सणसणीत शिट्टी हाणायला शिकायला पाहिजे होते.
रात्र उत्तरोत्तर रंगत गेली, "संक्रांतीला भेटु अशी केली होती बोली ....., आली बाई पंचमी रंगाची " या लावणीच्या नादात, रंगात रंगुन जात, नादावत, खुळावत, बेफान, बेहोश होत, वन्स मोअर, वन्स मोयरच्या आग्रही मागणीत.
राज्य लावणी महोत्सव भरलाय, टाटा थिएटर, एन.सी.पी.ए , मधे काल, आज आणि उद्या.
काल रेश्मा-वर्षा परितेकर, शुकुंतला लोणंदकर आणि साधना-संगीता नगरकर यांच्या कलापथकांनी नुसते टाटा थिएटर दणाणुन सोडले. एका पेक्षा एक सरस अश्या पारंपारिक लावण्या सादर करत.
"धरी माझ्या पदराला"
"पंचकल्याणी घोडा अबलख"
"जवानीच दुकान माझ फुटल, या पाव्हण्यान सार काही लुटल "
" राया मला जेजुरी दाखवा " एक छकडा सादर केला गेला
"माझ्या उरावर सवत केली नवऱ्याने, राया मी तुमच्याशी बोलायची नाही"
अश्या अनेक लावण्यांनी काळीज नुसते लुटले ना.
आणि मग
"बाई मी लाडाची कैरी मी पाडाची " या शेवटी सादर झालेल्या लावणीला तर येवढ्या शिट्या वाजवल्या गेल्या, बाप रे बाप।
या चवलीच म्हनं हाय लावनी ठसक्यात झाली पायजल।
No comments:
Post a Comment