अशक्य ! त्रिवार अशक्य. शनिवार-रविवार आणि राजाभाऊ घरात ? छे, हे कसे काय शक्य आहे ?
मांढरदेवच्या पठारावर झालेल्या या पावसाळ्यातील पदभ्रमंतीमुळे ही लागलेली चटक घरात स्वस्थ बसुन देणे नाही, हा भटकंतीचा कीडा जेव्हा डोक्यात वळवळू लागतो तेव्हा तो आपल्या तब्बेतीचा, आपल्या मुलाचा प्रकृतीचा पण जरासुद्धा विचार करत नाही, त्याचे पाय आपोआप वळु लागतात जंगलाच्या वाटेकडॆ , एका अनामिक ओढीने. तो निसर्ग भरभरुन आपल्यामधे साठवुन घेण्यासाठी , आठवणींवर पुढील साऱ्या वर्षाची बेगमी करावयास.
कासच्या पठारावर फिरायला जायचे म्हणजे जायचेच, मागचा पुढचा कसलाच विचार आता करणे नाही, ती रानफुले साद घालु लागली आहेत, चाळकेवाडीच्या पठारावरचा भन्नाट वारा वेडेपिसा करायला लावणार आहे, होश उडवणाऱ्या पवनचक्यांचे दृश्य मनात साठवायचे आहे, ठोसेघरच्या धबधब्याची मोहीनी डोळ्यात साठवायची आहे, गच्च धुक्यात , भरल्या ढगात हरवुन आणि हरकुन जायचे आहे, कधी एकदा खळखळ वहाणाऱ्या अवखळ झऱ्याच्या ठंडगार पाण्यानी आपली तृषा शमावतो असे झाले आहे. ते मदहोशी वातावरणात भुरळ घालुन घ्यायची आहे आणि समर्थांचे ही दर्शन घायचे आहे, बामणोलीचा शिवसागर जलाशय, या पर्वतरांगांवरुन खालच्या दरीत दिसणारे धरणातील पाण्याचे दृश्य डोळे भरभरुन पहायचे आहे , वाटेत यवतेश्वर, घाटाई देवीला भेट द्यायची आहे आणि जमल्यास बामणोलीवरुन जो अप्रतिम रस्ता महाबळेश्वरला जातो त्यावरुन प्रवास करायचा आहे. ( हा रस्ता जवळजवळ ४० कि.मी. असुन बराचसा कच्चा आहे व त्यावरुन फार तुरळक वाहतुक असते , थोडे जोखमीचे काम )
मग काय , राजाभाऊ सुटले तडक सुटले.
भाड्याच्या गाडीच्या तकलफीमुळे निघायला अंंमळ उशीरच झाला, त्यामुळे वाटेवर असुन देखील यवतेश्वर, घाटाईदेवी, शिवपेठेश्वर, बामळोली राहुन गेले, ( हे खरच राहुन गेलं की परत या परिसरात येण्यासाठी काहीतरी सबळ कारण हवे म्हणुन मुद्दामुन ? )
पण एकंदरीत या भ्रमंतीमधे खुप बहार आली, खंत एकच की वेळे अभावी पायी फारसे जास्त भटकता नाही आले, त्यात जरा लवकर गेल्याने, पाऊस अजुन सरला नसल्याने जास्त प्रमाणात रानफुले अजुन उगवली नव्हती )
ता.क. आज यवत जवळील भुलेश्वर परीसरात भटकायला जायचे होते, पण , पण अलिकडे त्यांच्या बायको जर्राशी, काहीशी एकंदरीत थंडावली आहे, उंबरगड चढणे राजांभाऊंसाठी शक्य नाही झाले. होता है होता है, ऐसाभी कभी कभी होता है !
No comments:
Post a Comment