Wednesday, October 31, 2007

स्वातंत्र

सद्ध्या स्वातंत्र आम्ही मनमुराद उपभोगतोय. १९ वर्षे, जे मिळायला १९ वर्ष जावी लागली, क्षणिक का होईना, आठवडाभराकरता का होईना ,पण ते मिळालय, हे असे क्षण एकत्र कुटुंब पद्धतीत मिळणे कठीणच असतात, आधी वडीलधाऱ्याचा खडा पहारा , त्यात मग मुलाचा जागता. एकामेकासाठी वेळ काढणे, निवांतपणी, म्हणजे काय हे विसरुनच गेलो होतो, काल चक्क आम्ही उद्यानात फिरायला गेलो ,लग्नाआधी जायचो तसे, सिंहगड रस्तावर जपानी पद्धतीचे एक सुरेख उदयान बनले आहे, तयार होवुन जवळजवळ पावणेदोन बर्षे झाली असतील , नेहमीच्या रस्तावर असुन देखील काल पहिल्यांदाच गेलो.
(क्र.)

Monday, October 29, 2007

Diwali shopping at Laxmi Road.

It's mad mad mad World. Those punekar's must be crazy. (including me) . We went to Laxmi Road sunday evening for the deepavali shopping for my BIG BOSS.
Laxmi Road and all the shops on the road were overflooding with the human herd. Could not even enter some of the shops. Total sheer madness and total frustration. Even where we managed to enter , we found nothing great, just the usual stuff, prices jacked up for the season, what is available in Mumbai for Rs450.00 . found at the double price in Pune. She was rather disappointed.
So, this morning we went all the way to FabIndia and finally she managed to found quality products. ( Products and not product )
After all , if she is happy !!

Sunday, October 28, 2007

What a way to start Vacation

I am on vacation. Friday evening we headed for our 2nd weekend home in Pune. We were supposed to catch Mahabus starting from Mantralaya to Pune at 6.00 p.m. After 45 mins waiting, we lost the Patience and decided to go to Dadar Asiad Bus Stand only to find out long very long queue. ( Even after 20-25 years of opening of this bus stand. concerned authorities have not been able to move out of this cramped place and shift to decent bus stand. ).


The next option was catching Mumbai-Pune Taxi from the Taxi stand opp. Asiad Bus Stand.
"Taxies are not available" That's the standard answer I have always received ,whenever I have tried to take the taxi. You have to wait. Then we went to Pune-Mumbai taxi Stand in Hindu Colony and hired all by ourselves, Indica Taxi, drop at my doorstep. ofcouce with extra charge, without any excuse of whatsoever from the operator's side.
That was the point , start of vacation in comfort.
All those years I kept on complaining about the food quality at Express way. This time we decided to stop at Bhagat Tarachand's newly opened restaurant on the Bharat's Petrol pump after Toll Naka at Talegaon and to my surprise I was taken aback with the excellent ,superb, very tasty food. It was around 11.00 pm. , the next night after Kojagiri Poornima, with full moon and pleasant climate. I ordered Makka de Roti, and Dal Fry , pipping hot, my wife and son went for Malai Kofta. The food was damn good. I am happy , we have found a strong reason to take a break on expressway.
Next day was devoted to Diwali Shopping Damaka. We had good reason to go for shopping at "Westside". I had received their 20 % discount coupon on my birthday, Plus the store is offering Rs. 1000.00 Gift coupon on the purchase of RS.4000.00
To avail the gift coupons for rs.2000.00 . we rather I spent Rs.10,000.00 under "shop till you drop dead " mania. Well no regrets.
Today is a shopping day for my big BOSS.

Thursday, October 25, 2007

पैठणी- एक खोज






जी पैठणी आवडते ती परवडत नाही, जी परवडते ती आवडत नाही. हे एक फार मोठे त्रांगड होवुन बसलय. आता ही पैठणी घेण्याची हौस (माझीच) बहुदा, मला येवल्याला घेवुन जाणार असे दिसते.
आज खास वेळात वेळ काढुन, "न्यु वेव्ह पैठणी " तर्फे रवीन्द्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथल्या पु.ल.देशपांडे कला अकादमीत पैठणींचे खास प्रदर्शन आयोजीत केले आहे, त्यास भेट दिली. घेण्याचाच विचार करुन. नो डाउट, किंमती बघीतल्यावर जीभ बाहेर आली, पण आता भाच्याच्याच लग्नात मावशीबाय ला महावस्त्र हवच.



त्रिमुर्ती पासुन हा प्रवास सुरु झाला. जवळजवळ रु. ३६,०००.०० ने सुरु झालेला हा निर्देशांक रु. ११,०००.०० पर्यंत आला आहे, पाहु अजुन किती खाली उतरतोय का ?



या प्रवासात आता पर्यंत अंदाजे ५००.०० रुपये प्रवासखर्चासाठी संपले असावेत. तिच्या भाच्याकडुनच वसुल करायला हवेत.

Sunday, October 21, 2007

देवापुढे सर्वच सारखे ?


यांचे कॅमेरा देवळात नेलेले चालतात ? , त्यांचे देवावरोबरचे फॊटॊ उघड उघड प्रसिद्ध केलेले चालतात.?

दर्शनाला जाताना "प्रेस वाले" बरोबर ?

पण काय हो ?

पण मी काय म्हणतो नाना, बाटा, करोना, आदिदास, रिबॉक आदी चप्पल, बुट बनवणाऱ्या कंपन्या बंदबींद पडाल्या आहेत की काय ? का मुंबईत अचानक पादत्राणांचा दुष्काळ वगैरे तर पडला आहे काय ? आपण सर्वजण त्या एम.एफ. हुसेन ना हसत होतो ना , अनवाणी रस्तातुन चालतात म्हणुन. हल्ली अचानक रस्तातुन घावुक पणे , जथ्याजथ्याने चालणाऱ्यांची संख्या अचानक पणे कशी काय व का बरे वाढली आहे?

काय बर कारण असाव ?

All set for Dussehra Rally. -


श्री. ओंकार दादरकर.


जेव्हा दसरा पहाट, सुरमयी , स्वरमयी, झालेली असते तेव्हा ती आनंदमयी देखिल असते.
आज पहाटे ती सुखदायक करण्यासाठी कारणीभुत ठरले श्री. ओंकार दादरकर.
श्री. शशी व्यास, पंचम निषाद, यांनी पु.ल.देशपांडे कला अकादमीच्या प्रांगणात आज पहाटे "प्रातःस्वर" मधे श्री. ओंकार दादरकर यांचे गायन आयोजले होते.
अनेक वेळ, जायचे, जायचे, ऐकायचे आहे, करत श्री. ओंकार दादरकरंचे गाणे ऐकण्याचे राहुन गेलो होते. आज म्हटले ही संधी सोडायची नाही.
भटियार, अलेय्या बिलावल , पटदीप, जोगीया हे राग गावुन त्यांनी दसरा पहाट सुरेल केली.
धन्यवाद श्री. शशी व्यास, केवळ आपल्या मुळेच महिन्यातुन एकदा पहाटे, तरुणाई चे गाणे ऐकायला मिळते.

