ह्या श्री. रोहन चौधरींनी नुसतं सतावुन सोडलयं.
एकतर भटकंती करत रहातात व त्याचे भरभरुन वर्णन पुण्याच्या म.टा. मधे करुन नुसता जीवाला त्रास देत रहातात.
गोरखगड.
पावसाळ्यातील भ्रमंती, राजाभाऊ आणि त्यांच्या मित्रांची. धसई मधे एका शाळेच्या व्हरांड्यात काढलेली रात्र. दिव्यापासुन लांब झोपल्याने राजाभाऊ बचावले, पण त्यांच्या मित्रांना दिव्यावर आलेल्या काही कीडेकिटकांना फाडुन टाकलेले. हे भलेमोठाले फोड, नुसते टरटरलेले ते चावलेल्या जागी. एकाची तर पाठ भरुन गेलेली, कशी त्यानी सॅक मागे टाकली असेल ?
पण राजाभाऊंची त्यांना वाटले होते तशी सहजासहजी सुटका नव्हती. अर्धी पॅण्ट. जंगल. सटकन मांड्यांवर कुणीतरी जोरात, वेगात बारीक सुया घुसवतयं. वेदना. हा त्यांचा चावण्यासा प्रकार काही भलताच.
पण सुळक्याच्या पायऱ्या चढतांना, त्यांच्या खोबणीत हात घालुन शरीर वरती उचलतांना जी मजा आली त्यात ह्या त्रासाचा विसर पडला. किटकांचा त्रास संपुन ह्या पायऱ्यांचा त्रास सुरु झाल्यामुळे कदाचित. पण एकंदरीत मजा आली, सारा शीण गायब.
ह्या पायऱ्या मोठ्या न्याऱ्या. दिडकी पायरी म्हणजे काय ते पाहण्यात आले ते चांभार लेण्याची उभी चढण चढण्यात, ह्या उंचाल्या पायऱ्या. मग ती चढण्यासाठी एका बाजुला कोपऱ्यात केलेली अर्धी पायरी.
No comments:
Post a Comment