Wednesday, September 29, 2010

का नाही ?

सणसणत्या उन्हात, तापल्या दुपारी, कोसळणाऱ्या मुसळधार पावसात, धुळ आणि धुर श्वासात भरुन घेत, भरभरुन घेत, खड्‍यातुन, खाचखळग्यातुन, प्रदुषणाने विळखा घातलेल्या शहरातल्या वेड्‍यावाकड्‍या गर्दीतुन , तुंबलेल्या वहातुकीतुन ते दिवसरात्र मार्ग काढत असतात.

मार्ग काढत असतात ते आपल्या पोटाची खळगी भरायला, आपल्या कुटुंबियांना सांभाळण्यासाठी, इतरांना मार्गस्थ करण्यासाठी, आणि त्याचबरोबर " साले माजोरी आहेत, माजल्यात सगळे, पोलीसांकडे यांची तक्रार करायला हवी, यांना ऐकु येत नाही काय ? बहिरे आहे सगळे सारे, नुसते बहाणे सांगत असतात " हे सारे ऐकुन घेत.

कोणीतरी त्यांच्या व्यथापण समजुन घेण्याचा प्रयत्न करवा. कधी तरी आपल्याला इच्छीत स्थळी वेळेवर, आरामात, पोचावल्याबद्दल त्यांचे कधी आभार मानावे. हे ही जाणुन घ्यावे की केवळ प्रवाशांच्या सोईसाठीच ते रस्तावर आलेले नसतात, त्यांचाही तो व्यवसाय आहेत, पैसे कमवण्यासाठी त्यांनाही नकार देण्याचा हक्क आहे.
कधीकधी ते माणुस देखील असतात, त्यांच्या रिक्षाप्रमाणे ते केवळ यंत्र नसतात.

आपण त्यांना समजुन घेण्याची गरज असते. नकार ऐकला की आलेला राग गिळुन टाकायचा असतो, त्यांचा पण मान राखायचा असतो. कदाचित आपल्याला जेथे जायचे आहे तेथे जवळपास त्यांनाही जायचे असते, त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर, जराशी तडजोड केल्यास त्यांच्याशी आपले सुत जुळुनही जाते.

ता.क. आज म.टा. मधे चकोरनी यांची थट्टा केली आहे, जी अप्रस्तुत आहे.

1 comment:

Anonymous said...

साधारणपणे आपल्या अपयशाचा राग टॅक्सी ड्रायव्हरवर काढला जातो.