प्रिय डॉ. शुभा राऊळ, महापौर,

प्रिय डॉ. शुभा राऊळ,
महापौर,
मुंबई,

सप्रेम नमस्कार,

दसऱ्याचा शुभेच्छा.
पुढच्या दसऱ्याला झेंडुच्या फुलांचे, हिरव्या पानांचे तोरण केवळ आपल्या दाराला लावण्या पुरते मर्यादीत न ठेवता, हि हिरवाई, हा बहार आपल्या साऱ्या मुंबई मधे लावण्याचा संकल्प आज सोडुया व त्या साठी आपण पुढाकार घ्यावात ही विनंती.

काल " हिरव्या बोटांची महापौर " हा आपल्या कार्याची ओळख करुन देणारा लेख चतुरा मधे वाचला. संवेदनाक्षम एक डॉ. आम्हाला महापौर म्हणुन लाभले हे मुंबईचे भाग्य आहे. पण आपल्या कडे एखाद्या शहराची जबाबदारी असलेला एकच पदाधिकारी असल्याची घटनामत्क तरतुद नाही, त्यामुळे अनेक मर्यांदाच्या रिंगणात राहुन महापौरांना आपल्या अडीच वर्षाच्या कालावधीमधे काम करावे लागते. या कालावधीमधे एकाच्याच हाती विधायक कार्य होणे तसे कठीणच आहे.

आपल्या न्यूयॉर्क भेटीत आपल्याला तिथे ठायी ठायी दिसणाऱ्या ग्रीन झोन्सनी आकर्षीत केल्याचे वाचले, तिथे मुख्य रस्तावर झाडे नाहीत, तर रस्तांलगत ग्रीन पार्कस आहेत, दिव्याचा खांबावरही वेली सोडलेल्या आहेत, आणि दिव्याखाली झुडुपांच्या बास्केट्स ! आपल्या मते, मॉडॆल समोर ठेवावे ते समॄद्धी आणि हिरवाई जिथे संगतीने नादंते, अशा शहरच !

जर आपण, नागरीक व सरकारी यंत्रणा एकत्रीत आल्यात तर हे चित्र आपणही मुंबईत सहज साकार करु शकतो.

याची सुरवात आपण नर्दुंला टॅंक मैदानापासुन सुरु करु या का ? ही जागा बॄहन्मुंबई महानगर पालीकेच्याच मालकीची आहे. आपल्या बंगल्यापासुन पाच मिनीटाच्या अंतरावर आहे आणि मुख्य म्हणजे आपल्या रोजच्या जाण्यायेण्याच्या मार्गावर आहे.

शेजारच्या कोट्याधीश कि अब्जोपती देवाला ही आपण यात " स्वच्छ माझे अंगण " या योजने अंतर्गत सामील करु शकतो.

खास आपल्या निदर्शनास आणण्यासाठी या मैदानाची सध्याची दुरावस्ता सांगणारे फोटो काढले आहेत.

आपल्या नम्र,

लिहीणार - आपल्या शहरासाठी काहीतरी करण्याची तळमळ असणारा.

Saturday, October 20, 2007

घटस्थापना

वाघेश्वरी - देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी

देवीला खास खिचडीची वेणी - दादर मंडई तुन
घटस्थापना

Traditional Navratri Festival


गोडबोले स्टोअर्स तसेच पैठण्यांचे प्रदर्शन

दो दिवाने शहरमे, रानडे रोड पर, पैठणी ढुंडते है ! रानडे रोडवरील वैभब हॉल मधे पैठण्यांचे प्रदर्शन भरल्याचे वाचुन मोरु, मोरुच्या बायकोला म्हणा, बाई ग, ऊठ तयार हो, आज आपल्याला पैठणी आणायला जायची आहे. मोरुचीच बायको ती, दुसऱ्या क्षणी तयार, उगाचच तीची सासु तिला नाव ठेवत नाही, "भटकी, अक्खा दिवस भटकायला पाहिजे " म्हणुन !
खर म्हणजे तिचे हे एक जंक्शंनच झालेले असते, नवरा म्हणतो , अक्खा दिवस घरकामातच गुरफटलेली असते म्हणुन आणि सासु ?
पैठणी काही फारश्या भावल्या नाहीत, मग आपला नेहमीचा उपक्रम सुरु झाला, रानडे रोड वरुन, जवळपासच्या गल्ली, कुच्यातुन, फेरफटका मारायच्या. या प्रकारात प्रत्येक वेळी नविन जागा, ठिकाणे गवसत जातात. आज आमच्या समोर अवचीत आले ते डि.एल.रोड वरील "गोडबोले स्टोअर्स "

त्यांना वेध लागले आहेत ते दिवाळी फराळाचे. आपली सर्वांची दिवाळी लज्जतदार, चवदार, खास बनवण्यासाठी त्यांची लगबग चालु झाली आहे. दिवाळीच्या फराळाची आगावु मागणीची नोंदणी सुरु झाली आहे.
आकर्षण म्हणजे"अमेरिकेतील नातेवाईकांकरिता घरपोच फराळ हॅंपर पाठवले जाईल "
सद्ध्या पुरते अनारसे व शंकरपाळे घेवुन झाले.

पं.उल्हास कशाळकरांचे गायन

एन.सी.पी.ए चे भरजरी , मदहोशी माहोलात पं.उल्हास कशाळकरांचे गायन व साथीला पं. सुरेश तळवळाकरांचे तबला वादन ऐकण्यासारखे दुसरे सुख नसावे, प्रयोजन होते पं. अरविंद पारिख यांच्या वाढदिवसाचे निमित्ये. पण काल रात्री ह्या सुखाची प्राप्ती साठी फार मोठी किमंत मोजावी लागली.

आपल्या आवडत्या कलावंताचे गाणे सुरु होण्याआधी असलेल्या दुसऱ्या कलावंताचे वादन सहन करण्यासारखी शिक्षा नसावी ( माफी चाहता हु ! ही माझी वैयत्तीक मते आहेत ) . त्यात आधी सारंगीवादनाचा कार्यक्रम , जो टाळण्यासाठी मी कार्यक्रम सुरु होण्याची वेळ साडेसहाची असतांना सुद्धा जाणिवपुर्वक रात्री आठ वाजता स्थळी पोहोचलो , अरे रामा, ये क्या , अभी अभी आलाप सुरु हुवा ! मग बंदीशी गावुन दाखवायच्या, लोरी गायची, राजस्थानी लोकगीत सुनवायचे , मग त्यांचा , सर्वांचा अर्थ, गर्भीत अर्थ विशाद करुन सांगायचा, मग त्यातुन फुरसदीने अधुन मधुन सारंगीची त्याला जोड देयाची हा प्रकार. ( फिर से माफी चाहता हु !) हा सारा प्रकार मनाला पिडपीड पिड असता बाहेरच्या खुला वातावरणात आलो, आयोजकांनी मस्त पैकी केवळ चहापानाचीच नव्हे तर फराळाची उत्तम सोय केलेली होती . त्याचा माफक प्रमाणात न लाजता आस्वाद घेणे झाले. ( आधी कार्यालयात हाणहाण हाणाले होते, पोट तुडुंब भरलेले होते, पण गव्हर्नर ची गाडी भरल्या रस्तावर आली कि पोलिस कसा रस्ता मोकळा करतात तसेच काहीतरी )

इंतजारी, बेकरार, दरबदर संपले, अखेर जिस चीज़ का इंतजार था ते , पं.उल्हास कशाळकरांचे स्वर्गीय गायन सुरु झाले. राग हमीर, बसंतबहार , आणि डोलणारा मी. क्या बात है !

आयुष्यात असे सुखदायक क्षण फारच थोडे येत असतात . आता राह पाहणे आहे, कोजागीरी पोर्णिमेच्या रात्री दि,२५ ला पं.उल्हास कशाळकरांचे अंधेरी येथे भवन्स कॉलेजात तालाब किनारे प्रियजनासमवेत गाणॆ ऐकण्याचे. पुर्ण चंद्रमा गगन बिराजे. त्या आधी पं. नयन घोष यांचे सतार वादन ही ऐकायचे आहे. ते सुद्धा मला आवडतात बर का . त्यांचे तबलावादन ही बऱ्याच वेळा ऐकले आहे हो.

अशी कोजागीरी आयुष्यात पहिल्यांदाच येणार आहे. चंद्र आणि मनोचंद्र दोन्ही ही मनोमनी खुलणार आहे.
चांदनी रात मोहब्बत मे हसी थी "फाकीर "
क्यो भाई, चांदनी रात तो मोहब्बत भरी है !

Thursday, October 18, 2007

पाहुणे , अनाहुत पाहुणे आणि अतिउत्साही

घरातील काही माणसांना एक दांडगी हौस असते, घरी आलेल्या पाहुणेमंडळींची चांगली सरबाई करण्याची, मग त्या आदरातिथ्यात ते काहीच कमी पडु देत नाहीत.
पाहुणे दिवाणखाण्यात गप्पा मारत बसले असले की मग त्यांची चुळबुळ सुरु होते. फर्मान सोडले जाते , अगदी सर्वांसमोर, घरातील गॄहिणीला, हे आण ते आण, हे कर ते कर.
वास्तविक पहाता तिने सर्व गोष्टींची योग्य ती आखणी केलेली असते, काय करायचे, काय नाही, काय टाळायचे याचे आराखडे बांधलेले असतात, बेत ठरवलेले असतात.
या अशा अनाहुत हुकुमांमुळे तिची चांगलीच पंचाईत झालेली असते, होत असते, तिच्या प्रातांतील ही अनावश्यक ढवळाढवळ तिच्या साठी फारच त्रासदायक असते, विषेशःता घरात त्या वस्तु नसतील, संपल्या असतील , किंवा महिना अखेर घरात पैश्याची चणचण असताना.
याची जाणीव हुकुमकर्त्यांना नसते ते आपल्याच विश्वात मशगुल असतात.
गंमत म्हणजे या झालेल्या पंचायतीची जाणिव नंतर करुन दिल्यानंतर ही पुढच्या प्रसंगी गृहस्वामिनीचा मान राखायची त्यांची तयारी नसते, भान नसते.
ता.क. - तो मी नव्हे.

जे जे उत्तम...

