Tuesday, March 31, 2009

बहावा अहाहा - गेल्या वर्षीचे फोटो

असे झाले तर

काल लोकसत्तामधे आचार्य कृपलानी बद्दल माहिती आली होती। एवढे मोठे व्यक्तिमत्व पण निवडणुकीत एका नगण्य उमेदवाराकडुन त्यांना पराभुत व्हावे लागले । निवडणुकीत काय होईल हे सांगणे कठिन असते । स.का.पाटिलांना, अगदी इंदिरा गांधींना देखील पराभव स्विकारायला लागला होता।
मतदारसंघ बदलल्यामुळे आपल्या राज्यातील हेवीवेट उमेदवारांचा पराभव झाला तर ?

Monday, March 30, 2009

नवे मंत्रीमंडळ कसे असावे.

ब्लॉगर मित्रांनी फार चांगली नावे सुचवली आहेत.

mannab - "नवे मंत्रीमंड्ळ": Your idea is great! But it all depends how the parties/alliances win or lose. What you name a few are really good. A few more such as Chandrashekhar (ex - commssioner), Mahesh Jethmalani, Ram Naik can be included. I suggest without considering any political connection in my mind.

सर्किट - "नवे मंत्रीमंड्ळ": pranab mukherjee and jasawant singh

Vivek Patwardhan - "नवे मंत्रीमंड्ळ": Here are three names:1. Anna Hazare - He can bring greater transparency and credibility to political leaders. They are perceved today as rogues of the first order.2. Chandrashekhar: who transformed Thane and Nagpur.3. Kiran Bedi: For obvious reasons.Character, Achievements and an ability to change world around them are my criteria. We need more like these persons.


How true. If we have such great persons leading our country nothing like it

Any more suggesstions ?

Sunday, March 29, 2009

नवे मंत्रीमंड्ळ

नवे मंत्रीमंडळात कोण कोण असावे असे मला वाटते ? सध्या थोडीच नावे सुचली आहेत.  

श्री. मनमोहन सिंग
श्री.चिदंम्बरम
श्री. अरूण जेटली
श्री.सुरेश प्रभु
श्री. पॄथ्वीराज चव्हाण
श्री. अंबुमणी रामदास


आपल्याला काय वाटते ? त्यात कोणते चांगले नेते असावे ? पक्षविरहीत नावे सुचवा.

 

चैत्राचे आगमनअसा चैत्र नेहमी यावा, आंबे डाळ व कैरीचे पन्हे घेवुन

सायकल मार्ग फक्त


ज्या रस्तांवरुन हज्जारो, लाखो पादचारी जीव मुठीत घेवुन, अनेक अडीअडचणीचा सामना करत , असुरक्षीततेने चालत असतात त्यांच्या साठी "पादचारी मार्ग फक्त " संबंधीत खात्यांना करावेसे वाटत नाहीत ना त्या पादचाऱ्यांना वाटते असे काही पदपाथ असु शकतात.


"सायकल मार्ग ’ हा एक प्रोजेक्ट असु शकतो त्यची जाहीरात करता येते, आम्ही काय काय केले हे सांगता येते म्हणुन कदाचीत हल्ली पुण्यात सायकल मार्ग बांधले जात असतील.

सौ.वर्षा नेने यांचे शास्त्रीय व सुगम गायन
काल सुरेख गाणॆ ऐकले, बऱ्याच दिवसांनी, सौ.वर्षा नेने यांचे. 

संस्कार भारती यांनी आयोजीत केलेल्या मासीक संगीत साधना मधे. 

पुरीया धनश्रीने सुरु झालेली मैफील मग भजने, नाट्यगीते यांनी फुलत गेली.

श्री. शौनक अभिषेकी गात असलेले व लोकप्रिय भजन "अभीर गुलाल उधळीत रंग " हे भजन त्यांनी वेगळ्याच चालीत म्हटले. छान वाटले ऐकायला.

