Monday, June 21, 2010

समाधान स्नॅक्स

राजाभाऊंची नजर कशी, .खाली मुंडी खाणे धुंडी , त्यात उपहारगृहांपेक्षा घरगुती खाणे मिळण्याचे ठिकाण असेल तर ? वा क्या कहना. त्यांच्याचानी आपल्यावर ताबा ठेवणॆ फार त्रासदायक ठरते.

आज ठाकुरद्वारी , मुगभाटाच्या नाक्यावर एक मस्त  खाद्यठिकाण गवसले.

" समाधान स्नॅक्स."

मिसळ उत्तम होती, राजाभाऊंच्या बायकोला तिथले पॅटीस ( बटाटयाचे सारण असलेले ) भावले , तर पुतणीने मुंगडाळ भजींवर ताव मारला.

त्या दोन महिलांनी गेल्याच आठवड्यात या खाद्यमहोत्सवाची सुरवात केली आहे. सकाळच्या नास्तापासुन ते रात्रीच्या पोटभरणी पर्यंत.    

छोटेखानी दुकान. पण समाधानाची गॅरंटी.

काय गं ताई, काय चाललयं ?

शेवळं, खाण्यासाठी नव्हे तर खेळण्यासाठी


जव्हारला पुन्हा पुन्हा जाण्याचा अंतस्थ हेतु


सनसेट रिसॉर्ट मधली नाचणीची भाकरी व मग त्यासोबत इतर भाज्या

बाप आणि लेक -दोघांची तोंड विरुध्द दिशेला

उध्वस्त राजवाडा


नव्या राजवाड्याचीच एवढी हालत खराब आहे तर मग जुन्या राजवाड्याचे काय झाले असावे ?


ही वाट दुर जाते - जव्हारच्या वाटॆवर

कमाल आहे


एकीकडॆ गाडीच्या मागच्या सीट वर राजाभाऊंसारख्या जाडजुड माणसाला दुसऱ्या दोघांबरोबर बसणे अवघड, कठीण जाते तर दुसरीकडॆ,


Sunday, June 20, 2010

लॉग ड्राईव्ह

"तरी मी सांगत होतो , अजुन पाऊस धडपणे पिकलेला नाही, थांब, थोडॆ दिवस थांब, मग जावुया. पण तुला जरासुध्दा ऐकायला नको "

चवताळलेले राजाभाऊ.

बायकोने कधी आपल्या नवऱ्याचे म्हणणे ऐकले आहे का मग ते आज ऐकले जाईल.

संपुर्ण रस्तात एकही पावसाचा म्हणुन थेंब अंगावर झेलणॆ नाही. सारे धबधबे कोरडॆठाक.
मदमस्त , रौद्रसरुपी वैतरणा नुसती रोडावलेली.

त्यात भरीस भर म्हणुन कसाऱ्यापर्यंत मागुन येत असलेल्या दुसऱ्या गाडीच्या चालकाने कसाऱ्यावरुन डावीकडॆ विहीगावकडॆ गाडी वळवल्यानंतर काही कळण्याच्या आत अचानक जी भरधाव सोडली ती थेट खोडाळ्यापर्यंत. जरा देखिल थांबण्याचे नाव नाही. मग त्याला गाठण्याच्या नादात विहीगावात धबधब्याकडॆ झालेले दुर्लक्ष, वैतरणा पुलावर थांबण्याच्या, पुढे असलेल्या कॅनन्समधे उतरायच्या या सर्व सर्व बेतावर त्या गृहस्थामुळे पडलेले पाणी.

सारे वर्षे आपल्या बायकोला व मुलाला या भागातले सारे निसर्गसौदर्य न्याहाळायला केव्हा एकदा घेऊन जातो करुन आतुरतेल्या राजाभाऊंचा सारा विरस त्याने केला. तरी त्यांना  बजावुन सांगितले होते, माझ्या मागे गाडी ठेव म्हणुन, हा सारा परिसर माझ्या माहितीतला आहे.

खोडाळा ते देवबांध - देवबांध ते मोखाडा , मोखाडा ते जव्हार , जव्हार ते विक्रमगड , सारा परीसर नितांत सुंदर आहे. लॉग ड्राईव्ह साठी सर्वोत्तम.

