Tuesday, March 01, 2011

विनय हेल्थ होम , फणस वाडीच्या नाक्यावर

वाल्या कोळ्यानी घरी जावुन आपल्या बायकोला विचारले " माझ्या पापात तुम्ही सहभागी आहात काय ?

आता या बायकाच नवऱ्याला भरीस घालतात त्याला काय करावे ? . जेव्हा जेव्हा ते बाहेर न खाण्याचे ठरवायला लागतात तेव्हा तेव्हा ... "

खर म्हणजे त्या बायकोची तसं बघायला गेले तर काहीच चुक नसते, आता  असतात काहींचे नवरेच तसेच  विक्षिप्त, नादिष्ट.  आधी बिचाऱ्या बायकोला चटक लावायची आणि मग तिलाच दोष द्यायचा हा त्यांचा आवडीच छंद.

डॉक्टरांकडुन तपासुन घेवुन राजाभाऊ बाहेर पडतात ना पडतात तोच त्यांच्या बायकोनी जाहीर केले " आज घरी जेवण केलेले नाही , आपण तांब्याकडॆ जेवायला जाऊया " बिचारीला आपल्या स्वार्था बरोबर परमार्थ ही साधायचा होता, बाहेरही जेवायचे होते आणि साधे बाधणार नाही असे जेवण करायचे होते. आता नवराच मोठा बदमाश ,

राजाभाऊंच्या मनात मात्र आज "मधुर, साजुक नाजुक, मलईयुक्त, गरमागरम , सात्विक, मस्त, कुरकुरीत, हलकेफुलके, चटकदार, झणझणीत, चुरचुरीत, चविष्ट  , फक्कड, मसालेदार, गारेगार, मसालेयुक्त, तिखट, लोणकडी, ताजे " खाण्याचे घाटत होते. 

मग त्यांची पावले विनय कडे वळली.

विनय हेल्थ होम.

जे आपल्याकडे मिळणाऱ्या खाद्यपदार्थांचे वर्णन  "मधुर, साजुक नाजुक, मलईयुक्त, गरमागरम , सात्विक, मस्त, कुरकुरीत, हलकेफुलके, चटकदार, झणझणीत, चुरचुरीत, चविष्ट  , फक्कड, मसालेदार, गारेगार, मसालेयुक्त, तिखट, लोणकडी, ताजे " असे करतात.

साऱ्या मुंबईत सर्वोकृष्ट झणझणीत, तिखट, मिसळपाव, उसळपाव, पातळभाजी पाव कुठे मिळत असेल तर तो विनय कडॆच. 

आणि साबुदाणा वडा, त्याचे वरचे कुरकुरीत कोटींग,  सोबत ती मिळणारी चटणी, बटाटे आणि शेंगदाणे घातलेली , त्याला तोड नाही. राजाभाऊंची बायको ह्या चटणीच्या प्रेमात पडलेली, ती प्लेटभरुन नुसतीच चटणी मागवुन त्यावर ताव मारते.  ह्यांचे वटाणा पॅटीस. बटाटावडा देखील मस्त असतो.

खाल्यावर मग चवीचवीने आस्वाद घेत मॅंगो लस्सी पिणे आणि वर कॅश काऊंटर वर विकायला ठेवलेली काजुची वडी खाणे.

बढीया.

No comments: