एका दमात सर्व प्यावे.

ह्या फालुद्याच्या नादात खरेदी राहिली बाजुला. लोहारचाळीतली दुकाने बंद झाली .

काय भानगड तरी काय आहे ?

आज कल राजाभाऊंच्या सीबीडी बेलापुरमधल्या फेऱ्या फार वाढल्या आहेत. 

काय भानगड तरी काय आहे ?

उडीपी श्रीकृष्णा मधे पुण्याला जाताना पावभाजी खायला थांबायचे, सोबत केक वगैरे घ्यायचेकिंवा मग

अर्बन हट्स मधे भरलेल्या प्रदर्शनात चक्कर मारायची.


आपलं छोटंस, छोटंस काहीतरी घ्यायचं.

आता त्यांचच लक्ष रेशमी इरकलीकडॆ गेले, तिच्या तर ते ध्यानातही नव्हते.चला वाचलो. एक सुटकेचा निश्वास 

कढई.

संताप , तीव्र संताप. शक्य असतं तर या कढईत तिने ,

अगं , ऐक तर खरं. एक प्लेट तिघे मिळुन खावु. 

पण नाही म्हणजे नाही.

राजाभाऊंच्या बायकोने राजाभाऊंना जिलेब्या नाही म्हणाजे नाही खावुन दिल्या.

साऱ्याला कारणीभुत श्री.आशीष चांदोरकर. वर्तमानपत्रात भरभरुन गुणगाण करत रहातात, मग राजाभाऊंच्याने रहावत नाही. 

आता जिलेब्या म्हटल्यावर.

पण असा काय गुन्हा राजाभाऊंनी केला होता ज्या मुळे त्यांची बायको कावली ?  

Saturday, March 19, 2011

आले आले

सकाळी मोबाईल थरथरला.

"आले आहेत "

"बरं, येतो मी "

राजाभाऊंनी मोबाईल बंद केला. 

"यंदाला जास्त महाग आहेत , सातशे रुपये किलो "   हे त्यांनी घाबरत घाबरत सांगितल्याकडॆ राजाभाऊंनी कानाडोळा केला. 

आता बायकोला परमप्रिय असलेले ओले काजु जर किमतीकडे पाहुन घेतले नाहीत तर, ती सालासकट सोलुन काढायची.आले आले रत्नागिरीचे ओले काजु आले.आज मीठी लगी तेरी गाली रे

रंगपंचमी जवळ येवु लागली की एक गाणे नेहमी याद येवु लागते.
 नवरंग मधले. "आया होलीका तोह्यार , उडे रंगोकी बौछार , तु नार नखरेवाली रे, आज मीठी लगे रे तेरी गाली रे "

ते संध्याचे या गाण्यावरील नृत्य, ते हत्तीचे झुलणॆ, ते टिपेला पोचलेले गाणॆ. 

आज मीठी लगी तेरी गाली रे.

विनायक केशव कं आणि त्यांच्या पुरणपोळ्या, तेलपोळ्या

शुक्रवारची सकाळ.

राजाभाऊंनी ठाण मांडलयं, विनायक केशवांच्या बाहेर. केव्हा एकदा दुकान उघडतयं आणि आपण तेलपोळ्या, पुरणपोळ्या विकत घेतो याचा विचार करत.  


दुकान उघडले,आणि जीव भांड्‍यात(तेलाच्या ) पडला.
राजाभाऊंनी जरा जास्तीच्या पोळ्या बांधुन घेतल्या. घरी पोचेपोचेपर्यंत वाटेत मधे फडशा पाडायला.नको सोबत थंडगार दुध, नको लोणकडी तुपाची संततधार, ह्या साऱ्या चैनी घरी गेल्यावर. आत्ता आहे तश्याच हाणुया. मस्त मऊसुत पुरणपोळ्या.

