बढीया.
कुसुमांजली.
खुब मजा आली. बढीया.
कुसुमाग्रज, कुसुमाग्रज आणि फक्त कुसुमाग्रज.
सुरेल गाणॆ, सुरेख नृत्य आणि सुलेखन.
किती तरी वर्षापासुनची इच्छा होती , अच्युत पालवांना जवळुन पहाण्याची, ती आज पुरी झाली.
तृप्ती आणि केवळ तृप्ती.
थोडासा, जरास्सा, किंचितसा गोंधळ उडला.
हवाहवासा वाटणारा गोंधळ, सुखद गोंधळ.मस्त गोंधळ
कुसुमाग्रज.
प्रमोद पवारांचे , संदीप माळवींचे शब्द ऐकायचे की सायली तळवलकरांचे गाणे ?
तन्वी पालवंचे नृत्य की अच्युत पालवांची सुलेखनाची करामत.
सारे सारे केवळ अप्रतिम, अविस्मरणीय.
एकावर लक्ष केंद्रित करावे तर दुसरे नजरेतुन सुटतेम , दोन्ही पहायचे म्हटंले तर तिसऱ्याची मजा भरभरुन लुटता येत नाही.
परत नक्षत्रलोकातुन या पृथ्वीतलावर येण्यासाठी फार त्रास झाला.
कार्यालयातील रेंगाळलेली कामे मुद्दामुन आठवणीत आणावी लागली.
2 comments:
nice..
आपण नाशिकला असता काय ? मध्यंतरी आपण जी लिंक पाठवली होती ती उघडत नव्हती. आपल्याला कळवीन कळवीन म्हणता राहुन गेले.
कधीतरी आपल्याला भेटायची इच्छा आहे.
कार्यक्रम मस्तच झाला. त्यांचा हा पहिलाच प्रयत्न कुसुमांग्रज सर्व अंगाने लोकांपुढे आणण्याचा आणि ते ही स्वःताचे अफाट पैसे खर्च करुन.अच्युत पालव, प्रमोद पवार, संदीप माळवी. त्यांच्या हौसेला दाद ही दिलीच पाहीजे. दुर्दैवाने सभागृह जवळजवळ रिकामेच होते. जे आले नाहेत त्यांना कधीच कळणार नाही आपण काय मिस केले ते.
Post a Comment