पुस्तक वाचतांना अनेकदा काही परिच्छेद आवडतात. डॉ. नरेंद्र जाधव यांचं अत्यंत गाजलेलं पुस्तक ’आमचा बाप आन आम्ही’ यातला उतारा. http://kathapournima.blogspot.com/ हा बॉग पहा.
---------------------------------------------------------------
त्या पुढे मला सुरु करायचे होते.
पिता पुत्रांच्या अशाही नात्यासंबधीची ही कथा.
मर्मभेद. लेखक शशी भागवत.
-----------------------------------------------------------------
दुसरा दिवस उजाडला तो साऱ्या सुर्यप्रस्थाच्या राजकारणाला प्रचंड हादरा देण्यासाठीच. कडेकोट पहाऱ्यात जागत असलेल्या प्रचंड आणि अभेद्य अश्या त्या अश्मदुर्गातुन युवराज कुणाल नाहीशे झाले होते.
एकामेकाच्या दॄष्टीस दॄष्टी भिडवुन दोघे पिता पुत्र कित्येक क्षण अनिमिष, अबोल अचल एकामेकासमोर उभे होते. दोघांच्याही नजरा तितक्याच कठोर होत्या. दोघांच्याही नजरेत एकामेकांविषयी तोच अविश्वास अभिप्रेत होता. आतापर्यंत शब्दांनी खाली गाडलेला एकामेकांविषयीचा संताप आणि तिरस्कार त्यांच्या नेत्रामधूनच चमक दाखवित होता.
तथापी, उद्वेग कॄष्णांताच्या नजरेत अधिक होता. पॄत्राने उद्धट्पणे पित्याच्या दॄष्टीस दॄष्टी भिडवुन चालविलेला हा अपमान कॄष्णांताचे ह्रुदय संतापाने, उद्वेगाने होरपळवित होता. शार्दुलसिंहाला त्याची जाणिव नव्हती असे नव्हे - पण आता तसल्या गोष्टींना भीक घालण्याच्या मनस्थितीत तो नव्हता. पंख फुटल्याबरोबर त्याने उंच झेप घेतली होती ; आता आपले पाय लागणारे जग खाली खोल खोल कुठे तरी राहीले, या जाणिवेने घाबरुन परत फिरण्याची त्याची तयारी नव्हती. दोघेही पितापुत्र एकामेकांना जोखीत होते - तोलीत होते.
पित्याने पुत्राला प्रश्न विचारला त्याला आता बराच वेळ झाला होता. पुत्राने मात्र अद्याप त्या प्रश्नाला काहीच उत्तर दिले नव्हते. उद्धटपणॆ उलट तो कॄष्णांताच्या डोळ्याला डोळा देवुन उभा होता.
एक दीर्घ निःश्वास टाकून महालाच्या मध्यभागी असलेल्या कोरीव पथ्यराच्या खांबावरुन कॄष्णांताने आपला हात काढुन घेतला.
"मी आपली आज्ञा घेण्यासाठी केव्हा पासुन तिष्ठ्त आहे, पिताजी महाराज ! शार्दुलसिंह आढ्यतेने म्हणाला.
"आणि मी देखील तुला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल ह्या अपेक्षेने तिष्ठ्त आहे. पुत्रा, युवराज कुठे आहेत ? " कॄष्णांताने पुत्राकडे रोखून पहात म्हणाला.
"आपला हा प्रश्न अपमानकारक आहे !"
"तुझी सध्याची वागणूक त्यापेक्षाही अपमानकारक आहे "
"युवराजांच्या नाहीशा होण्यामागे माझा हात आहे, असा भयंकर आरोप माझ्यावर करायचा आहे काय?"
"युवराज कुणाल कुठे आहेत ? " शार्दुलसिंहाने विचारलेल्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करुन कॄष्णांताने पुन्हा विचारले.
"मला माहीत नाही !" प्रत्येक शब्द तुटकपणे बोलत शार्दुलसिंह जोराने म्हणाला, "पिताजी , आता मीच आपल्याला पॄच्छा करतो.युवराज कुणाल कोठे आहेत?"
उद्धटपणाचा हा अतिरेक होतो आहे ! " कॄष्णांत म्हणाला.
"आपल्या पाताळयंत्रीपणाचा तर केव्हाच अतिरेक झाला आहे ! " शार्दुलसिंह तिरस्काराने म्हणाला. संतापाने कॄष्णांताच्या मुखातुन शब्द उमटेनात.
पिताजी महाराज, शार्द्रुलसिंह पुढे म्हणाला, "पाताळयंत्री राजकारणाचा आपला कित्येक वर्षाचा अनुभव असेल ! पण शार्दुलसिंहाला राजकारण कळत नाही अशी जर आपली समजुत असेल तर ती चुकीची आहे, प्रथमपासुन आपण आपल्या पुत्रावर अविशास दाखवित आला आहात - आणि आताच्या आपल्या त्या प्रश्नाने अविश्वासाचा अतिरेक करता आहात. आपणाकडे प्रत्यही प्रेमाने, आदराने पाहात आलेल्या आपल्या ह्या पुत्रावर वरकरणी जरी आपल्या विश्वास असल्याचे दर्शवित होतात तरी आतुन आपण आपल्या पुत्राचा दुःस्वास करीत होतात. अगदी कालपर्यंत हे सत्य मला अज्ञात होते. आणि जेव्हा सत्याच्या विद्युत्पाचा पहिला प्रहर माला हादरवुन गेला तेव्हा अगम्य वाटणाऱ्या आपल्या कॄत्याचा क्षणार्धात उलगडा झाला. सर्व गोष्टी सुर्यप्रकाशाइतक्या स्वच्छ दिसु लागल्या."
अंतर्मयी क्रोधाने फणफणणाऱ्या कॄष्णान्ताने तिरस्काराने म्हटले " स्वार्थाने अतिमहत्वाकांक्षी आणि अंध झालेल्या पोरा, असंख्य सुर्याच्या प्रखर प्रकाशातही एखादी गोष्ट तुला स्वच्छ दिसु शकेल की नाही याची मला शंका आहे. "
"आणि घनदाट अंधःकारात अंधालाही स्पष्ट दिसु शकणाऱ्या आपल्या कृत्यांवर प्रकाश टाकण्यासाठी एका तरी सुर्याची आवश्यकता आहे की काय, याची मला शंका आहे "
"शब्दच्छल पुरे"
" हा शब्दच्छल नव्हे. वस्तुस्थितीबद्दलचा तर्क आहे !"
"तो ही पुरे !"
का ? सत्य आपणास आताच भेडसावू लागले ?
( शेवटी )
"आपणास एकदमच सर्व गोष्टींची विस्मॄती पडाली काय ? महाराज , भरपुर तयारी करुन मी आपणाविरुद्ध बंड करण्याबद्द्ल मला आदेश दिला नव्हता काय ? "
"मला वाटते त्या बेतात बदल करण्याचा समय आता आला आहे"
तथापि, अद्याप मला तसे काही वाटत नाही, प्रणाम पिताजी महाराज !"
नाट्यपुर्ण प्रणाम करुन कुत्सितपणे हसतच शार्द्रुलसिंह महालाबाहेर पडला.
महालात राहीला तो एकटा कृष्णांत ... दुर चाललेल्या पुत्राच्या पाठमोऱ्या आकॄतीकडे पाहात ......... ! मानवी नेत्रातुन ओसंड्णाऱ्या क्रोधात जर तितके सामर्थ्य असते तर कृष्णांताच्या नेत्रातील विखाराने शार्द्रुलसिंह केव्हाच ठार झाला असता.
========================================
मी ही गोष्ट येथे खाली ठेवतो. शेकोटीजवळ रात्री गप्पागोष्टी करत बसलेली माणसे जशी मागचा धागा पकडुन खाली ठेवलेली गोष्ट पुढे सुरु करतात ती आपण करायची आहे.

Monday, October 15, 2007

पद्धत

पण मी काय म्हणतो नाना, आपल्या कडे जशी मोठी माणसे (वयाने) लहान मुलांबरोबर लुटुपुटुचे खेळ खेळत असतील तर त्यात जाणिवपुर्वक लहान मुलांना जिंकुन देण्याची पद्दत आहे तशी ऑस्ट्रेलियात नाही वाटत ?
आणि काय हो , तो जगजेत्ता विश्वनाथन आनंद आपल्या घरी भारतात परतला का हो ?
काही कळलच नाही बुवा बघा. कोणी त्याची विजययात्रा वगैरे काढल्याचे काही कळल का ? म्हणजे नसेल काढली तर एक प्रकारे योग्यच की.
का आपला तो तिथे पराक्रम गाजवतोय आणि आम्ही आपले चेंडुफळीतच मश्गुल ?

Sunday, October 14, 2007

घटस्थापना


गाय नव्हे ही , ही तर गोमाता


मला भेटलेले देवदुत.

डॉ. जेम्स तिवडे.

तुमची गुढग्याची वाटी बदलायलाच हवी, वीस-बावीस वर्षा पुर्वी गुढघेदुखीने त्रस्त झालेल्या माझ्या वडीलांना एका प्रख्यात तज्ञाने सल्ला दिला, दुसरा पर्यायच नाही, चालुही न शकणाऱ्या वडीलांना भेटले तेव्हाचे नवखे डॉ. जेम्स तिवडे, एक साधी सोपी लहानशी शस्त्रक्रिया आपण करुन पाहुया काय होते ते, नाहीच बरे वाटले तर तुम्ही मोठाली शस्त्रक्रिया करायला मोकळे आहातच. त्या छोट्याश्या शस्त्रक्रिया वर आजही वडील दुनिया चालतात.

डॉक्टरची जबाबदारी केवळ रुग्ण बरा होवुन घरी गेला तरी संपत नाही, घरी त्याचे पुनर्वसन, काळजी घेणे कसे काय चालले आहे, त्यान व्यायाम कोणता करयला हवे हे नंतर आवर्जुन आमच्या घरी येवुन सांगणारे व त्या साठी कोणताही मोबदला न घेता येणारे डॉ. या पॄथ्वीलोकावर विरळाच.

त्या नंतर माझ्या आईचे दोनदा हिप जॉईंट चे फ्रक्चर साठी व एकदा त्यात इंफेक्श्न झाल्याने आत बसवलेली चकती काढुन टाकण्याची शत्रक्रिया त्यांनीच केली. त्यात परत एकदा तिचा पाठीचा मणका फ्रक्चर झाला असता तीची काळजी ही घेणारे तेच.

डॉ. विभास मोडक.

क्रिकेट खेळतांना सायंकाळी माझ्या चिरंजीवाने लहानपणी हात फ्रक्चर करुन घेतला. डॉ. जेम्स तिवडे नेमके परदेशी गेलेले. मुलाच्या डॉ. नी सांगीतले इकडे तिकडे कोठेही जावु नका, याला घेवुन डॉ. विभास मोडक कडेच जा. डॉ. नेमके ठाण्याला लग्नाला गेलेले. त्यांना दुरध्वनी केले. ते म्हणाले आम्ही लवकर निघतो, घरी आल्या वर तुम्हाला दुरध्वनी करतो, तुम्ही मुलाला घेवुन माझा घरी या. रात्री त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी बोलावले, तपासले, उपाशी मुलाला खावु घातले व दुसऱ्या दिवशी प्लस्टर घातले. त्यांचा व त्याच्या आईचा, बायकोचा हा दयाळु पणा आयुष्यभर विसरणॆ कठीण आहे. नंतर डॉ. जेम्स तिवडे बरोबर माझ्या आईच्या शस्त्रक्रियेच्या वेळी डॉ. विभास मोडक देखील होते.
डॉ. संजय गोडबोले.

मोठया डॉ. ना त्याचे रुग्ण वेळीअवेळी लहानसहान आजरपणासाठी परेशान करत असतील तेव्हा ? आम्हीच ते परेशानकर्ते. तरी देखील हसतमुख चेहऱ्याने आमच्या चिंता, काळजी व रोग दुर करणारे डॉ. संजय गोडबोले यानी एकदा माझ्या आईचे प्राण वाचवले. बऱ्याच वर्षापुर्वी तिला अटॅक आला, तत्काळ आय,सी.यु त दाखल केले. हा हार्ट अटॅक नव्हे , पण जे मी निदान केले आहे ते चांगले नव्हे, आपण प्रयत्नांची शर्थ करुया, हे ऍकुट पॅनक्रायटीस आहे ( त्या काळात याचे प्रमाण बहुदा नगण्य होते, फारसे ऐकीवातही नसावे ) हे मला रात्री दोन वाजता सांगत त्यांनी माझ्या आईचे प्राण वाचवले. दिड-दोन महीने ती रुग्णालयात होती.
हे सर्व डॉक्टर म्हणजे परमेश्वरच की.

मला भेटलेले देवदुत.


डॉ. पी.जी.समदानी.

मी सातवी मधे होतो, मलेरिया झाला होता. हिमोग्लोबिनची पातळी ३.४ वर आलेली होती. मी जवळजवळ कोमातच होतो. दोन एक महिने रुग्णालयात काढले. माझा जिव वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली ते तरुण, नवोदीत डॉ. पी.जी.समदानी.

डॉ. सुभाष दलाल.

मी, माझी बहीण आणि भाऊ , तिघांची ही शस्त्रक्रिया करुन प्लिहा काढुन टाकली आहे. हे सर्व आम्ही शाळेत ८ - ५ -४ थीत असतांना झाले. निदान झाले होते हेरीडेटरी स्लिरोसायटोसीस. वडलांना कधीच त्याचा त्रास झाला नाही, अजुनही होत नाही. शस्त्रक्रिया करुन आमचा जीव वाचवणारे सर्जन होते डॉ. सुभाष दलाल. आमची आर्थीक परीस्थिती लक्षात घेता त्यांनी आपली फी देखील खुपच कमी आकारली.

डॉ. सुनिल पारीख.

या काळात आमची रक्त तपासणी, त्याचे योग्य ते निदान व औषधोपचार करणारे तज्ञ डॉ. होते डॉ. सुनिल पारीख. १५-२० बर्षानंतर त्यांच्या कडे गेलो असतांना त्यांनी आम्हाला लगेच ओळखले, आमची केस सांगीतली व जपुन ठेवलेले आमचे तेव्हाचे रिपोर्ट , केस पेपर काढुन नविन पान सुरु केले.
डॉ. प्रकाश जोशी.

१९८४ साली निवडणुकी निमीत्त्ये १-२ महिने सतत बाहेर होतो. पाठीशी लागली ती ऍकुट ऍसीडीटी, एका प्रख्यात डॉ.ने अल्सर झाल्याचे सांगुन जवळजवळ एक-दिड वर्षे सिमीडीडीन व जेलुसील चा मारा चालु ठेवला. खाणे जवळजवळ तुटलेच होते, हवालदिल अवस्थेत एकाने नाव सुचवले ते डॉ. प्रकाश जोशी यांचे. इंडोस्कोपी केल्यानंतर त्यांनी सांगीतले "तुम्ही उपाशी आहात आधी खाली कामत मधे जावुन जेवुन या " पण डॉ. होटेल मधे ? तुम्हाला काहीही झालेले नाही "डिलेड गॅस्टिक मोटीलीटी , रिप्लेक्स इसोफजटीस" आहे. ही औषधे घ्या चारआठ दिवसात बरे व्हाल. केवढे मोठे डोक्यावरचे ओझे उतरले.

डॉ.सरोजबेन पारेख व डॉ. प्रेसवाला.
एकाच वेळी घरातील चौघे जण रुग्णालयात असणे, ते ही गंभीर अवस्थेत. शाळेत जाणारी बहीण न्युमोनीयाने , भाऊ निदान न झालेल्या तापाने रुग्णालयात दाखल, तशात त्याच्या मेंदुत गाठ येवुन एक बाजु लुळी पडत चाललेली, वडील दिल्लीस कार्यालयीन कामासाठी गेलेले, त्यांच्या पासुन ही गोष्ट लपवुन ठेवलेली, त्यांच्या करीयर चा प्रश्न. ते परत आले ते गंभीर अवस्थेत काविळ घेवुन, इकडे अविवाहीत मामा पण काविळेने आजारी, मग त्या दोघांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करणे.
त्यांना परत आणले ते डॉ.सरोजबेन पारेख व डॉ. प्रेसवाला यांनी. जवळजवळ दोन महीने घर काय असते ते आम्ही विसरुनच गेलो होते

ड्रायव्हरांची धुंदी, बेशिस्त सुरूच पोलिसांना वाढीव काम!



(Sample of roads in Dubai and AbuDhabi)
म. टा. प्रतिनिधी वाहनचालक दारूडे, बेशिस्त, म्हणून मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाला वाढीव काम करावे लागते आहे... जानेवारी ते ऑगस्टपर्यंत केलेल्या कारवाईत 'नो पाकिर्ंग'च्या ४,५९,२४० केसेस नोंदवल्या गेल्या; तर, मद्यपी ड्रायव्हरांविरोधात हाती घेतलेल्या खास मोहिमेचा आकडा ७८६१ वर पोहोचला आहे! नो पाकिर्ंग, अतिवेगाने जाणाऱ्या गाड्या, सिग्नल तोडणे, हेल्मेट न घालणे अशा गोष्टींवर वाहतूक खात्याचे पोलिस बडगा दाखवत असतात. मात्र, प्रामुख्याने खासगी वाहनचालकांची 'चलता है' ही मनोवृत्ती पुन्हा दिसते.

मला वाटते -


जर केवळ आठ महिन्यामधे वाहतुक संबधी नियम/कायदे मोडणाऱ्यांची संख्या लाखोंच्या (१,००८,५४०) घरात जात असेल, तर मग तो दोष केवळ नियम भंग करणाऱ्यांचा असेलच असे नाही. त्या कायदा मधे सुध्या त्रुटी असु शकते त्या मधे सुधारणा, फेरविचार करण्याची गरज असु शकते.


कुठेतरी कोपऱ्यात उभे राहुन, गाडी आड लपुन राहुन, नियम मोडण्याची वाट पहात राहत मग गाडी चालकांना पकडुन, त्यांच्या कडुन तडजोड शुल्क (दंड) स्विकारण्या पेक्षा जर वाहतुक पोलीस सर्वांसमोर दिसेल असे, आपले अस्तिव जाणवुन देत उभे राहीले तर नियमभंग करणाऱ्यांची संख्या नक्कीच कमी होण्यास हरकत नाही. मध्यंतरी पुण्याच्या सकाळ मधे एक लेख वाचल्याचे स्मरते. वाहतुक पोलीसांना तडजोड शुल्क स्विकारण्याचा अधिकार नाही, तो फक्त आरटीओ अधिकाऱ्यांना व कोर्टालाच आहे.


मुंबईची लोकसंख्या बेसुमार वाढली आहे, वाहने विकत घेणे ही आता केवळ गर्भश्रीमंतांची चैन राहीलेली नसल्यामुळे रस्तावर आलेल्या गाडयांची संख्या तर कैक पटीत फोफावली आहे. त्या तुलनेने गाडया उभ्या करण्यासाठी जागा वाढवल्या गेलेल्या नाहीत, आपल्या शहरनियोजनात हे सारे बसत नाही. परत गाडया उभ्या करण्याच्या जागा ठरवल्या गेलेल्या आहेत कैक वर्षापुर्वी, त्यात नवीन भर पडलेली नाही, मग गाडी चालकांनी गाडया उभ्या करायच्या कोठे ? मुंबईतील नेहमीच होणारी वाहतुक कोंडी लक्षात घेता वहान चालवणे हे काही आराम दायक राहीलेले नाही. लक्ष विचलीत होणास मोबाइल प्रमाणे गाडीत लावली गेलेली गाणी, शेजारी बसलेल्या व्यक्तीपाशी संभाष्ण करणे, वाहनचालकांसाठी लावले गेलेले जाहीरातीचे साईन बोर्ड वाचणे हे देखील कारणीभुत असतात.


मद्यपी चालक , बेदरकार चालक, बेफाट वेगाने वहान हाकणारे मस्तीखोर, मिजासखोर चालन यांच्यावर तत्काळ कठोर कारवाई व्हायलाच हवी या बद्द्ल दुमत नसावे. त्यांनी व इतरांनी, दुसऱ्यांच्या सुरक्षीततेला धक्का लागला जावु शकेल असे गुन्हे करण्यास धजवता कामा नये.


सिग्नल जवळील पांढऱ्या पट्यावर गाडी थांबवु नये हा एक नियम, पण परत अफाट रहदारी असणाऱ्या शहरात हे जरा जडच जाते. दुबईत चौकापलीकडली वाहतुक, रहदारी, सुरळीत नसेल, जर तेथे वहाने उभी असतील, जरी तुमचा हिरवा सिग्नल चालु असेल, तर वहान चौकात आणण्याची परवानगी नाही. चौकात वहाने अडुन रहाता कामा नये. पण आपल्या कडे वहानांची संख्या व रत्याची रुंदी व परिस्थीती लक्षात घेता हे जरा जडच जाणार आहे. हेल्मेट चा वापरासंबधीच्या सोयीगैरसोयी, त्या पासुन मिळणारी सुरक्षितता या विषयी सुरवातीच्या काळात वर्तमानपत्रातुन बरीच चर्चा झाली होती. हेल्मेट न घातल्यामुळे दंड भरणाऱ्यांची संख्या २,५१,००० आहे. दुसऱ्यांच्या सुरक्षीततेच्या विचार करता अकस्मात लेन तोडु नये, पण योग्य कारणासाठी, योग्य रितीने ही लेन बदलल्यास ? या रस्तावर नक्की किती वेग मर्यादा आहे ? हे कधी वाहान चालकाला स्पष्ट पणे कळणे कठीण असते. त्याची जाणीव करुन देण्याच्या पाटया रस्त्यावर व्यवस्थीत लावल्या गेल्या पाहीजेत.