"आल्या आल्या मुकादमांकडच्या पोळया आल्या "

Thursday, March 17, 2011

असे कसे हो तुम्ही राजाभाऊ ?

आठवडाभर ध्यास घेतलेला. होळी जवळ आली आहे, तेलपोळीचे वेध लागलेले आहेत. 

गुरुवारी संध्याकाळी न चुकता "विनायक केशव " कडे जायचे , तेलपोळी घ्यायची. तेलपोळी घ्यायची  आहे "विनायक केशव " कडॆ जावुन . तेलपोळी घ्यायची आणि थंडगार दुधात बुडवुन , कुस्करुन खायची. 
न विसरता जायचेच जायचे.

गुरुवार आला. संध्याकाळ झाली. 
"आज आपल्याला लौकर निघायचे आहे. आज कशासाठी लौकर निघायचे आहे ? " 

कुठेतरी उगीचच खोटी आशा, होळीनिमित्ते रात्री ९ - ९.३० पर्यंत दुकान उघडे असेल . 
पण नाही. 

"विनायक केशव" कडे जायचे . 
उद्याला सकाळी आठ वाजता, बघुया दुकान उघडल असेल का ? 
तेलपोळी खाण्याची आणि त्यांच्याकडचीच तेलपोळी खाण्याची जबरदस्त इच्छा आहे. 

Tuesday, March 15, 2011

वाटलं आता आपण हरलो

उगीचच वझीराला येवढ्या पुढे येवुन दिले.  डोके थंड ठेवले तर मार्ग नक्कीच सापडतो.

दिवा महाराष्ट्राचा आणि आस्वाद म्हणते " ॥ पुनरागमनाय च ॥

पोटात वडवानल पेटलेला, घरी पोचेपर्यंत कैसे धरु धीर आई. 

काही काही ठिकाणे अशी असतात त्या तिथे जावुन खावे, मुद्दामुन खाण्यासाठी जावे असे कधीच वाटत नाही.
पण आज राजाभाऊंनी केल खरं धाडस, म्हटलं, 
"दिवा एकदाचा पेटवुन टाकूयाच"

आत शिरताक्षणी मन काही प्रसन्न होता जाहले नाही, त्याचे रुप,रंग पाहुन. 
त्यात आत मधे फक्‍त दोघे जणच बसलेले दिसले. सारे सारे उपहारगृह रिकामेच.
हा रिकामेपणा पाहिला की राजाभाऊ अधिकच नर्व्हस होत रहातात. 

मेन्यु पाहिला, दर पाहिले, दर पाहिले, मेन्यु वाचला. डोळ्यासमोर मशाली पेटु लागल्या.

आता टोमेटोचे सार, झुणकाभाकर, भरली वांगी, उकडीचे मोदक, थालीपीठ वगैरे वगैरे मराठमोळी पदार्थ खाण्यासाठी चारशे-पाचशे रुपये खणाखणुन मोजले तर बायको पुढचे १०-१२ दिवस आपल्याला उपाशी ठेवले असा राजाभाऊंनी  विचार केला. त्यात या उपहारगृहाचा मालकांनी त्यांच्याकडे जेवायला येणाऱ्या मराठी माणासांवर आपल्या मुलाखतीत केलेली टीका आठवत राहिली.

नकोच , येथे भोजन करणे नकोच.
राजाभाऊंनी सुज्ञ विचार केला व ते बाहेर पडता झाले.

"आस्वाद " यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्षे.  

"पहिल्या वर्षापासुन आपण येथे सातत्याने खायला जातो मग या रौप्यमहोत्सवी अजुन कसे गेलेलो नाही ? " 

चला राजाभाऊ आज तुमच्या नशिबी येथेच खाणॆ आहे.

आतली गर्दी पाहुन , मराठी बांधव चवीचवीने खऱ्याखुऱ्या मराठीमोळ्या  खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत आहेत हे पाहुन राजाभाऊ खुष.

पोळा उसळ. 

