बायकोचा सर्वात जास्त राग केव्हा येत असेल ?
आज सुट्टीच्या दिवशी राजाभाऊ कधी नाहे ते सकाळी सहा वाजता उठुन बसलेले.
आत्ता घड्याळाचा काटा नवाला स्पर्श करु लागलायं, भुकेनी कळवळलेल्या जीवास कसेबसे धरुन ठेवलेले.
अजुन पर्यंत काही भांड्यांचा आवाज कानी पडत नाही. आज सारा काही थंड थंड कारभार. जीव आळसावलेला.
होतोय. होतोय. जरा धीर धर, नाही , नाहीत, घरात बिस्कीट नाहीत, उगाच काहीतरी खात बसु नकोस, रवा डोसा होतोय.
होतोय, होत आहे, आत्ता तयार होईल, धीरसबुरी काही आहे की नाही, हा पाढा जेव्हा आतुन सुरु होतो ना तेव्हा मात्र फार राग येतो. बायकोचा.
आणि त्यात ती जेव्हा जा आंघोळ करुन घे हे फर्मान सोडते तेव्हा तर.
पण पारा काही अजुन पर्यंत बॉयलींग पॉईंट पर्यंत पोचलेला नसतो.
बिघडला वाटतं.
आणि मग संतापाचा भडका उडतो.
"हा बघ, काय मस्त कुरकुरीत झाला आहे "
आणि जसा जसा एकएक दोसा आत पोटात जावु लागतो ना तेव्हा पुन्हा एकदा बायकोवरील प्रेम हळु हळु उतु जावु लागते.
2 comments:
सेम टू सेम.. इकडे पण :)
परमेश्रर आपले रक्षण करो.
Post a Comment