Thursday, September 30, 2010

तुमचे पण बरोबर आणि तुमचेही बरोबर.

तात्या रविवारी सकाळी मटण आणायला बाजारात गेले.

आपले दोन्ही पंजे त्या खाटीकापुढे नाचवत नाचवत विचारु लागले " मटण कैसा किलो ? कैसा किलो ? बोलो , कैसा किलो. "

तात्यांच्या हाताच्या दहाही बोटामधे सोन्याच्या अंगठ्या होत्या. 

या त्यांच्या वर्तनाने रागवलेल्या खाटीकाने आपले तोंड फिस्करुन तात्यांना सांगितले " दोसो रुपया, दोसो रुपया, दोसो रुपया किलो "

त्या खाटीकाचे सर्व दात सोन्याचे होते.

झाले तात्या व खाटिकाची लग्गालगी सुरु झाले. भांडण काही मिटता मिटे ना, शेवटी दोघेही न्यायालयात गेले, आपली कैफियत जज्जसाहिबांसमोर मांडली.

जज्जासाहिबांनी मान वळवुन तात्यांकडॆ बघितले, " तुम्हारा भी बराबर " आणि परत मान खाटीकाकडॆ वळवुन त्याला सांगितले " तुम्हाराभी बात बरोबर " एक्दा तात्याकडॆ , परत खाटीकाकडॆ वळत, परत परत त्यांना सांगु लागले. "तुमचे पण बरोबर आणि तुमचेही बरोबर. "

जज्जासाहिबांच्या कानात चांगल्याच वजनदार हिऱ्याच्या कुड्या.

सांगायचे तात्पर्य म्हणजे ......

तुझ्या घराकडे जाणारा

तु अजुनही आठवणीत आहेस, पण तुझ्या घराकडे जाणारा रस्ता, तो तर केव्हाच विस्मरणात गेला आहे.

वाटत होते

शक्यता तशी धुसर होती, पण वाटत होते श्री. ज्ञानेश्वर कुलकर्णी संमेलनाध्यक्ष व्हावेत.

पण ..

गाये लता, गाये लता, गाये लता, जलेम्बु, जलेम्बु, जलेम्बु

चलते न तीर बनके दिल ना अगर लगाते. आता सकाळी सकाळी काळजावर मखमली सुरी फिरवली त्याला कोण काय करणार ?

http://www.youtube.com/watch?v=BubFwAoRoeg

http://www.youtube.com/watch?v=2Yww1Y_uTBc&feature=related

http://www.youtube.com/watch?v=9zlFI8SomZM

http://www.youtube.com/watch?v=grnyAU-OlNI&feature=related

परवाला "मराठी लता " ऐकली.

विलेपार्लेचे नगरसेवक शशीकांत पाटकर यांनी उत्कृष्ट कार्यक्रम आयोजीत केला होता. विभावरी आपटॆ जोशी आणि निवेदनाला मंगला खाडीलकर.

आता गाणी ऐकायची की निवेदन ?



कधी तरी प्रवास करायचा आहे

कधी तरी प्रवास करायचा आहे.

प्रवास करायचा आहे अश्या सहप्रवाश्यांबरोबर जे सतत मोबाईलवर बोलणार नाहीत.
जे एकतर तुमच्याशी संवाद तरी साधतील नाहीतर शांतपणे हाताची घडी व तोंडावर बोट ठेवुन निमुटपणे मोबाईक वर वटवट न करता बसुन राहतील.

मुंबई ते पुणे , गाडीतले चौघेही मुंबईपासुन पुण्यापर्यंत न थांबता तीन चार तास मोबाईलवर नुसते बोलत राहिलेत.

बोलतच रहा, बोलतच रहा, बोलतच रहा. आणि ऐकतच रहा, ऐकतच रहा, एकाच वेळी चौघांचे बोलणे ऐकतच रहा.

असा प्रवास करायचा आहे , ज्या गाडीमधे चालकाने लावलेली चांगली गाणी ऐकता ऐकता कधी आपले ठिकाण आले हे कळलेच नाही म्हणण्याइतपत.

नाही सहन होत, कानावर अत्याचार.

Wednesday, September 29, 2010

ती एक राजकन्या आणि ते आणि हे

ती एक नाजुक राजकन्या.

फार नाजुक. अती नाजुक.  अनेक , अनेक नरम, अतीनरम , सावरीच्या कापसाचे बिछाने घातलेल्या पलंगावर ती झोपत असे. 

एक रात्र तिला झोपच लागली नाही, सारी रात्र तळमळत काढली.

अगदी खालच्या बिछान्यावर मुद्दाम ठेवलेला एक छोटुसा वटाणा तिला टोचत राहिला.