राजाभाऊंच्या बायकोच्या आवडीचा पदार्थ.

"तुझी आठवण काढत खातोय, पोळा उसळ गं " 

" मला आता तेथे घेवुन गेला नाहीस तर याद राख " 

एक हवीहवीशी वाटणारी गोड धमकी, बायको कडुन. 

विरोध

गृहसंकुलातील वार्षिक सर्वसाधारण बैठक.
विषय.
होणाऱ्या चोऱ्या. 
बंद सदनिकेमधले सर्व सामान दिवसाढवळ्या कोणीतरी सरळ टेम्पो / ट्रक आणुन त्यात ते भरुन खुशाल चोरुन नेणे. आणि त्याची कोणीही दखल घेवु नये.

रखवालदारांची संख्या वाढवावी, प्रत्येक कोपऱ्यात एक . इमारती खाली एक . जास्त रखवालदार नेमा या वर सर्वांचे एकमत . 
फक्‍त राजाभाऊ सोडुन. अश्याने चोऱ्या थांबतील? जर चार रखवालदार असे सामान चोरुन घेवुन जातांना मुक प्रेक्षकाची भुमिका बजावत असतील तर चाराचे आठ झाले तरी काय फरक पडतो असे त्यांचे मत.   

त्यांनी एक उपाय सुचवला. 
गेटपास बनवायचा. कारखान्यातुन जसा माल बाहेर काढतांना, एखादी वस्तु किंवा उत्पादन बाहेर काढतांना जो गेटवर वॉचमनला द्यावा लागतो तो गेटपास. 

जे कोणी सभासद / भाडेकरु आपल्या जागा सोडुन जात असतील त्यांनी सामान घेवुन जाण्याच्या वेळी तसे सोसायटीच्या कार्यलयात कळवावे व तेथुन गेट पास घ्यावा. त्या गेटपास शिवाय सामान भरलेले वहान अजिबात बाहेर जावुन द्यायचे नाही. बाहेत पडायला एकच रस्ता, एकच गेट. गेट वर चोरी पकडणे सहज शक्य.

नेहमी प्रमाणॆच राजाभाऊंच्या कल्पनेला विरोध झाला. विरोधासाठी विरोध, ज्यांना फॅक्टरी, गेटपास ही पद्धत ठावुक नाही अश्यांकडुन विरोध.

"छे हो, काहीतरीच काय ? हे चोरटे काय सोसायटीच्या ऑफीस मधे हे असे सांगुन का सामन नेणार आहेत ? ते कशाला जातील अर्जबिर्ज करायला ? " 

"अहो मला ही तेच म्हणायचंय, अश्या वेळी ते अलगद पकडले जातील ना परस्पर सामान चोरुन बाहेर नेणारे" 

पण नाहे पटले त्यांना.Sunday, March 13, 2011

आज प्रबोधनकार असते तर.

आपल्या नातवाचा, मग त्याच्या पश्चात पणतु नी चालवलेला व्यवसाय पाहुन , त्यावर पोलीसांच्या पडलेल्या धाडी, अटका पाहुन  प्रबोधनकार काय म्हणाले असते.

" ड्रमबिट " चे नाव निदान "पडघम" तरी असायला हवे होते असे कुठेतरी वाचल्याचे स्मरते. 

नाही आणि है ना.

उन्हाचा तडाखा, घशाला पडलेला सोश, अंगाची काहीली काहीली, तळपत्या सुर्याने आपले काम चोख बजावलेले. या दिवसात ताक, कोकमाचे सरबत, वाळ्याचे पाणी सर्वात उत्तम.

अश्याच एका तप्त भर दुपारी.

"अमुलचे ताक आहे का ?"

" नाही "

आता नाही हे समजु शकतो, पण " त्या पुढच्या दुकानात मिळेल " ही सेवाभावी वृत्ती कशासाठी ?