सारा रस्ता उत्तम दर्ज्याचा आहे.

तरी बरे थोडाफार पाऊस पडुन गेल्याने सारी धरती हिरवीगार झालेली.

आता परत एकदा या विभागात ऑगष्ट मधे.  

राजाभाऊ निघाले जव्हारला

हट्ट म्हणजे हट्ट म्हणजे हट्ट असतो.
नवऱ्याचे काहीएक न ऐकण्याचा निश्चय असतो

आधीच हट्टी म्हणजे हट्टी म्हणजे हट्टी स्वभाव असतो
त्यात नवऱ्याने डोक्यावर चढवुन ठेवलेले असते
भरीस भर म्हणजे काकीच्या चमचीची, पुतणीची मिळालेली साथ

आपल्या लग्नात आपला सासऱ्याने सुटकेचा सोडलेला निश्वास
आपला सासरा एवढा खुष का याचे त्यावेळी न उलगडलेले कोडे
आज अचानक झालेला साक्षात्कार.

वादविवादात जिंकण्याचा एक निष्फळ प्रयत्न.
तिने आपल्या प्रत्येक युक्‍तीवादाचे केलेले खंडन.

वानप्रस्थापनात कितव्या वर्षी जायचे असे शास्त्रात लिहिलेले आहे ?
त्याआधी राजाभाऊ जव्हारला जायला निघाले आहेत.

Saturday, June 19, 2010

आल्या आल्या आल्या पावसाच्या धारा

या पावसाच्या धारा घेवुन आल्या त्या रानभाज्या, शेवळ, फोडशी आणि इतर. मग वसईचे भाजीवाले त्या विकायला आणतात.

या दिवसात त्या मुद्दामुन खाव्यात.

 

धाडकन

"चॉकलेट " सारखा भावनाप्रधान चित्रपट पहाताना आपण गुंतुन , गुंगुन गेलेलो असतो. क्लायमेक्स येतो.

आपला मुलगा धाडकन येवुन चॅनेल बदलतो व क्रिकेट लावतो, 

आपला संताप अनावर   होतो.

तो ढिम्म, त्याच्यावर काहीही त्या रागाचा असर होत नाही.

या पावसाने

वर्षभर चांगलीच वाट पहायला लावल्यानंतर आलेल्या पावसाने काल संध्याकाळी घरी परततांना चांगलीच दमछाक केली तर तक्रार कशाला करावी ?

संध्याकाळ ते रात्र, तीन तास घरी पोचायला.

वहातुक कोंडीमधे गाडी चालवुन चालवुन पुरते झालेले भजे, त्यात पर्यंत रस्तावरचे दिवे बंद पडलेले,  काळोखाचे साम्राज्य.  

तुझ्या

तु तर अजुनही आठवणीत रेंगाळते आहेस , पण तुझ्या घराकडॆ घेवुन जाणारी वाट, ती वाट तर केव्हाच विस्म्रुतीत गेलेली आहे.

कुणीतरी

कुणीतरी ग्रेस च्या कविता समझावुन सांगता काय ? काहीच कळत नाहीयं, एवढच नव्ह्रे तर ही कविता आपण आधी वाचली होती का नव्हती याचे भानही रहात नाहीयं.

रावण

"रावण" चित्रपटाच्या म.टा. मधे आलेल्या परीक्षणात, समिक्षेत तो चित्रपट किता अगम्य आहे, गुढ आहे, विचित्र आहे, विक्षितपणाने भरलेला, कशाचा कशाशी संबध नसलेला प्रचंड गुंतागुंताचा असलेला, न समजणारा . सहन करण्याची ताकद पणाला लावणारा, किती  वाईट आहे या बद्द्ल भरभरुन  लिहिले आहे.  चित्रपटला एकीकडॆ चांगलच झोडापुन काढलेले आहे.