लायसन्स नसणे, रिन्यु न करणे यासाठी जर लोकांची सोय लक्षात घेता ती देण्याची पद्ध्यत, जागा बदलली तर याचे प्रमाण नक्कीच कमी होईल. सर्व वाहतुक चौक्या संगणाकाने मुख्य कार्यालयास जोडणे, संगणीकरण करणे, तुमच्या घराजवळील, कार्यालयाजवळील वाहतुक चौकीत परवाना देण्याची, नुतनीकरणाची सोय करणे, याचा विचार करायला हवा.


दुसरा मुद्दा म्हणजे अनेक ठिकाणी वाहतुक पोलीस चौकी हातभर अंतरावर असतांना सुद्ध्या, किंवा सतत पोलीस त्या चौकात मौजुद असतांना सुद्ध्या अनेक बाबीं कडॆ दुर्लक्ष कसे काय केले जाते ? उ.दा. चर्चगेट ला इरॉस चित्रपटगॄहाच्या बाहेरील परीसर, अगदी बसथांब्यावर देखील सर्रास गाडया उभ्या केलेल्या असतात, वीर नरीमन चा पिज्झेरीयाचा कोपरा, पदपाथ वाहने उभे करण्यास दिलेला ? इं. आणि पोलीसच जेव्हा वाहतुक नियम मोडतात तेव्हा ? कितीतरी मुंबई पोलीस, वाहतुक पोलीस हेल्मेट न घालता दुचाकी वाहन चालवताना रस्तात दिसतात, त्यांच्या गाडया बेलाशक कोठेही वळताना उभ्या केलेल्या, वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने जाताना दिसतात


गरज आहे ती आंतरराष्टीय दर्ज्याचे रस्ते निर्माण करण्याची, सुखसुविधा पुरवण्याची, सिग्नल व्यवस्थेचे आधुनीकीकरण करण्याची. पोलीस आणि वाहनचालक या दोघांची ही मानसीकता बदलण्याची.


आणि हे सर्व होत असतांना पादचाऱ्यांच्या सुरक्षीतचेचा, प्राथमिकतेचा विचार त्यांना अग्रभागी ठेवुन करण्याची गरज आहे.


एक माझा अनुभव. मी यामाहा वर. स्थळ चर्चगेट, इरॉस जवळचा सिग्नल, नुकताच पहीला पाऊस पडुन गेलेला, रस्ता निसरडा झालेला, सिग्नल अंबर झालेला, मी काळ्यापाढऱ्या पट्यावर, रस्तापार करणाऱ्यांची संख्या अफाट, क्षणभरात समोरील वाहतुक सुरु झालेली, माझ्या पुढे पर्याय दोन नियम पाळण्यासाठी पादचारी व मी व इतर वाहक यांचा जीव धोक्यात घालत न थांबता पुढे निघुन जाणे, कारण अवधी फारच थोडा किंवा दुसरा पर्याय, आहे त्या जागी उभे रहाणे. मी दुसरा पर्याय निवडला. त्या दिवशी श्री. राजु परुळकरांनी त्यांच्या लेखात ( लोकप्रभा १६.१०.०७) म्हटल्या प्रमाणे "कोटा " पुर्ण होणे असेल, मला व असंख्य वाहन चालकांना दंड भरायला लागला.


प्रसंग दुसरा, स्थळ दुसरे, मी व यामाहा तीच. प्रसंग ही जवळजवळ तसाच. पण मी अनुभवाने शहाणा झालेलो. मी मागचा सिग्नल लाल होण्यापुर्वी पार केलेला. चौकात तर थांबचचे नसते, येत नाही, वाहतुक अधीकाऱ्यांनी मला दंड भरायला लावला. अखेरीस ते जे म्हणतील तेच खरे. बहुधा केवळ वाहतुकीसंबधी नियम तोडले तर अपील करता येत नसावे.


प्रसंग तिसरा -मी सिग्नल चक्क इतरांबरोबर तोडला, आम्हाला सर्वांना दुचाकीवहाने बाजुला घ्यायला सांगीतली. मी तत्काळ गुन्हा कबुल केला. दंड भरतो सांगीतले व या गुन्हासाठीचा रु. १०० दंड भरण्यासाठी दिले. पावती मागीतली. थांबा. थोडया वेळाने रु. ५०. परत मिळाले.


नियम मोडणाऱ्यांची संख्या


नो पार्कींग ४,५९,२४०
वेगमर्यादा ओलांडणे ९,९००
सिग्नल तोडणे १,५५,०००
लेन तोडणे ५८,०००
मोबाइलवर बोलताना चालवणे १८,०००
हेल्मेट न घालणे २,५१,०००
सेप्टी बेल्ट न वापरणे २१,४००
नंबर प्लेट संबधी १८,०००
लायसन्स नसणे, रिन्यु न करणे १८,०००
एकुण १,००८,५४०

Saturday, October 13, 2007

श्री. जयतीर्थ मेवुंडी

माझ्या आयुष्यात कायकाय, कितीतरी , आणि केवढ्या गोष्टी करायच्या, ऐकायच्या, पहायच्या, राहुन गेल्या आहेत किंवा आता पर्यंत मी केवढ्या मोठया स्वर्गीय आनंदाला मुकलो होतो, आहे, विनाकारण, सबळ सबबी शिवाय , केवळ माझा मुर्खपणामुळे, माझा आळशी पणा मुळे, केवळ बायकोला "तुझा मुळेच हे राहुन जाते " दोष देत, याची सारी जाणीव आज श्री. जयतीर्थ मेवुंडी यांनी गायलेला केदार राग ऐकताना झाली.
किती वेळा त्यांचा मुंबईत कार्यक्रम झाला असेल . पण मी त्यात कोठे होतो ? आणि का नव्हतो ?

आपल्याच विश्वात, समस्यात, गुरफटलेलो मी, आता तरी जागे पणी जीवन जगायला हवे.

Shri Shailesh Damle

Shri Shailesh Damle has uploaed excellent Mp3 files of Hindustani Classical Sangeet into esnips.com

अभिनंदन - कृतिशील पर्यावरणवादी!

सकाळ मधुन

नवी दिल्ली, ता. १२ - जागतिक तापमानवाढीच्या संकटाविरुद्ध लढणारे आणि मानवजातीला त्याच्यापासून असलेल्या धोक्‍याबद्दल जनजागृती करणारे अनेक जण असतील...
डॉ. राजेंद्र पचौरी हे त्यातीलच एक. ख्यातनाम पर्यावरणवादी आणि विशेष म्हणजे कृतिशील विचारवंत. मांस उत्पादनामुळे पर्यावरणाची हानी होते; म्हणून शाकाहारी बनलेले...