"अमुल का छास , लस्सी , कुछ पिनेके लेये है क्या "

"है ना, क्या दुं , अंकल ?

एका ताकाची जागा मग घेतली ,  दोन ताक, दोन लस्सी, एक कॉनेफ्लेक्स, वॉलची तीन कसाटा, वॉलस चे एक मोठा आईसक्रीम पॅक नी.

स्पाईस किचन , मॅरीयट , पुणे

पुण्यामधे सर्वात चांगले बुफे जेवण कुठे मिळत असेल तर ते मॅरीयट मधे.  येथे येवढे प्रकार मिळतात की बस रे बस. 
खाण्याची आवड असणाऱ्यांची येथे चंगळ असते, मेजवानी, मेजवानी ती ही अशी. 

काल खरं म्हणजे आयुष्यात पहिल्यांदाच राजेशभाईंचे रात्री बाहेर जेवायला जाण्याचे मन नव्हते. दुपारचे जेवण खुप म्हणजे खुप जास्त झालेले. भरगच्च पोट घेवुन जाणे आणि या सर्व प्रकारांना योग्य तो न्याय न देणे , हे काही बरोबर दिसत नाहे. 

विठठल कामतांच्या " VITS " मधे जेवायला जाण्याचा विचार आयत्याक्षणी राजेशभाईंनी बदलला व ते पाहुण्यांना घेवुन मॅरीयट मधे जेवायला गेले.

 का कोण जाणे पण विठ्ठल कामंतांच्याकडॆ जेवायला जावे असे त्यांना हल्ली वाटेनासे झाले आहे.  विमानतळाजवळच्या "ऑर्कीड्स " मधे दोन चार जेवणाच्या सुखद अनुभवानंतर राजेशभाई विठ्ठ्ठल कामतांचे नाव लावलेल्या हमरस्तावरील दोनचार उपहारगृहात जेवले तेव्हा त्यांचे मत प्रतिकुल झाले होते. 
"ऑर्कीडस " च्या इतक्या उंचीवर पोचल्यानंतर त्यांनी खाली यायला, रस्तारस्तावरील उपहारगृहांना आपले नाव लावायला द्यायला नको होते असे राजाभाऊंना सतत वाटत रहाते. वाकड कडचे सोलकरी काय, सातारा रस्तावरील काय, नगर रोडवरील काय तसे  सुमार दर्ज्याचे.   मग इतर ठिकाणी कितीही चांगले असले तरी मन मात्र काही केल्या मानत नाही.

तर हे असे ते सहकुटुंब , सहपरिवार रात्री पोचले "मॅरीयट " मधे सेनापती बापट रस्तावरील. पोचायला उशीरच झाला, भारत संघाचे हरणे पहाणे मग त्यावरील संतंप्त प्रतिक्रिया , सर्वांना शिव्या देणे यात बराच वेळ गेला. मध्यरात्री बारा वाजता येथले बुफे जेवण बंद होते,  इतर जेवणासाठी मात्र  स्पाईस किचन २४ तास सुरु असते. 

येथे मिळणाऱ्या प्रत्येक पदार्थांवर राजेशभाईंनी चांगलाच आडवा हात मारला, अपवाद फक्त मांसाहारी पदार्थांचा.  पण काल मात्र वेळ फार कमी मिळाला, साडॆबाराच्या सुमारास कर्मचाऱ्यांनी सर्व आवरायला घेतले , मग त्यांची तशी पंचाईत झाली. 

काटे सावर

अचानक राजाभाऊ आपल्या बायकोच्या अंगावर जोरात खेकासले. "तुला काय सांगायचे आहे, दाखवायचे आहे ते आधी सांग " 

" हा बघ पळस. उजवीकडे बघ, डावी कडे बघ ,मागे गेला "

पळस आणि काटेसावर. आजुबाजुला बरेच फुलले आहेत. धायरी, नादेंड परिसरात.