आणि गाणॆ संपल्यानंतर तर आणखीनच मजा आली,  चक्क चैत्राचे प्रयोजन साधुन चविष्ट आंबाडाळ वाटण्यात आली.

Saturday, March 28, 2009

सारे काही पॉवर साठी

कालचे दोस्त आजचे प्रतिस्पर्धी आहेत, आजचे दुष्मन उद्याचे सोबती आहेत.    

धर्म आणि राजकारणाच्या खेळात जुन्या भिडुंनी आपली चाल बदलली आहे आणि त्यांच्या जागी नव्या दमाचे खेळाडु मैदानात उतरले आहेत. सुरु केलेला खेळ धड सोडवत ही नाही धड पुढे खेळताही येत नाही.

नशीब रे आर्य चाणक्याने या युगात जन्म घेतला नाही. अन्यथा त्याच्यावरच राजकारण शिकण्याची पाळी आली असती. 

न्याय

केवळ राजकीय पक्षांवर होणारा परीणाम या एकाच ऍंगल बद्दल वर्तमानपत्रांनी बातम्यांमधे लिहीले आहे.
 
गुजरात मधल्या दंगलीत धर्मांधांच्या हाती बळी पडलेल्या, होरपळालेल्या निष्पाप , अजाण माणसे, स्वर्वस्व गमावलेली, त्यांच्यामागे माघारी राहिलेल्यांच्या आयुष्य, यांचे काय ?
 
आणखी एक प्रश्न मला नेहमी सतवतो. 

चिथावणी मिळाल्यावर, भावना भडकवल्या गेल्या नंतर, द्वेषाची वातावरण निर्मीती केली गेल्या नंतर जमावाचे हातुन हिंसेचे जे अमानवी थैमान घातले जाते, त्या जमावातल्या व्यक्तींच्या मनावर हे कॄत्य घडुन गेल्यानंतर, जेव्हा एक जमाव म्हणुन त्यांचे अस्तित्व नाहिसे होवुन  ती एक व्यक्ती  म्हणुन शिल्लक रहाते तेव्हा आपल्या हातुन घडुन गेलेल्या आपल्या पाशवी वागणुकीचे काय परिणाम होत असतील ?   
 
दै.सकाळ- 
मायाबेन कोडनानी यांना गुजरात उच्च न्यायालयाने आज गोध्रा प्रकरणी अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला आहे. गोध्रा प्रकरणी क्लीनचीट मिळालेले गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे

लोकसत्ता - या घडामोडीमुळे निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे स्टारकॅम्पेनर नरेंद्र मोदी यांना हा मोठाच हादरा मानला जात आहे.
 
महाराष्ट्र टाईम्स - विशेष म्हणाजे मोदीच्या मतदारसंघातील सभेसाठी भाजप नेते लालकृष्ण अडवाणी शुक्रवारी गुजरातमधे असतांनाच भाजपाला हा धक्का बसला. 

सीता अशोक

काल डॉ.सानेबाईंनी चैत्रपालवी या कार्यक्रमामधे सीता अशोक आणि कालीदासाचा ओझरता उल्लेख केला.

काय म्हणातो महाकवी कालीदास सीता शोक बद्दल .भोवती वसंत बहरला होता. सारी सॄष्टी रंगली होती. दंगली होती, फुलली होती.गंधली होती.गात होती.झुलत होती.नाचत होती.
मधेच हा अशोक होता -
चांगला डवरलेला. पोसलेला. पण अजुन न फुललेला. मुका. एकटाच. जणु प्रियेची प्रतीक्षा करणारा.
संगोत्सुक !
तो वाट पहात असतो, ऋतुमयीची.
तिने यायचे. आपल्या कोवळ्या पावलांनी त्याला स्पर्श करायचा. अळीत्याने पाय शॄंगारुन, अलंकार घालून पैंजण छुमकवीत होणारा हळुवार स्पर्श.
मग तो रोमांचित होणार. शहरणार. फुलणार.


