Showing posts with label विक्रम और वेताळ. Show all posts
Showing posts with label विक्रम और वेताळ. Show all posts

Thursday, June 14, 2007

विक्रमा आम्ही मराठी हा आमचा गुन्हा काय रे ? वेताळाने विचारले.

हल्ली वेताळ तसा धास्तावला दिसत होता, मधेच स्वताःशीच "मी मांसाहारी नाही हो, खरच मी मांसाहारी नाही, मी फक्त वरणभातावर साजुक तुप घालुन खाणारा माणुस होतो हो, हवे तर आता तुप पण खाणे बंद करतो, मनेका गांधी म्हणाली होती ना गाईचे दुध पण मांसाहारी आहे , तिचे मी ऐकतो, पण नका हो नका मला" असे अर्थाचे काहीतरी पुटपुटत अचानक वेताळ गप्प झाला.

नेहमी माझ्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर दे नाहीतर परीणाम तुला ठावुक आहे म्हणणारा वेताळ, आज आपल्याच विचारात मग्न झालेला होता. काहीच न बोलता मधेच सुस्कारा सोडीत या खांद्यावरुन त्या खांद्यावर फिरणाऱ्या वेताळाचे हाल विक्रमाला आज पहावले नाही, स्वताःहुन त्याने आज बोलायचे ठरवले.
बा वेताळा, काय झाले सांगशील की नाही , तुझे दुःख दुर करणे माझ्या हातात असलेतर मी ते जरुर करीन, विक्रमाने विचारले.

पण वेताळ काहीच बोलला नाही , दर्दभऱ्या नजरेने आपल्या वडाच्या झाडाकडे, आपण लटकत असलेल्या फांदीकडे केवीलवाण्या नजरेने एकटक पहात राहीला, शेवटी ही झाडे विक्रमाने, त्याच्या पुर्वजांनी लावलेली आहेत ते तो कसे विसरु शकत होता ?

विक्रमा, चल तुला मी प्रश्न विचारतोच. मी भुमीपुत्र, स्थानीक, मराठी आहे आणि वर मुंबईत रहातो हा माझा गुन्हा आहे का रे ? आम्ही मांसाहार करतो ती आमची जीवनपद्धत आहे. म्हणुन काय आम्हाला आमच्याकडे घरे विकत घेण्यासाठी पैसा असुन सुद्धा बिल्डरनी घरे विकू नयेत का रे ? परप्रांतीयानी आम्हाला केवळ आम्ही मांसाहारी आहेत म्हणुन आमच्या राहात्या जागेतुनही हुसकवुन लावावे काय रे ? दुर्देवाची गोष्ट म्हणजे काही बिल्डर तर आमचेच भाऊबंद आहेत रे ! आमच्यातल्या शाकाहारी माणसांना आम्ही शाकाहारी आहोत , शाकाहारी आहोत हे दुनीयेला ओरडुन सांगायला लागण्याची, अमराठी लोकांना पटवुन देण्याची वेळ का बरे आली रे ?
आमचा कोणीच वाली नाही का रे ? विक्रमा, अधिक माहीती साठी दि. ९ मे रोजी महाराष्ट टाईम्स मधे आलेला श्री. संजीब साबडे यांचा " शाकाहारी वस्त्यांतील घरं महाग " या विषयावर लिहलेला लेख वाच, आजच्या म.टा. मधले "शाकाहारी वस्तांना मराठी शाकाहारीही नको आहेत " हे श्री.अरुण जोशी , गिरगाव यांचे पत्र वाच.

विक्रमा आता समाज त्यांच्या आहारशैलीवर विभागाला जावु लागला आहे रे ! काहीतरी कर रे , आता तुच आमचा वाली ,आमचा तारणहार, तुच आमचा नेता.

वेताळा, मी तुला याबाबतीत काहीच मदत करु शकत नाहीरे, मला पुढच्या शंभर पिढ्यांची तरतुत करुन ठेवायची आहे, शेवटी पैसा हेच जीवनसर्वस्व, हाच सखा, हाच आप्त, आणि हाच शाश्वत. बाकी सारे झुठ. तु गावाकडे किंवा लांब उपनगरात दुसरे झाड बघ. हवेतर त्यास मी तुला सहायता करीन.

विक्रमा तु बोललास, पण हा मी असा उडुन जावु कुठे रे ?

आणि शेवटी अगतीक वेताळ उडुन जावुन परत आपल्या झाडावर लटकु लागला, दोन दिवसात फांदी खाली करण्यासाठी.

Tuesday, June 12, 2007

विक्रम और वेताळ

विरोधाभास म्हणजे काय रे दादा ? वेताळाने विक्रमला विचारले, माझ्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर दे नाहीतर परीणाम तुला ठावुक आहे. वेताळा अरे वेताळा, ही बातमी "एका राजकीय पक्षाच्या हिंदुत्ववादी भूमिकेबाबात त्याच्याच मित्रपक्षाकडुन संशय व्यक्त " ही वाचलीस का ?
वाचली पुढे बोल,
आता हे वाच. "मालेगाव महापौरपदासाठी मौलाना मुप्ती यांच्या तीसरा महाज आणि याच मित्राची युती होणार अशी चर्चा असताना आज अचानक भलत्याच राजकीय पक्षाबरोबर तीसरा महाज यांच्याबरोबर आघाडी झाली असुन मुप्ती यांच्या या पक्षाला महापौर बहाल करण्याचा निर्णयही झाला " वर्तमानपत्र वाचत जा म्हणुन मी तुला गेल्याच वेळा सांगीतले होते नारे .
विक्रमा तु बोललास आणि हा मी चाललो. आणि वेताळ उडुन जावुन परत आपल्या झाडावर लटकु लागला, सर्व काही दोन दिवसात विसरुन जाण्यासाठी.

Monday, June 04, 2007

भाबडेपणा म्हणजे काय रे भाऊ ?

भाबडेपणा म्हणजे काय रे भाऊ ? वेताळाने विक्रमला विचारले, माझ्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर दे नाहीतर परीणाम तुला ठावुक आहे.

बा वेताळा, याचे उत्तर सोपे आहे. वर्तमानपत्रात , थोरामोठयांच्या सुरस, अर्थपुर्ण, अरेबियन नाईट्स मधे शोभतील अश्या कथा वाचुन, मग आता या लोकांची चौकशी होईल, गैरव्यवहार आढळल्यास कारवाई होईल, अफाट संपत्ती, जमीनी सरकारजमा होईल, नदीखोऱ्यात डुबलेले प्रकल्प त्याचा योग्य तो विनीयोग करुन वर काढण्यात येतील , जमीनी मुळच्या खरोखरीच्या शेतकऱ्यांना परत मिळतील , योग्य तो न्याय केला जाईल आदी भ्रामक कल्पना, सर्वसामान्य माणुस खोट्या आशेपोटी उराशी बाळगतो, समजले का वेताळा भाबडेपणा भाबडेपणा म्हणतात तो हाच की रे.

अरे विक्रमा उगीचच हवेत बोलु नकोस. नीट काय ते सांग.

वेताळा हल्ली वर्तमानपत्र वाचणे सोडुन दिलेले तर नाहीस ना ? कालचाच लोकसत्ता घे. सर्व लेख, बातम्या वाच, आपसुकच कळेल.

विक्रमा तु बोललास आणि हा मी चाललो.

आणि वेताळ उडुन जावुन परत आपल्या झाडावर लटकु लागला, सर्व काही दोन दिवसात विसरुन जाण्यासाठी. ?