चिंता, चिंता आणि चिंता, मानसिक ताण आणि तणाव, नैराश्य यांनी ते रात्रभर कुस बदलत राहिले, झोप म्हणुन यायच नाव नाही.

आणि

हे

केवळ डोक्यावर छप्पर नाही म्हणुन .

गॉडफादर मधे एक वाक्य आहे, गॉडफादर म्हणतात, "तुम्हाला वाटते त्याप्रमाणे खरच माझ्या जवळ ताकद असती तर मी परमेश्वरापेक्षा दयाळु झालो असतो.







का नाही ?

सणसणत्या उन्हात, तापल्या दुपारी, कोसळणाऱ्या मुसळधार पावसात, धुळ आणि धुर श्वासात भरुन घेत, भरभरुन घेत, खड्‍यातुन, खाचखळग्यातुन, प्रदुषणाने विळखा घातलेल्या शहरातल्या वेड्‍यावाकड्‍या गर्दीतुन , तुंबलेल्या वहातुकीतुन ते दिवसरात्र मार्ग काढत असतात.

मार्ग काढत असतात ते आपल्या पोटाची खळगी भरायला, आपल्या कुटुंबियांना सांभाळण्यासाठी, इतरांना मार्गस्थ करण्यासाठी, आणि त्याचबरोबर " साले माजोरी आहेत, माजल्यात सगळे, पोलीसांकडे यांची तक्रार करायला हवी, यांना ऐकु येत नाही काय ? बहिरे आहे सगळे सारे, नुसते बहाणे सांगत असतात " हे सारे ऐकुन घेत.

कोणीतरी त्यांच्या व्यथापण समजुन घेण्याचा प्रयत्न करवा. कधी तरी आपल्याला इच्छीत स्थळी वेळेवर, आरामात, पोचावल्याबद्दल त्यांचे कधी आभार मानावे. हे ही जाणुन घ्यावे की केवळ प्रवाशांच्या सोईसाठीच ते रस्तावर आलेले नसतात, त्यांचाही तो व्यवसाय आहेत, पैसे कमवण्यासाठी त्यांनाही नकार देण्याचा हक्क आहे.
कधीकधी ते माणुस देखील असतात, त्यांच्या रिक्षाप्रमाणे ते केवळ यंत्र नसतात.

आपण त्यांना समजुन घेण्याची गरज असते. नकार ऐकला की आलेला राग गिळुन टाकायचा असतो, त्यांचा पण मान राखायचा असतो. कदाचित आपल्याला जेथे जायचे आहे तेथे जवळपास त्यांनाही जायचे असते, त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर, जराशी तडजोड केल्यास त्यांच्याशी आपले सुत जुळुनही जाते.

ता.क. आज म.टा. मधे चकोरनी यांची थट्टा केली आहे, जी अप्रस्तुत आहे.

Thursday, September 23, 2010

कस कायं

पंचवीस, तीस, पसतीस वर्षानंतर देखिल तुमच्या शाळेतले गुरुजन भेटतात व ते तुम्हाला नुसतेच चेहऱ्यावरून ओळखत नाहीत तर अगदी नावानिशी ओळखतात.,

 ज्यांच्या हाताखालुन आजवर शेकडो मुले गेली असतांत, त्यांच्या लक्षात तुमचे गुणदोष पण असतात.

आणि हो , तुम्हाला देखिल तुमची हुळहुळणारी पाठ, जळजळणारा हाताचा पंजा, कानफटीत उमटलेली त्यांची बोटं पण आठवणीत असतात, आणि या मारा तुम्हाला कधीच राग आलेला नसतो हे ही आठवते.

ચાલો જમવા

बरेच दिवस झाले राजाभाऊंना सारखे गोरेगाव मधल्या ओबेरॉय मॉल मधे असणाऱ्या "राजधानी " मधे जेवायला जावेसे वाटत होते.

आतापर्यंत गोलाकार थाळीमधे जेवण जेवायची सवय आणि ही अचानक लंबगोलाकार थाळी समोर आली, ह्या भल्यामोठ्या थाळीच्या आकाराने जरा बिचकायला झाले, मग ध्यानी आले, येथे मिळणाऱ्या अनेक पदार्थांसाठी ही अश्या आकाराची थाळी ही हवीच.

जेवण खुप छान होते. पापडीडाळ तर मस्तच आणि मक्याचा हलवा, तो तर खायला सिंहाचे काळीज लागते.

रात्र काळी,घागर काळी,यमुना जळे ती काळी हो माय !

रात्र काळी,घागर काळी,यमुना जळे ती काळी हो माय !.

