Wednesday, April 07, 2010

अश्या ह्या बायका

"बहारे फिर भी आयेगी , मगर हम तुम जुदा होंगे , घटांये फिर भी छायेगी .. हे गाणॆ फार छळुन राहिलयं,  येवढेच आठवतयं, आगापिछा काहीच सापडत नाहीयं , नुसत डोक्यात गरागरा फिरत राहिलयं "

बसप्रवासात राजाभाऊंनी आपल्या बायकोला सांगितले.

पुढच्या बाकावर बसलेल्या एक बाई मागे वळल्या, व काहीसे पुटपुटल्या. राजाभाऊंच्या काही लक्षात येइना. त्यांनी त्या गाण्याच्या ओळी राजाभाऊंना तीन-चार वेळा सांगितल्या, पण टाळक्यात काही शिरेना, यांना आपल्याला काय सांगायचे आहे.

शेवटी त्या बाईंनी गाणे भर बसमधे त्यांना गाऊन दाखवलं.

दुर्दैवांने ते दुसरेच गाणे होते. 

थोडक्यात काय तर आपल्या आवडीच्या गोष्टी माणसाला करायला मिळाल्यातर मग त्याला बाह्यवातावरणाची फिकीर करायचे कारण रहात नाही.






ता.क. आज भल्या सकाळी हे गाणे youtube वर मिळाले. जेव्हा काळजावर लता नामक दुधारी सुरी
अलगद चालत रहाते

Suhanee2 याने ते गाणे अपलोड केलेले आहे.

http://www.youtube.com/watch?v=vsziuRkqLdU

10 comments:

Ap____M said...

google baba la vichaarlat ka?

tyaane dilielya anek uttaraanpaiki ek uttar khaali det aahe:

http://jhunkar.com/bahaaren-phir-bhi-aayengi-from-lahore/

HAREKRISHNAJI said...

धन्यवाद. मला ते गाणे मिळाले.
मी मराठीमधे टाईप करुन ते शोधण्याचा प्रयत्न केला होतो.

Vivek said...

संगीतकार: श्यामसुंदर
चित्रपट: लाहोर (१९४९)
गीतकार: राजेन्द्र कृष्ण

श्यामसुंदरनं काही फार चित्रपटांना संगीत दिलं नाही. पण लाहोर या एकाच चित्रपटातली गाणी त्याच्या दर्जाची झलक दाखवणारी होती.

‘बहारें फ़िर भी आयेंगी’चे मर्मभेदी सूर ऐकून ओ पी नय्यरनं (होय, ओपीनंच) कान धरून ‘साली ऐसी आवाज़ सौ साल में नहीं होगी’ असे उत्स्फूर्त उद्गार लताबद्दल काढले होते (इति शिरिष कणेकर).

लाहोर आणि श्यामसुंदर म्हणताच ‘सुन लो सजन मेरी बात’ हे अतिशय लडिवाळ गीत, आणि ‘बेदर्द ज़माने क्या तेरी मेहफ़िल में हमारा कोई नहीं’ हे विरहगीत आठवतं. त्यापाठोपाठ ‘दुनिया हमारे प्यार की’ हे लता आणि करण दीवानचं द्वंद्वगीत ओठांवर येतं.

आणि शेवटी ‘बहारें फ़िर भी आयेंगी’ आणि ‘टूटे हुए अरमानों की’ ही लताची all time greats. ‘टूटे हुए’ ऐकताना नूरजहाँची आठवण येत राहते. या दोन्ही गाण्यांत सरस कुठलं हे ठरवणं अशक्यच. आपण फक्त लताच्या सुरांचा आस्वाद घ्यायचा.

HAREKRISHNAJI said...

विवेकजी,

आपण आज माझ्या हृदयाच्या तारा छेडल्यात. माझ्याकडे श्यामसुंदरची बरीच गाणी आहेत. माझ्या आवडीचा हा एक संगीतकार . बजारमधले "साजनकी गलीयॉ छोड चले दिन रोना "
हे गाणे देखिल अप्रतिम.

Naniwadekar said...

ओ पी ची दाद 'बहारे फिर भी आयेंगी' ला नव्हती, तर 'टूटे हुए अरमानों की' गाण्याला होती.

'लाहोर' मधली अनेक गाणी (लताचं 'बहारे' आणि मन्ना डे चं एक सोडून बाकी सर्व) नेरुरकरच्या लता-कोश पुस्तकात विनोदच्या नावावर दिली आहेत, आणि एच एम व्ही च्या कागदपत्रांतही विनोदचा तसा स्पष्ट उल्लेख आहे. पण 'टूटे हुए' आणि इतर गाण्यांवरही श्याम सुन्दरची छाप आहे; उदा. कडव्यातल्या एखाद्‌या ओळीचा भाग तरन्नुम पद्‌धतीनी गाणे. आणि 'लाहोर'मधली सगळी गाणी श्यामसुन्दरचीच असल्याचा उल्लेख त्या सिनेमाचा गीतकार राजेन्द्र कृष्ण याने अ‍िसाक मुज़ावर साहेबांकडे केला आहे.