 

ओकायामा उद्यानात तसे फारसे काही हाती लागले नाही. एकमेव काटॆसावर  छान फुलली आहे.

गेल्या वर्षी इशान्य मधे सर्व कांचनची झाडे मस्त फुलली होती. यंदाला ती बघायला जायला अंमंळ विलंबच झाला. 

काल नवसह्यादीत  बहरलेला कॅशीया बघुन मजा आली.

बहार आली सारदा मठात

नील मोहर आणि कॅशीया. बाजुबाजुला बहरले आहेत. काय छान नजारा दिसत आहे.

या सिंहगड रस्तावरील सारदा मठात, रामकृष्ण मठात फार छान बाग आहे.   कधीतरी या दिवसात आत फेरफटका मारायला मजा येते.


रामफळ तोडुन खाण्याचा मोह कसाबसा आवरावा लागला.

वाह रे माझ्या वाघा

जेव्हा उन्हाचा तडाखा वाढत जातो तेव्हा

Saturday, March 12, 2011

पवनाकाठचा आंबेमोहोर

पवनाकाठी जाण्याचे खास प्रयोजन काय तर, आंबेमोहराचे प्रचंड आकर्षण.  
एकाही दुकानात तो मिळु नये ? मावळात आबेंमोहर पिकणे म्हणे बंद झालय. 
कोणीतरी काहीतरी करा रे.

आज घरी काम करणाऱ्या मावशींनी त्यांच्या शेतात पिकलेला इंद्रायणी दिला.

इंद्रायणीचा भात,  त्यावर मस्तपैकी कैरी घालुन केलेली  डाळ. मऊसुद भात,  त्याच्या वर पसरली खुप खुप डाळ, कितीही ओता, त्यात शोषुन घेतली जाणारी,  झक्कास कैरी घातलेली आणि सोबत ताजे ताजे लोणचे, कैरीचे.  

मग तो मऊसुद भात ह्या अश्या डाळीबरोबर खावा की दाण्याचे कुट घालुन केलेल्या भरल्या वांग्याच्या अटकदार , चटकदार रस्साबरोबर. एकदा खावा का परत मागुन मागुन खावा.

मागच्यांना काही उरले असेल काय ? त्यांच्या साठी काही शिल्लक राहीले असेल काय  याचा विचार न करता.  

हया श्रो. रोहन चौधरीनीं ना

हे रोहन भाऊ, स्वतः फिरतात तर फिरतात आणि मग त्या बद्द्ल म.टा. मधे सुसाट लिहीत सुटतात.

आता काय तर " सिंहगड ते राजगड ".

एकदा रोहनची सुरेश परांजपेंबरोबर गाठभेट घालुन द्यायल्या हवी.

आता राजगड पाहुन झाला, सिंहगडपण काय घरचाच. 
पण सिंहगड ते राजगड.

गाडी घेवुन पानशेतच्या अलीकडुन वेल्हेला रस्ता जातो त्यावरुन फिरुन आले पाहिजे.
तेवढेच राजगडाचे कळस दर्शन. 

शिवजयंती निमित्ते आयोजलेला राजगडावर सोहळा. नुसती धम्माल.
जरतरी नववारी साड्या काय, नाकात नथ काय, गळ्यात मोत्याच्या सरी काय. पगड्या काय,  फेटे काय, धोतर काय.
गंमतच गंमत. उत्साह उत्साह तो तरी किती.

राजेशभाईंना हे पाहुन वाटले आपण ही फेटा बांधावा मस्त पैकी.
आपण फेटा बांधण्यासाठी काहीतरी आणले असते तर बरं झाल असते.
मग त्यांच्या मैत्रीणीनी दयावंत होवुन जास्तीची आणलेली भरजरी साडी त्यांना दिली फेट्यासाठी.

अहाहा काय तो फेटा, रुबाबशीर. अहाहा काय पण तो तारुण्याचा प्रभाव. 

