Friday, April 30, 2010

Traveller's Tales: Pune Dining: Five Senses

Traveller's Tales: Pune Dining: Five Senses

लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाईम्स

हल्ली लोकसत्ताला झालयं तरी काय ?

पान नी पान भरलेल्या जाहिरातीमधुन बातम्या शोधाव्या लागतात. दर्जा साफ खालावत चालला आहे.

त्याउलट म.टा. पुन्हा एकदा भरारी घेतली आहे, दर्जा एकदम उच्चावला आहे.  

काय म्हणावे ?

वरळी नाका.
आचार्य अत्रे चौक.
चौकातील आचार्य अत्रे यांचा पुतळा.
झाकला गेलेला, एका भल्या मोठ्या फलकानी.

एका राजकीय पक्ष उद्या एक कार्यक्रम या चौकात सादर करणार आहे.
संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढुन मिळवलेल्या मराठी माणसांच्या महाराष्ट्र राज्याचा सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ते.

आचार्य अत्रे यांच्या या लढ्यातील योगदानाचे स्मरण ठेवण्याचे काय प्रयोजन ?
दिल्लीचे तक्‍त फोडणाऱ्या आचार्य अत्रे यांच्या तोफा केव्हाच थंडावल्या केल्या गेल्या होत्या.

महेद्रकाका व कांचनताई की जय हो.

महेंद्र व कांचननी लिहिलेले ते रोमॅंटीकपणावरचे लेख राजाभाऊंनी वाचले, नुसतेच वाचले नाही तर आपल्याच बायकोला पण वाचायला दिले.


http://www.mogaraafulalaa.com/

http://kayvatelte.wordpress.com/


सकाळ झाली. राजाभाऊंची बायको राजाभाऊंनी म्हणाली," उठा आता , सकाळ झाली, किती लोळत पडाल ? जरा हात पुढे करा ?

आपल्या बायकोची प्रत्येक आज्ञा पाळण्याची सवय झालेल्या राजाभाऊंनी हात पुढे केला.


२१ वर्षापुर्वी ह्याच दिवशी, अगदी ह्याच दिवशी तिचा घात झाला, तिला स्वप्नात तरी  निदान सात फेरे घालतांना तरी वाटले असेल का की आपल्या पदराची गाठ एका विक्षिप्त माणसाशी, चक्रमादित्याशी बांधली गेली आहे, आता जन्मभर आपल्याला याचा स्वभाव सहन करायला लागणार आहे, काय करणार पदरी पडलं पवित्र झालं करत.

घेतले खरे तिने निभावुन इतकी वर्षे आपल्या नवऱ्याला सांभाळुन घेत.

प्रिय बायको,

जलेम्बु,जलेम्बु, जलेम्बु, जलेम्बु.

Tuesday, April 27, 2010

वजीर असुन सुद्धा सहज जिंकालच असे नाही

सिसीलीयन बचाव


देशपांडे यांचा श्रीकृष्ण आटा. विलेपार्ले

आपल्या नवऱ्यानी घरी एखादी गोष्ट हौसेने आणली असेल तर त्याचा हिरमोड कसा करायचा हे या बायकांना पक्क माहिती.  

राजाभाऊंना विलेपार्लेच्या भटकंतीत आणखी एक चांगली जागा सापडली.  ( अर्थात या जागेचा संबंध अप्रत्यक्षपणे त्यांच्या भोजनभाऊपणाशी असणार होता ) 

Taste for Life - Enriching every day.  हे वाक्य आपल्या पिशव्यांवर मिरवणाऱ्या  श्रीकृष्ण आटा विकणारे दुकान त्याच्या नजरेत भरले होते. मग एकदा ते घरी जाता जाता त्या दुकानात शिरले व तेथे मिळणारी अनेक प्रकारची पिठे पाहुन ते हरकुन गेले, काय घेऊ नी काय नाही असे त्यांना झाले.  मग भीतभीत त्यांनी तांदळाचे पिठ व गव्हाचा आटा विकत घेतला.