अलिफ़ लैला मधली काही गाणी मात्र श्याम सुन्दरच्या मृत्युनन्तर झालेली अशी मदन मोहनची असावीत.

'भाईजान', 'गाँव की गोरी' (urf Village Girl), 'एक रोज़', प्रभातचा 'नई कहानी', १९४९ कडला 'निर्दोष' या सिनेमांतही श्याम सुन्दरची अ‍ुत्तमोत्तम गाणी आहेत. लाहोरहून मुम्बईला येण्यापूर्वी काही पंजाबी सिनेमांतून त्यानी दिलेली गाणीही ऐकायला मिळतात.

HAREKRISHNAJI said...

नानीवडेकर,

गेले पाससहा दिवस मला आपली प्रकर्षाने आठवण होत होती. मी बायकोला म्हटले देखिल की बऱ्याच दिवसात आपल्याकडुन काहीच ऐकायला मिळालेले नाही.

Vivek said...

नानिवडेकरजी

कॉमेंट पोस्ट केल्यानंतर लिहिण्यात चूक झाली हे लक्षात आलं आणि मग ओपीची दाद ‘टूटे हुए’ला होती हे वाचल्याचं आठवलं. सांगितल्याबद्दल thanks.

हा विनोद-शामसुंदर प्रश्न कसा सोडवायचा? ‘टूटे हुए’ ऐकताना शामसुंदरच्याच ‘बैठी हूँ तेरी याद का’ची आठवण येत राहते. आणि ‘बहारें फिर भी आयेगी’इतके आर्त सूर असणारं विनोदचं अन्य गाणं तरी कधी ऐकलं नाहे.

अलिफ़ लैलातलं ‘बहार आयी खिली कलियाँ’ हे एकच गाणं मला आठवतंय.

कमल के फूलमधलं सुरैयाचं ‘कोई दिल में समाया चुपके चुपके’ हेही पटकन आठवणारं गाणं.

विवेक.

Naniwadekar said...

‘बहारें फिर भी आयेगी’इतके आर्त सूर असणारं विनोदचं अन्य गाणं तरी कधी ऐकलं नाहे.
-----

मला स्वत:ला 'बहारें फिर भी आयेंगी' फार आवडत नाही. त्यात कृत्रिमपणा वाटतो. मला श्यामसुन्दर विनोदपेक्षा जास्त आवडतो, पण विनोदची अनेक सुन्दर गाणी आहेत. 'अनमोल रतन' मधली लताची सगळीच, 'वफा' मधलं 'कागा रे जा रे जा रे', तलतचं कामिनी मधलं (वा रम्मन मधेही घेतलेलं) 'हो गये बरबाद हम', ज़ीनत बेगमचं 'अपनों से शिकायत है' ही विनोदची गाणी खूप छान आहेत. 'दिल्ली से आया भाई टिंगू' हे विनिता(?) अमलाडीचं गाणंही अप्रतिम. हे यू-ट्यूबवर आहे. यात उभा असलेला एक बारकासा माणूस विनोद स्वत: असावा अशी मला शंका आहे. कणेकर म्हणतात तो धनुर्वातानी गेला, पण त्याच्या मृत्युच्या दाखल्यावर म्हणे क्षयाचा उल्लेख आहे.

Vivek said...

अनमोल रतनमधली तारे वो ही हैं आणि शिकवा तेरा ही दोनच गाणी माझ्याकडं आहेत.

हो गये बरबाद हम आणि अपनों से शिकायत है कधीच ऐकली नाहीत.

एक थी लडकीतील लारीलप्पाव्यतिरिक्त दिल्ली से आया भाई आणि घिर घिर आयी अशी तीनच गाणी मी ऐकलीत.

कागा रे शिवाय वफ़ामधलं अरमान भरा दिल हेही गाणं मला माहीत आहे. पण वफ़ातली ही गाणी बुलो सी रानीची होती असं वाचल्याचं आठवतंय.

Naniwadekar said...

About wafaa :
kaagaa re - Vinod's
apanii apanii qisamat hai - Bulo C Rani's.
Will need to check Geet Kosh about other songs.

About Lata in Anmol Ratan :
mere ghuu.NghaT me.n do nain
more dwaar khule hai.n
dard milaa hai tere pyaar kii nishaanii
Plus, I think, a couple more.

- dn