पाय लावुन झाल्यावर मालविकेने विचारले, ’सये, आपण याचे एवढे लाड केले. आता हा फुलेल ना ?"
न फुलला तर हा उणेपणा तुझा नव्हे.
असे का ?
इतक्या सुंदर पावलांचा स्पर्श होवुनही जर तो फुलला नाही तर तो अरसीक ठरेल. वेडा ठरेल

अग्निमित्राला नशिबाचे नवल वाटले -
- जो अरसिक ठरण्याचा संभव होता त्याला प्रीतीचे समर्पण झाले होते
- मालविकेची ही पावले -
- जणु फुललेली सुंदर लाल जोडकमळे.
- तिचे शेलटे लांब पाय ते या कमलाचे नाल.
- कटितळीचे रूप-वैभव ती या कमलवेलीची कंदमूस.
- नूपुरांची छुमछुम ती जणू तिच्या अंतरीचे जीवनसंगीत
- या साऱ्याचे वैभव या अशोकाला लाभले.
- आणि हा अरसिक शांत उभा आहे.
-अजुन फुलांनी फुटलेला नाही.
-हेच भाग्य माझे असायला हवे होते.
- मी या वेळी फूल फूल फुललो असतो.
- अरसिक अशोका !
-माझ्यासारख्या प्रेमिकाशी तुझी तुलना करतात.
- तूही रमणीच्या स्पर्शासाठी झूरतोस असे म्हणातात.
- ते सारे खोटे आहे.

अशोक आजच फुलला होता. -
अगदी भरभरुन फुलला होता -
आजवर कधी नाही असा उमलला होता.
: याचे हे सौंदर्य अतुलनीय आहे.
: असाधारण आहे.
: सारी वसंतश्री याच्या वरुन ओवाळून टाकावी असे आहे.
: आधी फुललेली झाडे उगाच क्षणाचा दिमाग दाखवून गेली.
त्या सर्वांची एकत्र शोभा आता याच्यावर फुललेली आहे.


ज्या अशोकाचे, महाकवी कालीदासाने "माविकाग्निमित्र" या कादंबरीत मुक्तहस्ते वर्णन केलय. अग्निमित्र व माधवीचे, मालविकेचे मिलन घडुन आणण्यासाठी त्याच्या खुबीने वापर केलाय, त्या अशोकाची आठवण जरा अंमळ उशीराच झाली. ( वरील भावानुवाद - "मालविका " लेखक आनंद साधले मधुन साभार. "

पशुपक्षी अवतरले आहेत उद्यानामधेमुंबईच्या मलबार हिल येथील हॅंगीग गार्डन मधे झुडपे विशिष्ट पध्दतीने छाटुन त्याला वेगवेगळॆ आहार देण्या्च्या कलेचा मुक्त हस्ते वापर केला आहे.संजीवनी ओळखता न आल्यामुळे सारा पर्वत घेवुन उड्डान करणारे हे मारुतीराया.

Men at Work


Friday, March 27, 2009

स्वागत चैत्रमासाचे


चैत्रपालवीने आज चैत्रातली पहाट उगवली. सानीया पा्टणकरांचे गाणे ऐकुन या नववर्षाची सुरवात मोठॊ बहारदार झाली.

सानीया पाटणकरांचे गाणे आणि शर्वरी जमेनीसचे नृत्य.

और क्या चाहीये जीने के लीये

ओल्या काजुगराची भाजी और आमरस के सीवा   शिव शंकर महादेव , जटा गिरधर त्रिनेत्र सुंदर


वड हे शिव शंकर महादेवाचेच रुप, पार्वतीच्या शापाने,  ही कथा आजच कळली. 

शंकराच्या जटा आणि या वडाच्या गुढ पारंब्या.  

चल ग सखये कुंजवनी गुजगो्ष्टी कराया

चैत्र पालवीकाही वॄक्षांना नाही येत फुल फुल् फुलता या बसंतात.

 मग ते आपले देखणॆपण असे दाखवुन देतात. 

