Monday, October 08, 2007

देवटाके, सिंहगड

काल नको नको म्हणत असताना आमची शासक आम्हा सर्वांना घेऊन सिंहगडला भेट देण्यासाठी जबरदस्तीने घेवुन गेली.
हल्ली सिंहगडावर जाण्याची माझी ईच्छाच नसते. याची दुरावस्ता बघवत नाही. सगळी बजबजपुरी. "टुरीस्ट" पेक्षा जास्त येथे झुणकाभाकर, कांदाभजी आदी विकणाऱ्यांचीस संख्या जास्त असावी. अर्थात आम्हास ऐतीहासीक वास्तुंबद्द्ल फारसे ममत्व नसतेच म्हणा.
मी या शेंगा खाल्या नाहीत मी ही टरफले उचलणार नाही हे बाणेदारपणॆ सांगण्याऱ्या लोकमान्य टिळकांचे वास्तव्य येथे होते व त्यांचा बंगला अजुन ही येथे आहे याची जाणीव ना वाफलेल्या शेंगा विकणाऱ्यांना ना खावुन सर्वत्र टरफल्यांचा सडा करणाऱ्यांना. बरेच कोटी रुपये या परीसराची सुधारणा करण्यासाठी शासन खर्च करणार आहे हे मध्यंतरी वर्तमानपत्रात वाचुन राहीलो होतो. मुहर्त अजुन मिळाला नसावा बहुतेक. हे एक उदाहरण झाले.
मग गेलोच आहे तर सर्वांना हौसेने देवटाक्याचे पाणी पिण्यासाठी मुद्दाम घेवुन गेलो. पाणी नेहमीसारखे थंडगार होते. पण रुचकर ? चवदार ? या पाण्याचे नैसर्गीक अंगीभुत गुण कोठे हरवले होते देव जाणॆ .
वरुन मला वाटते हत्ती टाक्यातुन पाझरलेले किंवा ईतर सांडपाणी त्यात मिसळले जात असावे. कारण मी या देवटाक्यात वरुन पाणी पडताना पाहीले.


अ.

No comments: