जेव्हा मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी असलेल्या श्री. सुभाष दळवी यांनी आठ वर्षापुर्वी ग्रॅंटरोडच्या भाजीमार्केट मधे भाजीविक्रेतांसमोर, या पातळ प्लास्टीकच्या पिशव्या ग्राहकांना न देण्यामागे पर्यावरणाचा तसेच त्यांचाच किती फायदा होवु शकतो, त्यांचे किती पैसे वाचु शकतात हे मांडले होते आणि सर्वांना सोबत घेत हा प्रकल्प यशस्वीरित्या राबवला होता.
आठ वर्षापुर्वी श्री. सुभाष दळवींना स्वप्नात तरी वाटले असेल काय की हे असे देखिल घडु शकेल ?
विलेपार्ले रेल्वेस्थानकासमोरील भाजीविक्रेत्यांचे गेल्या वर्षी श्री. दळवी यांनी मन वळवले व त्यांनी देखिल ग्राहकांना भाज्या, फळे प्लास्टीकच्या पिशवीत देणे बंद केले.
फायदा जसा हा पर्यावरणाचा झाला तसाच तो खराखुरा या भाजीविक्रेत्यांचा देखिल झाला.
मग अलीभाईंनी त्यांचे पिशव्यांवर खर्च होत असलेले पैसे वर्षभर वाचवले.
अलीभाईंनी वाचलेल्या पैश्याचे काय केले असावे ?
श्री. सुभाष दळवी यांनी जी एक नवी पाऊलवाट पाडली, त्याचा हळुहळु हमरस्ता होवु लागला आहे.
No comments:
Post a Comment