आठवडाभर ध्यास घेतलेला. होळी जवळ आली आहे, तेलपोळीचे वेध लागलेले आहेत.
गुरुवारी संध्याकाळी न चुकता "विनायक केशव " कडे जायचे , तेलपोळी घ्यायची. तेलपोळी घ्यायची आहे "विनायक केशव " कडॆ जावुन . तेलपोळी घ्यायची आणि थंडगार दुधात बुडवुन , कुस्करुन खायची.
न विसरता जायचेच जायचे.
गुरुवार आला. संध्याकाळ झाली.
"आज आपल्याला लौकर निघायचे आहे. आज कशासाठी लौकर निघायचे आहे ? "
कुठेतरी उगीचच खोटी आशा, होळीनिमित्ते रात्री ९ - ९.३० पर्यंत दुकान उघडे असेल .
पण नाही.
"विनायक केशव" कडे जायचे .
उद्याला सकाळी आठ वाजता, बघुया दुकान उघडल असेल का ?
तेलपोळी खाण्याची आणि त्यांच्याकडचीच तेलपोळी खाण्याची जबरदस्त इच्छा आहे.
2 comments:
hello , khup divasani aapala blog pahila.. mhanje ajun kunachach naahi pahila... blog kade khup divsani chakkar marali.. punha tasach baharalelaa.. pahun chhan vatale.. (telpoli mhanaje kay kalale nahi)??
लोपामुद्रा,
किती वर्षाने ? आहात कुठे ? मी सर्व जुन्या ब्लॉगर स्नेहींना नेहमीच मिस करत असतो. कश्या आहात ?
तेलपोळ्या ह्या मैद्याच्या असुन त्या तेलावर लाटतात. त्या पुरणपोळीप्रमाणॆ मऊसुत नसुन कडक असतात.
मुंबईला / पुण्याला आलात की सांगा तेलपोळीच्या चवीशी ओळख करुन देतो.
Post a Comment