आता पर्यंत तसे चित्रपटापासुन लांब राहिलेले राजाभाऊ म्हणातात

" तर मग हा चित्रपट आवर्जुन पाहिला पाहिजे "


Sunday, June 13, 2010

सिल्क फॅब - मुंबई

ही पोष्ट वाचणाऱ्याने आपल्या जोखमीवर व स्वःताच्या जबाबदारीवर वाचावी. हे वाचल्यानंतर जर कोणी भरपुर खर्च झाल्याची तक्रार केली तर ती ऐकली जाणार नाही, आपल्याच बायकोने हट्ट केला आणि नवऱ्याने तो न पुरवल्याबद्दल घरात भांडणे झाली तर या सर्वास राजाभाऊ वैयक्तीकरीत्या जबाबदार नाहीत.

राजाभाऊंना वाटले, आपण आपल्या बायकोपेक्षा स्मार्ट. आपल्या बायकोला आवडलेले बिहारच्या स्टॉलवरुल टसर सिल्क चे ड्रेस मटेरीयल आपल्याला आवडले नाही असे दर्शवायचे ,नको गं, खुप महाग आहे, गेल्याच वर्षी तुला कांथा सिल्कची साडी घेतली , परत नको, करत दहापंधरा ठिकाणी तिला फिरवत नाराज करायचे व बघ मी तुझे सारे ऐकतो, तुजे मन राखणॆ माझ्यासाठी खरं करत ते विकत घ्यायचे, बायको खुष तर राजाभाऊ खुष.

पण हा डाव राजाभाऊंच्या चांगलाच अंगाशी आला. या बायका मोठ्‍या हुशार, नवऱ्याला कसे उल्लु बनवत पटवायचे हे बरोबर जाणुन. या दहापंधरा स्टॉलच्या खेळात वाराणशीच्या स्टॉलवर आवडलेले ड्रेस मटेरीयलपण तिने आपल्या पदरी पाडुन घेतले.






वर्ड ट्रेड सेंटर, कफ परेडला सालाबाद प्रमाणॆ यंदालाही "सिल्क फॅब " हे भारतसरकार वस्त्र उद्योगालय आयोजीत सिल्कच्या साड्‍यांचे प्रदर्शन भरले आहे. देशाच्या विविध राज्यातुन सहकारी संस्था येथे आपला माल विकायला आलेल्या आहेत.

खरं म्हणजे आज राजाभाऊ येथे ओडीसी घेण्यासाठी गेले.

पण.

कशाला उगाच. खरचं नको.

रुक्षपणॆ आपल्या नवऱ्याचा रसभंग करायचे हेच यांचे काम.

या चार पैकी एक घ्यायची फार मनात होते, पण . आपल्या नवऱ्याच्या प्रत्येक गोष्टीला विरोध करणे हे या बायकांना चांगले जमते.

बरं झाले पैसे वाचले.

सिल्क फॅब प्रदर्शन व विक्री - मुंबई.



ही पोष्ट वाचणाऱ्याने आपल्या जोखमीवर व स्वःताच्या जबाबदारीवर वाचावी. हे वाचल्यानंतर जर कोणी भरपुर खर्च झाल्याची तक्रार केली तर ती ऐकली जाणार नाही, आपल्याच बायकोने हट्ट केला आणि नवऱ्याने तो न पुरवल्याबद्दल घरात भांडणे झाली तर या सर्वास राजाभाऊ वैयक्तीकरीत्या जबाबदार नाहीत.

राजाभाऊंना वाटले, आपण आपल्या बायकोपेक्षा स्मार्ट. आपल्या बायकोला आवडलेले बिहारच्या स्टॉलवरुल टसर सिल्क चे ड्रेस मटेरीयल आपल्याला आवडले नाही असे दर्शवायचे ,नको गं, खुप महाग आहे, गेल्याच वर्षी तुला कांथा सिल्कची साडी घेतली , परत नको, करत दहापंधरा ठिकाणी तिला फिरवत नाराज करायचे व बघ मी तुझे सारे ऐकतो, तुजे मन राखणॆ माझ्यासाठी खरं करत ते विकत घ्यायचे, बायको खुष तर राजाभाऊ खुष.

पण हा डाव राजाभाऊंच्या चांगलाच अंगाशी आला. या बायका मोठ्‍या हुशार, नवऱ्याला कसे उल्लु बनवत पटवायचे हे बरोबर जाणुन. या दहापंधरा स्टॉलच्या खेळात वाराणशीच्या स्टॉलवर आवडलेले ड्रेस मटेरीयलपण तिने आपल्या पदरी पाडुन घेतले.