पिंपळाची पालवी नेहमीत मोहवीत आली आहे, भुरळ घालत आली आहे

राघुंची मोठी चैन आहे या चैत्रात

नाभी के दरबार सब मिल गावो बसंत की मुबारक

वसंतवैभव

कांदे काय शेतात पिकतात ?

काही दिवसापुर्वी मी एक  शेताचा फोटॊ ब्लॉगवर टाकला होता व  माहीत नसल्यामुळे ही शेती कसली असे विचारले होते.  बऱ्याच जणांनी मला ही शेती कांद्याची आहे हे सांगीतले. पण त्यांचे उत्तर साफ चुकले असावे.

कांदे काय शेतात पिकतात ? ते तर झाडाला लागतात. 

खोटे वाटते , हा घ्या पुरावा


ही शेती.गुढीपाडवा आणि नवसंवत्सर शालिवाहक

गुढीपाडवा आणि नवसंवत्सर शालिवाहक शके १९३१ साठी अत्यंत मन:पूर्वक आणि हार्दिक शुभेच्छा.
हे नवीन वर्ष सर्वांना आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे, सुख-समाधानाचे जावो.

Wednesday, March 25, 2009

राजाभाऊ आता गैरसमज टाळा

आता पर्यंत अनोळखी माणासांकडुन ई मेल फक्त लौटरी , बक्षीस लागले आहेत किंवा मला भारतात पैसे पाठवायचे आहेत अश्या बोगस कारणासाठी, फसवणुक करण्यासाठी यायच्या.

परवा चक्क लग्नाचे प्रपोजलसाठी ईमेल आली.

'आपण दिलेल्या जाहिरातीला उत्तर म्हणुन सोबत माझ्या बहीणी्ची माहीती पाठवत आहे "

जाहिरात ????

बायकोला गंमत म्हणुन ही ई मेल दाखवली, नशीब तिने हा सर्व प्रकार लाईटली घेतला.

मग दुसऱ्या दिवशी परत ती ईमेल उघडुन व्यवस्थीत पाहिली.

"आपल्या मुलासाठी हे प्रपोजल पाठवत आहे तेव्हा त्याचा विचार करावा ....... "

राजाभाऊ आपली पन्नासी आता काही वर्षात जवळ येईल, आपला मुलगा लवकरच उपवर होईल त्याचा विचार करा आता.

Sunday, March 22, 2009

ही शेती कसली ?


मंदीच्या काळात आणखी एक बांधकाम कंपनी बंद पडली. ???

कधी कधी शंका येते की या मंदीच्या दिवसात कसे सारे बांधकाम प्रोजेक्ट थंडावतात, घरांना, जागेला उठाव नसल्यामुळे बांधकाम स्थगित केले जाते त्यातला तर हा प्रकार नसावा. 

पण बहुदा तसे नसावे , मंदी तर ही अलीकडची आणि आपण बांधकाम करायला काढलय हे तर ते बिल्डर गेले कित्येक वर्षे विसरुनच गेलेले आहेत.

कि आपण बांधत असलेली बांधकामं आता विकली जात नसल्यामुळॆ मग हे व्यवसायाचे डायवर्टसीफीकेशन तर नसावे ना ? 

--------
दै.सकाळ, पुणॆ, २२/०३/२००९

मुख्खार अब्बास नकवींचे विधान : "अयोध्यात राम मंदीर बांधायला भाजपा ही काही बांधकाम कंपनी नाही !"

पहेला नशा पहेला खुमार

रंग केसरिया सिर पागा बंधलेसाहित्यसंमेलने

राज्य सरकाराने आता या साहित्यसंमेलनावर करमणुक कर लावायला सुरवात करायला हवी.

भांडणे, मारा्माऱ्या, कुटाकुटी, धक्काबुक्की, वादविवाद, उखाळॆपाखाळॆ , निंदानालस्ती, चांगली मस्त करमणुक होते या संमेलनाचे वृतांत वाचतांना. 

तेव्हा आता ही संमेलन करमणुक करणारी साधने मानुन त्या वर करमणुक कर लावायला हवा

Saturday, March 21, 2009

Hospitalisation


Just out from Hospital

शामे अवध .. सुभे बनारस.शामे अवध .. सुभे बनारस.