हिरमोड अश्यासाठी की  त्यानंतर त्यांच्या घरी जेव्हा तांदळ्याच्या भाकऱ्या केल्या गेल्या तेव्हा घरातील जुनेच पिठ वापरले गेले.

राजाभाऊ नाराज झाले, त्यांनी आपली नाराजी व्यक्‍त करण्याचे धारीष्ट दाखवले.

अलिकडे त्यांची बायको तशी समजुतदार होत चालली आहे. तिला आपल्या नवऱ्याची नाराजी चक्क समजली.

आज जेव्हा ते देशपांडे यांच्या श्रीकृष्ण आटा मधुन आणलेल्या तांदळाच्या पिठाच्या केलेल्या मऊसुत भाकऱ्या खात होते तेव्हा ती प्रेमानी त्यांना विचारु लागली

" आणखी कोणती पिठे तिथे मिळतात ? आणत जा अधुन मधुन "  


 

महाराष्ट्र माझा - खाद्य महोत्सव - मनसे आयोजीत
राजाभाऊ आता मागे परतणे नाही. मागचे सारे दोर कापुन टाकले आहेत. आज जगातील कोणतीही ताकद, शक्‍ती तुम्हाला शहाजीराजे क्रिडा संकुलात खाद्यमहोत्सवात जाण्यापासुन परावृत्त करु शकत नाही. तुम्ही साऱ्या प्रतिकुल परिस्थितीशी लढा. भेदा हा चक्रव्युह. चला, व्हा पुढे, चालत रहा.  ब्लॉगर्सची  सारी सेना ऐन मोक्याची क्षणी गायब झाली म्हणुन काय झाले ? एकला चलो रे.

बचेंगे तो और खायेंगे.

अंधेरीच्या महाभयानक गर्दीतुन, ट्रॅफिक जॅम मधुन कधी बस मधुन, कधी रिक्षामधुन कधी चक्क चालत चालत, मार्गक्रमण करत ते आपल्या इच्छीत स्थळी अखेरीस पोचले.

आत शिरताशिरता समोर आले ते  लेझिम पथकानी सादर केलेले लेझिम, मग तुतारी वादन, कडकडणारी  हलगी माहोल कसा मस्त बनु राहिली होता. सारे क्रिडांगण छान सजवले आहे, बसुन खायला खुप टॆबलखुर्च्या मांडल्या आहेत. विभागावारी स्टॉल लावुन त्याच्यामागे त्याप्रमाणॆ सजावट करण्याची कल्पकता जबरदस्त.

काल सुगरीणींची खाद्यस्पर्धा होती.  त्यांनी कायकाय केले आहे ते बघायला जायला  हवे होते.

तर  
कोकणातल्या ओल्याकाजुची उसळ खाण्यासाठी त्यांची बायको इतके दिवस तळमळुन राहिली होती, तिची ही इच्छा आज पुरी झाली, परंतु खरचं ही इच्छा पुर्ण झाली का की राजाभाऊंनीच त्या उसळीवर डल्ला मारल्यामुळॆ ती अतॄप्तच राहिली ? त्यात उसळीसोबत गरमागरम वडॆ.

राजांभाऊंनी त्यांना म्हटले की जरा माणसाची साईझ बघा आणि मग वाटीत भाजी भरा, मग अगदी सढळ हस्ते त्या चिपळुनवरुन आलेल्या गृहस्थांनी राजभाऊंना ओल्या काजुची उसळ खाऊ घातली.

तेवढ्यात त्यांचे लक्ष कोल्हापुरी मिसळीकडॆ गेले. गेल्या वेळी शिवाजी पार्कावर आयोजीत कोल्हापुर महोत्सवात ती खाण्याची राहुन गेली होती. मग कोल्हापुरी मिसळ आणि सोबत दोनच फक्त दोनच कांदा भजी. उगीच जास्त नको. अजुन लांबचा पल्ला गाठायचा आहे.