वर्ड ट्रेड सेंटर, कफ परेडला सालाबाद प्रमाणॆ यंदालाही "सिल्क फॅब " हे भारतसरकार वस्त्र उद्योगालय आयोजीत सिल्कच्या साड्‍यांचे प्रदर्शन भरले आहे. देशाच्या विविध राज्यातुन सहकारी संस्था येथे आपला माल विकायला आलेल्या आहेत.

खरं म्हणजे आज राजाभाऊ येथे ओडीसी घेण्यासाठी गेले.

पण.

केशर आणि मलादाबादी दशैरी

उत्तम केशर आणि दशैरी आंबे असतांना बाजारु हापुसच्या मागे का लागावे ?

अंधेरीला अपनाबाजार मधे दशहरी आंबे त्या बोर्डाने विक्रीस ठेवल्याचे वाचले.

कधी तेथे जायला वेळ नसायचा, वेळ असेल तर पैसे सोबत नेलेले नसायचे व दोन्ही बरोबर असेल तर अपना बाजार मधे जायचे आहे हेच विसरले जायचे.

चांगले दशहरी आंबे खायचं राहुन गेलयं.

तुसडॆपणा

http://dilipkawathekar.blogspot.com/ यांच्या ब्लॉगवर मुकुल शिवपुत्र ऐकत असतांना आलेल्या दुरध्वनीला त्रासदायक व्यत्यय समजुन जर त्यावर तुटक तुटक संभाषण करत आपण किती तुसडॆपणा दाखवु शकतो हे राजाभाऊंनी आज दाखवुन दिले.

रहिये अब ऐसी जगह चलकर जहाँ कोई न हो,

जीव नुसता घुसमटतोय या मुंबईत. कधी एकदा पुण्याला कायमचा रहायला जातो असं झालयं. दुर सर्वांपासुन दुर, एकट्याने. स्वतंत्रपणॆ जगण्यासाठी. कंटाळा आला हे या अश्या आयुष्याचा.

रहिये अब ऐसी जगह चलकर जहाँ कोई न हो,
हम सुखन कोई ना हो पासबाँ कोई न हो,
पड़िये गर बीमार, तो न हो तीमारदार
और अगर मर जायें तो,
नौहाख्वाँ कोई न हो।

किती थैल्या घेतल्यात ?

हा म्हणतो त्याच्यापासुन सावध, त्याच्या पासुन लांब रहा
तो म्हणतो ह्याच्यापासुन सांभाळुन
मी तर म्हणतो दोघांपासुन आपण लांबच रहावे

Saturday, June 12, 2010

बहार आली

परवाला रात्रीला बहुदा दोनच्या सुमारास पाऊस सुरु झाला असावा तो पहाटे पर्यंत.

मस्त धुंदफुंद वातावरण तयार झाले.

गाडी चालवतांना बहार आली. वरळी सी फेस आल्यावर राजाभाऊंनी गाडीच्या काचा खाली केल्या, थंड पावसाळी हवा  अंगभर भरुन घेतली.

या पावसाळी वातावरणात सी लिंक वरुन गाडी चालवतांना बहार आली.


महाराज महाराज घात झाला

"महाराज महाराज, आधी अभय द्या "
"दिले- पुढे बोल"
"महाराज महाराज पडला, पडला"
"अरे , पाऊसना , तो १० जुनला पडायचाच होता, वेधशाळेचा अंदाज खरा ठरला म्हणायचं. "
"नाही नाही महाराज , तो पडला तो पडला ’
"आपल्या शेयरचा भाव ना, तो पण पडायचाच होतो "
"नाही नाही महाराज ,विधान परिषदेच्या निवडणुकीत आपला उमेदवार पडला "

महाराजांनी एक मंद स्मित केले.

विधान परिषदेच्या आमदारकीत अशी कोणती जादु आहे की ज्यासाठी घोडाबाजार मांडला जातो,
अशी कोणती त्या जागांमुळॆ मलई मिळते ( Return of Investment ? ) की त्यावर उमेदवार निवडुन आणावा कोट्यावधी रुपये खर्च केले जातात .यासाठी १०० कोटीची उलाढाल झाल्याचे वर्तमानपत्रात वाचनात येते. कशासाठी आमदारांचा पंचतारांकीत हॉटॆलमधे अज्ञातवासात (?) पाहुणचार केला जातो ?





