काळेकाका आणि काळेकाकु परवाच्याला परत माटुंग्याला दंतवैद्यांकडे गेले होते.
शिरस्त्यानुसार राजाभाऊंची पावले "कॅफे मद्रास"च्या दिशेने वळली, आज काहीतरी नवीन प्रकारचा डोसा खावा ह्या हेतुने.
"कंटाळा आला आहे, नेहमी नेहमी तेच तेच"
"ठिक आहे"
मग त्यांच्या गाडी वळली त्यांच्या दुसऱ्या आवडत्या ठिकाणी.
"गोविंदा" शुद्ध आणि सात्विक जेवण. कांदा लसुण विरहीत. जेथले जेवण हे श्रीकृष्णाला प्रसाद म्हणुन चढवले जाते.
गिरगाव चौपाटी जवळ "इस्कॉन" आहे तेथले हे उपहारगृह.
चीज काश्मिरी कोफ्ता आणि बटर कुलचा.
आज परत माटुंग्याला जायचय, बघु मग कुठे जायचे ते.
No comments:
Post a Comment