हं. नागपुरकर काय म्हणतात ? आपल्याला हे काय खिलवुन राहिले आहेत ? विष्णु मनोहरांनी काय येथे डाव मांडला ? पाटवड्याचा रस्सा आणि सोबत मांडॆ आणि गोळाभात देखिल.

हवा तो आंबा निवडा, आमरस काढुन मिळेले. मग लागलेली तहान भागवण्यासाठी हवा तो आमरस.

आता बास की , थोडे पदार्थ उद्यासाठी राखुन ठेवाल का नाही म्हणता म्हणता राजाभाऊंची नजर डालबाफल्यांकडॆ गेली आणि मग ते मनाने तत्काळ इन्दोरला पोचले.

कशाला, कशाला बोलताबोलता मग राजाभाऊंनी डालबाफल्यांवर आडवा हात मारला.

पुरे आता, त्यांची बायको त्यांना ओरडली, मग त्यांनी आवरते घेतले.

Sunday, April 25, 2010

अन्नासाठी दिवसरात्र काम करुनी घेशी जगदिशा

रात्रीचे जवळजवळ पावणॆनऊ वाजत आलेले आहेत. यांच्यासाठी दिवस अजुन मावळायचाय. या असह्य गरमीत सकाळपासुन हे राबराब राबत आहेत. १० तास ? १२ तास ? १४ तास ? १५ तास ? महाभयानक अंगमेहनतेची कामे.

 ज्या वेळी जमिनीला पाठ टेकेल ती वेळ खरी, परत दुसऱ्या दिवसाची चिंता, वय देखिल १८-२०-२२ मधले. काम काम आणि काम, प्रचंड काम.

Motivation, Performance Bonus, Perks, Allowances, LTA, आदी बाबी काय असतात हे ह्यांना ठावुक असण्याचे प्रयोजन नाही.


ब्लंडर

ब्लंडर

मुंबादेवी

मुंबादेवीच्या मंदिराचे खरे सौदर्य न्याहाळायचे असेल स्थापत्यकलाशैलीचा आस्वाद घ्यायचा असेल  तर मागच्या एका गल्लीतुन आत जावे.

एवढी सुंदर वास्तु,  पण या सौंदर्याचे जतन कसे करावे हेच आपल्याला कळत नाही. 


सेंट इग्नेशियस चर्च, सातरस्ता


दगडी बांधकाम असलेले हे चर्च , सातरस्ता जवळ

फुलफुल फुलायचे, फुलफुल फुललेले पाहायचे.सकाळी उठल्यावर डोळ्यासमोर येतो तो हा फुललेला वृक्ष.

अन्नासाठी दशदिशा फिरविशी जगदिशा

उन्हाचा तडाखा वाढत चाललायं, पारा वर वर चढत चालला आहे. अगदी पक्षांपासुन ते माणसांपर्यंत सर्व जण या दुपारच्या उन्हापासुन आपला बचाब करण्यासाठी आपल्या घरात, सावलीत   गायब झाले आहेत. पंखे गरगरा फिरताहेत, वाळ्याचे पडदे खाली झालेले, तर कुठे वातानुकुलीत यंत्र तर कुठे कुलर थंडावा आणण्याचा निष्फळ प्रयत्न करताहेत.

पण ज्यांचे पोट त्यांना पं.बंगालमधुन मुंबईत घेवुन आलेले आहेत त्यांच्या नशिबी हे कुठले सुख ?


राम आश्रय, आर्य भवन अर्थात मुत्तुस्वामी आणि काफे म्हैसुर -

नवराबायकोचे ३६ पैकी ३६ गुण जमायला पाहिजेत ही गोष्ट खरी पण निदान अंगीभुत काही गुण जुळले तरी  पुष्कळ .  आणि मग दोघांची मते जुळायला पाहिजेत असे कुठे आहे ?