काय राजगडावर कचकचुन थंडी होती ह्या उन्हाळ्याच्या दिवसात.
काश्मिर झक मारावे. चांगलाच हुडहुडुन ताप भरुन आला. पद्मावतीच्या देवळात नुसतं बसुन सकाळ काढावी लागली.

त्यानंतर  मग कधीच राजगडावर जाणे झाले नाही, माच्या बघणे राहुनच गेल्याची हुरहुर मनी बाळगत.

ह्या श्री. रोहन चौधरींनी.

ह्या श्री. रोहन चौधरींनी नुसतं सतावुन सोडलयं. 
एकतर भटकंती करत रहातात व त्याचे भरभरुन वर्णन पुण्याच्या म.टा. मधे करुन नुसता  जीवाला त्रास  देत रहातात. 
गोरखगड.
पावसाळ्यातील भ्रमंती, राजाभाऊ आणि त्यांच्या मित्रांची. धसई मधे एका शाळेच्या व्हरांड्यात काढलेली रात्र. दिव्यापासुन लांब झोपल्याने राजाभाऊ बचावले, पण त्यांच्या मित्रांना दिव्यावर आलेल्या काही कीडेकिटकांना फाडुन टाकलेले. हे भलेमोठाले फोड, नुसते टरटरलेले ते चावलेल्या जागी. एकाची तर पाठ भरुन गेलेली, कशी त्यानी सॅक मागे टाकली असेल ?

पण राजाभाऊंची त्यांना वाटले होते तशी सहजासहजी सुटका नव्हती. अर्धी पॅण्ट. जंगल. सटकन मांड्यांवर कुणीतरी जोरात, वेगात बारीक सुया घुसवतयं. वेदना. हा त्यांचा चावण्यासा प्रकार काही भलताच.

पण सुळक्याच्या पायऱ्या चढतांना, त्यांच्या खोबणीत हात घालुन शरीर वरती उचलतांना जी मजा आली त्यात ह्या त्रासाचा विसर पडला.  किटकांचा त्रास संपुन  ह्या पायऱ्यांचा त्रास सुरु झाल्यामुळे कदाचित. पण एकंदरीत मजा आली, सारा शीण गायब. 
ह्या पायऱ्या मोठ्या न्याऱ्या. दिडकी पायरी म्हणजे काय ते पाहण्यात आले ते चांभार लेण्याची उभी चढण चढण्यात, ह्या उंचाल्या पायऱ्या. मग ती चढण्यासाठी एका बाजुला कोपऱ्यात केलेली अर्धी पायरी.  

    

प्रिय डायरी

जपानमधे कोसळलेल्या नैसर्गिक आपत्तीबद्द्ल कळले, लगेचच श्री. नितिन पोतदारांनी फेसबुकवर लिहिलेले " मी  टोकीयो मधे आहे " हे सकाळीच वाचल्याचे आठवले.

काळजी वाटली. रात्री घरी पोचल्यावर " मी सुरक्षित आहे " वाचले आणि जीव भांड्यात पडला.

फुललाय रे

आणि टॅबोबिया पण फुललाय.ऎंप्रेस गार्डनमधे

केव्हा केव्हा आपण अगदी मुर्खासारखे (केव्हाकेव्हा कशाला ? ) वागतो, असे राजेशभाईंचे प्रांजळ मत. 
जी गोष्ट त्याच वेळी करायला पाहिजे होती ती कोणतेही सबळ कारण नसतांना  करण्याची टाळायची आणि मग मागाहुन उसासे टाकत रहायचे. 

विमानननगर मधल्या  एका गृहसंकुलातील संपुर्ण फुललेला टॅबोबिया वर गाडी चालवतांना राजेशभाईंचे लक्ष गेले, त्याचे सौंदर्य चाखण्यासाठी  त्यांनी गाडी मागे वळवली.  उतरुन , जवळ जावुन तो न्याहाळणे  तर दुरच,  गाडी एका सेकंदासाठी देखील न थांबवता चालवताचालवता राजेशभाईंनी तो नुसताच पाहिला.  आता त्याचे रुप आठवता आठवता आपण त्या वेळी असे वागलो याच्या ते विचार करताहेत.

