Saturday, March 21, 2009

आंबेवाले कार्लेकर

यंदाला

गेल्या वर्षीचा स्टॉल

गेल्या काही वर्षात आंब्याच्या व्यापाऱ्यांनी, दलालांनी, आणि विक्रेत्यांनी हा सम्राटाचे अवमुल्यन करुन टाकले आहे. पैश्याच्या लोभाने कोवळे फळ लवकर झाडावरुन उतरवणॆ, कॄत्रीम रसायनांचा मारा करुन ते अकाली पिकवणॆ, व काळॆ पडलेले, सुरकुतलेले, न बघवणारे रसहीन, गंधहीन फळ चढ्या दरात अज्ञानी ग्राहकाच्या गळी उतरवणॆ असे प्रकार. 

आणि मग या परिस्थितीत असली, रुचकर, चविष्ट, सुवासीक आंबे, बागेतुन थेट ग्राहकांपर्यंत पोचावे यासाठी अनेक ठिकाणी आंबा महोत्सव भरवण्यात येवु लागले. 

दोन एक वर्षापुर्वी अशाच एका आंबा महोत्सवात आमची गाढ पडली देवगढच्या सौ. मुग्धा कार्लेकरांशी , आणि उत्तम दर्जाचे, अस्सल, ओरीजनल आंबे खाण्यासाठी शोध घेत रहाण्याचा आमचा प्रवास तेथे संपला. आता इतरत्र कोठेही बेभरवश्याची बोली करण्याचे प्रयोजनच राहीले नाही. जे फळ हवे होते, जसे हवे होते ते मिळाले.

मग आता दरवर्षी मार्च महिना आला की वेध लागतात केव्हा एकदा केव्हा बरे  सौ. मुग्धा कार्लेकर मुंबईत आंबे घेवुन येणार याचे. यंदाला बायकोने फर्मान काढले , मला गुढी पाडव्याला काहीही करा पण मला  आंबे पाहिजेत म्हणजे पाहिजेत. मग राजाभाऊंवर धर्मसंकट उभे राहिले . अजुन पर्यंत तरी त्या मुंबईत केव्हा येणार याची खबरबात नव्हती आणि इतरत्र कोठेही आंबे विकत घेवुन ते खाण्याचे अनाठायी धाडस करण्याची त्यांची इच्छा नव्हती, बाजारात आंब विकत घेवुन खाणे हे त्यांच्यासाठी महापाप

काल सकाळी देवगढला फोन लावला चौकशी करण्यासाठी आणि एक आश्चर्याचा धक्का बसला. 

सौ. मुग्धा कार्लेकरांनी मुंबई मधे चक्क दुकान घेतलय , दादरला, गोडबोले स्टोरच्या बाजुला, कॅनरा बॅंके समोर, वैद्य रोडवर आणि त्याचे आजच उदघाटन आहे.

मग काय . संध्याकाळी झाली खरेदी. 

आणि आता काय पुढील दोन महिने नुसते मनोसक्‍त कार्लेकरांच्या आंब्यांचा आस्वाद घेणॆ. 

कारण अस्सल , सुमधुर, नैसर्गीकरित्या पिकलेले फळ जो कोणी एकदा चाखेल तो परत दुसऱ्या कोणत्याही आंब्याकडे कशाला पाहेल ? 

No comments: