"झपुर्झा" ला जायचे ठरवले तेव्हा राजाभाऊंनी तेथे पोटापाण्याची काय सोय ह्याची चौकशी पहिल्यांदा केली. कारण तिथे सर्व निवांत बघायला जवळजवळ ४-५ तास नक्कीच जातात.
जवळजवळ ८ एकरात असलेल्या जागेत वसलेले हे एका निसर्गरम्य ठिकाणी असलेले वस्तुसंग्रहालय व कला दालन. एक अप्रतिम स्थळ. आयुष्यात एकदातरी जावुन पहावेसे असणारे नयनरम्य ठिकाण.
"पुना गेस्ट हाऊस" चे तेथे कॅफे आहे म्हटल्यावर निश्चिंतपणे राजाभाऊ "झपुर्झा" ला गेले.
जेवण उत्तम मिळाले. अळुची पातळभाजी, बटाटा सुकी भाजी व पुरी, कोकमसोडा, व निसर्ग.
No comments:
Post a Comment