Friday, March 11, 2011

सितारादेवींचे कथ्थक नृत्य.

सितारादेवींचे कथ्थक नृत्य.

पहाणाऱ्यांचे देव संरक्षण करो.

सितारादेवींनी नाही चालता येत नाही धडपणे उभे रहाता येत. सारा वयाचा परिणाम. त्या खुप म्हाताऱ्या झाल्या आहेत.

पण अजुन कथ्थक सादर करण्याचा काय पण सोस.

धन्य ते आयोजक आणि धन्य ते रसीक.

जुन्या जमान्याच्या आठवणीवर अजुन किती काळ रमणार ?

Thursday, March 10, 2011

कुसुमांजली

अप्रतिम. केवळ अप्रतिम.
बढीया.

कुसुमांजली.


खुब मजा आली. बढीया.
कुसुमाग्रज, कुसुमाग्रज आणि फक्‍त कुसुमाग्रज.
सुरेल गाणॆ, सुरेख नृत्य आणि सुलेखन.

किती तरी वर्षापासुनची इच्छा होती , अच्युत पालवांना जवळुन पहाण्याची, ती आज पुरी झाली.

तृप्ती आणि केवळ तृप्ती.  


थोडासा, जरास्सा, किंचितसा  गोंधळ उडला. 
हवाहवासा वाटणारा गोंधळ, सुखद गोंधळ.मस्त गोंधळ

कुसुमाग्रज.
प्रमोद पवारांचे , संदीप माळवींचे शब्द ऐकायचे की सायली तळवलकरांचे गाणे ? 
तन्वी पालवंचे नृत्य की अच्युत पालवांची सुलेखनाची करामत.

सारे सारे केवळ अप्रतिम, अविस्मरणीय. 
एकावर लक्ष केंद्रित करावे तर दुसरे नजरेतुन सुटतेम , दोन्ही पहायचे म्हटंले तर तिसऱ्याची मजा भरभरुन लुटता येत नाही. 

परत नक्षत्रलोकातुन या पृथ्वीतलावर येण्यासाठी फार त्रास झाला. 
कार्यालयातील रेंगाळलेली कामे मुद्दामुन आठवणीत आणावी लागली.

Sunday, March 06, 2011

गाडी चालवता आहात ?

रस्तावर मुलं दिसले की गाडीचा वेग लागलीच मंदावला पाहिजे. सरळ थांबा, त्या मुलांना आधी रस्ता पार करु द्या, बाजुला होवु द्या, मगच तुम्ही पुढे चला.

आणि समोर अचानक बॉल आला तर त्यामागोमाग एखादा मुलगा धावत तो पकडण्यासाठी येवु शकतो हे जाणा व वेग कमी करा.

राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह

हे सौदर्य कोणाचे ?
वेदना

पहिल्यांदाच झालेला मधमाशीचा डंख दाहक

की

पहिलीच ऐकलेली कोयलची कूक , वसंतातली.

एक लत्ताप्रहार

संतापलेल्या तिने आपल्या प्रियकराची सभांवना लत्ताप्रहारानी करायची आणि त्यानी ते सुरेख पाऊल आपल्या मस्तकी धारण करायचे हे शास्त्रवचन.

आणखी एक संकेत. 

सुंदर युवतीने बसंतात नटुनथट्न , सारा साजशृंगार करुन उपवनात जावे, 

प्रिय सीताअशोकाचे लाड करावे आणि मग त्या अशोकावर आपल्या नाजुक पावलांनी हळुवारपणे लत्ताप्रहार करावा , आणि मग सीताअशोकाने फुलावे, फुलत जावे.