Sunday, September 05, 2010

ठोसेघरचे श्री. माने.

कासच्या पठारावर जेवण मिळेल न मिळेल, तु आपले जेवण बरोबर घे. "

राजाभाऊंनी आपल्या बायकोला हुकुम फर्मावला.

त्या भल्या बिचाऱ्या ( ???? ) बाईने भल्यापहाटॆ लवकर उठुन सर्वांसाठी भाजी केली. मस्तपैकी आज पावभाजीचा बेत, कुठेतरी गवताळ कुरणात बसुन, नाही तर एखाद्या देवळाच्या ओट्यावर (घाटणदेवीच्याच की ) आश्रय घेत, मजा येणारं, आज वनभोजनाचा खास खासा बेत.

राजाभाऊंना काय स्वप्न पडले होते आज आपल्या नशिबी आपल्या समोर ताटात काय वाढुन ठेवले आहे.
ठोसेघरला धबधब्याऐवजी या पावसाने चांगलचं भिजवुन सोडले, भिजल्या अवस्थेत त्यांनी रस्तावर समोर एक घर पाहिले, घरात असलेला काऊंटर पाहिला, काऊंटर मागे उभे असलेले गृहस्थ पाहिले आणि अचानक जाणिव झाली "अरे आपल्याला चांगल्यापैकी चक्क भुक लागली आहे.
राजाभाऊंनी त्या गृहस्थांकडॆ विचारपुस केली की आम्हाला घरुन आणलेले जेवण जेवण्यासाठी बसायला जवळपास कुठे एखादे देऊळ, शाळा वगैरे आहे का ? हे एक उपहारगृह आहे ह्याची दखल घेणॆ ते भुकेपोटी आणि त्यात डोळ्यासमोर पावभाजी दिसत असल्याने विसरुन गेले.

पण, आज त्यांच्या नशिबी पावभाजी नव्हती.

श्री.मानेंनी उदार मनाने त्यांना आपल्या जागेत बसुन जेवणाची परवानगी दिली. ते म्हणाले की थोडेफार आमच्या कडुन काहीतरी घ्या आणि मात्र येथे सारे स्वच्छ ठेवा.

थोडॆफार. हं. थोडॆफार. घेवु की. एखादी मिसळ किंवा एकादे थंडपेय. घेवु काय तरी. राजाभाऊंनी विचार केला.

गरमागरम मिसळीचा पहिला घास, पावसाळी हवेतील वाफाळलेल्या भातावरील आमटी आणि घेतलेला भुरका, पिठले भाकरी, एका मागोमाग ऑर्डर सुटत गेल्या, मागण्या वाढत गेल्या, या मस्त, चविष्ट, गरमागरम जेवणासमोर आणलेली पावभाजी पोटात कुठेतरी खोलवर तळाशी कोपऱ्यात जाऊन बसली, (थंडगार झालेली भाजी, नको गं , मी आपला डाळ भात खाईन, राजाभाऊ वदले )



 
मजा आली.

आता परत ठोसेघर, चाळकेवाडीला जायचे झाले तर पहिले पाऊल श्री.मानेंच्या घरी, जेवणाची आगावु मागणी करावयास.

No comments: