Wednesday, April 21, 2010

सॅडविच

अपर्णा,

या ठिकाणी "ताटात फ़क्त सॅंडविच असताना ती पाहायचं म्हणजे काय शिक्षा आहे हे लगेच कळेल..." असे वाटणे नाही.

किती किती प्रकार, आणि दुकानही छान.





व्हे.सॅडविच आज येथे राजाभाऊंनी खाल्ले.  रस्तावर मिळणारा हा पदार्थे आज वातानकुलीत जागी पोचला आहे. रोजच्या वाटेवर असुन देखिल आतापर्यंत राजाभाऊ तेथे जाणे टाळत होते. पण आज नाही राहवलं.

सॅडविचची लज्जत वाढवते ती चटणी आणि बटाट्यावर, टॉमेटोवर भुरभुरलेला मसाला.मस्त मऊसुत पाव.

अगदी शाळेची आठवण झाली. लक्ष्मीबागेसमोर एक सॅडविचवाला बसायचा. दुपारच्या सुट्टीत तेथे फक्‍त चार आण्याला सॅडविच मिळे, जवळजवळ रोजच खाणे व्हायचे.

2 comments:

आनंद पत्रे said...

अप्रतिम....

अनिकेत वैद्य said...

अहो राजाभाऊ,
"रस्तावर मिळणारा हा पदार्थे आज वातानकुलीत जागी पोचला आहे"
मी गोव्यात एका ३* हॉटेलमधे सॅंडविच खाला होतं. मस्त होतं.
आणि ताज (गेट वे च्या समोर) मधे पण एकदा जाणं झाल्यावर तिथे पण संडविच खाल्लं.
चवीत अप्रतिम. (आणि खिसा सुद्धा बर्‍यापैकी खाली झाला.)
परवा औंध मध्ये डबलडेकर नावाच सॅंडविच खालं. ४ पावामध्ये बर्‍याच भाज्या भरलेल्या. सुरेख चव.