Wednesday, June 09, 2010

कॉपर चिमनी, वरळी , मुंबई - मुळचे.

आज प्रथमच राजाभाऊंना आपण आपल्या आवडीच्या मरिन प्लाझा मधल्या बे व्हु मधे बुफे खायला जावु नये असे वाटत होते, सतत उठायचा कंटाळा आलेला, त्यात परत सोबत म्हातारी माणसे, त्या ऐवजी मस्त पैकी कॉपर चिमनी मधे जावुन शांतपणे मोघलाई जेवणाचा आस्वाद घ्यावा असे त्यांचे मत झाले.

कॉपर चिमनी, उत्कॄष्ट, चविष्ट, अस्सल मोघलाई खाना मिळण्याचे मुंबईमधले फार पुर्वी पासुनचे ठिकाण. जवळजवळ १८-१९ वर्षापुर्वी ते तेथे जेवायले गेले होते. त्या वेळी त्यांचे जेवण एवढे आवडले होते, एवढे आवडले होते  की आपण येथे नेहमी जेवायला यायचे असा त्यांनी ठाम निश्चय केला होता. हे सतत जायचे प्रकरण मधे इतका कालावधी लोटल्या नंतर अखेरीस साजरे झाले.

सुरवात झाली ती टॉमेटो सुप नी. त्या पाठोपाठ मागवले गेले ते आलु चटणीवाला व मकई मलाई शीग कबाब, मस्त पैकी त्या हिरव्या चटणी सोबत.

मुख्य जेवणात त्यांनी दम आलु व मलई कोफ्ता मागवला , सोबत ड्राय फुट्र्स व फळे भरलेला काबुली नान.



मजा आली. बऱ्याच दिवसाने चांगले जेवल्याचे समाधान मिळाले.

आज पंचाहत्तरीला पोचलेले आजोबा खुष झाले आणि राजाभाऊ पण, कारण येथे दर तसे रिझनेबल आहेत. VFM.
कॉपर चिमनी, वरळी , मुंबई

आज प्रथमच राजाभाऊंना आपण आपल्या आवडीच्या मरिन प्लाझा मधल्या बे व्हु मधे बुफे खायला जावु नये असे वाटत होते, सतत उठायचा कंटाळा येतो, त्यात परत सोबत म्हातारी माणसे, त्या ऐवजी मस्त पैकी कॉपर चिमनी मधे जावुन शांतपणे मोघलाई जेवणाचा आस्वाद घ्यावा असे त्यांचे मत झाले.

कॉपर चिमनी, उत्कॄष्ट, चविष्ट, अस्सल मोघलाई खाना मिळण्याचे मुंबईमधले फार पुर्वी पासुनचे ठिकाण. जवळजवळ १८-१९ वर्षापुर्वी ते तेथे जेवायले गेले होते. त्या वेळी त्यांचे जेवण एवढे आवडले होते की आपण येथे नेहमी जेवायला यायचे असा त्यांनी ठाम निश्चय केला होता. हे सतत जायचे प्रकरण मधे इतका कालावधी लोटल्या नंतर अखेरीस साजरे झाले.

सुरवात झाली ती टॉमेटो सुप नी. त्या पाठोपाठ मागवले गेले ते आलु चटणीवाला व मकई मलाई शीग कबाब, मस्त पैकी त्या हिरव्या चटणी सोबत.

मुख्य जेवणात त्यांनी दम आलु व मलई कोफ्ता मागवला , सोबत ड्राय फुट्र्स व फळे भरलेला काबुली नान.

मजा आली. बऱ्याच दिवसाने चांगले जेवल्याचे समाधान मिळाले.

आज पंचाहत्तरीला पोचलेले आजोबा खुष झाले.

वेध लागायला सुरवात झालेली आहे.

माझ्या  सोबत कोण कोण येणार ?

येत्या वर्षा दोन वर्षात हे वैभव धरणाच्या फुगवट्याखाली गाढले जाणार आहे, लुप्त होणार आहे, कायमचे नाहिसे होणार आहे.