अवध आणि बनारस, या दोन्ही शहरांची प्रकॄती आणि प्रवॄत्ती , माहोल अलग अलग, दोन्हींच्या तबियतीत, अंदाज मधे जमीन अस्मानाचा फरक.

बनारस म्हटलं की डोळ्यासमोर येते ती पवित्र गंगा नदी, तिच्या किनाऱ्यावरचे सुरेख घाट, काशी विश्वेश्वराचे मंदिर, धार्मिकतेचे प्रतिष्ठान लाभलेले हे शहर जेथे साहीत्य , संकॄती, कला यांचा मिलाप होतो.

ती देवळे त्यात मंगल प्रातःस्वर उमटणारी बिसमिल्ला खां साहेबांची शहनाई, ते शास्त्रीय
संगीताचे माहेरघर बनारस, खरच याचा बाज काही निराळाच.

अवध. हसीन , रंगेल, रंगीन, गुलजार, शेरोशायरीने बहरलेले शहर .

यांचे हे सारे बदलते रंग यांचे यथार्थ प्रगटीकरण केले गेले ते नेहरु सेंटर ने सादर केलेल्या आणि काझी साहेबांनी दिग्दर्शीत केलेल्या "शामे अवध .. सुभे बनारस" या कार्यक्रमात.

कथ्थक , गाणॆ, बजावणॆ , शहनाई वादन , रागदारी कंठ संगीत , मिर्झा गालीब, बहादुर शहा जफर , सर्व रुप पकडण्याच्या प्रयास केला गेला या सादरीकरणात.

ख्प मज लुटली.

आंबेवाले कार्लेकर

यंदाला

गेल्या वर्षीचा स्टॉल

गेल्या काही वर्षात आंब्याच्या व्यापाऱ्यांनी, दलालांनी, आणि विक्रेत्यांनी हा सम्राटाचे अवमुल्यन करुन टाकले आहे. पैश्याच्या लोभाने कोवळे फळ लवकर झाडावरुन उतरवणॆ, कॄत्रीम रसायनांचा मारा करुन ते अकाली पिकवणॆ, व काळॆ पडलेले, सुरकुतलेले, न बघवणारे रसहीन, गंधहीन फळ चढ्या दरात अज्ञानी ग्राहकाच्या गळी उतरवणॆ असे प्रकार. 

आणि मग या परिस्थितीत असली, रुचकर, चविष्ट, सुवासीक आंबे, बागेतुन थेट ग्राहकांपर्यंत पोचावे यासाठी अनेक ठिकाणी आंबा महोत्सव भरवण्यात येवु लागले. 

दोन एक वर्षापुर्वी अशाच एका आंबा महोत्सवात आमची गाढ पडली देवगढच्या सौ. मुग्धा कार्लेकरांशी , आणि उत्तम दर्जाचे, अस्सल, ओरीजनल आंबे खाण्यासाठी शोध घेत रहाण्याचा आमचा प्रवास तेथे संपला. आता इतरत्र कोठेही बेभरवश्याची बोली करण्याचे प्रयोजनच राहीले नाही. जे फळ हवे होते, जसे हवे होते ते मिळाले.

मग आता दरवर्षी मार्च महिना आला की वेध लागतात केव्हा एकदा केव्हा बरे  सौ. मुग्धा कार्लेकर मुंबईत आंबे घेवुन येणार याचे. यंदाला बायकोने फर्मान काढले , मला गुढी पाडव्याला काहीही करा पण मला  आंबे पाहिजेत म्हणजे पाहिजेत. मग राजाभाऊंवर धर्मसंकट उभे राहिले . अजुन पर्यंत तरी त्या मुंबईत केव्हा येणार याची खबरबात नव्हती आणि इतरत्र कोठेही आंबे विकत घेवुन ते खाण्याचे अनाठायी धाडस करण्याची त्यांची इच्छा नव्हती, बाजारात आंब विकत घेवुन खाणे हे त्यांच्यासाठी महापाप

काल सकाळी देवगढला फोन लावला चौकशी करण्यासाठी आणि एक आश्चर्याचा धक्का बसला. 