संयुक्त राष्ट्रसंघाच्या "इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्‍लायमेट चेंज' (आयपीसीसी) या संस्थेला आज अल गोर यांच्याबरोबरच शांततेचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे डॉ. पचौरी हे भारतीय नाव नोबेलच्या "रेकॉर्ड बुक'मध्ये नोंदले गेले. डॉ. पचौरी हे एप्रिल २००२ पासून "आयपीसीसी'ची धुरा सांभाळत आहेत. विशेष म्हणजे, "आयपीसीसी' हे देखील त्यांचेच "ब्रेन चाइल्ड'. त्यांचीच संकल्पना राष्ट्रसंघाच्या जागतिक हवामान संस्थेने (डब्ल्यूएमओ) आणि "संयुक्त राष्ट्रसंघाचा पर्यावरण कार्यक्रम' (यूएनईपी) यांनी उचलून धरली आणि १९८८ मध्ये ती प्रत्यक्षातही उतरली गेली.
माझा मुलालाही पर्यावरण व जागतिक तापमानवाढ या विषयात शिक्षण घ्यायचे आहे.

नंदी बैल- खेळ दाखवणार, भविष्य सांगणार

नंदी बैल - विस्म्रुतीत जात चाललेला






Friday, October 12, 2007

Blog by Dr. Dr. Shriniwas Deshpande, MS

http://gisurgery.blogspot.com/

I have discovered great blog by Dr. Shriniwas Deshpande. MS

The Ultimate Warnig

Few days back one young lady offered me a seat in B.E.S.T bus, which is reserved for "SENIOR CITIZENS"
I must reduce my weight.

Thursday, October 11, 2007

हार दे इंडिया.

अती खाणे आणि मसणात जाणे. ज्यानी कोणी ही म्हण लिहीली त्याची तारीफ करायला हवी.
अती खाण्याने अजीर्ण झाले की निसर्गोपचार तज्ञ सोपा उपाय सांगतात. पोटाला जरा विश्रांती द्या, लंघन करा. पण क्रिकेट ज्वराने पछाडलेल्या या देशाला कोण सल्ला देणार ?
पण मी काय म्हणतो नाना ! मुळ्ळातच आपण या सणकी लोकांबरोबर खेळायचेच कशाला ? खरतर या ऑस्टेलियन संघावर सर्वांनीच सामुहीक बहिष्कारच घालायला हवा नाही का ? ही बदमाश माणसे दुसऱ्यांना जिंकुनच देत नाही म्हणजे काय ? जरा अतीच आहेत !
तरी म्हणत होतो या आपल्या संघाची २०-२० जिंकल्यानंतर वरात काढु नकात, त्यांना वाटेल आता आपला पुढल्या २० वर्षाचा कोटा पुरा झाला, पण माझे कोण ऐकेल तर शप्पथ.
लिहीणार - फुकटचे सल्लागार.

Wednesday, October 10, 2007

Credit Cards

Having Credit Cards, its a problem by itself, even if one does not hold any credit cards, it's still worst.

I received message on my mobile from "dbAlerts" , of Deutsche Bank, on 09/10/07 at 4.00 pm, which reads as below.

"Statement for your DB Card #XXXX2007 dated 08-Oct, due 28-Oct will be delivered shortly. Total and min amounts due are Rs.5,126.29 and Rs.256.32 "

This came to me as surprise as, any application for the issuance of Credit Card was not made by me and I do not hold any credit card including Deutsche Bank Credit Card.
I called up the bank, I was told to ignore the SMS by the lady over the phone.
May be this is another scam.

Monday, October 08, 2007

देवटाके, सिंहगड

काल नको नको म्हणत असताना आमची शासक आम्हा सर्वांना घेऊन सिंहगडला भेट देण्यासाठी जबरदस्तीने घेवुन गेली.
हल्ली सिंहगडावर जाण्याची माझी ईच्छाच नसते. याची दुरावस्ता बघवत नाही. सगळी बजबजपुरी. "टुरीस्ट" पेक्षा जास्त येथे झुणकाभाकर, कांदाभजी आदी विकणाऱ्यांचीस संख्या जास्त असावी. अर्थात आम्हास ऐतीहासीक वास्तुंबद्द्ल फारसे ममत्व नसतेच म्हणा.
मी या शेंगा खाल्या नाहीत मी ही टरफले उचलणार नाही हे बाणेदारपणॆ सांगण्याऱ्या लोकमान्य टिळकांचे वास्तव्य येथे होते व त्यांचा बंगला अजुन ही येथे आहे याची जाणीव ना वाफलेल्या शेंगा विकणाऱ्यांना ना खावुन सर्वत्र टरफल्यांचा सडा करणाऱ्यांना. बरेच कोटी रुपये या परीसराची सुधारणा करण्यासाठी शासन खर्च करणार आहे हे मध्यंतरी वर्तमानपत्रात वाचुन राहीलो होतो. मुहर्त अजुन मिळाला नसावा बहुतेक. हे एक उदाहरण झाले.
मग गेलोच आहे तर सर्वांना हौसेने देवटाक्याचे पाणी पिण्यासाठी मुद्दाम घेवुन गेलो. पाणी नेहमीसारखे थंडगार होते. पण रुचकर ? चवदार ? या पाण्याचे नैसर्गीक अंगीभुत गुण कोठे हरवले होते देव जाणॆ .
वरुन मला वाटते हत्ती टाक्यातुन पाझरलेले किंवा ईतर सांडपाणी त्यात मिसळले जात असावे. कारण मी या देवटाक्यात वरुन पाणी पडताना पाहीले.


अ.

अस का ?

बऱ्याच वेळा आपल्या कडॆ लिहीण्यासाठी, सांगण्यासारखे बरेच काय असते . तर केव्हा काहीच नसते असे का होते ?

Sunday, October 07, 2007

टोपण नाव

अस्मादिकाने हरेक्रिश्नाजी हे टोपण नाव का व कशासाठी घेतले हां आता प्रश्न पडला आहे । उगाचच पोक्त झाल्या सारखे वाटायला लागले आहे। सुरवातीच्या काळात घेतलेले हे टोपण नाव आता वाटते बदलावे।

Friday, October 05, 2007

Ek safar Mohamedali Road ki - During holy month of Ramzaan

Tour De Suleman Usman Mithaiwala

It's a high time to visit Suleman Usman Mithaiwala, Below Minara Masjid, Mohamedali Road, during the holy month of Ramzan to break Roza, for Ferni. Being veggie, we stick to Ferni only. The shop is very famous for Malpuva, Kala Jamun, all sorts of sweets.