केवळ राजकीय पक्षांवर होणारा परीणाम या एकाच ऍंगल बद्दल वर्तमानपत्रांनी बातम्यांमधे लिहीले आहे.
गुजरात मधल्या दंगलीत धर्मांधांच्या हाती बळी पडलेल्या, होरपळालेल्या निष्पाप , अजाण माणसे, स्वर्वस्व गमावलेली, त्यांच्यामागे माघारी राहिलेल्यांच्या आयुष्य, यांचे काय ?
आणखी एक प्रश्न मला नेहमी सतवतो.
चिथावणी मिळाल्यावर, भावना भडकवल्या गेल्या नंतर, द्वेषाची वातावरण निर्मीती केली गेल्या नंतर जमावाचे हातुन हिंसेचे जे अमानवी थैमान घातले जाते, त्या जमावातल्या व्यक्तींच्या मनावर हे कॄत्य घडुन गेल्यानंतर, जेव्हा एक जमाव म्हणुन त्यांचे अस्तित्व नाहिसे होवुन ती एक व्यक्ती म्हणुन शिल्लक रहाते तेव्हा आपल्या हातुन घडुन गेलेल्या आपल्या पाशवी वागणुकीचे काय परिणाम होत असतील ?
दै.सकाळ-
मायाबेन कोडनानी यांना गुजरात उच्च न्यायालयाने आज गोध्रा प्रकरणी अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला आहे. गोध्रा प्रकरणी क्लीनचीट मिळालेले गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे
लोकसत्ता - या घडामोडीमुळे निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे स्टारकॅम्पेनर नरेंद्र मोदी यांना हा मोठाच हादरा मानला जात आहे.
महाराष्ट्र टाईम्स - विशेष म्हणाजे मोदीच्या मतदारसंघातील सभेसाठी भाजप नेते लालकृष्ण अडवाणी शुक्रवारी गुजरातमधे असतांनाच भाजपाला हा धक्का बसला.
No comments:
Post a Comment