Wednesday, October 31, 2007

स्वातंत्र

सद्ध्या स्वातंत्र आम्ही मनमुराद उपभोगतोय. १९ वर्षे, जे मिळायला १९ वर्ष जावी लागली, क्षणिक का होईना, आठवडाभराकरता का होईना ,पण ते मिळालय, हे असे क्षण एकत्र कुटुंब पद्धतीत मिळणे कठीणच असतात, आधी वडीलधाऱ्याचा खडा पहारा , त्यात मग मुलाचा जागता. एकामेकासाठी वेळ काढणे, निवांतपणी, म्हणजे काय हे विसरुनच गेलो होतो, काल चक्क आम्ही उद्यानात फिरायला गेलो ,लग्नाआधी जायचो तसे, सिंहगड रस्तावर जपानी पद्धतीचे एक सुरेख उदयान बनले आहे, तयार होवुन जवळजवळ पावणेदोन बर्षे झाली असतील , नेहमीच्या रस्तावर असुन देखील काल पहिल्यांदाच गेलो.
(क्र.)

3 comments:

आशा जोगळेकर said...

हे म्हणजे अगदी एपीटाइझरच झालं. पुढे वाचण्याची उत्सुकता आहे.

कोहम said...

Long live freeedom

Vaishali Hinge said...

ataa thambu nakaa. sukhaachyaa kshnanaa asech vadhavaa ayushya sundar aahe ho ki naahi?