Friday, March 11, 2011

सितारादेवींचे कथ्थक नृत्य.

सितारादेवींचे कथ्थक नृत्य.

पहाणाऱ्यांचे देव संरक्षण करो.

सितारादेवींनी नाही चालता येत नाही धडपणे उभे रहाता येत. सारा वयाचा परिणाम. त्या खुप म्हाताऱ्या झाल्या आहेत.

पण अजुन कथ्थक सादर करण्याचा काय पण सोस.

धन्य ते आयोजक आणि धन्य ते रसीक.

जुन्या जमान्याच्या आठवणीवर अजुन किती काळ रमणार ?

9 comments:

Shraddha Bhowad said...

त्यांनी पद्मभूषण नाकारुन भारतरत्न द्यावं अशी मागणी केली होती तेव्हा सुद्धा अवास्तवच वाटलं.
वास्तविक काही काळाकरता मी त्यांच्याकडे शिकलेय, त्यावेळी त्याच्या अदाकारीने खूप भारावून जायचे. पण कलाकार म्हटला की थोडा मद असतोच या लोकोपवादाला त्या कशा बरं अपवाद होतील? (सन्माननीय अपवाद अर्थातच आहेत. अगदी कथ्थकबद्दलच बोलायचं झालं तर बिरजू महाराज)
असो,
तुम्ही एस.एल भैरपांचं ’मंद्र’ वाचलं आहे का? जरुर वाचा. कलाकार ,त्यांचे भपके, खोटे अहंकार, त्यांच्याबद्दलचे लोकोपवाद, त्यांचं रगेलपण याबोवतीच ती कादंबरी फ़िरते. ठोकळा आहे पण एकदा वाचायला हरकत नसावी.

Vinayak Pandit said...

अगदी खरंय! अक्षरश: हजारो नवीन तरूण मुली-मुलं अप्रतिम कथकनृत्य सादर करणारी आहेत भारतभर.अनेकांना संघर्षातच हयात घालवावी लागते आहे.आयोजकांनीच आता याचा विचार करायला नको का?

HAREKRISHNAJI said...

श्रद्धा,

सितारादेवींना मी दरवर्षी कल के कलाकार समेंलन, स्वामी हरीदास समेलनात बघत आलोय, त्यांच्या बद्द्ल योय तो सन्मान ठेवुन म्हणावेसे वाटते की त्यां त्यांच्या नाटकबाजींनी, भाषणबाजींनी फार फार कंटाळा आणवतात. एका कार्यक्रमात तर त्यांनी वयाने लहान असलेल्या त्यांच्या नातीला अक्षरश्या रंगमंचावर रडवले.तिने आणि तिच्यासाथीला असलेल्या आईने काय करायचे ठरवले होते पण झाले काय . सितारादेवी मधेच रंगंमचावर ऐवुन बसल्या व माईकचा जबरदस्तीने ताबा हेत एकेक कठीण गोष्टी करण्याची तिला जबरदस्ती करु लागल्या. त्या बिचारीची तेवढी तयारी नव्हती, काय करावे , कसे करावे हे तिला कळेनासे झाले ,ती बिचारी गोंधळुन गेली, रडवेली झाली. सर्वांसमोर आपल्या आजीने केलेल्या या तमाश्याने ती मग फार संतापली. कार्यक्रमाचा सितारांदेवींनी कसा फियास्को केला हे विसरणे कठीण.

HAREKRISHNAJI said...

विनायक. मी याच मताचा आहे. मी तर मोठमोठ्या कलावंतांचे कार्यक्रम पहाणे टाळतो, जास्तीत जास्त कार्यक्रम नवोदीत , तरुण गुणी कलावंताचेच पहाणे पसंत करतो. कल के कलाकार संमेलनाला न चुकता जातो. जुन्या जमान्याच्या आठवणीत रमत रहाणारे उद्यासाठी आत्ता ह्या क्षणी इतिहास रचणाऱ्यांकडॆ दुर्लक्ष करतात.

एक दुसरे उदाहरण सांगतो. आकाशवाणीत पं.जसराजांनी दिडदोन तास तंबोरे जुळवण्यात घालवले. काय हा प्रकार.

Naniwadekar said...

राजाभाऊ: 'रोटी' सिनेमात सितारा 'सजना सांझ भई' मस्त गायली आहे. ऐकलं आहे का? नसल्यास, अवश्य ऐका. अनिल बिस्वासच्या अत्युत्तम चित्रपटांपैकी हा एक. त्यातली अख्तरीची आणि अश्रफ़ खानची गाणी अविस्मरणीय आहेत.

- डी एन

Naniwadekar said...

> जुन्या जमान्याच्या आठवणीत रमत रहाणारे उद्यासाठी आत्ता ह्या क्षणी इतिहास रचणाऱ्यांकडॆ दुर्लक्ष करतात.
>---

पूर्णपणे सहमत. मुख्य म्हणजे नवीन कलाकार मनापासून गातात. पण आता त्यांनाही त्यांचे गुरुजी लोक वर्गात (आणि गुरुजींच्या स्वत:च्या मैफ़िलींमधे प्रत्यक्ष वर्तनानी) ज़ाकिर हुसेनसारखी केसाळ झुलपं हलवून लोकांवर छाप पाडायचा सल्ला देतात. आणि बडे ग़ुलाम अली खान, रवी शंकर, विलायत खान हे लोक भले अनेकदा भंपकपणा करत असतील, पाट्या टाकत असतील. तरी ते एकदा ज़मले की ज्या दर्जाची कला सादर करत (अगदी ते २५-३० चे असतानाही) तो दर्जा कुठल्याच नव्या कलाकाराला गाठता आलेला नाही.

HAREKRISHNAJI said...

डी एन.

का कोण जाणे काल रात्री प्रकर्षाने आपली आठवण होत होती. आपल्या घरचा दुरध्वनी क्रमांक शोधुन मग आपल्याशी बोलण्याचे मन करत होते.

HAREKRISHNAJI said...

झाकीर हुसेनचे सुरवातीचे कार्यक्रम मी पाहिलेले आहेत. त्यांची जादु अनुभवलेली आहे.

पण आता,

वा उस्ताद वा, वा उस्ताद वा.

उस्ताद लोकांना टाळ्या पिटण्याचे कारण देण्यासाठी मग तबला बडवबडव बडवतात, पैसे वसुल झाले म्हणुन मग त्यांचे चाहते खुष.

Naniwadekar said...

अल्ला रखा साहेब मुलाप्रमाणेच थोर कलाकार आणि जास्त संयमीही असले तरी तबला बडवणे हा प्रकार वाढवण्यामधे तेही होते. रवि शंकरच्या हिप्पी चाहत्यांना हे प्रकार आवडत. पण अमेरिकनांना दोष देण्यात अर्थ नाही, कारण भारतातही हेच प्रकार चालतात.

ज़ुन्या पिढीतल्या लोकांची कला विविध अंगांनी कशी बहरायची याचं एक उदाहरण हे की १९४०-सुमारास जन्मलेले आणि सुरांच्या दुनियेतले (गांधी घराण्याचे स्वयंनियुक्त कूली) हॅरी चौरसिया आणि सन्तूरवाला शर्माही संगीत देताना गोन्धळ घालते झाले. त्यांच्यापेक्षा फक्त २०-२५ वर्षांनी मोठे अल्ला रखा यांनी सुराऐवजी तालाच्या क्षेत्रातले असूनही लता-तलत (बेवफ़ा)-आशा (सबक़)- सुरिन्दर कौर यांना छान सिनेमा गीतं गायला दिलीच. ते स्वत: फार सुन्दर गात. त्यांच्या आवाज़ातल्या एका गाण्याचे शब्द मी नोन्दवले होते: http://giitaayan.com/search.asp?s=Maan+Baap&browse=Film

- डी एन