अलिकडे केव्हा तरी कोणत्यातरी पुस्तकात या गौळणीचा ओझरती उल्लेख वाचला होतो, मग ते गाणे तुटक तुटक डोक्यात नुसते भिरभिरत राहिले. याचा अर्थ काय उमजत नव्हता. 

रात्र काळी, हो ती काळी असते, काळीकुट्ट असते, जंगलात, पर्वतमाथावर, दरीत, गुहेत, गुंफात, लेण्यातल्या मुक्कामात अनुभवली होती. पण यमुना काळी ? घागर काळी ? गोऱ्यागोमट्या कृष्णसखीची घागर काळी ? काळे विषारी पाणी , कालीयामर्दनाने ?

ज्या यमुनेच्या तीरी कृष्णाच्या मुरलीच्या नादाने भुलुन जावुन त्या साऱ्या गोपी, गोपीकृष्णासंगे रासाचे नृत्य करायचे त्या यमुनेचे रुप कसे हे असे काळॆ ? मग या अश्या ह्या  नदीकाठी कश्या काय या लीला घडत असतील ? विरहणी कश्या बहाणे काढुन कृष्णसख्याला भेटायला येत असतील ? या यमुनेचे रुप तर कसे साजरे, लाजरे, गोजीरवाणे, देखणे हवे . यमुना काळी ? रात्र काळी ? घागर काळी ? जेथे कृष्ण तेथे तर सर्व कसे आनंदमय असायला हवे.

मग ही यमुना अशी यमुना-कालिंदी का ? का ? का ? 

मग त्याचे उत्तर दुर्गाबाई भागवतांच्या "पैस" मधे सापडले.

"यमुना नि दु:ख याची सांगड परंपरेने घातली आहे. मरण, विरह, निराशा यांचे कल्लोळ तिच्यात सतत परंपरेने उठवत ठेवलेले आहेत . भयाणाची जाण तिला पाहूनच होते. 

पुढे त्या लिहितात,

" यमुना नि मृत्यू यांची सांगड वैदिक यमयमीच्या भग्न प्रेमकथेत आहे. लहानबहिण वडील भावावर प्रेम करते. त्या काळी हे प्रेम  अनोखे नव्हते. पण यम हा नितिधर्माचा नवा पुरस्कर्ता. तो हे प्रेम सफल होवु देत नाही. बहिणीशी लग्न करणे पाप ठरवून तिला निराश करतो. यमी विकल होते. यम हा प्रथम मरण पावणारा माणूससुद्धा होतो. तो सूर्यपुत्र तसाच मानवही आहे आणि म्हणूनच यमी नदीरूपाने मानवलोकी आली, पण यमीची खरी शोकात्मिका यमाच्या मरणात आहे. विरहात ती त्याच्यावर प्रेम करत जगत होती. तो मेल्यावर ती शोकाकुल झाली, वेडी झाली. तिला दु:खाचा विसर पडावा म्हणून देवांनी रात्र केली. यमी झोपली. दु:ख विसरली. काळ्या यमुनेला काळ्या रात्रीचा आसरा प्रथम इथेच मिळाला. ही काळी कालिंदी शोकाने विकल झाल्यानंतर काळ्या रात्रीमुळे स्थिरावली. यमीला साधले नाही ते यमुना नदीने साधले. यमाला भाऊ म्हणून जेवायला बोलावले. बिजेचा काळा रंग उजाळला. "




Wednesday, September 22, 2010

ह्यात काय मोठेसे ?

न पडणारे पुल काय जगात कोणपण बांधते, बांधेल. आमच्या सारखं बांधताबांधता पडणारा, काम चालु असता कोसळणारा पुल कोणी बांधुन दाखवेल काय ?

दोन पिढ्या

खतरनाक

छपरावरुन खाली पडायला केवळ एक बेसावध क्षण पुरेसा आहे. सुरक्षतेतेबाबत आपण येवढे बेजबाबदार, निष्काळजी का असतो ?

आता पोस्टरमधे काय ठेवलयं, खाली काय नी वरती काय ? काय फरक पडतोय ?

यंग सिनीयर सिटीजन .

ह्या सेवाभावी वृत्तीचे खरेच कौतुक वाटते, या वयात पण तरुणाला लाजवेल असा हा उत्साह.

जाते हो तो जावो हम भी यहां यादोंके सहारे जी लेंगे

प्रो. ते मा.

एकेकाळी काही दुकानदार दुकानाच्या पाटीवर आपले नाव लिहित असते. प्रो. अमुकतमुक. या प्रोपरायटर ना कुठे तरी वाटत असे आपण प्रोफेसर आहोत म्हणुन. तेवढीच आपली हौस.