हाईट , लिमीट वगैरे वगैरे

संध्याकाळी सुरु केलेल्या मुंबई - पुणे प्रवासाने नेहमी प्रमाणेच ५-६ तास घेतलेले. वाकडवरुन पुढे दरमजल करत वहाने बदलत पुढे जातांना नेमकी शेवटाची बस डोळ्यासमोरुन निघुन गेलेली, मध्यरात्र उलटुन गेल्यानंतर नकोसे झालेले हातातले जड सामानाचे ओझे आणि शरीराचा भार भुकेल्या पोटी वहात वहात , तंगडतोड करत , पायी चालत चालत, भटक्या  कुत्र्यांचा सोबतीने इमारतीच्या पायथ्याशी पोचता, हुश्श करत , पोचलो एकदाचा ह्या समाधानाने सुखावत उद्दवहानाची कळ दाबता, हाय रे  देवा, सारे नकोसे होवुन संतापाने, अगतिकपणे कपाळावर जोरात हात मारता,

"ही लिफ्ट आत्ताच बंद पडायला हवी होती ? "

नशिबात लिहिलेले सात मजले चढुन घरी पोचता, 

"हे भगवान , घराची चावी विसरलो "  

Tuesday, June 08, 2010

का आणि कसे ?

हल्ली दुसऱ्यांच्या विकेटी उडवणाऱ्या साहेबांचीच "विकेट उडाली " हे असे काही वर्तमानपत्रात वाचायला मिळते.

इंद्रायणी, शिवाजी नगर आणि मृत्युचे आमंत्रण

आधीच फलाट आणि ट्रेन यांच्यामधे माणुस आत सहजच पडावा, खाली रुळाखाली जावा येवढे अंतर ( सुरक्षितता म्हणजे काय रे भाऊ ? ) , त्यात इंद्रायणी, सोलापुर पर्यंत जाणारी  इंद्रायणी, फक्त दोन-चार मिनिटे शिवाजी नगरला थांबणारी इंद्रायणी, या येवढाश्या कमी वेळात आतली माणसं उतरणार, प्रवासी वर चढणार. त्यात आपण सारे बेशिस्तीचे.

या सावळ्या गोंधळात ट्रेन सुरु होते, धावती गाडी पकडण्याच्या प्रयत्नात, त्या चालत्या गाडीत  बायको, मुलांना चढवण्यात,  किंवा आपल्या म्हाताऱ्या बायकोला आधार देत वर चढवता चढवता एखादे म्हाताराम्हातारी, मुले , अर्धे प्रवासी आत, अर्धे बाहेर राहीलेले  खाली फलटावर पडतात, सुदैव त्यांचे ते फलटावरच पडतात, त्या गॅपमधुन खाली रुळावर पडुन गाडी खाली सापडत नाहीत.

बरं झाले

बरं झाले शनिवार, रविवारी पुण्यात " नभ मेघांनी आक्रमिले, तारांगण सर्व ही झाकुन गेले " म्हणण्यासारखी परिस्थिती नव्हती.  
वरना ये ऐसा नजारा कहा देखने मिलता ?
माणसे आपल्या जोड्या जुळवतात, पशुपक्षी देखिल आपापल्या जोड्या जुळवुन रहात, मग ग्रहताऱ्यांनी तरी का मागे रहावे ?

मावळतीकडॆ महातेजस्वी शुक्रमहाराज जणु माझ्यासाठीच उघडले आहे हे स्वर्गाचे द्वार करीत पुनर्वसू नक्षत्रात पोलक्स व कॅस्टर मधे बिराजमान झाले होते. 

आणि त्यांच्या मागोमाग मंगळस्वामी,
ते तर सिंहेमधल्या मघाशी उरीभेट , गळाभेट घ्यायला आतुर झालेले.  

मग गुरुदेवांनी तरी काय पाप केलयं ? चंद्रकोरी सोबतच, समावेतच  ते पुर्वेला उगवत होते.

हे केवळ ढग विरळ असल्यामुळे, सारे आकाश ढगांनी भरुन न गेल्यामुळे पहायला मिळाले.