सौ. मुग्धा कार्लेकरांनी मुंबई मधे चक्क दुकान घेतलय , दादरला, गोडबोले स्टोरच्या बाजुला, कॅनरा बॅंके समोर, वैद्य रोडवर आणि त्याचे आजच उदघाटन आहे.

मग काय . संध्याकाळी झाली खरेदी. 

आणि आता काय पुढील दोन महिने नुसते मनोसक्‍त कार्लेकरांच्या आंब्यांचा आस्वाद घेणॆ. 

कारण अस्सल , सुमधुर, नैसर्गीकरित्या पिकलेले फळ जो कोणी एकदा चाखेल तो परत दुसऱ्या कोणत्याही आंब्याकडे कशाला पाहेल ? 

Friday, March 20, 2009

राज्य लावणी महोत्सव

राजाभाऊ आवरा की आता स्वतःला, नाहीतर होईल की तुमचा सुद्द्धा मास्तर "पिंजरा" मधला. चालले आपले ढोलकीवरची थाप आणि घुंगरुचा नाद ऐकला की. वळली आपली पावले आपसुक. 

राजाभाऊ, हे सांस्कृतीक कार्य संचालनालय, आणि टाटा वाले तुमाला येडाखुळा करुन सोडणार की काय। राव हे तमाशाचे खुळ बर नव्हे

तर मग संपला, एकदाचा. "राज्य लावणी महोत्सव ".

तीन दिवसीय राज्य लावणी महोत्सवाची काल रात्री सांगता झाली. हि रात्र दणाणुन सोडली, गाजवली ती छबु लोचना अंतरवेलीकर यांच्या कलापथकाने. नादावलेल्यांनी, चार चार, पाच पाच वेळा परत परत वन्स मोअर देत " मला म्हणतात "डोंगरची मैना" ही लावणी सादर करायला लावली। या बाईंनी फड जिंकला.


या कलापथका व्यतिरीक्त काल राजश्री काळे नगरकर आणि रेखा सारीका केजकर यांनी देखील लावणी महोत्सव मधे भाग घेतला.

Wednesday, March 18, 2009

राज्य लावणी महोत्सव भरलाय

सणसणीत शिट्टी हाणायला शिकायला पाहिजे होते.

रात्र उत्तरोत्तर रंगत गेली, "संक्रांतीला भेटु अशी केली होती बोली ....., आली बाई पंचमी रंगाची " या लावणीच्या नादात, रंगात रंगुन जात, नादावत, खुळावत, बेफान, बेहोश होत, वन्स मोअर, वन्स मोयरच्या आग्रही मागणीत.

राज्य लावणी महोत्सव भरलाय, टाटा थिएटर, एन.सी.पी.ए , मधे काल, आज आणि उद्या.

काल रेश्मा-वर्षा परितेकर, शुकुंतला लोणंदकर आणि साधना-संगीता नगरकर यांच्या कलापथकांनी नुसते टाटा थिएटर दणाणुन सोडले. एका पेक्षा एक सरस अश्या पारंपारिक लावण्या सादर करत.
"धरी माझ्या पदराला"
"पंचकल्याणी घोडा अबलख"
"जवानीच दुकान माझ फुटल, या पाव्हण्यान सार काही लुटल "
" राया मला जेजुरी दाखवा " एक छकडा सादर केला गेला
"माझ्या उरावर सवत केली नवऱ्याने, राया मी तुमच्याशी बोलायची नाही"

अश्या अनेक लावण्यांनी काळीज नुसते लुटले ना.