चल, तयार हो, जायचय म्हटल्यावर दुसऱ्या मिनिटाला तयार होवुन पाचव्या मिनिटाला खाली उतरणारी बायको.  

खरं तर आजची फर्माईस  फर्माईश तिचीच माटुंग्याल  राम आश्रय मधे,  "कोकोनट शेवया " खायला जाण्याची.   राजाभाऊंना  मुत्तुस्वामी मधे इडीआप्पम व कोकोनट स्टु खाण्याची आज इच्छा होती. बायकोच्या पु्ढे नवऱ्याचे कधी काय चालले आहे का ? राम आश्रय म्हणजे राम आश्रय, अपिल नाही.

त्यांनी राम आश्रय मधे गेल्यानंतर आपल्या इच्छेला मुरड घालायचे ठरवले कारण ही तसेच होते. समोर त्यांनी पाटी वर पोंगल अवियल  लिहिलेले वाचले. मग त्यांनी पोंगल अवीयल मागवले. पण एक गडबड झाली. अवीयल वेगळॆ खुप लहानश्या वाटीत थोडॆसेच दिले त्यानी त्यांचे काय समाधान व्हायचे ?   आणखीन एक वाटी मागवले ते ही कमी पडले. पोट काही भरले नाही. 

मग ते आर्यभवनमधे इडीआप्पम खायला गेले. पण एवढ्या सक्काळी सक्काळी साडॆ सात वाजता त्यांना ते कसे मिळावे ?  मग काहीसे खट्टू होवुन ते काफे म्हैसुर मधे रवा डोसा खायला गेले.
Saturday, April 24, 2010

मौद्रिक संग्रहालय

आज एक अनोखे संग्रहालय राजाभाऊंनी पाहिले.

एक असे संग्रहालय की जे आपल्या देशात एकमेव आहे, एक असे संग्रहालय की त्यात मांडलेल्या वस्तुंवर आपले सारे जीवन अबलंबुन असते, ज्याच्या वाचुन आपण जगु शकत नाही.

मुंबईमधे भारतीय रिझर्व बॅंकेने मौद्रिक संग्रहालय उघडलय, ज्यात चलनाच्या उत्क्रांतीची कथा इथे उलगडुन सांगीतली गेली आहे. प्राचीन वस्तुविनिमय पध्दत आणि नाणेपध्दतीच्या उदयापासुन ते आधुनिक काळातील चलनापर्यंतचा संपुर्ण इतिहास येथे मांडला आहे. अनेक देशातील नाणी, अनेक प्रकारची नाणी, अनेक कालखंडातील, अनेक राजवटील नाणी, अनेक धातुमधे बनवलेली नाणी येथे पहायला मिळतात.

या चलनाची किंमत अगदी एक, दोन तीन, पाच पैसे तर सोडाच पण १/१२ पै. पासुन सुरवात झालेली आहे ती अगदी १०,००० रुपयेच्या नोटेपर्यंत.

हे सर्वांनी पहायलाच हवे.

काळबादेवी मंदिर

ज्या देवीच्या देवळावरुन हा विभाग ओळखला जातो ते हे काळबादेवीचे लहानसे मंदिर

श्री बालाजी रामजी मंदिर

जीव घुसमटला असेल काय ?

दोन्ही बाजुस बेचव इमारतीमधे सापडलेल्या या सुंदर वास्तुचा जीव गुदमरत असेल काय ?

नरनारायण मंदिर - झवेर बाग

आज हे मंदिर ्किंवा अश्या प्रकारचे मंदिर  आयुष्यात पहिल्यांदाच पाहिले.

येथे नरनारायणाच्या सुंदर मुर्त्या आहेत.

नरनारायण म्हणजे काय ?

स्वर्गातील सरकार


एकदा काय झाले स्वर्गातील सर्व देवांनी पृथ्वीतलावर माणसे स्थापतात तसे स्वर्गाचे राज्य चालवण्यासाठी सरकार स्थापन करायचे ठरवले. मग काय.