आता मा.आमदार म्हणजे माननीय आमदार साहेब की माजी आमदार ? हौस फिटली नाही म्हणायचे.

सोज्वळ रुप आणि ...



इराणीबाईची गणपती

आम्हीच खरे राजे , हो खरे खुरे राजे.बाकीचे आपले ......

त्याला काय ठावुक ?

कोणीतरी कधीतरी आपल्या कडुन ही भगवी पट्टी विकत घेवुन आपल्या कपाळावर बांधेल ही आशा.

पण त्याला कुठं ठावुक आहे "गर्वसे कहो हम हिंदु है " ची उपयुक्तता केव्हाच संपली आहे.

आणि आता या पट्टीची जागा, अमुक राजा, तमुक राजा लिहिलेल्या पांढऱ्या टोपीने घेतली आहे.


वालावलकरांचे पोट गदागदा हलतयं.

गेले कित्येक वर्षे , अनेक वर्षे,  वालावलकर न चुकता अनंतचतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीच्या वेळी छपरावर उभे राहुन सर्वांचे मनोरंजन करत आले आहेत.

 अर्थात आपल्या वैशिष्टपुर्ण नाचानी.

तरी आता वालावलकर बऱ्यापैकी बारीक झाले आहेत. त्यांच्या हा नाच बघण्यासाठी मिरवणुकीतील नाचणारे पण आपले नाचणे विसरुन जावुन त्यांचे हे थिरकणे बघत रहातात, पहात् रहातात.








गणपती विर्सजन - मुंबई - २०१० - गिरगाव चौपाटी

भगवान ये सरासर नाइन्साफी है !

किसीके मन पे लालच पैदा कर देना और उसे .......

आशा होती, स्पर्धेचा निकाल आता लवकर लागेल.

थोडे तरी, काही तरी, निदान जरासे तरी, अगदीच काहीनाही तर एखादा पदार्थ तरी चाखायला का होईना पण मिळेल, कोणत्या तरी सुगरणीला आपली दया येइल.

पण नाही, अजिबात नाही, जरा सुद्दा नाही, बिलकुल नाही ते मिळाले.

लाळ नुसतीच टपकट, टपक टपक टपकत राहिली.

कहा अपनी किस्मत इतनी अच्छी !

Tuesday, September 21, 2010

देवा तु सुद्धा ?

आपल्या मंडळाचा गणपती या स्पर्धेत पहिल्या पाचात निवडला गेला आहे.

त्याला पहिल्या क्रमांकाचे बक्षिस मिळवुन देण्यासाठी

करा

SMS आपल्या मोबाईल वरुन या नंबरवर.

देवा, असे पडद्याआड का रहाता भक्तांना का तिष्टीत ठेवता




खेतवाडी

खेतवाडीचा राजा


लहान मुर्तीकार कुडाळदेशमुख वाडीतले


सदाशिव क्रॉस गल्ली, निकदवरी लेन आणि कुडाळदेशमुख वाडी



जेठाभाई जाधवजी चाळ

भल्यामोठाल्या मुर्त्यांचे दर्शन घेतल्या नंतर या छोटुश्या मुर्तीचे दर्शन घेण्याचा आनंद काही और आहे,

ही मुर्ती भिंगामधुन पहावी लागते.



जेठाभाई जाधवजी चाळ

या ठिकाणाचा गणपती पहाण्यासाठी राजाभाऊ कोणात्याही परिस्थितीत जातातच. परदेशातील विलोभनीय रुप असलेले गणराया येथे पहावयास मिळतात.


मुगभाट- कंबोडीया मधील एक दुर्मीळ मुर्ती


सुर्यमहाल - विद्यागणॆश

केशवजी नाईकांच्या चाळी, गिरगाव

केशवजी नाईकांच्या चाळी. जेथे अजुनही उत्सव हा उत्सवच राहिला आहे.
मुंबईमधला पहिला सार्वजनिक गणेशोत्सव.




आणि तेच चाळीतील मराठीमोळे वातावरण.

Monday, September 20, 2010

भाजी गल्ली व मंडई - ग्रॅंटरोड





"मालामाल " गणेश

धन, संपत्ती, माया, पैसाअडका, वैभव, ऐश्वर्य ही सारी खाती कुबेराकडे, लक्ष्मी कडे.
आणि आता तर विघ्नहर्ता गणेशाकडे त्याच्या भक्तांनी हे स्थान सोपवलेले आही की काय असे वाटु लागले आहे.

पैशाचे हे ओंगळवाणे प्रदर्शन बघवत नाही.