आणि मग

"बाई मी लाडाची कैरी मी पाडाची " या शेवटी सादर झालेल्या लावणीला तर येवढ्या शिट्या वाजवल्या गेल्या, बाप रे बाप।

या चवलीच म्हनं हाय लावनी ठसक्यात झाली पायजल।

मेणाहुनी मऊ आम्ही

आम्हाला जे योग्य वाटेल तेच योग्य

Saturday, March 14, 2009

व्हाईट_लिली ऍड नाईट_रायडर
"मला यात आपले प्रतिबिंब दिसले". इती राजाभाऊंची बायको. 

आज लग्नानंतर बहुदा पहिल्यांदाच आपल्याच विश्वातुन बाहेर पडत आपल्या बायकोला जे हवे असते ते देण्याचा प्रयत्न केला. राजाभाऊ तिला चक्क नाटकाला घेवुन गेले, तिला नाटकं पहाणे आवडते, ती तशी कॉलेजजीवनात नाटकात कामबीम करायची हे ठावुक असुनही गेल्या वीस वर्षात पाहिलेले हे कदाचीत पहिलेच नाटक असावे. ( तसं राजाभाऊंनी पण एकदा नाटकात काम करण्याचे धाडस केले होते, पण ते नाटक धाडकन आपटले होते कदाचीत त्यांच्याच मुळॆ ) 


फारच वाईट राजाभाऊ फारच वाईट वागलात तुम्ही प्रत्यक्षात. अगदी त्या नाटकातील पात्रे प्रत्यक्ष भेटीत जशी वागतात तशेच.

उगीच नाही ती म्हणाली " मला यात आपले प्रतिबिंब दिसले." 

"मग भेट ना मला माझ्या ब्लॉग वर , नाही वागणार मी विचीत्र, खुप चांगला वागवीन मी तेथे तुला "


तर काय , आज एक मस्त नाटक पाहिले. बेहद्द खुश तबीयत,   अधुन मधुन दिलखुलास हसणॆ, मस्त पैकी दाद देणॆ कलावंतांच्या अदाकारीला. बढीया. 

व्हाईट_लिली ऍड नाईट_रायडर,  इंटरनेट वर नेहमी इंटरेस्टींग चॅटीग करताकरता प्रत्यक्ष भेटायचे ठरवतात, झालच तर आयुष्यातही एकत्र ऐण्यासाठी. तिचा करारनामा असतो , लग्नाआधी शरीरसंबध ठेवुन आपण एकामेकाला अनुरुप आहे की नाही त्याची चाचणी घेण्याची आणि मग त्याची ही अट असते २४ तास आपण एकत्र एकामेकाच्या सहवासात घालवुन मग ठरवुया, पुढे पावुल टाकायचे की नाही ते.

ते भेटतात, ठरवल्याप्रमाणॆ करतात देखील . 

पण ............


म्हणुन राजाभाऊचे देखील बायकोला सांगणे असते " माझ्याशी सुसंवाद साधायचा असेल तर मग  भेट तर ..........., जलेम्बु, जलेम्बु, जलेम्बु " 

रसीका जोशी आणि मिलींद फाटक सिंपली टेरीफिक. मस्त कामं केली आहेत.       


फोटो वरील ब्लॉगवरुन.

व्हाईट_लिली ऍड नाईट_रायडर

"मला यात आपले प्रतिबिंब दिसले". इती राजाभाऊंची बायको. 

आज लग्नानंतर बहुदा पहिल्यांदाच आपल्याच विश्वातुन बाहेर पडत आपल्या बायकोला जे हवे असते ते देण्याचा प्रयत्न केला. राजाभाऊ तिला चक्क नाटकाला घेवुन गेले, तिला नाटकं पहाणे आवडते, ती तशी कॉलेजजीवनात नाटकात कामबीम करायची हे ठावुक असुनही गेल्या वीस वर्षात पाहिलेले हे कदाचीत पहिलेच नाटक असावे. ( तसं राजाभाऊंनी पण एकदा नाटकात काम करण्याचे धाडस केले होते, पण ते नाटक धाडकन आपटले होते कदाचीत त्यांच्याच मुळॆ ) 


फारच वाईट राजाभाऊ फारच वाईट वागलात तुम्ही प्रत्यक्षात. अगदी त्या नाटकातील पात्रे प्रत्यक्ष भेटीत जशी वागतात तशेच.

उगीच नाही ती म्हणाली " मला यात आपले प्रतिबिंब दिसले." 

"मग भेट ना मला माझ्या ब्लॉग वर , नाही वागणार मी विचीत्र, खुप चांगला वागवीन मी तेथे तुला "


तर काय , आज एक मस्त नाटक पाहिले. बेहद्द खुश तबीयत,   अधुन मधुन दिलखुलास हसणॆ, मस्त पैकी दाद देणॆ कलावंतांच्या अदाकारीला. बढीया. 

व्हाईट_लिली ऍड नाईट_रायडर,  इंटरनेट वर नेहमी इंटरेस्टींग चॅटीग करताकरता प्रत्यक्ष भेटायचे ठरवतात, झालच तर आयुष्यातही एकत्र ऐण्यासाठी. तिचा करारनामा असतो , लग्नाआधी शरीरसंबध ठेवुन आपण एकामेकाला अनुरुप आहे की नाही त्याची चाचणी घेण्याची आणि मग त्याची ही अट असते २४ तास आपण एकत्र एकामेकाच्या सहवासात घालवुन मग ठरवुया, पुढे पावुल टाकायचे की नाही ते.

ते भेटतात, ठरवल्याप्रमाणॆ करतात देखील . 

पण ............


म्हणुन राजाभाऊचे देखील बायकोला सांगणे असते " माझ्याशी सुसंवाद साधायचा असेल तर मग  भेट तर ..........., जलेम्बु, जलेम्बु, जलेम्बु " 

रसीका जोशी आणि मिलींद फाटक सिंपली टेरीफिक. मस्त कामं केली आहेत.       

जिंकलो रे बाबा आखिरीस

तळीरामा काय रे तुझी ही दशा

छत्रपती शिवाजी महाराज
महाराजांचा या मॉडॆल वरुन एक देखणा पुतळा बनवला गेला, तो कोणी बनवला, तो आहे कुठे आणि त्याचे वैशिष्ठ काय ?

जीवलगा , राहिले दुर घर माझे


त्या पल्लड या दिवाण्याचा आबुदाना

अरे वेड्‍या ही पानगळती नव्हे, कुणी सुंदरी श्रुंगार कराया आपला सारा साजश्रुंगार उतरवुन ठेवत आहे


गेल्या वर्षी , ज्याने वेडापिसा करुन सोड्ला होता तो हा अमलताश


का बरे हा असा ओकाबोका !

फार आशेने गेलो होतो पहावया याचे सौदर्य बेमौसमी, एका खोट्या इच्छेने, पण पदरी पडली ती निराशाच. वास्तविक पहाता बहाबा डवरायला अजुन अवकाश आहे , तरी पण बालेवाडीच्या आवारातील एक छोटुसा बहावा फुललेला पाहिला आणि गेल्या वर्षी धारेश्वराच्या अंगणात फुलेलेले याचे रुप आठवले, म्हटले एक चक्कर टाकावी, असे होवु नये बहार येवुन गेला आणि आपल्याला कळालेच नाही.


जेव्हा जेव्हा मी हे निष्पर्ण वॄक्ष पहातो तेव्हा तेव्हा श्री नरेंद्र सिनकर यांच्या बहुदा "माझे रशियातील दिवस " या पुस्तकातील एक शेर आठवतो. मुळ शेर काही लक्षात नाही.


"अरे वेड्‍या ही पानगळती नव्हे, कुणी सुंदरी श्रुंगार कराया आपला सारा साजश्रुंगार उतरवुन ठेवत आहे " अश्या काहीश्या अर्थाचा.

हा ओकाबोका अमलताश पाहिला आणि आज त्याचा अर्थ उमजला. 

असं आहे काय.       

Wednesday, March 11, 2009

बालाजी

बालाजी भरपुर धन दे रे बाबा, किती तरी कॄत्रीम गरजा अपुऱ्या राहिल्यत पैश्या अभावी