श्री भुलेश्वर मंदिर

या परिसराला ज्याच्या वरुन भुलेश्वर हे नाव पडले ते हे श्री. भुलेश्वर मंदिर.  मुंबईमधले एक प्राचीन देवस्थान. 

पण या साऱ्या संकुलाची अवस्था वाईट , दयनीय आहे, अत्यंत श्रीमंत मानल्या जाणाऱ्या गौड सारस्वत बाम्हण ज्ञातीचे देवालय असुन देखिल या ज्ञातीतील लोकांनी याकडॆ संपुर्ण दुर्लक्ष केलेले दिसते. त्यांचे सारे लक्ष फक्त महादेवपुत्रावर, कोट्याधीश गणपतीवर केंद्रीत झाले आहे असे वाटते. कधी तरी त्यांनी GSB  गणपती व राममंदिरातील गणपतीच्या पलिकडे जावुन येथे लक्ष घालायला हवे असे राजाभाऊंना वाटते.  कदाचीत आपल्या ज्ञातीचे असे एकादे देऊळ आहे याचे त्यांना विस्मरण झाले असेल.
श्री राधाकृष्ण प्रणामी मंदिर

श्री लक्ष्मीनारायण मंदिर

फिरोज रानडॆंनी राजाभाऊंना जी नवी दृष्टी दिली त्यामुळॆ आता पर्यंत आपण सौंदर्यरसग्रहणात किती कमी पडत होतो याची त्यांना जाणिव झाली. आता पर्यंत उभ्या आयुष्यात या सर्व उपासनावास्तुंमधे जावुन पहावेसे कधीच वाटले नव्हते. आयुष्यात पहिल्यांदच ते या सर्व मंदिरात गेले.

श्री. लक्ष्मी नारायण मंदिरात त्यांनी पाऊल ठेवले व एक नवे सुंदर, देखणॆ विश्व त्यांच्यासाठी उघडले गेले.   केवढी ही कलाकुसर, भिंतींपासुन ती छतापर्यंत.

श्रीराम मंदिर


याचा गाभाऱ्याचा दरवाजा मस्त आहे. रामाच्या आयुष्यातले अनेक प्रसंग यावर कोरलेले आहेत. व ्बाहेर दोन बाजुला उभे असणारे , बहुदा मारुती आणि गरुड

श्री सामुद्री माताजीका मंदिर


श्री चंद्रप्रभ दिगम्बर जैन मंदिर

आज दोन सुंदर वास्तु पाहिल्या त्यापैकी ही एक.

अत्यंत स्वच्छ परिसर,  साऱ्या जमिनी उच्च दर्जाच्या मार्बलनी सजलेल्या, दुसऱ्या मजल्यावर प्रार्थना गृह. 

मनाला फार प्रसन्न वाटते. उत्त्म स्थितीत हे ठेवले गेलेले आहे. असे पाहाणे खुप दुर्मिळ आहे.


आणि हा पांजरपोळ माणसांचा

कुण्या दानशुर व्यक्‍तीस वाटते आपण अन्नदान करावे मग ......


पांजरपोळ - माधवबाग

हे असे सारे खाऊन जर गाई धष्ट्पुष्ट न झाल्यातरच नवल

माधवबाग


श्रद्धाळु लोकांसाठी माधवबाग - भुलेश्वर परिसर म्हणजे स्वर्गच. असंख्य देवळे या परिसरात आहेत.
श्री. लक्ष्मीनारायण मंदिर.पांडुरंग शास्त्री आठवले यांची प्रवचने या स्थानी होत असत.


शेठ मोठीसा लालबाग जैन मंदिर.
याचे नुतनीकरण सुरु आहे.
संगमरवरी मंदिर, त्यातले सुरेख कोरीवकाम केलेले खांब ह्या मंदिराची शोभा वाढवतात.