Sunday, October 14, 2007

मला भेटलेले देवदुत.


डॉ. पी.जी.समदानी.

मी सातवी मधे होतो, मलेरिया झाला होता. हिमोग्लोबिनची पातळी ३.४ वर आलेली होती. मी जवळजवळ कोमातच होतो. दोन एक महिने रुग्णालयात काढले. माझा जिव वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली ते तरुण, नवोदीत डॉ. पी.जी.समदानी.

डॉ. सुभाष दलाल.

मी, माझी बहीण आणि भाऊ , तिघांची ही शस्त्रक्रिया करुन प्लिहा काढुन टाकली आहे. हे सर्व आम्ही शाळेत ८ - ५ -४ थीत असतांना झाले. निदान झाले होते हेरीडेटरी स्लिरोसायटोसीस. वडलांना कधीच त्याचा त्रास झाला नाही, अजुनही होत नाही. शस्त्रक्रिया करुन आमचा जीव वाचवणारे सर्जन होते डॉ. सुभाष दलाल. आमची आर्थीक परीस्थिती लक्षात घेता त्यांनी आपली फी देखील खुपच कमी आकारली.

डॉ. सुनिल पारीख.

या काळात आमची रक्त तपासणी, त्याचे योग्य ते निदान व औषधोपचार करणारे तज्ञ डॉ. होते डॉ. सुनिल पारीख. १५-२० बर्षानंतर त्यांच्या कडे गेलो असतांना त्यांनी आम्हाला लगेच ओळखले, आमची केस सांगीतली व जपुन ठेवलेले आमचे तेव्हाचे रिपोर्ट , केस पेपर काढुन नविन पान सुरु केले.
डॉ. प्रकाश जोशी.

१९८४ साली निवडणुकी निमीत्त्ये १-२ महिने सतत बाहेर होतो. पाठीशी लागली ती ऍकुट ऍसीडीटी, एका प्रख्यात डॉ.ने अल्सर झाल्याचे सांगुन जवळजवळ एक-दिड वर्षे सिमीडीडीन व जेलुसील चा मारा चालु ठेवला. खाणे जवळजवळ तुटलेच होते, हवालदिल अवस्थेत एकाने नाव सुचवले ते डॉ. प्रकाश जोशी यांचे. इंडोस्कोपी केल्यानंतर त्यांनी सांगीतले "तुम्ही उपाशी आहात आधी खाली कामत मधे जावुन जेवुन या " पण डॉ. होटेल मधे ? तुम्हाला काहीही झालेले नाही "डिलेड गॅस्टिक मोटीलीटी , रिप्लेक्स इसोफजटीस" आहे. ही औषधे घ्या चारआठ दिवसात बरे व्हाल. केवढे मोठे डोक्यावरचे ओझे उतरले.

डॉ.सरोजबेन पारेख व डॉ. प्रेसवाला.
एकाच वेळी घरातील चौघे जण रुग्णालयात असणे, ते ही गंभीर अवस्थेत. शाळेत जाणारी बहीण न्युमोनीयाने , भाऊ निदान न झालेल्या तापाने रुग्णालयात दाखल, तशात त्याच्या मेंदुत गाठ येवुन एक बाजु लुळी पडत चाललेली, वडील दिल्लीस कार्यालयीन कामासाठी गेलेले, त्यांच्या पासुन ही गोष्ट लपवुन ठेवलेली, त्यांच्या करीयर चा प्रश्न. ते परत आले ते गंभीर अवस्थेत काविळ घेवुन, इकडे अविवाहीत मामा पण काविळेने आजारी, मग त्या दोघांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करणे.
त्यांना परत आणले ते डॉ.सरोजबेन पारेख व डॉ. प्रेसवाला यांनी. जवळजवळ दोन महीने घर काय असते ते आम्ही विसरुनच गेलो होते

No comments: